Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2007

Hitguj » My Experience » माझा शब्दकोष » Archive through March 02, 2007 « Previous Next »

Sanghamitra
Friday, February 02, 2007 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए. के. हनगल होणे अगदी अगदी.
एखाद्या उदास चेहर्‍याच्या माणसाला " ए. के. हनगल तरूण असल्यापासून हा असाच दिसतो. "
किंवा डी. आय. क़्यु. (हे जुलाबावरचे औषध होते.)
शिवाय, अत्यंत फालतू आणि शिळी बातमी कुणी हौसेने देत असल्यास मौ. मा. किंवा MM म्हणजे मौलीक माहिती.
कॅंटीन मधे यायला नकार दिल्यास " तिला विरक्ती आलीय " .

>>> पुण्यात त्याला खडकी दापोडी म्हणण्याची पद्धत आहे...
मुंबईत लालबाग परळ म्हणतात बहुतेक. किंवा अलिबाग. अर्थात अलीबाग से आया ला अजून व्यापक अर्थ आहे म्हणा.



Zakki
Friday, February 02, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी 'येरवड्याहून आला' म्हणायचे.

दीपांजली, जरा माझीच वाक्ये सुसंबद्ध नि मुख्यत:, संदर्भासहित वाचून, परत लिहून दाखव. तेव्हढेच माझे लिखाण सुधारेल! धन्यवाद.

आता खरे म्हणजे 'हळदीकुंकवाला जाऊन आला किंवा आली' असा नविन वाक्प्रचार सुरु करायला हरकत नाही. म्हणजे लिंबूटिंबू म्हणेल, झक्की बहुधा 'हळदी कुंकवाला' जाऊन आलेले दिसताहेत.


Zakasrao
Saturday, February 03, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादा माणुस तिरळा असेल तर त्याला आम्ही जोतिबा-पन्हाळा असे म्हणत होतो.

Zakki
Saturday, February 03, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला पूर्वी बाँबे कलकत्ता म्हणायचो. आमच्या वेळी तीच नावे होती त्या शहरांची.

एक खुलासा: मी ए. के. हनगल यांची क्षमा मागतो. काय झाले, त्यांचे चित्र एकदा टी व्ही वर पाहिले. ते पाहून मला वाटले अरेरे, गेला बिचारा!

~D

Robeenhood
Saturday, February 03, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचे चित्र एकदा टी व्ही वर पाहिले. ते पाहून मला वाटले अरेरे, गेला बिचारा!
~D>>>>>>
काय म्हणावे आता या बालीशपणाला! अहो टीव्ही वर दिसलेला प्रत्येक माणूस'गेला' असे समजायला लागले तर रोज कितीतरी सेलेब्रेटी, पुढारी, गुन्ड मरतील...
छ्या, हडळीकुंकवाला जाऊन आलेले दिसतात बोवाजी...








Swa_26
Tuesday, February 06, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिरळ्या माणसाला आम्ही कर्जत कसारा असे म्हणायचो...

Satishmadhekar
Monday, February 12, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात पूर्वी गावठी माणसाला "पौडाचा दिसतोय किंवा पौडाहून आल्यासारखा वाटतोय" असं म्हणायचे.

एखादा आपण बावळट किंवा अडाणी नाही हे दाखविण्यासाठी "मी काय पौडावरून नाही आलेलो" असं सांगायचा.


Gajanandesai
Monday, February 12, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बावळटपणासाठी किंवा ज्याला कोणीही शेंडी लावू शकतो त्याला मुंबईत 'अलीबागहून आलाय' म्हणतात.

Zakki
Monday, February 12, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर त्याला आता 'अमेरिकेहून आलाय्' असे म्हणायला पाहिजे. काय पण फेकत होते लोक मला पुण्यात? आता मी आपले सगळ्याला हो म्हंटले, माझे काय जाते? उदा. ६ सीटर रिक्षात मोठ्या ट्रकचे इंजिन बसवले असते, म्हणून त्यात सहा ऐवजी बारा लोक सहज नेता येतात. रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवली तर जिथे जायचे तिथे पोचायला वेळ कमी लागतो, म्हणून काही लोकांना पोलीस पकडत नाही! वगैरे वगैरे. पुण्यात मराठी वर्तमानपत्रांपेक्षा कन्नड, तेलुगु जास्त चालतात, म्हणून मला हिंजेवाडीत मराठी वर्तमानपत्र मिळत नसे कित्येकदा! वगैरे वगैरे.

Mrinish
Friday, February 16, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेत असतानाचा एक आवडता shortform
यमुनाबाई आगाशे
य यडपट
मु मुर्ख
ना नालायक
बा बावळट
ई ईडियट

आ आगाऊ
गा गाढव
शे शेळपट


Nkashi
Friday, February 23, 2007 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या गावी विजेच्या खांबाला "डांब" म्हणतात...
for e.g त्यो डांब हायेना तीत शाळा हाये...


Zakasrao
Friday, February 23, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NKASHI
चावी नळ
किल्ली- चावी
बरोबर का?


Adi787
Friday, February 23, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कानाखाली आवाज काढणे: पेटवीणे, असली पेटवली ना त्याला :-)

Dineshvs
Friday, February 23, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन त्या डांबाला त्या पाईप है न्हवं का, तिथं एक बाई उभारली है

Chyayla
Friday, February 23, 2007 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला "मुर्दाडशिन्ग" माहित आहे का? आधी कैक दीवस मी त्याला शिवी समजायचो नन्तर आमच्या मास्तरान्नी एक दीवस सन्गितले के ते एका पदार्थाचे नाव आहे.

Karadkar
Friday, February 23, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू मुरडशेंग म्हणतो आहेस का?


Chyayla
Saturday, February 24, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही मुरडशेन्ग नाही, तो काही तरी वेगळाच पदार्थ आहे, माझ्या आजीकडुन ऐकला होता, फ़ार पुर्वी. कधी कधी माझे बाबा त्याला गमतीनी नाव ठेवाण्यासाठी उपयोग करतात. जाउ दे मला वाटत हा शब्द आता काळाच्या उदरात गडप झाला आहे.
अरे मुर्दडशिन्गा... हा हा आपण असेच बोलुन मजा लुटु या.


Manuswini
Sunday, February 25, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काही common मुंबई खास शब्द, नविन काही नाही,अर्थ माहीत असतीलच.

अम्मा - उर्फ़ काकु type मुलगी.
मद्रासी - कोणीही असो तेलगु, कन्नडा,तामिळ सगळे एकजात मद्रासी. for e.g: अरे वोह मद्रासी है ना....

ढक्कन - मुर्ख, बावळट
चिपकु
खुन्नस आया
पकाऊ है
ढासु है वोह
जलु है - जळकट मुलगी
सांड - उभा आडवा वाढलेला नी अक्कल कमी असलेला मुलगा(कित्येक दिवस मला ही शीवी वाटायची, कारण हिंदीतील ह्या शब्दाचा अर्थ ही माहीत न्हवता ना. अजुनही जरा विचित्रच वाटतो मला हा शब्द)


मराठी
ठोंब्या - sunny deol = ठोंब्या
झंप्या - थोडासा स्वःताला 'हे' समजणारा

तेली मामी तेलकट, अजागळ मुलगी.
बया - वस्ताद बाई मुलगी
कारली - कुसकट मुलगी

आणखी बरेच कोणी add करु शकतील किंवा already त्याची नोंद झाली असेल वरती कदाचीत.


Nkashi
Thursday, March 01, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, अगदी अगदी झकासराव...
कंच्या गावच हो तुमी?


Zakasrao
Friday, March 02, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवो तुमच्याच नव्ह का? पण आता मी पुण्यात असतो पोटापाण्यासाठी. बाकी तुमच काय?
अजुन एक शब्द आहे
लडतर्- लफ़ड, राडा
जसे की ' आयला त्या कामाची एक लडतरच झाली.
किंवा लय लडतरी करू नकोस गळ्याशी येइल.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators