Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 10, 2007 « Previous Next »

Gobu
Friday, April 06, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव,
अगदी अगदी अशाच मिशा तुमच्या आहेत असे तुमच्या नावावरुन वाटते!!!
सुपरमोम,
क्काय मुले घाबरत नाहीत तुला
नाव बदल बुवा तुझ...
फ़ुलपाखरु,
हा असा वाटतो:
हा माणुस कधी गायब होइल ते सान्गता येणार नाही
प्रचन्ड बेभरवशाचा
हौशी आणि सदाबहार


Supermom
Friday, April 06, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू,
तुझा गैरसमज झालाय रे बाबा.
फ़ुलपाखरू ' तो ' नसून 'ती' आहे.


Gobu
Friday, April 06, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमोम,
अस्स होय
ठीक आहे मग वरील सर्व वर्णनानन्तर फ़ुलपाखरुसाठी एक फ़िश्पोन्ड ही देतो:
लेक लाडकी या घरची
होणार सुन दहा घरची!!!

मला वाचवा रे आता कुणीतरी!!!



Fulpakhru
Friday, April 06, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अरे गोबू १० घरची सून म्हणजे १० सासवा

नको रे बाबा


Zakki
Saturday, April 07, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण दहा नवरे म्हणजे बघा, प्रत्येक पाडव्याला कित्ती भेटी! शिवाय एक जण दागिने देईल, एकजण भारतीय पद्धतीचे कपडे, एक पाश्चात्य स्टाईलचे, एकजण शास्त्रीय संगीत म्हणून दाखवेल, एक जण फिल्मी, एकजण इंग्रजी.
एकजण घरात स्वैपाकपाणी, चहा करायला, एकजण बाहेर फिरायला घेऊन जायला. एकजण पैसे सांभाळून नीट गुंतवायला नि मग कधी काळी रोमॅंटिक वाटले तर एक त्यासाठी!

पहा अजूनहि दोन चार असते तरी त्यांच्यासाठी कामे आहेत! विचार करा


Fulpakhru
Saturday, April 07, 2007 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है झक्की काका तुम्ही काकुन्ना दर पाडव्याला भेटी देता कि काय?
आणि शिवाय स्वैपाकपाणी पण?


नाही म्हणजे माझा आणि माझ्या मैत्रीणिन्चा तरी अनुभव असा आहे की हे सगळं फ़क्त लग्नानतर १ २ वर्श मिळतं हो. नंतर काही नाही fielding लावल्याशिवाय

तेव्हा हे सगळं मिळवण्यासाठी १० नवरे बात कुछ हजम नै हुई


Deshi
Saturday, April 07, 2007 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळं फ़क्त लग्नानतर १ २ वर्श मिळतं हो>>>
अगदी नशीब काढलस तु. १२ वर्षे नवरा गिफ्ट देतोय. मी तर पहील्याच वर्षा नंतर नेहेमी टाळत आलोय.

Fulpakhru
Sunday, April 08, 2007 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो देशी मला १ किंवा २ वर्शं म्हणायचे होते
१२ नाही. आणि हो अजुन माझ्या लग्नाला १२ वर्श नाही झालियेत.


Nandini2911
Monday, April 09, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर पहील्याच वर्षा नंतर नेहेमी टाळत आलोय>>>>>>
चला कुणीतरी एकाने कबुली जबाब दिला.

Ultima
Monday, April 09, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहा अजूनहि दोन चार असते तरी त्यांच्यासाठी कामे आहेत!....

झाकी तुला तर सगळी कामं अगदी पाठ आहेत की...स्वानुभवाचे बोल की काय म्हणतात ते हेच का?....


Gobu
Monday, April 09, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुलपाखरु,
हे घे...

हे तुझ्या खिलाडुवृत्तीसाठी!
(गेले ४ दिवस घाबरुन मायबोलिवर आलो नव्हतो!!!)


Sheshhnag
Monday, April 09, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरोखरच फुलपाखरुच्या खिलाडूवृत्तीची दाद द्यायला हवी.

Fulpakhru
Monday, April 09, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh thanks gobu ...

Zakki
Monday, April 09, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अल्टिमा, ही सगळि कामे मी काही वर्षांपूर्वीपर्यंत करत असे, म्हणून आठवताहेत. आता यातले काही करत नाही. मला वाटते फक्त आठवड्यातून एकदा गार्बेज बाहेर नेऊन टाकणे हे एकच काम मी घरात करतो. आणि ते बाहेर फिरायला नेणे, दागिने, कपडे हे सगळे प्रकार केंव्हाच बंद केले.
घरी बसून हटकेश्वर हटकेश्वर म्हणत बसतो.


Fulpakhru
Monday, April 09, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु मी हौशी आहे पण बेभरवश्याची नाही आहे रे. :-)


Zakasrao
Tuesday, April 10, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टिमा आणि तमाम नवीन मंडळी झक्कि हे माय बोलीवरील सर्वात ज्येष्ठ नागरीक आहेत त्याना आदराने संबोधावे.
अल्टिमा fielding लावण्यासाठी तुला अनेक टिप्स मिळतील इथे असा खुप अनुभव असलेल्या खुप जणी आहेत. (तुझ्या नव-यचा मेल आय डी दे आम्ही त्याला आउट कसे व्हायचे नाही ह्याच ट्रेनिंग देतो)
गोबु अशी गमंत करु नये ज्याने अस गायब व्हाव लागेल. अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. जपुन रहाव. सगळेजण खिलाडु नसतात. अशा वेळी दिवे द्यायला विसरु नये.
तर आज काशी विषयी.
आमचा एक मित्र होता. त्याच्या वडीलांच नाव काशीनाथ होत. त्यामुळे त्याला ग्रुप मधील बरेच जण काशी असेच म्हणत. तो देखिल त्यामुळे त्या त्या लोकांच्या बापांचा उद्धार केल्याशिवाय राह्त नव्हता. तो बराच मिस्किल आणि टारगट मुलगा होता.मध्यम उंची, शिडशिडीत बांधा. डोळ्यावर चष्मा. क्लास सुरु व्हायच्या वेळे आधी २० मिनिट हजर. सर्व पाखरं नजरेखालुन घालणे आणि लांबुन मास्तर येताना दिसले की सायकल घेवुन गायब होणे हा ह्याचा रोजचा छंद. तसेच कोणा मित्राला एखाद्या पाखराच घरटं शोधायच असेल तर ते काम ह्याच्याकडे कारण ह्याला सगळे गल्लि बोळ रस्ते पक्के माहीत होते.
पाखरु गाडिवरुन जरी जात असेल तरी हा सायकल जोरात दामटत रोज थोडे अस करत ४ दिवसाच्या आत पत्ता घेवुन हजर. आता काय करतोय माहित नाही काहिच कॊंटक्ट नाही. मला काशी म्हणले की तोच आठवतो.
पण आपली माय बोलीवरची काशी he नसुन she आहे. तिच्याविषयी थोडे. काशी म्हणले की मला एक शब्द आठ्वतो की जा काशी कर. म्हणजे तुला जे हवे ते कर मी आता मधे पडणार नाही अशा अर्थाचा. ह्यापलिकडे काही अर्थ असेल तर मला माहित नाही.
पण माय बोली वरची काशी फ़ोटो रुपाने orkut वर भेटली. त्याव्रुन वाटले की ति जीवनाचा भरभरुन आनंद घेणारी आहे. साधी सरळ , प्रेमळ. (तिला फ़ोटो मधे सुधा पती शिवाय करमत नाही, बघा orkut वर जावुन)~D . खुप धमाल करणारी आणि स्वता:मधल लहान मुल जपलेली. तिचे फ़ोटो पाहुन फ़क्त हाच विचार मनात येतो. आयुष्य हे तिच्यासाठि एक धमाल ट्रिप आहे आणि ती मजा घेतेय.

Nandini2911
Tuesday, April 10, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा... झकासराव.. चांगलंच Face Reading जमतय की तुम्हाला..
जरा माझाही फ़ोटो बघून काहित्तरी सांगा ना..


Ultima
Tuesday, April 10, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह.....झक्कि काका काही उलटसुलट बोलले असेन तर मनापासुन दिलगीर आहे.... खरच तुम्हाला त्रास द्यावा असा काही विचार नव्हता....

झकासराव धन्यवाद


Gobu
Tuesday, April 10, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
तुमच्याबद्दल माहीती नव्हते
माझ्या लिखाणात काही चुकीचे असेल तर क्षमस्व
(पण तुमची काही मते पटत नाहीत बुवा, तेव्हा आम्ही त्याबद्दल लिहीणारच!)
झकासराव,
तुम्ही नको तितके सिरीयस झालात बुवा
अहो, फ़ुलपाखरु मनावर घेणार नाही याची खात्री होती मला, म्हणुनच लिहीले, शिवाय दिवे ही दिले होते मी
(कुवैतवर पहाताच तुम्ही, मी किती सभ्य माणुस आहे ते!)
टेन्शन नही लेनेका, मस्त रहेनेका!!! (फ़ुलपाखरु जैसे!!!)
उल्तिमा,
मला वाटत,तुमच्याबद्दलही मी लिहीले होते
पण अभिप्राय कळला नाही


Ultima
Tuesday, April 10, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उल्तिमा: एकदम अल्टिमेट.. सदर व्यक्ती एकतर अतिशय सुन्दर असणार किन्वा कला रसिक
सर्वात आधी मी उल्तिमा नाही तर अल्टिमा आहे... उल्तिमा एकदम अरेबिक शब्द वाट्टो ना.....

ते "अतिशय सुन्दर " - "कला रसिक " याच्यामधे "किन्वा" ऐवजी "आणि" जास्त बर दिसल असत नाही...

तस काही नाही रे.....मी आपली सरळ साधी शांत सोज्वळ सालस मुलगी आहे. (हा दिवा माझ्या स्वत्:साठिच हं !!)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators