Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 05, 2007

Hitguj » My Experience » माझा शब्दकोष » Archive through April 05, 2007 « Previous Next »

Dineshvs
Friday, March 02, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, हे तसे अलिकडचे शब्द असतील.
माझ्या कॉलेजच्या दिवसातले काहि

घासु = लायब्ररीत बसुन अभ्यास करणारा.

माठ्या, माठ, = मठ्ठ

चमको = प्रोफ़ेसराच्या पुढे पुढे करणारा.

संडेमंडे = ओढणीची दोन टोकं खालीवर असलेली मुलगी.



Nkashi
Friday, March 02, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बी पुन्यातच असती की, म्हन्जि आता ५-६ महीन झाल बगा हित यिउन..

बाकी, आणखी एक शब्द म्हणजे
मुद्द्याच न बोलता उगाच extra info देणे = लांबड लावणे


Zakasrao
Saturday, March 03, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुद्द्याच न बोलता उगाच extra info देणे = लांबड लावणे>>>>>>
त्यालाच येरंडाच गुर्‍हाळ अस म्हणतात. nkashii
तुमची मेल चेक करा.


Dhulekar
Sunday, March 04, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे प्रतीशब्द ऐकुन मजा आली
आमच्याकडे गावंढळ माणसाला "गावना येडा आनी बर्फ़िले म्हने पेडा" असे म्हणायची पद्धत आहे.


Zakasrao
Wednesday, March 28, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुमाण हा शब्द कोणाला माहित आहे का?
मी सुट्टीत गावी गेलो की हुमाण घालुन खेळ कर होतो सन्ध्याकाळच्या वेळी.
हुमा्ण म्हणजे उखाणा टाइप कोडे.ज्यामधे थोडेसे काव्यात्मक
असे कोडे असायचे ते ओळखायचे.
उदा.
कोकणातनं आली सखु
तिच्या मानत मारली बुक्की
तिच्या सारया घरभर लेकि
कोणाला उत्तर येत असेल तर द्या नसेल तर मी पुढच्या आठवड्यात देइनच.

Robeenhood
Wednesday, March 28, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुमान म्हनजे उखाणा, कोडे.(तो लग्नातला उखाणा नव्हे.)हुमाण शब्द अरेबिक की पर्शियनमधून आलाय.

आमच्याकडे (अहमदनगर) त्याला आन्हा म्हणतात.

अटक्यात लोटकं लोटक्यात दही,
बारा कोस गेलं तर सांडत नाही...
(उत्तर नारळ.)


Nkashi
Wednesday, March 28, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, तुमच्या हुमाण च उत्तर "लसूण"
बरोबर का?


Suvikask
Wednesday, March 28, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो.. लसूणच आहे.. मलाही तेच वाटत..

Shriwani
Wednesday, March 28, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रेय या शब्दाला मराठी प्रतीशब्द काय?

Robeenhood
Wednesday, March 28, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

credit... ... .. ..

Dineshvs
Wednesday, March 28, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुमाण नव्हे पण हुमण म्हणजे तिरफळं घालुन केलेला माश्याचा खास करुन बांगड्याचा एक प्रकार.


याला म्हणतात कुणाचं काय तर गोंधळ्याची ...


Atul
Wednesday, March 28, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खटकुळ्- सारखा किर्किर करणारा/ री
पीडकबुद्धी- सारखा पीड्णारा/ री

Low BP- खूप हळू गाडी चालवणारा/ री

Anilbhai
Wednesday, March 28, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुमण म्हणजे माश्याची कढी. शीत म्हणजे भात.
'गोयकारांग किरे.. शित आणि हुमण मेळे की जाले.'

उमाणे म्हणजे कोडे.
:-)

बांगड्याचा खास प्रकार म्हणजे 'उड्डमेथी'

Zakasrao
Thursday, March 29, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलु आणी सुविकासके बरोबर आहे. अशी खुप कोडी आहेत पण आता बरेच विसरलो. रॉबिन तुमच्या हुमानाच उत्तर आल नसत बुवा. बर झाल सांगितल.
असो आताच एक मेल आली आहे त्यात काही पुणेरी शब्द आहेत ते देतो. काही रिपीट होतील पण असो.



Zakasrao
Thursday, March 29, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे घ्या अजुन काही.


Zakasrao
Thursday, March 29, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे घ्या अजुन काही.



Gobu
Thursday, March 29, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव,
माझ्याकडे शब्दच नाहीत
झकास!!!
सुन्दर!!!
सुरेख!!!
अफ़लातुन!!!
जुन्या दिवसानची आठवण झाली बघा (गेले ते दिवस...)


Atul
Thursday, March 29, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TW= तन्गड्या वर (काही काम न करणे)
मन्डळ अभारी आहे= आता निघा
बबन्=दत्तू/ हुजर्‍या


Nkashi
Thursday, April 05, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही नविन शब्द

अर्धबोबड = जाडसर वाटुन घेणे
निवळी = दही आणि पाणी वेगळे झालेले ताक


Dineshvs
Thursday, April 05, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, झकास संकलन बरं का ! पण ही भाषा दर दोन वर्षानी बदलते. आताचे अर्थ उद्या रहात नाहीत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators