Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रामसे moments ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » रामसे moments « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 06, 200720 09-06-07  8:58 am

Savyasachi
Thursday, September 06, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा एक मूव्ही होता खूप वर्षांपुर्वी. कटा हुआ हाथ अस नाव होत का ते माहीत नाही पण ही फ़्रेझ होती त्यात सारखी. तो पण असाच बदला घेतो त्याला मारणार्‍यांचा.

Asami
Thursday, September 06, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हि monkey's paw म्हणून गोष्ट आहे. मला वाटते दहावी किंवा बारावीला होती हि

Mi_anu
Friday, September 07, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Spoilar warning: This post gives idea about the storyline of 'The monkey's paw' by w.w. Jacobs, anyone wishing to keep the suspence about the story can skip this post.



'मंकीज पॉ' ही कथा जरा वेगळी आहे. यात प्रत्यक्ष हात सूड घेत नाही. एका माणसाच्या मित्राकडे एक जुना माकडाचा पंजा असतो आणि तो तीन मागण्या पूर्ण करतो, पण शापित आहे असं त्याचं म्हणणं असतं. या मित्राच्या इशार्‍यांना न जुनामता तो माणूस पंजा विकत घेतो आणि त्याला आता दोनशे डॉलर्स मिळावे अशी इच्छा व्यक्त करतो. दुसर्‍या दिवशी त्याचा कामावर गेलेला मुलगा यंत्रात सापडून ठार झाल्याची बातमी येते आणि कंपनीने नुकसानभरपाई म्हणून दोनशे डॉलर्स दिलेले असतात. माणसाला अत्यंत पश्च्चात्ताप होतो आणी तो आपल्या मुलाच्या किमतीचा हा धडा शिकून पंजाचा नाद सोडून देतो. पण मुलाच्या दु:खाने वेडी झालेली त्याची बायको पंजाकडे मुलाला परत जिवंत करायची इच्छा व्यक्त करते. यंत्रात सापडून भयाण अवस्था झालेला मुलगा हाकेला आवाज देऊन कबरस्थानातून येऊन दारावर टकटक करतो. माणसाला हा भयाण प्रकार थांबवायचा असतो. आपला मुलगा आपल्याला परत मिळणार नाही, जे काही परत आले आहे ते आपल्याच्याने बघवणार नाही हे जाणून तो बायको दार उघडायला धावत असतानाच पंजा धरुन तिसरी आणी शेवटची इच्चा व्यक्त करतो की त्या मुलाला त्याच्या निद्रास्थानी पोहचवले जावे. आणि बायकोने दार उघडल्यावर बाहेर कोणीच नसते. तीन इच्छा वाया, मुलाचा जीव पण गेला.
इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, 'बीअवेअर ऑफ व्हॉट यु विश फॉर, यु मे गेट इट.' ज्याची आपण इच्छा करतो ते मिळताना दुसरे काही गमावले जाणारच नाही असे नाही, किंवा ते देणे विचीत्र प्रकारे मिळेल.
मंकीज पॉ वर झी हॉरर शो मधली तिसरी कथा 'ताविज' आधारीत आहे, तसेच स्टिफन किंग च्या पेट सिमेटरी ची कल्पना काही प्रमाणात मंकीज पॉ वर आधारीत आहे असे म्हणतात.


Uchapatee
Friday, September 07, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(मागील भागाच्या पुढे)
आता मात्र माझी झोप पूर्णपणे उडाली. मित्राला जागे करावे असे वाटले पण मग लाज वाटली. हे कुणालाही सांगीतले अथवा कळले तरी पूर्ण होस्टेल/कॉलेज मधे पसरून माप काढले जाणार याची खात्री होती. तसाच पडून राहीलो. जरा कुठे खुट्ट झाले की छातीची धडधड डबल व्हायची. पंजा जवळपासच आहे आणी तो अंगावर येतोय असे वाटून दचकायला व्हायचे. मी सारखा अंधारात तो पंजा शोधण्याचा प्रयत्न करीत होतो. विचार करून मेन्दूचा भूगा झाला होता. क़ाही अमानवी असेल हे पटत नव्हते पण ओरखडा कसा आला ते ही कळत नव्हते.

हे असेच पहाटे पर्यंत सुरू होते. नंतर थोडी पेंग यायला लागली. अर्धवट झोपेत कूस बदलली तेव्हा हात अंगाखाली येउन काहीतरी टोचल्यासारखे वाटले. क़ाय टोचले ते त्याचा शोध घेतला आणी ओरखाड्याचे रहस्य समजले. मला हातात घड्याळ घालून झोपायची सवय होती (अजूनही आहे). घड्याळाचा पट्टा धातूचा होता व त्याच्या बक्कल मधली एक पिन थोडी जास्त बाहेर आली होती. मग क़ाय झाले असावे हे लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. “पंजा” ला पोटावरून ओरबाडून काढताना माझा हात पोटावरून घासला गेला तेंव्हा घड्याळाच्या बाहेर आलेल्या पिनमुळेच तो ओरखाडा पडला असावा. हा उलगडा झाला आणी एकदम भीतीचे ओझे मनावरून उतरले. नंतर थेट दुपारी 11 वाजे पर्य़ंत गाढ झोपलो व सुट्टीचा प्लॅन खराब केल्या बद्दल मित्राच्या शिव्या खाल्ल्या.


Tiu
Friday, September 07, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती...

सही लिहिलं आहेस रे! जबरदस्त suspense create केलास आणि शेवट पण खलास. :-)

आवडलं!


Aashu29
Friday, September 07, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापति झकास लिहलयस!! आणि तुझा आयडि पण सहिच आहे

Sheshhnag
Saturday, September 08, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती! मस्तच.

तुमचा अगोदरचा पोस्ट वाचला आणि त्यादिवशी रात्री झोपताना तुमच्या पोस्टची आठवण झाली आणि रात्री माझ्यापण स्वप्नात तुम्हाला आला त्याच प्रकारे पंजा आला. फक्त फरक इतकाच होता की,
तो पंजा ओव्हनमधून भांडी बाहेर काढण्यासाठी वापरतात तो हातमोजा होता.


Swa_26
Saturday, September 08, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला उचापत्या... मस्तच लिहिलयस!!

Prajaktad
Saturday, September 08, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो पंजा ओव्हनमधून भांडी बाहेर काढण्यासाठी वापरतात तो हातमोजा होता.

'मिटेन' म्हणतात त्याला!

Mi_anu
Monday, September 10, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले अनेक दिवस रात्रीपहाटे आमच्या खोलीचं दार कोणीतरी बाहेरुन कडी धरुन हलवल्यासारखं वाजायचं आणि माझ्या डोक्यात 'अतिमानवी शक्ती'.. इ. कल्पना यायला लागायच्या. नीट लक्ष देऊन पाहिलं तर अगदी शेजारी दुसरी बेडरुम आहे त्यातल्यांनी त्यांच्या खोलीचं दार जोरात उघडलं की आमच्या खोलीचं दार वार्‍याच्या झट्क्याने हलायचं.

Uchapatee
Monday, September 10, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मायबोलीकरांनो. फारच भयंकर अनुभव होता तो. आता आठवले कि हसू येते, पण तेंव्हा सॉलीड घाबरलो होतो. ओरखड्याचे कारण समजले नसते तर मी पुन्हा खोलीत एकटा झोपु शकलो नसतो.
तुमच्या प्रोत्साहना बद्दल पुन्हा एकदा आभार.


Asmaani
Saturday, September 15, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहावीत वगैरे असेन मी त्यावेळी. आमच्या बेडरुमला बर्‍यापैकी मोठी खिडकी होती ग्रिलची. पलीकडे एक वाडा कम building होती. आणि त्याच्यामागे थोडी झाडं होती. ह्या building ची गच्ची आमच्या बेडरुम च्या level ला होती. आणि तिथे अस्लेल्या एका ट्युबच्या उजेडामुळे आमच्या खिड्कीच्या ग्रिलची सावली बेडसमोर असलेल्या भिंतीवर पडे.
एकदा असाच रात्री बारा एक चा सुमार असेल. मला झोप येत नव्हती. मी आपली ग्रिलची ती सावली बघत शांतपणे पडून होते. आणि अचानक एक माणसाची सावली विलक्षण वेगाने उजवीकडून डावीकडे आणि तशीच उलट्या दिशेने गेली. त्या वाड्याचे म्हातारे मालक कधीकधी त्यांच्या गच्चीत झोपत असत. पण मी पाहिलेली सावली त्यांची नव्हती हे नक्की. कारण त्या सावलीचा वेग खूपच जास्त होता. बर ती जागा अशी होती की एखाद्या चोराला येणं शक्य नव्हतं कारण गच्ची म्हणजे तो पत्राच होता. एखादा माणूस इतक्या वेगानं तिथून धावल्यावर बराच मोठा आवाज झाला असता.
बरीच वर्ष ते रहस्य तसंच होतं डोक्यात. आणि परवा जेव्हा माझ्या सध्याच्या घरात मी तशीच सावली भिंतीवर धावतांना पाहिली तेव्हा आधी मी अतिशय घाबरले. पण तरीही मी धीर एकवटून खिडकीतून बाहेर पहिलं आणि सगळं रहस्य क्षणात उलगडलं. ती सावली वार्‍यानं हालणार्‍या झाडाची होती. somehow तिचा shape अगदी माणसाच्या सावलीचा होता. आणि इतकी वर्ष मला अगदी खात्रीपूर्वक वाटे की लहानपणी मी भूताचीच सावली पाहिली होती म्हणून.


Disha013
Friday, October 05, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही एक अनुभव लिहायचाय. भूत किंवा रामसे नाही म्हणता येणार,पण अकल्पनीय नि त्यावेळी स्तब्ध करणारा होता. आणि विशेष म्हणजे, माझी सख्खी बहिण बरोबर असताना घेतलेला.

आमच्या शेजारच्या काकुंकडे लिंबाचे पुरुषभर उंचीचे झाड होते. आम्ही जनरली लाईट गेली की बाहेर कट्ट्यावर बसाय्चो. तेव्हाही असंच बसलेलो. आई आतमध्ये काही काम करत होती. मधेच बहिणीने माझे लक्ष एका गोष्टीकडे वेधले. त्या लिंबाच्या झाडात एक ज्योत दिसत होती. म्हणजे अगदी तेवणा-या दिव्यची असावी तशी,हलत होती. मी उडालेच.तिथे पणती असणं शक्यच न्हवतं! नि ती ज्योत चक्क वर खाली हलत होति! आम्ही दोघी जवळ जावुन बघायला लागलो. ती ज्योत अधांतरी होती नि वर वर जात होती!! नि तशीच जात जात ती गायब झाली!
आइने बाहेर येवुन हाका मारल्या तेव्हा आम्ही शुद्धीवर आलो.तेव्हा सगळ्यांनी उडवुनच लावले होते. आता २ साक्षिदार म्हटल्यावर मग 'तुम्ही आत्मा बघितला' अशी सगळी गंमत करायला लागले.

पण कोणी काहिही म्हणो,आम्ही दोघिनी हा अनुभव घेतलाय. कधी भेटलो की हा विषय निघतोच निघतो!
अगदी रोमांचक अनुभव होता तो!


Bsk
Saturday, October 06, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काजवा असेल तो :-)
अर्थात भिती मला पण वाटली असती.. लाईट्स गेल्यावर झाडांची सावली सुद्धा भयंकर वाटू शकते, हे तर अजुनच भीतीदायक..


Disha013
Saturday, October 06, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही गं,काजवा नक्कीच नव्हता. लगेच कळाले अस्ते की आम्हाला. चांगली २ इंच लांबीची दिव्याची ज्योत असावी तसं काहीसं होतं ते. आणि आपल्या सिनेमांमद्ये नाही का दाखव की एखादा मनुष्य मेला की त्याचा ज्योतीसारखा आत्मा वर जातो,अगदी त्या स्टाईल मधे.

Bsk
Sunday, October 07, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मी मजेत लिहीलं होतं.. काजवा असता तर कळलंच असतं.. पण बापरे.. काय भयंकर आहे! काय असेल ते कुणास ठाऊक!

Dineshvs
Sunday, October 07, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, काजव्याची अळि असते तिलाही असा दिवा असतो. ती सुरवंटासारखीच असते. ती असेल.
काहि जातीच्या वाळव्याही दिवा घेतलेल्या असतात. डिस्कव्हरीच्या वाईल्ड साऊथ अमेरिका मधे, अश्या वाळव्या दाखवल्या होत्या. पतंगाना आकर्षुन घेण्यासाठी त्या असे करतात. त्यांच्या तोंडाचा नांगीजवळचा भागच प्रकाशमान होतो.
काजवा मात्र मादीला आकर्षित करण्यासाठी असे करतो.
भीमाशंकरच्या काहि झाडावरची बुरशी देखील रात्री प्रकाशमान होते.
समुद्रातले काहि जिवाणु देखील रात्री प्रकाशतात. मध्यंतरी मुंबईत भांडुपच्या खाडीत असे दिसले होते.
समुद्रातले काहि मासेही रात्री चमकतात. ईल सारखे मोठे मासेच नव्हेत तर किनार्‍यावरचे छोटे मासेही चमकतात. ओमान मधल्या सुर गावात मी प्रत्यक्ष बघितले आहेत.


Disha013
Monday, October 08, 2007 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय माहीत दिनेशदा!पण मला अजुनही वाटत नाही की एखाद्या किटकाचा तो प्रकाश होता असे. काजवे वगैरे तसे ब-याच वेगाने फ़िरतात.पण मी पाहिलेले मात्र अगदी शांतपणे तेवणारी दिव्याची ज्योत वाटत होती.

Maanus
Thursday, January 24, 2008 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय कोणीच कधी रात्री एकटे घरात राहीले नव्हते का?

Amruta
Thursday, January 24, 2008 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा तुझा आज सगळिकडे मुक्त संचार का?? :-)

Maanus
Friday, January 25, 2008 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो तेच ते problems चे BB बघुन डोक दुखायला लागलेय... काहीतरी वेगळे विषय लोकांना दिसावे म्हणुन सगळे जुने BB उघडतोय :-)

आमच्या साठी सगळ्या प्रोब्लेम्स वर एकच उपाय... एक सनसनीत कानाखाली :-)


Yogesh_damle
Friday, January 25, 2008 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाशिक बस अपघाताच्या कवरेजवर पाठवण्यात आलं होतं. वरळीच्या वस्तीत जेव्हां त्यांचे मृतदेह आणले होते तेव्हा पांढर्‍याशुभ्र कापडात बांधलेले- नुसते जखमी चेहरे उघडे- अशी माणसं पाहून खूप दुखलं आतमध्ये. एक देह तर इतका चेंदामेंदा झाला होता की पूर्णपणे झाकला होता. त्या बाईंच्या आईने इतका आकांत केला की पोलिसांचेही डोळे पाणावले. त्यांचे विस्फारलेले डोळे-किंचाळ्या-केस मोकळे सुटेपर्यंत डोकं गदागदा हलवणं अजून शहारे आणतं अंगावर...

... एक मृतदेह मात्र वेगळ्या कारणासाठी आठवतो- त्या आजी नातवाच्या बसला अपघात झाल्याचं कळताच मुंबईतल्या राहत्या घरीच वारल्या. नातवाचं संकट मात्र एका फ्रक्चरवर निभावलं.

त्या घरात रडारड नव्हती. फक्त भेसूर शांतता- आणि सगळे गेलेल्या आजींकडे नुसते पाहत होते... Spine chilling !!!


Chinnu
Friday, January 25, 2008 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश वैर्‍यावरही असले प्रसंग येउ नयेत. वाईट वाटलं वाचून.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators