Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 11, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through June 11, 2007 « Previous Next »

Alpana
Thursday, June 07, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यात हातिमचे काम कुणी केलय? मला वाटते मी पण बहुतेक थोडासा बघितलाय हा पिक्चर.. त्याकाळी माझी सहनशक्ती खुपच कमी होती त्यामुळे मी बरेच असे विनोदी पिक्चर नाही बघु शकले...

Giriraj
Thursday, June 07, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जितेंद्रला 'ताई' म्हणवून घेणे कसे चालले हेच कळत नाही मला तर

Alpana
Thursday, June 07, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जितेन्द्रचाच न पिक्चर...मी बर्‍याचदा तुकड्या तुकड्यात बघितला आहे.....सगळ्यन्चे मेकप पण मस्त आहेत त्यात

Chinya1985
Thursday, June 07, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे यार मी मागेच त्या रेल्वे शॉटबद्दल लिहिले होते की

Sas
Thursday, June 07, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नील रेल्वेवाला विडिओ जबरी :-)

Farend
Friday, June 08, 2007 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जितेंद्रला 'ताई' म्हणवून घेणे कसे चालले हेच कळत नाही मला तर

अगदी बरोबर. येथे जर राजकुमार असता तर चित्रपटाचे नाव हतिमदादा करायला लावले असते (मला माहीत आहे येथे मराठी ताई चा संबंध नाही). कारण त्याला आपल्याकडे जराही कमीपणा आलेला चालत नसे. एका चित्रपटात त्याचा गोविंदा किंवा अशाच कोणालातरी उद्देशून डॉयलॉग होता, "तुम्हारे पास ताकत है और मेरे पास दिमाग". आता यात माझ्याकडे ताकद नाही असा अर्थ निघतो, म्हणून म्हणे याने तो बदलायला लावला "तुम्हारे पास ताकत है और मेरे पास दिमाग और ताकत दोनो" :-)

Disha013
Friday, June 08, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेन्ड,
राजकुमार हिरो असलेला पिक्चर बघुन मला नेहमी प्रश्न पडायचा की हिरोईन याच्या प्रेमात पडुच कशी शक्ते?अगम्य असायचं ते.
आणि राजकुमारला लोक पिक्चरमधे का घ्यायचे तेही अगम्य होतं. अगदी स्थितप्रज्ञ मनुष्य होता तो. प्रेमाची गाणी आणि विरहाची गाणी सारख्याच खडबडीत चेह-याने गायचा.


Kedarjoshi
Friday, June 08, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे वाचले की जंजीर राजकुमार व देवाआनंद य दोघांना पण ऑफर केला होता, राजकुमार ने सांगीतले की दिग्दर्शक डोक्याला वासाचे तेल लावतो म्हणुन मी करनार, देव ने सांगीतले की या पिक्चर मध्ये एकही गाण हिरो च्या तोंडी नाही म्हनुन दोघांनीही केला नाही.

पण ते वासाचे तेल लावतो हे कारण अचाट न अतर्क्य आहे.


Deepanjali
Friday, June 08, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदी picture मधल्या लग्न झालेल्या hero चा पाय घसरायची एक एक कारणे पण लै विनोदी असतत !
( बायको आवडत असूनही ) जरा दुसरी बाई दिसली कि घसरलाच पाय !
' एक हि भूल ' मधे तर शब्द्श : पाय घसरतो जितेंद्र चा !
तो रामेश्वरी च्या मागे बाथरूम मधे जातो आणि दोघांचा साबणाच्या वडी वर पाय पडून पाय घसरतो !


Maitreyee
Friday, June 08, 2007 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरो चा रस्ता असा 'घसरडा' करण्यात एकता कपूर या बाईचा हात कुणी धरू शकणार नाही :-)

Shendenaxatra
Saturday, June 09, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जितेंद्रचा पाय घसरण्याचा प्रसंग मस्तच! ह ह पु वा!


Zakasrao
Saturday, June 09, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ते सलाम नमस्ते मधल गाण पाहत होतो. त्यात त्या प्रीती च भल मोठ पोट दिसत होत म्हणजे ती कमीत मकी ५-६ महिने पुर्ण झालेली गरोदर स्त्री असेल अस.
आणि तिच्या सगळ्या हालचाली इतक्या भरभर होत होत्या शिवाय ती उड्या मारत होति हे सगळ बघुन वाटल कि हिचा डॉ. एकदम भारी असेल ज्याने उड्या मार हालचाली भरभर कर अस सांगितले किंवा तीला त्या वाढलेल्या पोटासहित उड्या मारण्याची ताकद आहे. काहिही यार....


Mahaguru
Sunday, June 10, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रजनीकांत च्या सिवाजीचा ट्रेलर बघितला का? त्यांची भाषा नाही कळाली पण एका सीन मधे रजनीकांत चालत असताना मागुन रस्ता तयार होत जातो.
http://specials.rediff.com/movies/2007/jun/05rajni.htm
१:२९ मि. आणि १:४२ मि. वर तो अद्भुत सीन आहे

Sakhi_d
Monday, June 11, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु सहीच...

झकास मलाही ते गाण बघताना असेच वाटते. तिच्या हालचालीवरुन ती गरोदर आहे असे अजिबात वाटत नाही. तसेच राणी, सलमान आणि प्रितीचा पिक्चर आहे. त्यातही ती राणी अशीच ५ - ६ महिन्याची गरोदर असते आणी पडद्यावर लटकत गाणे गात असते. अरे दाखवताना जरातरी काही विचार करा...
तसेच ह्या सगळ्याजणी दिवस भरत येतानाच नेमक्या पोटावरच पडतात. काय सही टायमिंग आहे पडायचे पण...


Zakasrao
Monday, June 11, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु
रजनीला पुण्यात आणावा का रस्ते दुरुस्तींवर खर्च करण्यापेक्षा?
सखी अशा वेळी बायका आणि तिच्या घरचे किती काळजी घेतात ना. नाहितर हिंदी पिक्चर त्या गरोदर बाइला काय काय करायला लावतात. राणी त्या फ़िल्म मधे बॉल पकडायला धावते. काहिही.


Psg
Monday, June 11, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे 'सिवाजी'चा ट्रेलर.. त्यात टीपिकल रजनीकांत स्टंट्सही आहेत.. ते पाहिलं ना.. या हातातून त्या हातात खांद्यावरून पिस्तूल घेऊन गोळी झाडतो ते! :-) आणि फोनवर म्हणतो 'बास' बॉसच्या ऐवजी!
मला तर सिनेमाच पहावा असं वाटायला लागलंय.. कसला चकाचक ट्रेलर आहे! :-)


Shraddhak
Monday, June 11, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल झी सिनेमावर अपरिचित नावाचा टिपिकल तामीळ सिनेमा (dubbed in hindi ) लागला होता. भीषण! मोजून पाच सहा सीन बघितले.
एक अंबी नावाचा सामान्य मनुष्य, समाजात होणार्‍या अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. आणि अशा लोकांना धडा शिकवायची वेळ आली की त्याच्या पोनीटेलमधले सरळ केस सुटून कुरळे कुरळे होतात, त्याचा चेहरा झाकतात आणि तो एकेका भ्रष्टाचार्‍याला, गुंडाला अगदी हाल हाल करून मारतो ( तो सिझोफ्रेनिक असतो म्हणे! त्यात हे असं होतं? त्यात कदाचित तो माणूस अगदी वेगळा वागेलही पण या दुसर्‍या व्यक्तिमत्त्वाचा गेट अप आपोआप कसा तयार होतो म्हणे? त्याचे केस दरवेळी आपोआप सुटून कुरळे होतात). भगवंता, प्रचंड भडक सिनेमा... अनेक अचाट आणि अतर्क्य दृश्यं होतीच! विशेषतः त्याचं अंबी ते अपरिचित असं होणारं transformation ... आणि ते सतत सर्वांना कुरळ्या केसांआडूनच का बघायचं, ते काही कळलं नाही. पण एकंदरीतच भीषण सिनेमा... दक्षिणेत हिट गेला असणार यात शंका नाही.


पूनम ' शिवाजी ' आपल्याकडेही आयनॉक्स आणि ई स्क्वेअरला रिलीज होतोय १५ ला. नक्की बघ.

Psg
Monday, June 11, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचे केस दरवेळी आपोआप सुटून कुरळे होतात
श्र!!!

१५ला झूम बराबर पण रीलीज होतोय.. सिवाजी डब्ड असेल तर बघायला नक्कीच मजा येईल :-) सगळे मिळून जाऊया का?


Dakshina
Monday, June 11, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, काल जाणूनबुजूनच झी सिनेमाच्या वाटेला गेले नाही. कारण या चित्रपटाची जाहीरात बरेच दिवस अगोदर पासून येत होती.
ते ट्रेलरंच इतके भयानक होते की बास.
तुझं कौतुक वाटलं. ५ / ६ सीन पहायचे म्हणजे सुद्धा, अचाट धाडस हवं

झी सिनेमावाल्यांना वाटलं असेल दक्षिणेत सिनेमा हिट्ट ठरला तर तो इकडे पण आवडेल म्हणून.


Himscool
Monday, June 11, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र त्या पिक्चरचा तामिळ पिक्चर 'अन्यन' हा आहे... आणि हा पिक्चर २००५ साली रिलिज झाला आणि तुफान चालला.. चेन्नैमध्ये तिकिटे मिळणे मुश्किल होते आणि गाणी तर फारच पॉप्युलर झाली.. मी हा पिक्चर केरळ मध्ये थिएटर मध्ये जाऊन बघितला आहे.. आणि त्या अंबिची दोन नाही तर तीन रुपे आहेत.. अंबि, रेमो आणि अपरिचित.. अत्यंत भडक, अतर्क्य, अचाट असे सर्व काही ह्या पिक्चर मध्ये आहे.. :-)
अंबि असे का करतो त्याचे कारण तर अचाटच आहे... त्याची बहिण Electric Current असलेल्या पाण्यात पडून मरते आणि त्याचे वडील वकिल असतात ते केस लढवताना म्हणतात की ज्या लोकांमुळे त्यंची मुलगी मेली त्या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि तसे काही होत नाही म्हणुन अंबि तसे वागत असतो.. :-(


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators