Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 25, 2007 « Previous Next »

Rmjadhav75
Monday, April 23, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु,
धन्यवाद. :-)

आपल्या काल झालेल्या वाढदिवसाबद्दल उशिरा का होईना पण हार्दिक शुभेच्छा!!!


Anilbhai
Monday, April 23, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी आणि गोबु,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

मला ५ जण माहित आहेत ज्यांचे वाढदिवस २२ एप्रिलला आहेत.
:-)

Tivlyabavlya
Monday, April 23, 2007 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काका थोडे दिवे घ्याल..
मला वाटले झक मारणे ह्यातला जो "झक" आहे त्यावरुन तुम्ही तुमचे नाव "झक्की" ठेवले म्हणजे "सतत झक मारणारा" ...

मी पण नागपुरचाच आहे.. पण कधी ऐकला नव्हता "झक्की" हा शब्द... आता खरा अर्थ कळाला :-)
Thanks

Gobu
Tuesday, April 24, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई,
धन्यवाद!
आणखी कोण कोण आहेत हे महान लोक
जरुर सान्गा
मी वाट पहातोय


Zakki
Tuesday, April 24, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सतत झक मारणारा" ...
आता मी सतत मायबोलीवर लिहीत असतो, म्हणजे तुम्ही सांगितलेला अर्थहि खराच म्हणायला पाहिजे.


Tivlyabavlya
Tuesday, April 24, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग़ोबु..

ए. भा. प्र. .... तुमच्या सहधर्मचारिणीचे चे नाव "गोबी" आहे का हो? :-)


Tivlyabavlya
Tuesday, April 24, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काका... अहो मग सगळेच झक्की आहेत इथे... :-)

Robeenhood
Tuesday, April 24, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण नागपुरचाच आहे.. पण कधी ऐकला नव्हता "झक्की" हा शब्द... >>>

कमाल आहे आम्ही नागपूरचे नसूनही आम्ही ऐकलाय झक्की हा शब्द!!!

Gobu
Tuesday, April 24, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिवल्या,
तुमच्या "ही"चे नाव बाहुली आहे का?
अहो, हे माझ्या सुपुत्राचे लाडाचे नाव आहे
बाकी "झक्की" या नावाबद्दल तुम्ही जे लिहीलेय ते एकदम...
जाऊदे,
काही नाही
मी आपल असच...
(झक्की म्हणत असतील, हा गोब्या भेटु दे एकदा...,असा बघतो त्याला...)


Tivlyabavlya
Tuesday, April 24, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग़ोबु.. माझी "ही" अजुन नाहिये.. त्यामुळे मी "बाहुला" विदाउट "बाहुली" आहे.. :-)

राॅबिनहूड...
टि.बा. करण्यात बिझी असल्यामुळे कदाचित ऐकु नसेल आला.. पण आता ऐकला त्यामुळे लक्षात ठेवेन. :-)


Zakki
Tuesday, April 24, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिवल्याबावल्या, 'खाई त्याला खवखवे', 'चोराच्या मनात चांदणे' 'If the shoe fits ...' इ. इ.

रॉबिनहूड, तुम्ही आमच्याकडून झक्कीच काय, भैत्ताड हा शब्द पण ऐकला असेल. आम्ही सभ्य आहोत म्हणून, नाहीतर इतर नागपूरकरांनी आणखी काय काय म्हंटले असते तुम्हाला!



Haripriya
Tuesday, April 24, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि म्हणजे नागपुरकर सभ्य नसतात अस म्हणायच आहे का?

Suvikask
Wednesday, April 25, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला विषयाकडे वळा.... विषयांतर होत आहे.....

Monakshi
Wednesday, April 25, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नावावरुन तुम्हाला काय वाटत?

Bee
Wednesday, April 25, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सभ्यपणा हा भौगोलिक आधारावर ठरवल्या जातो हे आज मला प्रथमच माहिती पडले इथले काही पोष्ट वाचून.

Robeenhood
Wednesday, April 25, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे विषयान्तर करून झाले असेल तर मुद्दे सम्पलेत असे समजून हा बी बी बन्द करणे योग्य राहील.:-)

Zakki
Wednesday, April 25, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरिप्रिया, नागपूरकर सभ्य नाहीत असे नाही. पण तरीहि ते, सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडता, माझ्यापेक्षा जास्त जहाल भाषा वापरू शकतात. मला तशी, अक्कल कमीच, शिवाय भाषेवरहि प्रभुत्व नाही.

Robeenhood
Wednesday, April 25, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तशी, अक्कल कमीच, शिवाय भाषेवरहि प्रभुत्व नाही.
>>>>
अहाहा! अहाहा!! किती कठोर हे आत्मपरीक्षण! १०० टक्के अनुमोदन.

Sheshhnag
Wednesday, April 25, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती कठोर हे आत्मपरीक्षण! १०० टक्के अनुमोदन.

हुडजी, झक्कीनी आपली अक्कल आणि भाषा नागपुरी जहाल भाषेसंदर्भात आहे. आणि मायबोलीवर इतक्या पोस्टांच्या अनुभवानंतर `वरील संदर्भात' तुमचे म्हणणे असेल तर माझेही अनुमोदन.

BTW झक्कीजी, ए. भो. प्र. - ही अक्कल आणि भाषा कुणापेक्षा कमी?


Ultima
Wednesday, April 25, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हुडा......... किती रे हा हुडपणा???


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators