Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 25, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through June 25, 2007 « Previous Next »

Manjud
Friday, June 08, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,

ह. ह.पु.वा

पण हा वेन्धळेपणा की इब्लिसपणा?... इब्लिसपणा असेल तर त्या dr. चे काही खरे नाही.


Dakshina
Friday, June 08, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इब्लिसपणा डॉक्टरांचाच....
पण सवयीचे गुलाम.... करणार काय? तरी नशिब तिने मनावर घेतले नाही. आणि नेमका तो डॉ. काही वयस्कर नाही....
चांगला तरूण आहे. दुसर्‍या मुलीला / बाईला बोलला तर मेलाच....


Athak
Friday, June 08, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथे तो म्हणेल चला मरुया :-)

Disha013
Friday, June 08, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा,
'ठेवणीतलं हसु'...... पर्फ़ेक्ट शब्द वापरलात!
दक्षिणा,


Dineshvs
Friday, June 08, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या हिंगणघाटच्या डॉक्टर मित्रानी सांगितलेला किस्सा. ( त्यांचे वय साठीपार ) त्यांच्या दवाखान्यात एक तरुणी आली सोबत तिची गोड छोकरी. ती छोटी मुलगी खुपच गोड होती, पण दवाखान्यात दुसरे पेशंट होते म्हणुन डॉक्टर अधुन मधुन तिला म्हणायचे. मने मी तपासताना, मला गोड गोड पापा द्यायचा बरं का. मग मी तूला गोड औषध देईन. वैगरे वैगरे. प्रत्येकवेळी ते असे म्हणाले कि सगळे पेशंट खुसुखुसु हसायचे.
डॉक्टराना, नंतर कारण कळले.

त्या तरुणीचे नावच, मने होते.


Nandini2911
Thursday, June 14, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेळ रात्री साडे दहा नंतरची. रोज कुणीतरी "तू मला फोन कर" हे सांगतय. म्हटलं आज फोन करू याच. आईच्या मोबाईलवरून नंबर फ़िरवला.
"हेलो?"
"हेलो. माझी मावशी आली आहे का तिथे?"
"कोण?"
"मावशी,, मावशी.. माझी मावशी, तुमच्या कडे आली का?"
"कुणाचा नंबर हवाय?"
"हे पाटलाचंम घर आहे ना?"
"हो, हे पाटलंचे घर आहे. तुम्ही कोण बोलताय?"
"अरे, मला कसं नाही ओळखलं. माझी मावशी तुमच्याकडे आली आहे ना, रात्र झाली हो, काळजी वाटते असेल तर पाठवून द्या ना.."
"कोण बोलतय?"
"मी बोलतेय. माझी मावशी आली आहे का?"
"कोण स्वाती?"
"नाही मी स्वाती नाही. मी..." काहीतरी खोटं नाव सांगणार तेवढ्यात पलीकडच्याच्या डोक्यात ट्युब पेटली, नेमकी हीच सम साधून आईन पाठीत धपाटा घातला..
"कोण नंदिनी?"
"दुसरं कोण?" :-)


Zakasrao
Thursday, June 14, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर कोण तेरा दोस्त झकास
पण काल तुझ्या आवाजामुळे मीच काय माझी बायको पण म्हणाली की हि स्वातीच आहे. सेम आवाज.
बाकी तुझ्या आईचा आवाज खणखणीत आहे.तुला ताळ्यावर आणायचे सगळे उपाय आहेत त्यांच्याकडे.


Chyayla
Thursday, June 14, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, मला कसं नाही ओळखलं. माझी मावशी तुमच्याकडे आली आहे ना, रात्र झाली हो, काळजी वाटते असेल तर पाठवून द्या ना

नन्दीनी आणी झकास सहीच , मग मावशीच काय झाल? ते तर सान्गितलेच नाही

Storvi
Thursday, June 14, 2007 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मग मावशीच काय झाल? ते तर सान्गितलेच नाही >>तुमच्याकडे नाही आली? :-O

Disha013
Thursday, June 14, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर काहीच समज्ले नाहीये. ही स्वाती कोण आहे?


Farend
Friday, June 15, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता हे इब्लिस पणात टाकावे की वेंधळेपणात कळत नाही.

विद्यापीठात आम्ही संध्याकाळी डिपार्टमेंटमधेच थांबून थोडे काम व बर्‍याच टवाळक्या करायचो. आमचे व Physics चे विभाग जवळ जवळ होते. एकदा संध्याकाळी आमच्या पैकी एकाला 'जावे' लागले. लेक्चर्स संपलेली असल्याने आम्ही ४-५ जण आणि काही प्रोफेसर्स एवढेच डिपार्टमेंट्मधे होतो.

बराच वेळ झाला तरी तो काही परत येईना, तेव्हा आम्ही टॉयलेट मधे गेलो आणि एका बंद दरवाजावर
जोरजोरात लाथा, थपडा वगैरे मारून 'अरे साल्या किती वेळ लावतोस, खातो कशाला इतका पचत नाही तर' वगैरे ओरडत होतो. आतून काहीच उत्तर येईना. मग शेवटी कंटाळून आता बाहेर आल्यावर छळू म्हणून परत बाहेर आलो.

त्यानंतर ५-१० मिनीटांनी तो मित्र दुसर्‍या बाजूने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने किल्ली फिरवत येताना दिसला. म्हणजे तो Physics मधल्या टॉयलेट मधे गेला होता. मग आम्ही एवढा गोंधळ केला होता तेव्हा आत कोणीतरी प्रोफेसर बसला होता हे लक्षात आले.

त्यानंतर आम्ही २-३ तास कॅंटीन मधेच जाऊन बसलो आणि रात्री उशीर होईपर्यंत परत आलो नाही :-)


Zakasrao
Friday, June 15, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंद
मग तुमची ओरल राहिली नाहि ना कोणाची


Zakasrao
Friday, June 15, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा स्वाती हे माझ्या मेहुणीच नाव ती हि अधे मधे असाच आगवुपणाकरत असते म्हणुन....
असो मि फ़ोन वरुन केलेल्या दोन्ही इब्लिसपणाला इब्लिसपणा करुनच उत्तर मिळाल.
एक वरती नन्दिनी ने लिहिलच आहे. दुसरा इब्लिसप्णा गिरि ने केला. गिरि लिहेलच ते.


Sanghamitra
Friday, June 15, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेंड जबरी हसले आज.
नंदिनीच वाचून आठवले. इथे मायबोलीवर कधी लिहीलेय का आठवत नाही.
माझ्या एक मैत्रिणीने फोन डिरेक्टरीतून वाघ नावाच्या माणसांचे नंबर शोधले. कंटाळा आला की त्यातल्या एखाद्या वाघाला फोन करायचा आणि संवाद पुढीलप्रमाणे
मै. : " हॅलो वाघ आहेत का? "
पलिकडून अर्थातच " हो. वाघ बोलतोय "
मै. :" हो? मग मी सिंह बोलतोय. "


Zakasrao
Friday, June 15, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

. :" हो? मग मी सिंह बोलतोय. " >>>>..
आणि मग आजकाल शिकार मिळणे किती अवघड आहे ह्याची चर्चा करायची का?

Dakshina
Friday, June 15, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच काळात, याच प्रकारच्या इब्लिसपणामध्ये वाघ आडनावाच्या लोकांना फोन करून
मी 'वाघमारे' बोलतोय असं सांगण्याची पण Fashion आली होती..

अजून एक किस्सा मी बहुतेक पुर्वी पण लिहीला होता...
माझ्या शाळेतल्या मित्रांनी रात्री कुणा कुलकर्णींना फोन केला आणि जोरजोरात ओरडायला सुरवात केली... 'हे पहा कुलकर्णी तुमच्या कुत्र्याने जर परत आमच्या गाडीवर लघूशंका केली तर आम्ही पोलिसात तक्रार करू.....' पलिकडचे कुलकर्णी बावचळून, घाबरून म्हणाले "अहो पण आमच्याकडे कुत्रा नाहीए....' इकडून यांनी उत्तर दिलं 'आमच्याकडे तरी गाडी कुठाय'? फोन कट.


Chyayla
Friday, June 15, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अरे साल्या किती वेळ लावतोस, खातो कशाला इतका पचत नाही तर'

फ़ारेन्ड जाम हसलो तुझा किस्सा वाचुन

स्टोर्वी, मावशी माझ्याकडे आली आहे लवकर घेउन जा

वाघ, सिन्ह, वाघमारे आणी दक्षिणेचा कुत्रा.. हा.. हा.. वाचुन मजा आली, मागेच कुणी कदाचित स्वाती की सखी नी तुमच्याकडे फ़्रीज चालतो का? असे फ़ोन वरुन विचारायचे आणी हो म्हटले की मग धरुन ठेवा म्हणुन सल्ला देण्याचा ईब्लीसपणाचा किस्सा दीला होता.




Asami
Friday, June 15, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच वर्षांपूर्वीची ( जेंव्हा mobile phone चा सूळसूळाट नव्हता ) एक दुपार. मी घरी एकटाच होतो. आदल्या रात्री party मूळे जागरण झाले होते so जरा जास्तीच झोप डोळ्यावर आली होती. मस्त जेवण झाल्यावर ताणून दिली होती.
तेव्हढ्यात phone दणाणला. मोठ्या मुश्किलीने उठून प्रचंड जड आवाजात मि बोलायला सुरूवात केली.
"hello"
" सरांना phone द्या " समोरून आज्ञा झाली.
" घरी नाहियेत ते " माझ्या वडलांना office मधे कहीजण सर म्हणतात , त्यातलाच कोणी तरी असेल असे समजून मी उत्तर दिले
" असे कसे होईल ? थोड्या वेळापूर्वीच तर बोललो मी त्यांच्याशी "
" अहो ते मघाशीच बाहेर गेले " इती मी. प्रचंड झोप.
" बर एक काम करा. त्यांना message द्या कि मी गाडी घेऊन अमूक अमूक ठिकाणी उभा आहे. " त्यांनी एक पत्ता सांगितला. जो माझ्या डोक्यावरून गेला.
" जरा पत्ता परत repeat करता का ? "
त्याने परत repeat केला.
" सरांना सांगा कि ताबडतोब इथे पोचा. आपण लगेच निघू. फ़ार वेळ नाहीये "
" अहो पण ते बाहेर गेलेत , ते परत आल्यावर निरोप देईन. आणी त्यांना घरून तिथे यायला अर्धा तास तरी लागेल "
" अर्धा तास ? अहो तुमच्या बाल्कनीमधून बाहेर बघितल तर गाडी दिसेल. "
तो पत्ता घरापासून दूरचा होता , ह्या क्षणी काहितरी गडबड आहे असे मला वाटायला लागले.
" अहो तुम्ही कोण बोलताय ?"
" पाटील " समोरून उत्तर आले. च्यामारी पाटील नावाचा एक तरी माणूस प्रत्येकाच्या ओळखीचा असतो.
" तुम्हाला कोणता no हवाय ?"
समोरून भलताच no आला.
" अहो तुम्ही wrong no dial केलाय. " इती मी.
" आधी सांगायला काय झाला होत ? उगाच timepass का करताय एव्हढा वेळ ?" समोरचा पेटलाच.
मग मीही पेटलो. एकतर झोप उडवलेली त्याची चीडचीड नि wrong no dial करून वर माझ्यावरच चीडतोय.
" तुम्ही कुठे विचारलेत ते ? विचारले असते तर सांगितले असते " माझा मामा विशिष्ट शहरामधे राहतो नि माझे बरेच आयुष्य तिथे व्यतीत झालेय.
समोरून अस्सल शिव्यांचा अहेर आला.
त्याला थोपवत मी विचारले " public phone वरून बोलताय काय हो ? "
" हो. का ?" माझ्या प्रश्नाने तो बुचकळ्यात पडला होता.
" नाही एवितेवी पैसे टाकलेच आहेत नी अजून 3 min व्हायला वेळ आहे तेंव्हा असेच बोलत राहा की. तेव्हढेच तुमचे पैसे फ़ुकट न गेल्याचे समाधान "
समोरचा अक्षरश फ़ुटलाच त्यानंतर नि मी शांतपणे phone ठेवून दिला.


Gajanandesai
Saturday, June 16, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांपूर्वी मी माझ्या मित्राला त्याच्या मोबाईलवर फोन लावला तर एका गुजराती माणसाला लागला. तो माणूस चांगलाच उखडला. तो म्हणाला "हे तुमचा दोस्त वैभव हाये ना तेचा एड्रेस मला द्या. तेला काही अक्कल हाये की नाय?" आणि बरेच काही काही म्हणाला.

मला काही कळेना, हा माणूस कोण, तो वैभवच्या मोबाईलवरचे कॉल्स का घेतोय? आणि मुख्य म्हणजे त्याला शिव्या का देतोय? नक्की काय झालं असेल? मी म्हटले, "अहो काका, शांत व्हा आणि काय झालेय ते तर सांगा." तर म्हणे "तो तुमचा वैभव हाये त्याने कार्ड बदलले. मी हल्लीच मोबाईल घेतला तर मला त्याचा नंबर मिळाला. दिवसाला सात आठ कोल्स तरी येते, वैभव हाय काय विचारायला. अरे मी माझा काम करू के हे वैभव कुठे हाये ते सांगत बसू? तेचा रेस्पोन्सेब्लिटी नाय काय तेच्या दोस्त लोगना नवीन नंबर द्यायचा ते? ऑँ?"

पुढे म्हणाला, "तुमी मला त्याचा एड्रेस द्याच! मी तेच्या घरी जाऊन त्याच्या मागे एक लाथ हाणणार हाये."

मी म्हटले, "काका नको नको, तुम्ही कशाला? तुमच्यासाठी हे काम मी आनंदाने करीन."


Chyayla
Monday, June 25, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन वहिनी नुकतेच लग्न झालेली आमच्या कडे आली आणी जो दीसेल त्याला अहो काहो म्हणायची. आम्ही म्हणायचो हे काय वहिनी आम्ही तुझ्या पेक्षा लहान आहोत आम्हाला अहो काहो, अहो भावजी अस काही म्हणु नका. त्यावर वहिनी म्हणाली नाही भावजी सासरकडच्या आपल्या लोकाना मान नाही देणार तर कोण देणार?

हे ऐकल माझ्या आजोबान्नी आणी त्यान्नी सहज विचारल मग सासर कडच्या कुत्र्याला कसे हाकलशील? आणी त्यानी चक्क नक्कल करुन दाखवली की "अहो कुत्रे हाSSडाSSS..."

झाल वहिनी सकट सगळ घर हसायला लागले. आता मात्र बराच फ़रक पडला आता तरी नावानी हाक मारायला शिकली. व थट्टा मस्करीही चालुच असते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators