Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 31, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through May 31, 2007 « Previous Next »

Gobu
Wednesday, May 30, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वा,
मी पाहीलाय... मी पाहीलाय..र्उद्राक्ष
एकदम बकवास पिक्चर आहे
झकास,
मस्त रे!!!


Disha013
Wednesday, May 30, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झटपट लग्नाची किती मस्त पद्धत शोधलिये या सिनेमावाल्यांनी. हिरोईन्वर लोकांनी संशय घेतला रे घेतला की भर तिची मांग! अन जाहीर करुन टाकायचं 'ये अब मेरी अमानत है! अगर किसीने इसकी तरफ़ आख उठाकर देखा या इसे कुछ कहा हो चीर के रख दुंगा!' मग कुंकु नसेल तर रक्त आहेच पर्याय!

Deepanjali
Wednesday, May 30, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताजे रक्त लावण्याची style तरी ठिक आहे , पण एका movie मधे ( नाव आठवत नाही,) तर मिथुन त्याला आधी झालेल्या जखमेचे बॅंडेज सोडून त्या जखमे वरचे रक्त वापरतो !

Sas
Wednesday, May 30, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! ह. ह. पु. वा. , मी तर आज काल ह्या बीबी वर काही नविन Post आल्यात का याचीच वाट बघत असते. ह्या सार्‍या सिन ला घेवुन 'A3SL' (अचाट सिन आणी आतर्क्य लोजिक) multi star movie काढण्याचा सल्ला 'क' ला द्यायला हवा. (मिथुन, रजनीकांत अतीमुख्य भुमिकेत.) :-)


Kedarjoshi
Wednesday, May 30, 2007 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिथुन त्याला आधी झालेल्या जखमेचे बॅंडेज सोडून त्या जखमे वरचे रक्त वापरतो >>

Amol_amol
Wednesday, May 30, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हिलन इतके मुर्ख आसतात कि कधीच हीरो ला इतर वेशात ओलखत नाहित. ५ वयाच्या मुलाला कळेल पण त्याला नाही.

Amol_amol
Wednesday, May 30, 2007 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या पध्दतीने व्हीलचेअर मधले लोक बरे होतात ड़ऑक्टरची गरजच नाही. काहितरी dramatic करा.....सत्ते पे सत्ता?

Bhagya
Thursday, May 31, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या निश:ब्द बद्दल लिहा की रे कोणी! sas म्हणते ते बरोबर आहे....मी तर नि:शब्द बघूनच नि:शब्द झाले. पुर्ण सिनेमाभर अमिताभ च्या चेहर्‍यावर म्हातार्‍या (चेहर्‍यावरच्या सुरकुत्या सगळ्या मोजता येतात), लाळ गाळणार्‍या कुत्र्यासारखे भाव आहेत आणि त्याचे तसे सारखे close-ups आहेत.
ती ज़िया का कोण ती निष्पाप नाही, तर चक्क निर्लज्ज दाखवलीय. आणि पुर्ण सिनेमाभर निशब्द कोणीच नाही......फ़क्त सीनच नव्हे, तर पटकथा, दिग्दर्शन सगळे काही अचाट, अतर्क्य आहे.
साठ वर्षाचा म्हातारा मुलीच्या सोळा वर्षाच्या मैत्रिणीच्या प्रेमात कसा काय पडु शकतो? तिचा innocence त्याला खूप भावतो म्हणे... तर काय मुलगी innocent नसते?

don आणि इतर अनेक दमदार सिनेमे बघितल्यानंतर अमिताभकडून ही अपेक्षा नव्हती.


Mi_anu
Thursday, May 31, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धूम २ च्या सुरुवातीला खाली रुळावर बोर्डावर घसरत असलेला हृतिक उलटी उसळी मारुन गाडीच्या टपावर उडी घेतो ते करुन पाहिलं आहे का कुणी? साधा समोरचा प्लॅटफॉर्म उंच असला तर तो चढून जायला कोणाचातरी हात घ्यावा लागतो.
अगदी ६५ किलो वजनाचा ६ फूटाचा ह्रितिक असला तरी १० फूट उंचीच्या चालत्या डब्यावर खालून उसळी मारुन चढू शकेल काय? न्युटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम केळी खायला गेले का?


Zakasrao
Thursday, May 31, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिथुन त्याला आधी झालेल्या जखमेचे बॅंडेज सोडून त्या जखमे वरचे रक्त वापरतो>>>>
त्या डायरेक्टर ला आपला हिरो किती हुशार आहे ते दाखवायचे असेल.
काल त्या हिमेश रेशमियाच्या येणार्‍या पिक्चरचा ट्रेलर पाहिला चुकुन. अवाक झालो.
रिक्षा पुढचा एक पाय (पक्षी चाक ) हवेत उचलुन मागच्या दोन पायावर (पक्षी चाक) उभी राहु शकते आणि अशी एक नाहि तर ३ रिक्षा आहेत ह्या जगभरात! आणि ह्या तिनही रिक्षा त्यांच्या "डायव्हर" सोबत पुढच्या एका कार वर हल्ला चढवतात. त्याच्या बॉनेट वर आपली पुढची लाथ (पक्षी पुढच चाक) हाणतात. अगबाबौ! केवढ मोठ आश्चर्य.
अगा जे पुण्यातल्या रिक्षा वाल्याना आजपर्यंत जमल नाहि ते पिक्चर मधल्या रिक्षावाल्याना जमल.
समस्त पुणेकर रिक्षा वाल्यांकडुन (पक्षी डायव्हर) मी याचा जाहिर निषेध करतो.

disclaimer: जे लोक्स पुण्यात रिक्षात नाहि बसलेले त्याना
माझ्या भावना समजण्यास कठीण जातील. पण समजुन घ्यावे.


Neel_ved
Thursday, May 31, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, आम्ही कल्पना करु शकतो, कारण आम्हीही ठाणे डोंबिवलीच्या रिक्षांमध्ये बसलो आहोत.

Shraddhak
Thursday, May 31, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्युटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम केळी खायला गेले का?<<<<
अनू, याचं स्पष्टीकरण माझ्याकडे आहे.
बग्ज बनीच्या एका एपिसोडमध्ये बग्ज त्याच्या लहानपणीची आठवण सांगतो. त्यात एल्मरपण लहानच आहे. एकदा छोटा बग्ज पळत असताना एका कड्यावरून दुसर्‍या कड्यावर ( गुरुत्वाकर्षणाचे नियम as usual धुडकावून लावत) पळत जातो. एल्मरलाही ते जमलेलं पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तेव्हा एल्मर सांगतो की त्यांना शाळेत अजून गुरुत्वाकर्षण शिकवलेलेच नाही. मग बग्ज त्याला गुरुत्वाकर्षणावरचे पुस्तक वाचायला देतो आणि तेव्हा मात्र एल्मर एका कड्यावरून सरळ दुसर्‍या कड्यावर पळत न जाऊ शकता गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळत खाली पडतो.
हेच तत्व त्यांनी धूममध्ये वापरले असल्यास नकळे! ' गर उसे मालूम नही है की कौन न्यूटन और कैसी gravity तो वो ( पक्षी : हृतिक) gravity के रुल्स फ़ॉलो करे भी तो कैसे? ' निर्विवाद!


BTW हृतिकचं वजन ६५ किलो आहे? ए भा प्र. आकारावरून तरी वाटत नाही. :-P

' आप का सुरूर ' first day first show पाह्यला विसरू नका. त्यात HR सदैव डोक्यावर असलेली त्याची ती गूढ ( आणि कळकट) टोपी काढणार आहे, अशी बातमी आहे.

Farend
Thursday, May 31, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shraddhak बरोबर आहे. कार्टून कॅरेक्टर्स ना निदान आपण हवेत अधांतरी आहोत हे दिसल्यावर मग ते पडतात. हिंदी चित्रपटांत ते ही नाही. फरिश्ते का अशाच कोणत्यातरी चित्रपटात धरम आणि बहुधा रजनी ची एंट्री हवेतून तरंगत उतरत झाली आहे म्हणे. असे दर्जेदार पिक्चर जरा बघायला पाहिजेत.

Sas
Thursday, May 31, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सल्लुने चक्क बाटलिने 'बासरी' वाजविलि आहे :-) म्हणज़े बाटलीला बासरी सारख धरुन बासरिचे आवाज काढलेत :-) ते ही चक्क विमानात "कही प्यार ना हो जाये" चित्रपट आहे बहुदा राणी, रविना, पुजा बत्रा(?), मोहनिश...."सावरिया रे ओ सावरिया" गाण असलेला चित्रपट



Sas
Thursday, May 31, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या अगदी नेमके शब्द वापरलेत "नि:शब्द" साठी निर्लज्ज, कुत्रा :-)

६० वर्षांचा कुटुंब असलेला, सख्खी तरुण मुलगी असलेला थेरडा प्रेमात वै. पडलेला नाही 'लंपट' झालेला दाखविलाय. आणी ति जिया निष्पाप नाही "मानसिक रुग्ण" वाटते.

Sas
Thursday, May 31, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होरिईन ची ज्याच्या शी "सगाई होने वालि है" वा "शादि तय हो गई है" त्याच character down bad दाखवितात बरेचता (आई वडिलांना मुलाची पुर्व चौकशी करायला उसंत कशी नाही मिळत, "खानदान कि चौकशी", मित्राचा मुलगा असला तरी त्याची चौकशी हा ही culture चाच भाग ना arrange marriage मध्ये :-) )

मुख्य म्हणजे तो Side Actor in other movies also 'हिरोच' काम करत नसेल तर त्यला bad दाखवायचच हा नियम आहे जणु, पण जर का तो सल्लु (सिर्फ तुम, K3G..), अक्षय (दिल तो पागल है) असेल तर मात्र त्याला 'चांगल' 'रईस', अच्छा'... दाखवितात.



Runi
Thursday, May 31, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, सास खरच तो निःशब्द सिनेमा निःशब्द करणारा आहे. ते जिया चे take light तर अगदी डोक्यात जाते. ती innocent वाटण्यापेक्षा बावळट आणि उद्धट वाटते आणि बिग बी पण संपुर्ण सिनेमात भंजाळल्यासारखा वाटतो.

Disha013
Thursday, May 31, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिही निशब्द बद्दल असेच मत लिहीले होते मागे. साठी बुद्धी नाठी असे झालेय अमिताभचे त्यात.म्हातारचळ लागल्यासारखे करतो. आणि जिया तर कमी वयाची म्हणु न बेअकली. दोघे असे येडे असल्यावर जुळणारच!
BTW , इथे थोडे वेगळे लॉजिक वापरुन का नाही सिनेमा काढत हे लोक?म्हणजे, रुपेरी केसांच्या,सुरकुत्या पडलेल्या म्हाता-या हिरोईन च्या प्रेमात एक विशीपंच्विशीचा तरुण पडतो वगैरे!


Farend
Thursday, May 31, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, जवळजवळ तसेच 'दिल चाहता है' मधे अक्षय खन्ना व डिम्पल चे होते :-)

Deepanjali
Thursday, May 31, 2007 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच movies मधे आणि t.v. serials मधे सतत आढळणारे विनोदी दृश्य :
( थोबाड सतत प्रेक्षकां कडे करण्याच्या नादात ) दोन व्यक्ती dialogs तर एका मेकांशी बोलत असतात , पण एकामेकां कडे पहात नाहीत , खिडकी बाहेर , भींती कडे . किंवा कधी कधी तर दोन व्यक्ती दोन भींतीं कडे पहात सुध्दा बोलतात !


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators