Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through March 13, 2007 « Previous Next »

Sunidhee
Thursday, February 22, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईत असताना माझी मैत्रिण एकदा office मधे काम करता करता एकदम मूड मधे येऊन गायला लागली "चुरा लिया है तुमने जो दिलको, बदन नही चुराना सनम". आधी मी दचकले कारण अगदी शांतपणे काम चालु असताना पोरीने एकदम आळवणी सुरु केली आणि ते ही भलतेच शब्द वापरुन..
मग मी तिला "ते बदन नसुन नजर आहे" असं सांगितल तेव्हा इतकी ओशाळली बिचारी कारण शेवटी मुंबईच्या आॅफीसात सर्व आसपासच बसलेले असतात ना.


Nkashi
Friday, February 23, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजेश खन्ना आणि नंदाच एक गाण आहे. काहीस अस...

गुलाबी आंखे जो तेरी देखी
शराबी ये दिल हो गया
संभालो मुझको ओ यारो
संभलना मुश्कील हो गया

यात आंखे नक्की गुलाबीच आहेत ना? का मला एकु येत?


Heena21
Friday, February 23, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गुलाबीच आहेत. I think so.

Dineshvs
Saturday, February 24, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गुलाबी असाच शब्द आहे तो. सिनेमा दी ट्रेन. पण मला वाटते या गाण्यात हेलन आहे.

Sachinbhide
Tuesday, February 27, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, त्या गाण्यात बेबी नन्दा आहे.

Asmaani
Saturday, March 03, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

washing powder nirma " च्या ad मधे, " रंगीन कपडे भी खिल खिल जाए" अशी एक ओळ आहे. कित्येक दिवस ते मला " रंगीन कपडे दे पिल्ले पिल्ले जाए" असं ऐकू यायचं आणि काहीतरी पंजाबी ओळी असाव्यात असं वाटायचं.

Vinaydesai
Saturday, March 03, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते पिळले पिळले जातात चं हिंदी भाषांतर


Chinnu
Saturday, March 03, 2007 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी :-)
अस्मानी, विनय :-) निर्माच्या या ओळी ऐकुन मला वाटायचे की कपड्यावरचे पिवळे पिवळे डाग पण जातात निर्माने, अशी जाहीरात आहे!


Zakasrao
Monday, March 05, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते पिळले पिळले जातात चं हिंदी भाषांतर >>>>>>
कपड्यावरचे पिवळे पिवळे डाग पण जातात निर्माने>>>>
हा.............. हा...............


Sanghamitra
Monday, March 05, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> कपड्यावरचे पिवळे पिवळे डाग पण जातात निर्माने
चिन्नू जाम हसले मी.
पण मलाही अगदी अस्मानी सारखंच ऐकू यायचं आधी. बहुतेक तेंव्हा तसंच असणार ते. आता बदललं असेल.

>> ते पिळले पिळले जातात चं हिंदी भाषांतर
विनय कपडे इतके पिळपिळीत होतात की कसेही पिळले जातात असं का? :-)

Antima
Monday, March 05, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रिण सडक मधले गाणे "रहने को घर नही सोने को बिस्तर नही" च्या एवजी "रहने को घर नही सोने को मिस्टर नही" असे म्हणायची (चुकुन की मुद्दाम माहित नाही)

Suvikask
Tuesday, March 06, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सोने को मिस्टर नही"

धमाल आली वाचुन... मैत्रिण बरीच चालू होती की..


Disha013
Wednesday, March 07, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लता-मन्ना डे चे 'दिल की गिरह खोल दो'
हे गाणे मला
'दिल की गिरह खोल दो,चुप न बैठो, कोळी गीत गाओ' असे ऐकु यायचे!


Chinnu
Wednesday, March 07, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोने को मिस्टर! कोळी गीत! हा हा हा!!!! :-)

हाथ मेरा थाम लो,
"हाथ" जब तक हो?
कसं स्टाईलमध्ये धमकावायचं, नै? :-)


Runi
Wednesday, March 07, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोळी गीत गाओ...
दिशा, खि खि खि


Disha013
Wednesday, March 07, 2007 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो,आणि छायागीतमधे बघितलेले ते गाणे तेव्हा मला प्रश्न पडलेला नर्गिस सगळ्यांना कोळी गीत का गायला सांगतेय असा!

आणि चिनु, तुझ्या style ने म्हणावे असे अजुन एक गाणे... 'राजा' मधिल,
'किसी दिन बनुंगी मैं राजा की राणी
जरा फ़िर से केहेना'


Tawaal
Thursday, March 08, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्ताना मधले टायटल गाणे आहे ना त्याच्या कडव्याच्या ओळी पुस्तकात अश्या छापल्या होत्या...

वो रवाबोके दिन, वो किताबोके दिन

आणि त्या वाचुन मी तश्याच म्हणायचो. मग एकाने सांगीतले की झाम्या, ते "वो ख्वाबोके दिन" आहे म्हणुन.


Tawaal
Thursday, March 08, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसच एक ते प्रसिद्ध बाहुलीचे गाणे आहे ना त्यात अश्या ओळी आहेत

ऐकु न येते, हळुहळु कशी माझी छबी बोलते

तेव्हा "लोकांनी ऐकु नये" अश्या शिव्या बहुधा ही छबी हळु आवाजात देत असावी असं वाटायचं.

टवाळाला टवाळीच सुचणार ना!


Sayuri
Tuesday, March 13, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चष्मेबद्दूर १९८१ (सई परांजपे दिग्दर्शित चित्रपट)
"प्यार लगावट (?) प्रणय मोहोब्बत प्रीत प्रेम या ....?"
नक्की काय शब्द आहेत या गाण्याचे?

Pooh
Tuesday, March 13, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी,

ते शब्द love l'amour असे आहेत. amour हा french शब्द आहे. त्याचा अर्थ प्रेम


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators