Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 11, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मराठी लोकांचे हिन्दी » Archive through June 11, 2007 « Previous Next »

Dakshina
Tuesday, May 22, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मी डब्यातून दोडक्याची भाजी नेली होती. मैत्रिणीला टेस्ट करायला दिली. पोळी खाऊन झाली तरी तिची भाजी उरलेली.. मी म्हणलं 'का ग? भाजी टाकून दिलीस..?' ती म्हणाली, "पुलाव के साथ, मूँह को लगाने के लिए रख्खी हैं." बराच वेळ विचार केल्यावर कळलं की तोंडी लावायला ठेवली होती ते.

Nandini2911
Tuesday, May 22, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पडलेला प्रश्न.. तुम्ही दोघी मराठीतून बोलू शकत असताना तिने हिंदीतून उत्तर का द्यावं??

तसं माझं हिंदी बर्यापैकी आहे पण तरीही परवा बॉसला काहीतरी सांगताना मी म्हटलं "वो मेल किया तो भी जवाब नही देता. तर मी परत परत क्यु मेल करू??"

बॉस वैतागला माझ्यावर.
"जे काय बोलायचं ते धड बोल"
"मी तीनदा मेल केलं त्याला... पर वो साला reply ही नही करता... "
बॉसने कपाळावर हात मारला.




Nkashi
Tuesday, May 22, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हा मैत्रिणींचा एक वेंधळेपणा... १० वी ची परिक्षा झाली होती आणि एका non महाराष्ट्रियन मैत्रिणी कडे गेलो होतो. तिथुन निघताना तिच्या आईला म्हणलो "अच्छा आंटी हम निघते हे"

Sheshhnag
Tuesday, May 22, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूँह को लगाने के लिए रख्खी हैं.


दक्षिणा... ह. ह. पु. वा.


Sheshhnag
Tuesday, May 22, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर वो साला reply\

ह. ह. पु. वा.
नन्दिनी... बॉसला असं उत्तर!


Supermom
Tuesday, May 22, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका दूरच्या बहिणीने तिच्या सासूचा सांगितलेला भयंकर म्हणजे भयंकरच किस्सा.
नागपूरला उन्हाळ्यात जीवघेणी गर्मी असते. घरोघरी वाळ्याच्या ताट्या लावतात. त्यावर पाणी घालायला काही घरी नोकरही असतात.

सासूबाईंच्या घरी व शेजारी मिळून एकच नोकर होता. एक दिवस सासूबाई त्याला रागावून म्हणाल्या,
'क्यु रे, तुम उनकी तट्टी पे पानी डालता है, और मेरी तट्टी पे नही डालता.'

आम्ही हसून हसून लोटपोट.

तसेच माझ्या मुंबईच्या मावशी कडे घडलेला किस्सा
मावशी- 'अरे वो शेजारी है ना उनका पोपट मर गया...'

मावशीची सिंधी शेजारीण- 'तो चल, पिठलंभात लेके जायेंगे क्या?'


Runi
Tuesday, May 22, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शप्पथ..खो खो खो.... सुमॉ, अशक्य हसवता तुम्ही.

Manjud
Thursday, May 24, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

B.Com च्या class ला एका वर्गात १०० students असायचे. class मधे तीन powerful air conditioners लावले होते. परंतू पुढे बसणार्‍याना खुपच थंडी वाजायची. असेच एकदा lecture चालू असताना थंडी वाजली म्हणून सरांना A.C. low करण्याची request केली. त्यानी विचारले "का"?
तर आमच्यातल्या एकीने उत्तर दिले, "सर, बहोत ठंडी बज रही है"

आता मराठीत थंडी वाजते म्हणुन हिंदी मधे ठंडी बजेल का?


Dakshina
Thursday, May 24, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या Boss ला फोनवर सांगत होते... "पहले तो उसने कुछ बताया नहीं,
पर जब मैंने उसको खोद खोद के पुछा तो बोलदीया.."


Aditi
Thursday, May 24, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच ऑफीस मध्ये घडलेला किस्सा

एकाचा वाढदिवस होता म्हणुन केक आणून केक कापायचा समारंभ पार पडला अणि मग एकाचे मित्रप्रेम जागले. त्याने पुढे होउन, केक चा एक मोठ्ठा तुकडा कापला अनि ज्याचा वाढदिवस होता त्याच्या जवळ जाउन म्हणले, 'चलो, आ करो, जल्दिसे आ करो.' :-):-)


Zakasrao
Monday, May 28, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा हे भी देखो भोत छान हिंदी है!


Chinya1985
Tuesday, May 29, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या मित्रांना म्हणालो 'हम सब वहां बैठके ठरवेंगे कहां जाना है'

माझा मित्र-'अरे जय पिठ मळणेको जल्दी आ.'

मी एका भिंतीवरच्या फ़ुग्याला (जो बरेच दिवस भिंतिवर असल्याने हवा गेलेली होती) बघुन इस फ़ुगेमे हवा भर सकते है क्या??



Runi
Tuesday, May 29, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एका भिंतीवरच्या फ़ुग्याला (जो बरेच दिवस भिंतिवर असल्याने हवा गेलेली होती) बघुन इस फ़ुगेमे हवा भर सकते है क्या?? >>>
चिन्मय, माझी मैत्रीण जी थोडेफार मराठी बोलते, ती एकदा हवा गेलेला फुगा बघुन म्हणाली की अग यातला वारा गेला की.

Deepanjali
Wednesday, May 30, 2007 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा नवरा ' वारा आला ', ऐवजी ' हवा चालतीये ' म्हणतो !

Chinya1985
Wednesday, May 30, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरुण तुर्क म्हतारे अर्क नाटकात पण 'सायकलच्या चाकातला वारा गेला की 'असा dialogue आहे

Dakshina
Thursday, May 31, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांडू हवालदार मध्ये पण दादा कोंडकेंचे भन्नाट संवाद आहेत.

दादा आणि अशोक सराफ़ चोरून कोंबड्या नेणारा ट्रक पकडतात, तेव्हा, driver २ कोंबड्या अशोक सराफ़ला लाच म्हणून देऊ करतो. आणि दादाला लाच घेतलेली आवडत नसते. त्यामुळे उगिच त्याच्यासमोर अशोक सराफ़ त्या Driver ला म्हणतो...
"हमको लाच देता है? तुमको तुरूंग में डालेगा, तब तुम्हारा डोला उघडेगा.."


Yogesh_damle
Sunday, June 10, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशोकजींनी कुठल्यातरी चित्रपटात कोकणी मुसलमानाची भूमिका केली होती, त्यातही असेच मस्त संवाद होते, तेही ओरिजिनल,

"वो बाई का शेवई देखो कैसा पातल है, नहीं तो तुम्हारा देखो... गांडुल के जैसा जाडा जाडा!! :-)


Dakshina
Monday, June 11, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांडूल के जैसा जाडा जाडा....

Himscool
Monday, June 11, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हमारे इधर शादी मध्ये नवरा मुलगा नवरी मुलगीको घास भरवता है

Shailaja
Monday, June 11, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा माझ्या आईने एका अ-मराठी काम वाली ला विचारले
की "तुम हमारे भांडे घासेंगी क्या?"

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators