Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 30, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through May 30, 2007 « Previous Next »

Farend
Tuesday, March 20, 2007 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manuswini
इथुन पुढच्या पोस्ट्स आहेत त्याबद्दल, कदाचित आणखी मागे ही असतील

Manuswini
Wednesday, March 21, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थन्क्स farend and karadkar for link

Maku
Wednesday, March 21, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks a lot kashi
changali info dili tya badaal really thanks


Fulpari
Tuesday, April 10, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मुंबई-लंडन-मुंबई साठी स्वस्त आणी मस्त airline सुचवाल का? बरोबर ४ वर्षाचा मुलगा आहे

Imtushar
Wednesday, April 11, 2007 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fp , तुम्ही कधी प्रवास करणार आहात त्यावर बरेच अवलंबून आहे. तसे turkish, qatar आणि AI चे स्वस्त मिळू शकेल ( ex bombay ), पण turkish aaNi qatar च्या फ्लाईट्स थेट नसतील

Fulpari
Thursday, April 12, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, मला मे च्या पहिल्या आठवड्यात प्रवास करायचा आहे. कोणताही दिवस चालेल. week-day प्रवास केला तर स्वस्त पडेल का? मुलगा बरोबर आहे त्यामुळे शक्यतो थेट फ़्लाईट बरी ना? एखादी चांगली साईट आहे का बुकींग साठी?

Imtushar
Thursday, April 12, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही जर outbound travel weekday ल केलंत तर कदाचित स्वस्त पडेल. तुम्हाला तिथे एखाद्या travel agent कडून तिकिट बुक करता येईल. break journey शक्यतो टाळावा, पण जर stop over दिवसा असेल, तर फार काही त्रास होत नाही (हा स्वानुभव आहे :-)).

तुम्ही travelocity किंव expedia वर चेक करू शकता, पण ते भारतात तिकिटे पोचवतात का हे माहीत नाही.


Imtushar
Thursday, April 12, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fp, I have mailed you some more details

Farend
Wednesday, April 18, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेट आणि किंगफिशर अमेरिकेत सर्विस चालू करतायत. पण बहुधा सॅन फ्रॅंसिस्को तून मुंबईला जायला यात फ्लाईट नसेल सुरुवातीला.

Kedarjoshi
Wednesday, April 18, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच बातमी शिकागो मुंबै ऐअर ईंडिया विना थांबा व नविन विमानसेवा या जुन पासुन सुरु होनार असे लिहिले आहे. जबरी.


फुलपरी भारतात thomas cook ची साइट सर्व ऐअर लाईन्स ची तिकीटे विकते. स्व्स्त ही असतात. (ई टिकीट)

तुम्ही जर अमेरिकेत असाल तर carlson wagnolit ची साइट योग्य किमतीत तिकीट देते. (ई टिकीट)




Vinaydesai
Wednesday, April 18, 2007 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंधरा तासांची विना थांबा विमानसेवा ही किती त्रासाची असते ही त्यात बसून आल्यावर कळते..

विमान कंपन्या, आम्ही ह्या सोई करणार, त्या सोई करणार सांगत असल्या तरी त्या फक्त Business Class, First Class साठी असतात. आम जनतेने हौदातच बसून रहायचं असतं..

सध्या सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली विमानकंपन्या, तीन चार लोकाना उभे राहून गप्पा मारायलाही बंदी करतात. एका भागातल्या लोकांना दुसर्‍या भागात प्रसाधनगृह वापरायलाही बंदी असते.. तेव्हा पंधरा तास पाय दुमडून बसण्याची सवय असेल तर जायला हरकत नाही.. मी एकदा गेलोय, परत येताना हिम्मत झाली नाही.. अश्या मुंग्या येतात... काय सांगू?


Mandard
Thursday, April 19, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१२ एप्रिलला मी ए आय १२७ मु.दि.फ़्र.शि. ने मुम्बई हुन दिल्लीला आलो. विमानतळावर चेक इन ची मजा बघत उभा होतो. विमानाला तोबा गर्दी होती आणि शिकागो साठी फ़क्त दोनच काउन्टर होते. लोक अगदी एस.टी. सारखी घुसाघुसी करत होते. चेक इन एवढे हळु चालले होते की विमान सुटायच्या आत ते संपणे शक्य नव्हते. त्यामुळे विमान ४० मि. उशिरा सुटले. काहिंना अगोदर सिट नं. दिले होते. त्या जागी दुसरीच जनता होती. त्यांचे पन तेच नम्बर होते. सगळा सावळा गोंधळ. आणि विमान दिल्ली ला निम्म्याहुन रिकामे झाले. पुढच्या प्रवाश्यांना दिड तास हाॅल्ट आहे असे सांगितले होते. आणि बाहेर दिल्लीच्या प्रवाश्यांना ते चार तास लेट आहे असा बोर्ड होता. म्हणजे आतल्या प्रवाश्यांना चक्क गंडवले तर.

Monakshi
Friday, May 25, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीतरी प्लीज रेल्वेचे किंवा बसचे किस्से टाका ना?

या तुमच्या विमांनांमध्ये बसून कसंतरीच व्हायला लागलंय!

तुमच्यापैकी कोणी सांताक्रूझ गार्डनमधल्या विमानात बसलंय का??? ५ का १० रु. टिकीट आहे आतमध्ये एकदम प्रशस्त जागा, मुलांना ख़ेळायला एकदम छान आहे. फक्त ते विमान उडत नाही.

"just kidding haa, dil pe mat lo yaar!!!"


Rajya
Friday, May 25, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिरजेला काॅलेजला होतो त्यावेळेचा किस्सा,

सकाळी ७.१५ ची S.T. होती, अणि त्या ST ला भयानक गर्दी असायची. तर प्रत्येक जण खिडकीतुन रुमाल टाकुन आपली सीट बूक करायचा. मी धक्काबुक्की करत आत शिरलो तर बघेल त्या सीट वर रुमाल पडलेले. त्या दिवशी काय झालं काय माहीत, पण मी सरळ एक रुमाल उचलला व बाहेर फेकुन दिला आणि बसलो त्या सीटवर, बाजुला माझा मित्र बसला.
थोड्या वेळाने त्या रुमाल चा मालक आला व म्हणाला, "ही माझी सीट आहे"
"कशावरुन" मित्राची साथ ग्रहीत धरुन मी म्हणालो.
"या सीट वर मी रुमाल टाकला होता"
"अहो, आम्ही एव्हढा त्रास करुन जागा पकडायची आणि तुम्ही मात्र बाहेरुन रुमाल टाकायचे, सीट वर रुमाल टाकला तर सीट तुमची होते का?"
"हो"
"मग ही ST माझी आहे.
"ती कशी?"
"कारण गाडीच्या टपावर माझं रुमालाचं गाठोडं आहे."


Dakshina
Friday, May 25, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला प्रवासात आलेला अनुभव गम्मतशीर नक्कीच नाही. अर्थात त्याचा माझ्याशी direct संबंध असा पण काही नव्हता, तरीही इथे टाकावसा वटतोय.

एकोणतीस एप्रिलला मी कोल्हापूरहून पुण्याला यायला निघाले. संध्याकाळी ४.४५ ची बस मिळाली. मधेच कुठेतरी, अता मला ठिकाण आठवत नाही... एक बाई - कम - मुलगी बसमधे चढली आणि माझ्या शेजारी बसली.. मला काही काम नव्हतं मी आपलं तिचा निरिक्षण करत बसले. ती खूप गोरी होती, हातावर मेंदी काढलेली, अंगावर भरजरी लाल रंगाची साडी... साडी नाही almost शालूच होता... पाठीवर कुठे कुठे हळद लागलेली.... आणि make up पण होता... ती फ़ार संशयास्पदरीत्या बस मधे चढली आणि conductor ला सांगत होती की तिला शिरगावला उतरायचं होतं ते पण कुठल्या पडक्या देवळापाशी म्हणे... ती माझ्याशेजारीच बसल्यामुळे मला सगळं दिसत आणि ऐकू येत होतं.

सातारा आल्यावर तिने कंदी पेढ्यांचा Box विकत घेतला.... आणि you can't imagin बकाबका सगळा संपवला सुद्धा २ मिनिटात. मी अवाक झाले होते. ते सगळंच विचित्रं वाटलं मला..

सुदैवाने ती माझ्याशी काही बोलली नाही, आणि मी पण...

शिरगाव आल्यावर ती ज्या आनंदात उतरली तो मी वर्णू शकत नाही... तुम्ही पण विचार करू शकता की संध्याकाळी पवणेपाचला निघालेली बस सातार्‍यात किती वाजता पोचली असेल. त्या अंधारात ती एकटी त्या so called देवळाजवळ उतरली..

मला बरेच प्रश्नं पडले, ती इतकी नटून थटून एकटीच कशी काय प्रवासाला आली असेल? मला तर ती एक क्षण नवरी मुलगीच वाटली होती.. पळून चालली आहे की काय असं पण वाटलं. ती उतरल्यावर पुढे काय झालं असेल? तिथे ती ज्या कुणाला भेटणार असेल, ती माणसं आली असतील का?

अर्थात हे सगळं गुढंच राहीलं माझ्या मनात.


Ajjuka
Friday, May 25, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणालातरी US मधला travel agent हवा होता ना. शिकागो मधे MAX Travels म्हणून आहे. मराठी माणूस आहे. राजाध्यक्ष आडनाव बहुतेक. लक्षात नाही नक्की. मी नेहमी त्यांच्याकडूनच केलं होतं बुकिंग. आता नंबर नाहीये माझ्याकडे पण बरेच वर्ष हे काम करतात ते त्यामुळे यलो पेजेस मधे असणार नक्की.

Saee
Tuesday, May 29, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, नशीब तू उतरुन तिच्यामागे गेली नाहीस बघायला!!

कोल्हापूर - पुणे प्रवासातलाच माझा एक गंमतीशीर किस्सा. संध्याकाळी निघालेले. आरामबस लागलेली, तिच्यात चढणार इतक्यात 'हुबळी पुणे' आली. बाबा म्हणाले कर्नाटकाच्या गाड्या लवकर पोचतात आणि चांगल्या नेतात, तिनेच जा. आमचा सगळ्यांचाच तो अनुभव आहे त्यामुळे तिच्यात चढले. मला सुदैवाने पुढच्या बाजूची एक चांगली स्वच्छ जागा मिळाली. दहाएक मिनिटातच आम्ही मार्गाला लागलो. हायवेला पोचल्यावर मात्र गाडी इतकी संथ झाली की सव्वासहाला सुटलेली गाडी पावणेआठ झाले तरी कर्‍हाड येईना. लवकर जाणार हे गृहीत धरुन बरेच जण बसलेले ते ओरडायला लागले. कर्‍हाडात स्टॅंड कुठे ते काही त्यांना ठाऊक नव्हतं मग आम्ही सगळ्यांनी हातवारे करत सांगितलं. पुन्हा महामार्गावर पोचताना रस्ता चुकले मग पुन्हा दिग्दर्शन. पण पुढे मात्र कमालच झाली. सातारा सोडल्यावर दोन फाटे फुटतात. या पठ्ठ्याने बस सरळ महाबळेश्वर फाट्यावर वळवली:-) बरीच पुढे गेली, ५ - ६ किमी तरी गेली असेल. मग कुणाच्या तरी लक्षात आलं! मग पुन्हा खाणाखुणा! अंधारात तसं लगेच लक्षात येणं अवघड असतं. मग 'U' आणि पुन्हा डावीकडे पुणे फाट्याला वळलो. तो रस्ता बराच अरुंद आहे त्यावर एवढी लांबुडकी बस (अलिकडे त्यांच्या नव्या आरामबस आल्यात त्यातली होती) वळवण्यातच १५ - २० मिनिटे गेली, आणखी उशीर! पण त्यामुळे लोक स्वारगेट येईतोवर टक्क जागे राहिले, हा आणखी कुठे भलतीकडे तर वळत नाही ना ते बघत!

गाडीत एकमेव माणूस होता तोडकं मोडकं कानडी येणारा त्याच्या मदतीने आम्हाला कळलं की वाहक - चालक बिचारे पहिल्यांदाच या मार्गावर गाडी घेऊन आले होते त्यात त्यांना मराठी जेमतेमही समजत नव्हतं! मग आणखी काय होणार होतं? मग कुणीही त्यांच्यावर रागवलं नाही, सगळ्यांनाच उलट त्यांचं कौतुक वाटळं. तोवर स्वारगेट यायला आम्हाला साडेबारा वाजले होते!:-)


Dineshvs
Wednesday, May 30, 2007 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी वायुदुत नावाची सरकारी विमानकंपनी होती. तिचाही असाच किस्सा सांगतात. मुंबईहुन कोल्हापुरसाठी विमान उडाले आणि पायलटच्या लक्षात आले, कि त्याला दिशाच माहित नाही. मग प्रवाश्यांच्या सल्ल्यानुसार कसेबसे पुण्यापर्यंत विमान आणले आणि मग पुणा बॅंगलोर हायवेवरुन उडवत उडवत कोल्हापुर गाठले. मी स्वतः मुंबई ते कोल्हापुर असा प्रवास केला होता त्या विमानाने. त्यामुळे किस्सा अगदीच खोटा असेल असे वाटत नाही.
काल एअर डेक्कनच्या फ़्लाईटमधे असाच एक धमाल किस्सा घडला. या एअरलाईनची पॉलिसी म्हणुन सीट नंबर देत नाहीत. हवं तिथे बसा असे सांगतात. त्यामूळे प्रवाश्यांचा खिडकीची जागा पकडण्यासाठी आटापिटा चालतो. काल माझ्यापुढे एक आठनऊ वर्षांची मुलगी आणि तिचे आईबाबा होते. तिला पहिल्या सीटवर बसायचे होते. तर तिचे बाबा म्हणाले,
बेटा वहाँ नही, उसको नीचेसे सपोर्ट नही होता. हम विंग के उपरहि बैठेंगे. !!!!!!


Dakshina
Wednesday, May 30, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम विन्ग के उपरही बैठेंगे

Limbutimbu
Wednesday, May 30, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> तुमच्यापैकी कोणी सांताक्रूझ गार्डनमधल्या विमानात बसलंय का??? ५ का १० रु. टिकीट आहे आतमध्ये एकदम प्रशस्त जागा, मुलांना ख़ेळायला एकदम छान आहे. फक्त ते विमान उडत नाही
हो, मी बसलो हे!
इसवीसन १९६९ मध्ये!
त्यावेळचा तिकीट दर आठवत नाही, पण बागेत शिरायला तिकीट होत, विमानात बसायला नवत येवढ आठवत!
:-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators