Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mule ( aani tyanchya sobat ) wadhtann...

Hitguj » My Experience » Mule ( aani tyanchya sobat ) wadhtanna « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 11, 200720 07-11-07  7:29 pm

Zakki
Wednesday, July 11, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला! (उद्गार. मायबोलीकराचे नाव नव्हे.)

या लोकांना काही उद्योग नसतात वाटत? खोबर्‍याच्या वाटीत केस! मग उजव्या मांडीवर की डाव्या मांडीवर बसवायचे मुलाला? शिवाय पाटावर किती फुल्या? किती मोठी ताट वाटी? मामेभाऊ, आतेभाऊ, बहिणी यांना यात काही कामे नाहीत का? जसे मोठ्या आतेभावाने कात्री आणून द्यायची. नि छोट्या मामेभावाने बॅक्टेरियल साबणाने ब्रिटा फिल्टरमधून आलेल्या पाण्याने धुवून मामेबहिणीकडे द्यायची!!

नि चुलते, चुलतभाऊ यांना कधी सोने चांदी मिळते? त्यासाठी मूल Toilet train झाल्यावर करायचा एखादा कार्यक्रम ठेवा. मी अनेक जणांचा चुलता आहे.



Robeenhood
Thursday, July 12, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अनेक जणांचा चुलता आहे.>>>>>


हूँ ssssssss
म्हणजे राघोबा दादा!!!
राघोबा मरे नही, राघोबा मरते नही!!


Limbutimbu
Thursday, July 12, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय रे हूडा???? एकटाच बडबडतोहेस???
एकट्यानेच बडबडायचे तर यस्जीरोडवर ये की माझ्या सन्गट!
DD

Manjud
Thursday, July 12, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, मामेभाऊ, आतेभाऊ, बहिणी यांना यात काही कामे नाहीत का?.... सहीच वाक्य आहे हे..... ह. ह. पु. वा.
अहो झक्कि काका, तुम्ही आता आजोबा झाला असाल, तेव्हा तुम्ही आता गोष्टी सांगायच्या.


Chyayla
Thursday, July 12, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईच्या एकुलत्या एक गोंडस बाळाचेपण जावळ काढले होते काही.. जावळ आधी मऊ होती काढल्यावर मग जरा दाट आणी छान केस वाढलेत. आमच्याकडे नाही बुवा असे आत्याला सोने वैगेरे दीले होते.

Kanak27
Thursday, July 12, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर का
मग अवनिचे जावळ करते.



Robeenhood
Thursday, July 12, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्कि काका,>>>>
तो पहा मध्यरात्रीही आवाज येतो आहे... का ssss का मला वाचवा!!!

Upashiboka
Thursday, July 12, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> माझ्या आईच्या एकुलत्या एक गोंडस बाळाचे
काळ्जी नको करूस. लग्ना नन्तर पण गोन्डस जावळ (टक्कल) होइल.

Prajaktad
Thursday, July 12, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यासाठी मूल Toilet train झाल्यावर करायचा एखादा कार्यक्रम ठेवा. मी अनेक जणांचा चुलता आहे.
तुम्ही कशाला?? जे कार्यक्रम करायचेत ते मुल स्वत:च करेल की! फ़ारतर उरलेले ट्रेनिन्ग pant (pull ups) मिळतिल तुम्हाला पहा साईझ मधे बसले तर...


Zakki
Thursday, July 12, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय, चांदीची ताट वाटी, असे काही नाही का? गेला बाजार एक चांदीचे फुलपात्र नि पळी तरी?

छ्या, एकदा नवीन पिढी आली की जुन्या पिढीला कोण विचारतो?
हटकेश्वर, हटकेश्वर, तूच आता आधार!


Chyayla
Friday, July 13, 2007 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळ्जी नको करूस. लग्ना नन्तर पण गोन्डस जावळ (टक्कल) होइल
उपाशीबोका.. का रे बाबा तुझे पण जावळ (टक्कल) झालीत काय? स्वानुभवाचे बोल ना.. दीवा घेशील हं.

कनक, तुम्ही अवनीचे जावळे काढाच बाकी तुम्ही तिच्या जावळाच्या वजनाएवढे सोने देण्याबद्दल म्हणाल तर तसा मी सध्या फ़ारच व्यस्त आहे पण आग्रहच केला तर यायचा नक्की प्रयत्न करेन. आणी तसे असेल तर थोडे जावळे (सोने) अजुन वाढु दे की.





Tukaram
Friday, July 13, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की किती जावळ अटेन्ड केली तुम्ही? तुमच झाल होत का? कि हा न झाल्याचा राग आहे?

Zakki
Saturday, July 14, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला राग नाही हो, मी जरा गंमत करत होतो.

माझे जावळ झाले होते की नव्हते? मला स्वत:ला मी कधी कॉलेजात गेलो होतो का, माझे लग्न केंव्हा झाले या गोष्टीहि आजकाल आठवत नाहीत. जावळ, उष्टावण, मुंज तर दूरच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators