Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through May 23, 2007 « Previous Next »

Dinesh77
Wednesday, May 23, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असा दाट संशय आहे की,
नायिका व्हिलनच्या तावडीत सापडली की बचाओ बचाओ असे न म्हणता बच्चा हो बच्चा हो असे म्हणत असेल :-)


Slarti
Wednesday, May 23, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रजनीकांतची श्टाईल : हा कुठल्यातरी तमीळ चित्रपटातील शीन आहे. इंस्पेक्टर रजनीकांत एका नारळाच्या झाडाखाली त्याच्या बाईकवर बसला आहे. अचानक त्याला गुंडांची जीप भरधाव जाताना दिसते. तो पिस्तूल काढतो, वर गोळी झाडतो. गोळी एका नारळाला लागून नारळ खाली पडतो. नुसता खाली नाही तर तो बरोबर बाईकच्या किकवर पडतो, किक मारली जाते आणि बाईक सुरू होते!

Rani_2007
Wednesday, May 23, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. पु. वा. ..धमाल चाललीय...

'धडकन' सिनेमात सुरवातीला सुनिल शेट्टी शिल्पा बरोबर नाचायचे सोडून काही करत नसतो..पन नंतर कुठेतरि (यु. के. का) लंडनला जातो. जेव्हा ४-५ वर्षानी येतो तेव्हा तो म्हनतो की 'मेरे पास ५०० करोड है'.

भारतात काही अनुभव नसताना याला 'व्हिसा' कसा मिळतो..एवढच नाही तर ५०० करोड ही मिळतात. अहो ह्या वेगाने कितितरि भारतीय अब्जाधीश व्हायला हवे होते.


Madhura
Wednesday, May 23, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ROTFL. काय धमाल लिहिलेय सगळ्यांनी. HHPV. हा BB office मधे वाचणे मुश्कील आहे.

Mbhure
Wednesday, May 23, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे आपल्या सिनेमावाल्या मंडळींचे सर्वच ज्ञान अगाध असते. "हम दिल दे... " तो ऐश्वर्याचा वाडा अगदी वाळवंटात. त्याला यायला जायाला रस्ता, वाट काही नाही. परत एव्हढ्या मोठ्ठ्या वाड्यात एक गेस्ट रुम नाही? त्या सलमानला ऐश्वर्या आपली खोली देते. तसेच नंतर, देवगण तीला सांगतो की " हम उसे इटली में ढुंढेंगे " . आयला, नुसत्या शिवाजी पार्कमध्ये माणुस शोधणे कठीन्; हे तर डायरेक्ट इटलीताच शोढायला निघतात.

पुर्वीच्या सिनेमात, घरात खाण्याचे वांदे असल्याने, नायिका कफल्लक बापाला (शक्यतो नासिर हुसेन) जेंव्हा नोकरी करण्याविशयी विचारते, तेण्व्हा बाप " हमारे खनदान में किसी औरतने देहलिज के बाहर कदम नही रख है. मेरे जीते जी...ब्ला ब्ला ब्ला. " बाप नासीर हुसेन असल्याने तो लवकरच हार्ट ऍटॅकने गचणार हेही नकी.

मला आवडलेला प्रॅक्टीकल डायलॉगः

चित्रपट " राम बलराम "

हेलनः (अजितला) मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ
अजिचचे त्याच्या खास आवाजात खासे उत्तरः मैं तुम्हे यहाँ क्या बच्चे पैदा करने के लिये लाया.


Disha013
Wednesday, May 23, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mbhure ,ह्ग्ग ह्घ्य्ग ह्घ ज्भ्झ ब्झ झ्झ झ्ज



Marhatmoli
Wednesday, May 23, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरो अथवा हिरोइन हे सगल्या स्पर्धा, परिक्शांत पहिले येणार हा तर नियमच आहे. 70's मधल्या pictures मध्ये हिरोला स्पर्धेत कप वगैरे मिळत असे आणि परिक्शेत पहिला आला तर नोकरि. पण mean while जमाना बदलला असावा कारण करिष्मा कपूर 'हिरो न. १' मध्ये पहिलि येते तेंव्हा चक्क तिल Europe Trip बक्शिस म्हणुन मिळते.

Ameyadeshpande
Wednesday, May 23, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>ह्ग्ग ह्घ्य्ग ह्घ ज्भ्झ ब्झ झ्झ झ्ज



Disha013
Wednesday, May 23, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय आहे??
ब्बापरे!आज लई हसले!



Atul
Wednesday, May 23, 2007 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दी सिनेमात हिरो, हिर्वीण किन्वा त्यान्चे आई-बाप, नेहमी व्हिलन च्या हातात पिस्तुल असताना आणि अवति भोवती त्याचे 'आदमी' असताना, "मै तेरी पोल खोलुन्गा", "मै कल अदालत मे तुम्हारे खिलाफ बयान दुन्गा" वगैरे डायलॉग़ का मारतात हे मला समजत नाही. :-)

Atul
Wednesday, May 23, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजुन एक कॉमन डायलॉग
ये अदालत
XXX को बाइज्जत बरी करती है


Farend
Wednesday, May 23, 2007 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे सर्व व्हिलन जमातीला (चित्रपटातील. :-) ) सांगणे आहे की हिरो जर हातात सापडला तर त्याला 'बांध दो इसको' वगैरे करत बसून नका. तुम्ही काही न शिकल्यामुळे व्हिलन झाला असाल तरी बाकीच्या व्हिलन्स पासून एवढे शिका. बांधलेला हिरो नंतर सुटतोच सुटतो.

Farend
Wednesday, May 23, 2007 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी 'जननी' बद्दल लिहिताना हिरो जगणार की मरणार याच्या हिंदी चित्रपटांतील संकेतांचे वर्णन केले होते. ते ठोकताळे माझ्या माहितीप्रमाणे असे आहेत्:

1 दंडात गोळी: नक्की वाचणार

2 डोक्यात किंवा छातीत गोळी: हिरॉईन जिवंत आहे का यावर ठरू शकेल
2a हिरॉईन आधी मेलेली: मग हा ही मरणार
2b हिरॉईन अजून जिवंत्: मग बहुधा वाचणार
2c तसेच याला मारून इतर कोणी कोणाबरोबर लग्न करावे हा प्रश्न सुटणार आहे: नक्कीच मरणार, डायरेक्ट गोळीने मेला नाही तर ज्याच्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे त्याला व्हिलन गोळी घालत असतान "नहीSSSS" म्हणून मधे कडमडणार.

3 नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचणार आणि नंतर परत येणार
3a यात चित्रपट emotional, about relationships वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे
मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करणार

4 कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी (सहनायक वगैरे) नाही: नक्कीच वाचणार आणि
बहुधा बरा व्हायच्या आधीच हॉस्पिटल मधून धावत सुटणार आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली"
असे वाटावे इतका बडवणार

5a चित्रपटाच्या शेवटी मेला: पर्मनंट मेला
5b चित्रपटाच्या मधेच मेला अशी शंका: नक्कीच नंतर उगवणार
5c चित्रपटाच्या मधेच मेला आणि जाळलेला किंवा पुरलेला दाखवला: नक्कीच डबल रोल असणार


Atul
Wednesday, May 23, 2007 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेन्ड
.. .. .. ..

Amol_amol
Thursday, May 24, 2007 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजुन काही,

आई देवापाशी बसली आसेल तर नक्की वाचणार

डाक्टनी अब दवा कि नही दुवा कि जरुरत है म्हणाले कि नक्की वाचणार पण "जाउन" परत येणार.







Amol_amol
Thursday, May 24, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमर अकबर अन्थनी मधे ३ भाउ एका वेळेस आई ला रक्त देतात. ३ इन १



Mukund
Thursday, May 24, 2007 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड.... हसुनहसुन पोट दुखायला लागले रे... जबरी ऑब्झर्व्हेशन!

सुपरमॉम.. देवाच्या समोर...

अतुल अरे पोल खोल दुंगा वगैरे म्हणुनसुद्धा व्हीलन इतका येडपट असतो की बंदुका वगैरे असुनसुद्धा तो काहीच करत नाही व नंतर अदालत मधे त्याचे पोल खोलले जातेच..आता बोल...

राणी अजुन एक.. सगळ्या हिंदी मुव्हीत हिरो अमेरिकेत किंवा इंग्लंड मधे जातो तेव्हा त्याचे ऑफ़ीस बघ.. थेम्स नदिच्या काठावर वगैरे.. उंच बिल्डींगमधे बेस्ट व्ह्यु असणारे पेंटहाउस सारखे ऑफ़ीस असते(हृतीक चे कुठल्यातरी मुव्ही मधे आहे तसे..) इथे आल्यावर आपली क्युबीकल बघुन बरेच जण निराश होत असतील..

सगळ्यांचे किस्से व डायलॉग एकदम मस्त.. खासकरुन रजनीकांतचे अचाट सीन....:-)


Shendenaxatra
Thursday, May 24, 2007 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून काही मासलेवाईक संवाद
१. कर्ण्यावर अनाउन्समेंट(जालिमसिन्ग, दुर्जनपैकी कुठलेसे नाम) अपने आप को कानून के हवाली करदो. पुलिसने तुम्हे चारो तरफ से
घेर लिया है. भागने की कोशीश बेकार होगी.

२. तमाम गवाहात व बयानात को मद्देनज़र रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुन्चि है कि मुल्ज़िम अमुक वल्द
तमुकनेही ये कत्ल किया है. लिहाजा अदालत उसे मुज़रिम क़रार देते हुए सज़ा-इ-मौत किंवा चौदह साल कैद्-ए-बामुशक़त फर्माती है.
अजून एक घीसा पीटा प्रकार म्हणजे मुल्ज़िम को बाइज्जत बरी कर देती है.
हे असले उच्च उर्दु संवाद कदाचित औरंगज़ेब वा बहादुरशहा जफरच्या कोर्टात ऐकायला मिळत असतील. ते आता हिंदी फिल्मांमधेच बघायला मिळतात.

३. ये दिन दिखाने की बजाय पैदा होते ही तु मर क्यु नही गयी? प्रसंग सांगायची गरज नाही!

४. नायक नायिका खलनायकापासून सुटका करायला कुठल्याशा बस्तीवर वा कबिल्यात पोचतात. कबिलेका सरदार वा
बस्ती का मुखिया कुणीतरी चरित्र अभिनेता, सहृदयी असणार. त्या दिवशी की रात्री
नेमकी पूरणमासी की रात असते. मग नायिकेचा बस्तीवाल्यांकडून एखादा डिरेस उसना घेऊन नाच वगैरे.

असल्या बसत्या आणि कबिले खरोखर कुठे असतात देव जाणे.

५. डॉक्टरच्या तोंडातली घिसीपिटी वाक्ये
१. इन्हे अब दवा नाही सिर्फ़ दुआ ही बचा सकती है.
२. डरने की कोई बात नहिं. मैने इन्जेक्शन दे दिया है.

६. अजून एक घिसापीटा
नोकर वा नोकरानी: सरकार भगवानने आपकी सुन ली. आपके घरमे बच्चा\/बच्ची पैदा हुआ\/हुई है.
मालक्: खडे खडे मुंह क्या देख रहे हो जाके सबका
मुंह मिठा करो.




Sayuri
Thursday, May 24, 2007 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचणार आणि नंतर परत येणार
3a यात चित्रपट emotional, about relationships वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे
मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करणार
>>>>अगदी! 'हिना' मध्ये ऋषी कपूर नदीत पडून थेट पाकिस्तानात पोचतो!!

'फ्नना' मध्ये आंधळ्या काजोलला झेंडावंदन करायला झेंडा कुठे लावलाय हे कळत नाही पण 'देस रंगीला' म्हणत बाकी को-डान्सर्सबरोबर न आपटता नाचता बरोबर येतं.

तारा रम पम मधली रानी आणि कुटुंबियांची गरीब झाल्यानंतरची श्रीमंत वेशभूषा...वा!! वा!!
:-)


Bhagya
Thursday, May 24, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी, बाइकवर बसलेल्या रजनीकांत नेच किक मारावी की! नारळाची काय गरज? वेळ वाया नाही का गेला?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators