Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 13, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 13, 2007 « Previous Next »

Nandini2911
Thursday, April 12, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी : जर मुल करु शकत असतील तर मी का करु नये? या विचाराची वाटली. एकदम बिन्धास्त मुलगी. लिखानावरुन तर कुठेतरी टाका भिडलेला वाटतोय>>>>>>>>>>>
म्हणायचय काय नक्की...
मी लहानपण भातुकली न खेळता विटीदांडू आणि क्रिकेट खेळण्यात घालवलं.
त्यामुळे मुलं करतात ते मी का करु नये हे कधी जाणवलंच नाही...
आणि टाका कुठेही भिडलेला नाही. शिवणक्षेत्रात तेवढी प्रगती नाही.. (दोर्‍यात सुई ओवता येत नाही.. :-) )


Bhramar_vihar
Thursday, April 12, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक ID होता सृजनत्व म्हणुन. या id वरुन काही सुचतय का?

Kashi
Thursday, April 12, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"स्वामी.. नका हो जाउ तिर्थयात्रेला तुमचे चरण हेच माझे तिर्थस्थान आहे.. "
च्यायला.... ह. ह. पु. वा.
चफ्फा....काश्टा....


Ultima
Thursday, April 12, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि टाका कुठेही भिडलेला नाही. शिवणक्षेत्रात तेवढी प्रगती नाही.. (दोर्‍यात सुई ओवता येत नाही.. )
सही जवाब


Indradhanushya
Thursday, April 12, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>शिवणक्षेत्रात तेवढी प्रगती नाही.. (दोर्‍यात सुई ओवता येत नाही.. )
>>>आणि टाका कुठेही भिडलेला नाही... ओ सुईण बाई... हे उत्तर होतं की प्रलोभन?
>>>एक ID होता सृजनत्व म्हणुन... भ्रमा... होता नाही रे आहे... पण या ID वरुन वविचा किस्सा आठवला...
कोणीतरी मिश्कीलपणे म्हणाले होते "हे नाव उच्चारताना जीभेचे तुकडे पडतात म्हणुन...
बाकी झकास, च्यायला, गोबु, कशी, नंदिनी, फ़ाखरु, उल्टीमा धमाल चाल्लीयं :-)


Jaymaharashtra
Thursday, April 12, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या,
धन्यवाद! माझ्या बद्दलचा तुमचा अंदाज ९९% बरोबर अहे.फ़क्त मुले "मांसाहेब " म्हणत नाहित.पण मोठा लेक etv वरील "गोजिरवाण्या घरात बघायला "लागल्यापासुन मला "शामराव परांजपे" अशीच हाक मरतो.
त्याचे बाबा देखिल खुप कडक आहेत स्वभावाने पण माझा धाक जरा जास्त आहे बहुतेक.
पण खरच या बिबिने मात्र मायबोलीवर एकदम धमाल उडवुन दिलि आहे. गोबु,अल्टिमा,काशी,फ़ुलपाखरु,नंदिनि,च्यायला तुम्हा सगळ्यांचे निरिक्षण एकदम अचुक आणि झक्कास आहे असेच म्हणायला हवे. प्रत्येक नावाचे केलेले परिक्षण आणि वर्णन त्या व्यक्तिमत्वाला एकदम चपखल बसते.
चालु द्या......!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Ultima
Thursday, April 12, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो रात्री भुतासारखा काम करतो आणि दिवसा झोपतो.

भुतासारखा ?? बाप रे


Nkashi
Thursday, April 12, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए, माझ्याबद्दल तुमचे काही अंदाज सांगा की?

Runi
Thursday, April 12, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nkashi या आय डी चा उच्चार मी बर्‍याचदा नक्षी असा करते एन काशी ऐवजी त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर एक नक्षी सारखी आखीव रेखीव खुप नाजुक, परकर्-पोलक्यातली, मोठे मोठे डोळे करुन बघणारी, सतत घरभर लुडबुड करणारी मुलगी डोळ्यासमोर येते.
रुनि


Runi
Thursday, April 12, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला.. यावर माझे पण एकमत. मी BSK या आय डी कडे बघुन वाटते की ती व्यक्ती समोरच्याला म्हणत असेल बस क्या, सुबह से हम ही मिले थे तुमको टांग खेचनेके लिए. आणि मग स्वतःच खुप खेचत असेल समोरच्याची. काय BSK करतेस का असे?

Bsk
Thursday, April 12, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी, पहीला पार्ट बरोबर! मला तो डायलॉग म्हणायची वेळ खूप वेळा येते.. सगळे खूप खेचतात.. चेहर्यावरच लिहीलय कदाचित, पण मी दुसर्य़ांची खेचतीय हे फार कमी वेळा होतं.. हेहे...
btw, तुम्हा सगळ्यांची मेमरी, photographic आहे का? असे imagine कसे करता तुम्ही!! मला नाही जमते...कधीचा प्रयत्न करतीय़... :-)

Suyog
Thursday, April 12, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ya id baddal sanga n

Deepanjali
Friday, April 13, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" सुयोग " म्हंटल्यावर कुठल्या मुलाची image डोळ्या समोर येत नाही , फ़क्त मंगल कार्यालय , मॅरेज ब्युरो किंवा बंगल्याचे नाव डोळ्या समोर येते !

Bhagya
Friday, April 13, 2007 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही दिपांजली...... सुयोग हे अगदी मंगल कार्यालयाचेच नाव आहे.

Chaffa
Friday, April 13, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए, माझ्याबद्दल तुमचे काही अंदाज सांगा की?

Nkashi तुझ्या नावाबद्दल मी रुनीशी सहमत आहे मी ही बरेचदा ते नक्षी असेच वाचतो आणी डोळ्यासमोर येते ती घरासमोर मस्तपैकी ऐसपैस बसुन रांगोळी काढणारी एक मुलगी.
आता BSK का कुणास ठाउक पण हे BSK वाचलं की व्यक्ती डोळ्यासमोर येत नाही तर एखाद्या कंपनीचं नाव वाटतं.


Chaffa
Friday, April 13, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी चाफ़्फ़ा लालभाई हे फ़क्त कोणत्याही प्रकारच्या V&C मधेच आढळणारे व ईतर ठिकाणी अतिशय दुर्मिळ अशी व्यक्ति आहे,

नाही रे च्यायला,
नाही ईथे झक्कीकाका आलेत म्हणुन त्यांची आठवण झाली. दोघांचे विळ्याभोपळ्याचे सख्य. आता विळा कोण आणी भोपळा कोण हे तुम्हीच ठरवा.


Deepanjali
Friday, April 13, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा हे पण मुलाचे नाव नाही वाटत , दोन चाफ़्याची फ़ुले कोणी तरी एकत्र आपटल्या सारखे वाटते !

Chaffa
Friday, April 13, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपटल्या सारखी की चिकटवल्या सारखी?

Mrinmayee
Friday, April 13, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली म्हंटलं की मला आमच्या ओळखीची एक लहान मुलगी डोळ्यांसमोर येते. गोबरे गाल, बॉबकट त्यावर एक लांबलचक मोगरीचा गजरा (केसांपेक्षाही लांब!). जांभळं परकर पोलकं, हातात आईच्या हाती लागलेल्या १-२ डझन बांगड्या, एका हातात मोठ्ठी कचकड्याची बाहुली आणि या सगळ्या आवताराशी विसंगत (माउंट कार्मेल या शाळेत जाण्याचा परिणाम म्हणून) आपल्या ठेवणीतल्या आवाजात "फादर वी थँक दी फ़ॉ SSS र दी नाईट" हे गाणं! :-)

Runi
Friday, April 13, 2007 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सुयोग म्हणले की घरातला सगळ्यात मोठा मुलगा, शांत, मितभाषी, सोनेरी काड्यांचा चश्मा असलेला, किरकोळ शरीरयष्टीचा, ज्याला कॉलनीमधली सगळी मुले दादा असे हाक मारतात असे कोणी तरी डोळ्या समोर येते. काय सुयोग तु कसा आहेस?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators