Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Archive through June 01, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्यात दडलेलं लहान मूल » Archive through June 01, 2007 « Previous Next »

Billa
Friday, June 30, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aata mi job la aahe maza age 23 aahe. pan tari hi kadhi kadhi mi mood zalyawar shalet jaaun basato mhanje kahi shalechya wargaat nahi pan shalechya maidanat - aawaraat jaaun basato aani swatahala tya mulan madhe shodhat rahato aani mazya shaletalya junya aathawani kadhun chakka ektach hasat rahato kadhi kadhi tya aathawane dole pan bharun yetat.mahit nahi hi saway kadhi janar aani ti jaawi asa manapsun nahi watat.

Asmaani
Saturday, July 01, 2006 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरी पॉटर चा मराठी अनुवाद उपलब्ध आहे का?(आता मला हे सांगितल जाईलच की हा प्रश्न साहित्याच्या कुठल्यातरी बीबी वर टाका म्हणून. पण स्वतात दडलेल्या लहान मुलाबद्दल बोलायचे म्हणून मुद्दाम हा प्रश्न इथे विचारला.) (मंडळी क्रुपया दिवे घ्या.)

Deepanjali
Sunday, July 02, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* लहान मुलां मधे जाउन दंगा मस्ती , मारा मार्‍या करणे .
* शाळेत सेक्रेटरी होणे आणि त्या निमीत्ताने मुलांना पट्टीने मारणे .
* पुढे बसलेल्या मुलींच्या वेण्या एकमेकींना बांधणे किंवा त्यांच्या केसात कचरा टाकणे .
* नावडत्या मुलींच्या uniform वर नकळत रंगीबेरंगी शाईचे डाग पाडणे .
* डबल नंबरच्या गाड्या दिसल्या कि मैत्रीणीच्या पाठीत गुद्दे मारणे .
* पिसांचा संग्रह करणे .
* पुढे बसणार्‍या मुलाच्या स्वेटर चे धागे काढून त्याचा कोलाज करणे .
* sharpner नी कापलेले पेन्सिलीचे slices जमवून त्याचे artwork करणे .
* Chocolate च्या चांद्या जमवणे .
* फ़ुटलेल्या बांगड्यांच्या काचा जमवून टेबल वर सुशोभन करणे .
* निलगिरीच्या झाडाच्या वाळक्या टोप्या जमवून त्याचा गजरा करणे .
* प्राजक्ताच्या झाडाचा सडा वेचणे .
* मैत्रीणीं बरोबर फ़ुलपाखरे पाखरे पकडायला जाणे .
* लहान असताना मॅक्सी घालायची फ़ॅशन होती तशी मॅक्सी घालणे .
उडत्या बाह्यांचे frocks घालणे , घोडागाडी fabric चे single collar dresses घालणे .
* गॅदरींग मधे भरपूर programs मधे भाग घेणे .
* उन्हाळ्याच्या सुट्टीत घर घर खेळणे .
* बाबां बरोबर स्कूटर वर तासं तास भटकणे .
* मोठी बहिण झोपली असताना हळुच जाउन तिचा वेडावाकडा haircut करणे .
* बाल्कनी मधे उभे राहून रस्त्यावरून जाणार्‍या लोकांना हाका मारून लपून बसणे .
* उगीच wrong numbers लावून लोकांना पिडणे .
* पोळी भाजी खायचे नखरे करणे आणि आईच्या हातचे fancy पदार्थ आयते बसून खाणे .
* दुपारी आई झोपली कि चोरून डबे उचकून खाणे .
* शाळेच्या बाहेर मिळणारे पेरु , लाल चिंचा , चन्या मन्या बोरं पाच पैशाच्या गोळ्या खिसा भरून हादडणे .
चुपाचुप , lolipop आणि बिग बाईट खाणे .Athak
Sunday, July 02, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अजुनही गांवी गेलो की
दगडाचा नेम धरुन आंबे पाडणे , गिल्ली दांडु ( विटी दांडी ) म्हणत्यात तुमच्याकडे :-) खेळणे , मुलांच्यात मिसळुन कांचे खेळणे असे उध्योग करतो :-)
आणखी एक खोडी करणे , लहान तिसरी चवथीत शिकणार्‍या मुलांना एक गणित १७५७०५१ चा भागाकार ( भाजक शोधा ) करायला लावणे :-) मी लहान असतांना एका आजोबाने हे गणित दिले होते , कित्त्येक महिने सोडवत होतो :-)


Aashu29
Sunday, July 02, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<<मोठी बहिण झोपली असताना हळुच जाउन तिचा वेडावाकडा haircut करणे . >>
बापरे दिपा, माझ्या लहान बहिणिने हे केले असते तर तिची खैर नसती

Tulip
Sunday, July 02, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तं पोस्ट दीपांजली. बचपनके दिन याद आ गये. त्या मधे आयब्रो पेन्सीलने डोळे आणि लिपस्टीकने ओठ गोल रंगवून आई घरी नसताना दुपारी मैत्रीणी जमवून एकमेकींचा मेकप करणे पण आले. ( ह्यावरुन आठवले. एकदा आमच्या शेजारी रहाणार्‍या कॉलेजात जाणार्‍या मुलीने माझ्या आईजवळ चहाडी केली की तुम्ही बाहेर गेलात की ही मैत्रीणींना जमवून असे उद्योग करते. आईच्या हातच्या खाल्लेल्या धपाट्याचा वचपा मी लगेचच पुढच्याच रविवारी काढला. संध्याकाळी सातच्या सुमारास मुद्दाम त्यांच्या घरी जाऊन काकूंना सांगितले की तुमची रश्मी बघा समोरच्या रवी बरोबर गच्चीत गप्पा की काय करत बसलेय. आम्हाला दुसर्‍या गच्चीत खेळा म्हणून सांगतेय. वर असही सांगीतल की ती दर रविवारी असच करते. तेव्हापासून रश्मीताई मी दिसले की खाऊ की गिळू )

Dineshvs
Sunday, July 02, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलिकडेच विजया मेहतानी एक वर्कशॉप घेतला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, मी स्वतःला पाच वर्षाची मुलगी समजते.
म्हणजे त्यांच्या उत्साहाचे आणि अफाट कर्त्रुत्वाचे हे रहस्य आहे तर.


Deepanjali
Sunday, July 02, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही बाहुल्यांचे dress करण्यासाठी शेजारच्या काकुंच्या wadrobe मधल्या अतिशय ठेवणीतल्या महागड्या साड्या हळुच जाउन कराकरा कापायचो आणि नंतर मार खायचो ..
अत्ताही अशी ' शैतानी ' करायला जाम आवडेल , बाहुली ऐवजी साडी कापून स्वत : साठी कुर्ते शिवून घ्यायला धमाल येइल !


Asmaani
Sunday, July 02, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pls tell me something about harry potter's marathi anuvaad.

Manuswini
Monday, July 03, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली,
अगदी अगदी specially ते maxi प्रकार
तो खुपच famous होता

आम्ही सुद्धा लहानपणी घराच्या गच्चीतुन रस्त्यावरुन येणार्‍या जाणर्‍यांना शुक शुक करायचो आणी लपायचो.
एकदा मी आणी माझ्या लहान भावाने गावी असताना मांजरीची पिलांना अंघोळ घालुन मारुन टाकले actually मारुन टाकायचा हेतु बिलकुल नव्हता पण अक्कल एवढी लहान ना की 70c गरम पाण्यात shampoo टाकुन अंघोळ घातली गेली
मी लहान भावाच्या कानात बाम भरला होता कारण तो आईचा fav वाटायचा मला लहानपणी


Deepanjali
Monday, July 03, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही सुद्धा लहानपणी घराच्या गच्चीतुन रस्त्यावरुन येणार्‍या जाणर्‍यांना शुक शुक करायचो आणी लपायचो.
<<<आणि कधी कधी पाउस पडत असताना घरतल्या फ़्रीज मधल्या बर्फ़ाचे छोटे तुकडे करून खालून जाणार्‍या लोकांच्या डोक्यात टाकायचो , उगीच त्यांन गारा वाटाव्यात म्हणून .
एखाद्याच्या डोक्यात चूकून टणटणीत ice cube ही पडायचा .


Storvi
Monday, July 03, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही N.D.A मध्ये होतो, आणि शाळेत जातांना बरेचदा Cadets पळायाला जातांना वगैरे पहायचो. आणि मग सगळे बस मधले आम्ही एका दमात ओरडायला लागायचो ' आयाराम गयाराम पुसी कॅट ' असं का ओरडायचो कोणास ठाउक... दादा कं ने सांगुन ठेवलेलं कॅडेट्स दिसले की असं ओरडायचं :-O ही बहुतेक प्रत्येक पिढी ने पुढे pass on करायची गोष्टं असावी.. आताची पोरं करतात की नाही कुणास ठाउक? :-O

Meera
Tuesday, July 04, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रीझर मधील साठ्लेलं बर्फ़ गोळा करून घरात उडवणं, साबणाचे फ़ुगे करणं आणि ते मैत्रिणिच्या तोन्डावर सोड्णं...

Mrinish
Tuesday, July 04, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसामी हैरी पौटर च्या १ ल्या भागाचा मराठी अनुवाद आहे.......कोणितरी गुमास्ते असे लेखक आहेत बहुधा नाव हैरी पौटर आणी परिस असे आहे........

Suvikask
Monday, January 22, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ माहेरच आडनाव "गुमास्ते" आहे, पण मी अस काही केल नाही

Nandini2911
Monday, January 22, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यात दडलेली लहान मुलगी माझ्यापेक्षा लोकानाच जास्त दिसते कारण अजूनही मला कितवीला आहेस असं विचारतात :-(

Chyayla
Monday, January 22, 2007 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग नन्दिनी तु शाळेत जायच सोडुन ईथे मायबोलिवर कसल्या उनाडक्या करत आहेस? जा अभ्यास कर नुसती दीवसभर धान्गड धिन्गा करत असते. पास व्हायचे की नाही? थाम्ब नाही तर तुझ्या आईलाच सान्गतो.... अहो काकूSSSS.

तसा हा प्रसन्ग माझ्या सोबत पण खुपदा घडला आता नाही घडत जरा वजन वाढल आहे म्हणजे नॉर्मल झालो आहे.

दीपान्जली ते शुक शुक करण्याचे प्रकार आमच्याकडे पण शिवाय घरातुन पाणी शिम्पडने जेणे करुन पाउस पडत आहे असे वाटावे.

आणी खरी मजा तर ते रेस्टिप खेळताना मी आणी माझा भाउ लपताना माख्या बहिणीचे फ़्रॉक घालायचो त्यामुळे ज्याच्यावर राज्य असायचे तो पार गडबडुन जायचा, मी आत्ता माझ्या बहिणीला याची आठवण करुन दीली आणी आम्ही आठवुन आठवुन खो... खो.. हसलो.


Naatyaa
Monday, January 22, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर ते रेस्टिप खेळताना >>> बापरे मी चुकुन भलतेच वाचले पहिल्यांदा.. ~D

Anamikaa
Friday, April 06, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली तु खरच जुन्या दिवसांची आठवण करुन दिलीस. मला तर ते गाणे आठवले "बचपन के दिन भुला न देना". तुझ्या लिखाणाने मी खरच माझ्या भुतकाळात रमले.
मला आठवतय मी शाळेत असताना मधल्या सुट्टि मधे जेवायला घरी पळायचे खर पहाता आम्हाला परवानगी नसायची पण तरीही मी किमान शनिवारि तरि शिपाईकाकांचा डोळा चुकवुन घरी पळायचे.केवळ आईच्या हातचे गरम गरम जेवायला मिळायचे म्हणुन त्यासाठी मी कित्येकदा शिक्षकांचा मार देखिल खाल्ला पण घरी जाणे सोडले नाही.

मी कधि कधि शाळेच्या वेळेत खिशात चिंचा बोरे भरुन घ्यायचि एकदा वर्ग चालु असताना आमच्या हिंदिच्या शिक्षिका सौ चौधरी यांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि त्याच क्षणी तोंडात ठेवलेल्या आंबट चिंचेने माझा घात केला,त्यांची माझी नजरानजर झाली आणि तेंव्हाच माझा डोळा लवला.झाले त्यानंतर जी माझी परेड घेतलिय त्यांनी! कि आठवले तरी माझी भितिने गाळण उडते.
प्राथमिक मदुन माध्यमिक मधे येताना झालेल्या निरोप समारंभाच्या वेळेस मी खुप रडले होते. शिक्षकांना माझी समजुत काढता काढता नाकि नऊ आले होते.
पण अजुनही मी जेंव्हा जेंव्हा आईकडे जाते तेंव्हा माझ्या शाळेत अवश्य जाते. जुन्या आठवणींना उजाळा दिला कि मन खरच खुप सुखावते.
अनामिका"Nilima_v
Friday, June 01, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry
mala watle ha pregnant baykancha forum aahe

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions