Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 28, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through June 28, 2007 « Previous Next »

Swa_26
Wednesday, May 30, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम विंग के उपरहि बैठेंगे. !!!!!!

दिनेशदा... तो सरदारजी होता का?

Prajaktad
Wednesday, May 30, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message





Dineshvs
Wednesday, May 30, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता मस्त आहेत होर्डिंग्ज. कुठे आहेत ?
लिंबु मीही बसलोय त्या विमानात. पण बहुतेक १९६७ साली !!!
आता कोल्हापुरच्या रंकाळ्याजवळही तसले विमान ठेवलेय. पण ते मोबाईल आहे.


Kedarjoshi
Wednesday, May 30, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे म्हण्जे पुणेरी पाट्यां पेक्षा लय भारी. जीयो प्राजक्ता, ते ईथे दिल्या बदल.

Gobu
Wednesday, May 30, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्त,
कसे केले बुवा तु हे कलेक्शन?
एकदम छान!


Prajaktad
Wednesday, May 30, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,गोबु आणी केदार मला हे मेल मधुन आले . त्यामुळे कुठले आहे ते सांगता येणार... कुठल्या तरि metro सिटिपैकी असावे.

Chioo
Tuesday, June 05, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई-कोल्हापूर या रूटवर कोणी deccan airlines ने प्रवास केला आहे का? flight कशी आहे? deccan ने बाकी ठिकाणी प्रवास केला आहे. पण या रूटवर नाही. आम्ही जुलैच्या शेवटी जायच्या विचारात आहोत. आणि जर असं शक्य नसेल तर मुंबई international airport हून कोल्हापूरला taxi मिळते का? साधारण किती खर्च येईल? दुसरा कोणता लवकर पोचण्याचा रूट आहे का? मागे प्रशांत खापणेने यावर लिहिले होते. पण मला ते मिळत नाहिये. :-(

Dineshvs
Tuesday, June 05, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, एअर डेक्कनचे मुंबई कोल्हापुर रुटवर ATR एअरक्राफ़्ट आहे. प्रवासाला एक तास दहा मिनिटे लागतात. सध्या तिकिटे स्वस्त आहेत. हल्ली एअर डेक्कनची फ़्लाईट्स थोड्या उशीरानेच सुटतात. पण बाकि काहि त्रास नसतो. सीट अलॉट केलेल्या नसल्याने, प्रवासी धावपळ करतात. फ़्लाईटमधे वेगवेगळे क्लासेस नाहीत.
कोल्हापुरचा विमानतळ शहरापासुन खुपच लांब आहे. आणि तिथुन शहरात यायला खुप वेळ आणि पैसा जातो.
बेळगावचा विमानतळ शहरापासुन किती लांब आहे याची कल्पना नाही. पण सध्य बेळगाव कोल्हापुर रस्ता उत्तम आहे. दोन तासात बेळगावाहुन कोल्हापुरला पोहोचता येईल.
एअर डेक्कनची मुंबई बेळगाव सेवा आहे. या रुटवर पण ATR एअरक्राफ़्टच आहे. प्रवासाला एक तास वीस मिनिटे लागतात.

विमानतळावरुन पुण्यासाठी सर्व्हीस उपलब्ध आहे, पण कोल्हापुरसाठी असल्याचे बघितले नाही.

कोल्हापुरसाठी वोल्व्हो बस हा उत्तम पर्याय आहे. पण त्या सगळ्या रात्रीच मुंबईहुन निघतात. कोंडुसकरच्या बसेस आरामदायी आहेत. रात्री नऊ वाजता निघतात व सकाळी सहा साडेसहाला पोहोचतात. नाहीतर महालक्ष्मी एक्स्प्रेस आहेच. दिवसाचा मुंबई कोल्हापुर टॅक्सीचा वा कारचा प्रवास मात्र हायवे असला तरी कंटाळवाणा ठरतो.


Chioo
Tuesday, June 05, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्म्म्म... म्हणजे रात्रीपर्यंत थांबावे लागणार तर. :-( आम्ही सकाळी ६-७ ला पोचू. रात्री निघालो तर दुसर्‍या दिवशी सकाळी कोल्हापुरला पोचू. छोट्याश्या सुट्टितला एक आख्खा दिवस वाया घालवायचे जीवावर आले आहे. म्हणून दुसरे पर्याय शोधते आहे. एक दिवस घालवण्यपेक्षा विमानतळापासून घरी पोचायला उशीर झाला तर चालेल असे वाटते आहे. फ़क्त जुलै म्हणजे पाऊस खूप असणार. ते उलुसे विमान नीट उडेल की नाही याची काळजी आहे. :-) तुमचा कारने प्रवास कंटाळावाणा होईल हे पटले. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. :-)

Mandard
Tuesday, June 05, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, कोल्हापुरहुन जर कोणि गाडी घेउन आले तर उत्तम. ७ वा. जर विमानतळावरुन निघालात तर ३-३.३० वाजता पोचाल. रस्ता आता चांगला आहे. फ़क्त पुण्यात जायचे नाही. सध्या दुसरा कोणताही पर्याय नाही.(कोयना आहे असेल हिंम्मत तरच जावा)

Zakasrao
Tuesday, June 05, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरचा विमानतळ शहरापासुन खुपच लांब आहे. आणि तिथुन शहरात यायला खुप वेळ आणि पैसा जातो.>>>>>..
हा विमानतळ ज्या परिसरात आहे तो उजळाइ वाडी म्हणुन ओळखला जातो. तिथुन सिटीबस मिळण्याची शक्यता जवळ जवळ ०% असेल. तिथुन जर विमान येणार्‍या वेळेत टॅक्सी वै. असेल तर तुम्हाला शहरात पोहोचायला साधारण अर्धा तास लागेल.
मुंबै हुन यायला दिवसा वोल्वो मिळाण्याची शक्यता नाहि का दिनेशदा? कारण ह्या गाड्या सारख्या न दमता पळत असतात.
नाहितर मुंबई ते पुणे स्पेशल टॅक्सी किंवा कुल कॅब असते ती साधारण ३-३.५ तासात पोहोचवेल पुण्यात आणि तिथुन पुढे बर्‍याच गाड्या आहेत त्यात कोंडुसकर,महाराजा यांच्या वोल्वो मिळतील. पुण्यातुन कोल्हापुरात पोहोचायला लाल डब्बा ५ तास घेतो त्यामुळे त्यापेक्षा कमी वेळात पोहोचाल पण त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
जर मुंबई हुन डायरेक्ट वोल्वो मिळाली तर उत्तम.


Dineshvs
Tuesday, June 05, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावलो ची अहमदाबाद ते पणजी हि वोल्व्हो बस पुण्याहुन सकाळी साडेसातला सुटते. तीच एक दिवसाची बस. नाहीतर पुण्याला यावे लागेल. पण तिथुनही दिवसाच्या कोल्हापुरसाठी बसेस नाहीतच.
एअर डेक्कनला पावसाचा अनुभव नाही, बहुदा.
रस्ता उत्तम आहे, पण तरिही दिवसा कंटाळाच येतो. मी बर्‍याचवेळा केलाय हा प्रवास गाडीने, दिवसाचा.


Manish2703
Tuesday, June 05, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chioo... here are different options

1. Mumbai - Kolhapur by car ( will take around 6-8 hours. Not sure about the cost. I am not sure about a Volvo from Mumbai to Kolhapur.) You can take a nice sleep during the journey :-)

2. Book KK Travells or similar shuttle service to go to Pune from Mumbai (around Rs 500 per head). If there are more than 2 persons then a Cool Cab would be a better option. From Pune either go by car or by Maharaja, Konduskar. There are 3-4 buses leaving for Kolhapur at around 3-4 PM from Swargate.

3. If someone can come to pick you up at Kolhapur Airport, best option would be to go to Kolhapur by air (if timings are suitable)


Karadkar
Wednesday, June 06, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेळगावचा एअरपोर्ट (सांबरा) पण खुप गावाबाहेर आहे. तिथुन एस. टी. स्टंड वर येण्यासाठी साधारण ५०० रुपये घेतले होते गेल्यावर्षी. तिथुन कोल्हापुरला येण्यासाठी साधारण ३ तास लागतील.

एअर डेक्कनची विमाने ८ ला सांगुन १०.३० ला वगैरे सुटतात. हा स्वानुभव आहे.

आणि झकास म्हणतो तसे उजळाईवाडीवरुन वहान मिळणे पण थोडे कठिण. घरचे कोणी गाडी घेउन येत असेल तर बरे.


Madya
Wednesday, June 06, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chioo, mumbai kolhapur-> sahara air port chya baher taxi keli ki 5K ghetat kolhapur saathi. Jar kolhapuraatun sumo vagaire ghevun aale gharache, driver changala asala ki 6 hrs laagataat airport to kolhapur.
air deccan ne mi pravas kela aahe, 10.30 am paryant flight kolhapuraat pochate. sadhya taxi rikshaw airport var asataat. university kadun gaavaat yaayala 20 te 30 mins laagataat. gaavaat mhanaje pethet/rankalyajaval.

kolhapur hun sumo, airport hun taxi aani wimaan pravas hey sarv swanubav aahet.

ajun kaahi info havi asel tar saang, detail madhye lihin.

Pratyuma
Wednesday, June 06, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्नाटकातल्या एका गावात घडलेला किस्सा आहे. आम्ही तीघी मैत्रीणी खानापुरला जाणार्‍या बसची वाट पहात होतो. भाषेचा खूप प्रॉब्लेम होता आम्हाला कोणालाच कानडी बोलता किंवा वाचता येत नव्हत. त्यामुळे कुठलीही गाडी आली कि कुठल्यातरी हिन्दी किंवा मराठी येणार्‍या माणसाला शोधुन विचारावे लागायचे की गाडी कुठली आहे. आम्ही या सगळ्या प्रकाराला कंटाळलो होतो. गम्मत म्हणुन आम्ही अंकलिपी बरोबर घेतली होती. एका मैत्रीणीला आइडीया सुचली की आपण त्यात बघुन नाव वाचू शकतो. झाल २-३ बसची नाव आम्ही अशी वाचली आणि नन्तरच्या एका बसमधे "ख (किन्वा क)...पुर" एवढ वाचुन शिरलो. (पुर्ण नाव वाचण मात्र शक्य नव्हत बस सुटणार होती लगेच).बस निघाली आणि आम्ही जरावेळाने कंडक्टरला खानापुरचे तिकीट मागितले आणि तो हसायला लागला. नशिबाने त्याला तोडके मोडके हिन्दी येत होते. तो म्हणाला "अरे भाइ ये गाडी खानापुर नही कोल्हापुर जा रही है" आणि सगळी गाडी हसायला लागली. कारण आम्ही अगदी विरुद्ध दिशेनी जाण्यार्‍या गाडीमधे बसलो होतो. मग तिथेच खाली उतरुन चालत परत बस-स्टॉप वर गेलो आणि नन्तर प्रत्येक गाडीमधे बसायच्या आधी गाडी कुठे जाते याची खात्री करुन घ्यायला लागलो.

Saee
Thursday, June 07, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मद्या म्हणतोय तसा उजळाईवाडीहून शहरात कुठेही पोचायला खच्चून अर्धा तास पुष्कळ झाला! (अगदी चंबूखडीपर्यंतही) केवढी चर्चा चाललीय इथे! हसूच आलं. मुळात कोल्हापूर ते केवढं आणि त्यातुन विमानतळापासुन शाहू मिलपर्यंत तर रस्ता तसा मोकळा असतो. चालत निघालात तरी तासाभरात कुठेही पोचाल!! विमानसेवा अतिशय सुधारलेली आहे आणि कोल्हापूरातुन दर महिन्याला देशात - बाहेर करणारे लोक आहेत माझ्या ओळखीतले.
पावसाचा धोका वाटत असेल तर रस्त्याने मुंबईतुन दोन तास पुणे आणि पुण्यातुन चार तास कोल्हापूर. खायप्यायला तुम्ही मधे किती वेळ घालवाल तितकाच जादा. आणि मध्यमगतीचा कालावधी आहे हा! उत्तम रस्ता आहे थेट मुंबई ते कोल्हापूर. पण पाऊस जसा aircraft ला लागणार तसा रस्त्यावरच्या गाडीलाही लागणारच:-)



Chioo
Thursday, June 07, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना खूप धन्यवाद. :-) आम्ही तिथे बरोब्बर २६ जुलैला पोचणार आहोत. जरी दर वर्षी तेवढाच पाऊस नाही झाला तरी एकदा ती भीती नवर्‍याच्या मनात बसली आहे. म्हणून दुसरा पर्याय शोधायचा प्रयत्न. सई, खरंच तिथली विमानसेवा इतकी सुधारली आहे, हे माहित नव्हते. आता जायचे झाले तर बिनधास्त जायला हरकत नाही. :-)

Limbutimbu
Thursday, June 28, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अस नेहेमी माझ्याच बाबतीत का होत?
तस नस्त तर परवाचा २३ जुनचा काळा शनिवार अनुभवायला लागला नस्ता!

शुक्रवारी रात्री अटलान्टीसच आगमन बघत बघत झोपायला शनिवारच्या पहाटेचे अडिच तीन झालेले, कशीबशी दोनेक तासान्ची झोप उरकुन, गाशा गुन्डाळुन हापिसात आलेलो! कधी नव्हे ते शनिवारी खुप काम होते!
सन्ध्याकाळी पावने पाचच्या सुमारास लिम्बीचा फोन आला की तिच्या भावाचे सासरे सिरीयस असल्याने ऍडमित केलेत, काही खर नाही! तू लौकर निघुन ये साहेबान्ना सान्गुन, तुलाच गाडी चालवत नाशिकला जायच हे!
म्हणल, तुझा भाऊ कुठाय आत्ता??
विजापुरहुन येतोय! तिकडे कार्यक्रम होता! आत्ता सोलापुर पर्यन्त आलाहे, येईल.

सरळ उठुन निघालो ते पहले छुट कॅन्टिनला गेलो नि एक वडापाव हाणला! म्हणल नन्तर काय गिळायला मिळेल न मिळेल, आपला पोटोबा थोडा शान्त असावा!
हापिसातुन बाहेर पडुन लिम्बीच्या माहेरी पोचलो, तिथे गाडीच्या किल्लिच्या शोधाशोधी पासुन सुरुवात करुन, गाडीत बाराशेच पेट्रोल भरुन घेतल अन माझ्या घरी माझी बॅग भरायला गेलो, सोबत धाकटि लिम्बोणीला घ्यायच ठरल तर तिचे कपडे ही बॅगेत घेतले.
सर्व तयारी करुन लिम्बीच्या घरी आम्ही वाट बघत बसलो होतो, नि हे अस कस झाल, का झाल, वगैरे चर्चा असतानाच बातमी पक्की कळली!
अशा बातम्या सहसा खोट्या ठरत नसतात, तेव्हा लिम्बीच्या भावाला यातले सान्गायचे नाही असे ठरले! पण त्याची बायको तोवर नाशकात पोचल्यावर तिला कळले व तिच्याकडुन नन्तर लिम्बीच्या भावालाही!
तो आठ वाजता आला, तोवर आमच्या चहाच्या दोन फेर्‍या झालेल्या!
तो आल्यावर काही न खाताच बरोब्बर साडेआठला निघालो!
माझ्या डोक्यात अन्तराचा, वेळेचा अन वाटेत उपलब्ध हॉटेल धाब्याचा हिशेब सुरु होता!

बरेच महिन्यान्नी म्हणजे गेल्या नोव्हेम्बर नन्तर या गाडीला हात लावत होतो! गिअर कुठ काय क्रमाने आहेत तेसुद्धा बघुन घ्याव लागत होत!
शिन्च्या या मारुती गाड्यान्ची एक बोम्ब अस्ती.... क्लच, ब्रेक अन ऍक्सिलेटर अगदी खेटुन असतात! मला नाही आवडत अस!
सुरवातीला बिचकत बिचकत निघालो! इकडे लिम्बीच्या भावाची घाई सुरु झाली, लौकर चल लौकर चला, नाहीतर मी चालवायला बस्तो!
अशा मयतीच्या परिस्थितीत जात असताना त्याच्या हातात गाडी द्यायची नाही हे आधीच ठरले होते!
त्याची समजुत घालुन पुढे निघालो, पावसाची भुरभुर सुरुच होती अन वायपरच्या स्वीच बरोबर मी अजुन सरावलेलो नव्हतो, तरीही नेटाने गाडी चालवित साधारणतः चन्दनपुरी घाटाच्या अलिकडे दौलत धाबा म्हणुन हे तिथे साडेदहाला पोचलो.
लिम्बीचा भाऊ तुफान एक्साईट झालेला होता व बहुतेक त्याला मनोवेगे त्याच्या सासरी पोचायचे होते, अन मला त्या वेगाने ती सरावात नसलेली गाडी चालविणे शक्य होत नव्हते!
पुढील प्रसन्ग बघता, त्याला सगळ्यान्नी उतरुन खावुन घ्यायचा आग्रह केला! पण तो बधला नाही!
भावनिक कल्लोळात माणुस एकदा सापडला की त्याला कशाचे भान रहात नाही....!
किमान अनुभवाचे चार शब्द ऐकावेत याचेही भान रहात नाही!
गाडीतील बाकीचे आम्ही त्या ढाब्यात गेलो, पण केवळ चहा घेवुन बाहेर पडलो. मी माझ्या चेहरा, डोक, डोले, कोपरा पर्यन्त हात अस सगळ चिम्ब पाण्यान धुवुन काढल जेणेकरुन डोळ्यावरील पेन्ग / झोप जावी. कारण तोवर आदल्या रात्रीचे जागरण मला भोवायला लागले होते.
नाशिकच्या त्या भिकार येता जाता सिन्गल सिन्गल लेन वाल्या रोडवरुन जाताना समोरुन भगभगीत दिव्यान्च्या उजेडाच्या गाड्यान्च्या माळा आल्या की शब्दश मधेच त्या दिव्यान्च्या उजेडात डोळे फिरुन भोवळ येवु पहात होती! डोले गरगरु लागुन पुन्हा पुढच्या अन्धारात नजर स्थिरावता येत नव्हती!
म्हणुन थाम्बण आवश्यक होत!
पण लिम्बिच्या भावाला काही हे पटत नव्हत!
पुन्हा गाडीत आल्या आल्या त्यान फैर झाडायला सुरुवात केली
"तुम्हाला काही काळ वेळ आहे की नाही?
ही काय गिळायची वेळ हे का? थोडी कळ काढता येत नाही का? लोक तिकडे कशा परिस्थितीत वाट बघताहेत अन तुम्हाला खाण सुचतय?"
अरे बाबा तस नस्त, पुढे वेळ होणार नाही म्हणुन तर तुला.....
"तुम्ही काही एक बोलु नका, तुमची तत्वज्ञान तुमच्या पाशी ठेवा, मला त्यातल काही एक ऐकायच नाही हे"
"तुम्ही आत्ताच्या आत्ता आता निघताय की माझा मी सरळ एशियाडने जाउव?"

मी क्षनभर काय बोलावे हे न सुचुन सैरभैर झालो, एकिकडे मस्तकात सन्तापाने शीरा तडातडा उडु लागलेल्या! तोवर मी जीवाच्या कराराने, दमलेल्या अवस्थेत, गाडी अपरिचित असताना, माझ्या परीने वेगात आणत होतो! पण रस्ताच असा भीषण होता की ठराविक वेगाच्या पुढे मला जाण्याचा धीर होत नव्हता!
पण त्याचे, दुःखाच्या प्रसन्गात का होईना, तशात तो बरेच शे किमी लाम्बुन प्रवास करीत आलेला, पण तरीही असले बोल ऐकुन शेवटी मला रहावले नाही!
कोब्रा कोब्रा म्हणजे काय असते.... नाईलाज झाला तेव्हा मी खाटकन त्याला सुनावले! सुनावताना वाईट वाटत होते पण इलाज नव्हता!
यू जस्ट शट अप! आणि मी बोलतो तसच करायच हे!
"नाही, मला तुमच काही एक ऐकायच नाही, मला तुमची तत्वज्ञान या प्रसन्गात नकोत, तुमच्याजवळच ठेवा"
मग ऐक तर, तत्वज्ञान नाही सान्गते....
मी आत्ता ही गाडी चालवायला बसलो हे ते एक बॉडी नाशकात पोचवायची हे म्हणुन............!
गाडितल्या चार बॉड्या पोचवायला मी निघालो नाही हे!

हे ऐकल्यावर त्याच्यासहीत गाडीतले चिडिचुप बसले!
"आता तरी चला लौकर.... प्यच!"
थाम्ब, मला पुडी लावुदे!
खर तर प्रखर उजेडाने घेरी आल्या सारखे होत असल्याने मी पुडी लावणे टाळत होतो, पण आताच्या प्रसन्गातील भावनीक असन्तोषा पुढे दिव्यान्च्या उजेडाची घेरी काहीच नव्हती, आणि पुडीला तत्काळ तरी पर्याय नव्हता.....

पुडी लावुन मी जो एक्सिलेटरवर पाय चेपुन धरायला सुरुवात केली तो क्वचित पुर्ण वर उचलत होतो! चन्दनपुरी घाट ५० ते ६० च्या स्पीडने उतरविला! इतरजण कदाचित त्याहुनही जास्त वेगात जावु शकत असतील पण माझी गाडी नाजुक होती, झेन होती, क्वालिस किन्वा सुमो नव्हती!
नाशिक मधे घरी बरोब्बर १ वाजता पोचलो, हा जो प्रवास जवळपास दोन तास दहा मिनिटे या वेळात केला त्याच प्रवासाला दुसर्‍या दिवशी दिवसा उजेडी मला पावणे तीन तास लागले!

प्रसन्गोपात तिकडे पोचल्यावर, पुढे स्मशानात जाणे, बाकीचे उरकणे हे करता करता पहाटेचे चार वाजले पुन्हा घरी पोचायला!
तशीच गाडीतच आडव पडुन तासभराची डुलकी काढली!
खरे तर पोटात आग पडली होती....! पण इलाज नव्हता
सकाळि उठलो तेव्हा चुळ भरून पहिल्यान्दा बॅगेतुन तीन चार खारका काढुन हाणल्या, वर पाणी प्यायलो! तेव्हा कुठे जावुन पोटातला वडवानल थोडा शान्त झाला!
नन्तर पुन्हा स्मशानात सावडण्यास (अर्थात अस्थी गोळा करण्यास) जावुन साडेदहा अकराला परत आलो तेव्हा नन्तर मात्र त्या एरियात एक टपरी हॉटेल शोधुन तिथे मिसळ अन सढ डोसा हाणला!
दुपारी साडेतीनला निघुन साडेनवाला पुर्ण पावसात गाडी चालवित घरी परतलो!
सर्वच गोष्टिन्च वर्णन वेळेअभावी इथे देता येत नाही, प्रस्तुतही नसेल पण स्मशानातले अनुभव, गेल्या माणसाबद्दलच्या "माझ्याही" काही भावना वगैरे वगैरे सर्व गोष्टी "केवळ एक, सुरक्षित प्रवास करुन सगळ्यान्ना सुखरुप घरी पोचवणे" या एकाच उद्दिष्टामागे दडल्या गेल्या!
मनात पुन्हा विचार आला, हे अस माझ्याच बाबतीत का होत???
कोणतीच गोष्ट सरळ पणे का होत नाही?
काहीतरी खोट त्यात का रहाते???

यथावकाश दुसर्‍या दिवशी लिम्बीच्या भावाच्या लक्षात आलच की धाब्यावर आम्ही खायचा आग्रह का करीत होतो! पण तेव्हा वेळ निघुन गेलेली होती!

मधेच आदल्या दिवशी निघायच्या आधी झकोबाने माझा एक स्क्रॅप वाचल्यावर, नन्तर मला फोन करुन काही मदतीबद्दलही विचारले!
मी त्याला आत्ता नको अस सान्गितल, पण त्याने विचारले तर त्या गोष्टीचा सुद्धा केवढा तरी आधार होता!

Limbutimbu
Friday, June 29, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर तर अशा शेकड्याने गाड्या पुणे नाशिक दरम्यान तिन्हीत्रिकाळ धावत असतील, मग अस विशेष काय होत त्यात की, या, या लिम्ब्याने लगेच त्यावर उठुन खरडाव???
होत! विशेष होत! इतरान्ना जाणवेल किन्वा नाही! पण विशेष होतच!
या रस्त्याने गेल्या दीड वर्षात गेलेले नसल्याने सद्ध्याची परिस्थिती माहित नव्हती! रस्त्यावर किती खड्डे, पावसाच्या पाण्यात झाकलेले याचा अन्दाज येत नव्हता!
समोरुन गाड्यान्च्या माळा आल्यावर त्यान्च्या उजेडात पुढील काहीच दिसत नसे आणि अशा जागी जर एखादा बन्द पडलेला ट्रक वगैरे असेल तर? एखादी बैलगाडी वगैरे जात असेल तर? समोरच्या गाड्या पास झाल्या झाल्या दिसत रहाणार्‍या भीषण अन्धारात लगेच वळण असेल नि ते कळले नाही तर?
ओला रस्ता, पावसाची रीप रीप, डोक्यात तर्‍हतर्‍हेचे विचार, आणि अशात केवळ रस्त्याचा अन्दाज न आल्याने काही झाले तर?
सर्व काळ पुढे झुकुन काचेतून रोखुन रोखुन बघताना डोक्यात हेच विचार घुमत होते!
धाबा सोडल्यावर, चन्दन पुरी घाट ओलान्डल्यावर एके ठिकाणी माझ्या पुढे तीन मोठ्या कन्टेनरची रान्ग होती, त्यान्च्या मागे फार वेळ रेन्गाळणे शक्य नव्हते आणि जस जसा वेळ जाऊ लागला तसा लिम्बीचा भाऊ अस्वस्थ झाल्याचे त्याच्या "सुचनान्वरुन" स्पष्ट जाणवत होते!
हं, घ्या आता पुढे... जाऊद्या.....
काढाऽऽ काढाऽऽ, पुढे काढा
छ्याऽऽ उगीचच घाबरता तुम्ही...!

समोरुन येणार्‍या माळात खन्ड पडत नव्हता, आणि या गाड्यान्च्या पुढे मला जाता येत नव्हते!
शेवटी हिय्या करुन गाडी ओव्हरटेकला घेतली, लाम्बवर एका जीपचे दिवे दिसत होते
भुरुभुरु पावसात त्या जीपमधिल अन्तर आणि तिचा वेग याचा काहीच अन्दाज येत नव्हता.... तसेच एक्सिलेटरवर पाय चेपत गाडी पुढे दामटली...
एक त्रकचे धूड पास झाला,
आता दुसराही झाला...
शेवटचा उरला....!
अरे अरे अरे, हे मी काय बघतोय???
समोरील जीप भरमसाट वेगात जवळ जवळ येत चाललेली
तिच्या उजेडात डोळे दिपत असलेले
सारखे अप्पर डीपर देवुनही तो शिन्चा डीपर द्यायला तयार नाही
शेवटी माझ्या गाडीचा अप्पर चालु ठेवुन आता धडक चुकत नाही हे जाणवल्यामुळे गाडीला अधिक वेग दिला
आणि जवळपास एन्शी पन्च्याएन्शीच्या स्पीडने गाडी डावीकडच्या दोन ट्रक मधिल बेचक्यात झोक घेत घुसवुन पुन्हा ब्रेक मारीत ट्रकच्या वेगाची बरोबरी साधली, अन माझ्या सहीत सगळ्यान्चेच रोखलेले श्वास सुटले!
बाकिच्यान्नी घाई न करण्या बद्दल बजावले!
एकन्दरीत प्रसन्ग पहाता तिथुन पुढे लिम्बीच्या भावाने जास्त गडबड केली नाही!
आजही तो प्रसन्ग आठवुन अन्गावर शहारा येतो!

ekaa

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators