Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through March 15, 2007 « Previous Next »

Sheshhnag
Saturday, March 10, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा, वैवाहिक जीवनाची `अशी' सावध सुरुवात केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. मग रात्री झोप लागली की नाही, नवपरिणित जोडप्याला आणि त्यांच्या इष्टमित्राना. अहो तसं नव्हे, ह. ह. पु. वा. झाली असेल ना सर्वांची, म्हणून विचारलं. कसले कसले विचार मनात आणता हो तुम्ही!!

Yogesh_damle
Saturday, March 10, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chaffa, your इब्लिसपणा with the magic slate backfired! It's showing the source coding instead of the HTML window.

मी ते notepad मध्ये copy-paste करून HTML output चालवला त्याचा. लग्न झाल्यावर इतर गोष्टींचा असा विसर पडावा?

चला... आता काही दिवस चाफ़्फ़ा इब्लिसपणाचे विक्रम सोडून वेंधळेपणात झेंडा फडकवणार!!


Heraspparesh
Saturday, March 10, 2007 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झकासराव ती पाटी दुरुस्त करून घ्या.तुम्ही म्हणालात तसा आनन्द येत नाहिये.

Ajjuka
Saturday, March 10, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही चाफ्फा.. खूप छळलं असेल लोकांना की असंच होतं... आम्ही सॊलिड गायब झालो.. लोक घरच्यांपासून पळून जाऊन लग्न करतात आम्ही मित्रांपासून पळून गेलो होतो..

Mrinmayee
Saturday, March 10, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दामले मास्तर, जरा नीट बघा की हो!!!! ती पाटी चाफ्फ्यानं नाही, झकासरावांनी आंदण दिलीय!!!! आता वेंधळेपणा कुणाचा? :-)

चाफ्फ्या हार्दिक अभिनंदन!!!! एकदा 'बच गया' म्हणून काय झालं? बदला घेणारे फक्त संधीची वाट बघतात! तेव्हा सावधान!!!!!


Chaffa
Sunday, March 11, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेषनाग,रुनि,स्टोर्वि,अजुक्का,झकासराव,आर्च,च्यायला,नंदीनी,स्वा२६,आदि,मृण्मयी आणी सगळ्यांचेच मनापासुन आभार.
उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही थोड्क्यात मायबोली सोडणार नाही हो.!!

तो दोस्तलोग आगेका ईरसालपणका किस्सा झेलनेको तय्यार हो.??( आपलं हिंदी हे असच )

हा पुजेच्या दिवशीचा किस्सा:
म्हणजे त्याचे असे आहे की आजकाल लग्नात नवर्‍याचे बुट लपवणे अपरीहार्य आहे ( आग लागो त्या " हम आपके है कौन"च्या रिळांना. तर झालं नेमकं असं की रिवाजानुसार ( या नव्या ) माझे बुट लपवण्यात आले, आता बुट परत करण्यासाठीची खंडणी मागायला ते लपवणार्‍या आल्या, आणी माझ्या पायात बुट असलेले बघुन गाऽऽर पडल्या.
खरा प्रकार त्या करवल्यांना आजुनही माहीत नसेल की माझ्याकडे एकाच सारखे,एकाच दिवशी आणी एकाच दुकानातुन घेतलेले दोन जोड होते.

हे बुट लपवणे हा कार्यक्रम होणार हे आधिच गृहीत धरलेले होते नाऽऽ!!


Chaffa
Sunday, March 11, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं आता काही प्रश्नांना उत्तरे
आर्च,
आता इथे येणार्‍या अनुष्काच कस होणार?
तो एक वेगळा विषय आहे उगीच कशाला आणखी एखाद्या BB ला विषय पुरवु.?
स्टोर्वि,
चाफ़्फ़्या लग्न म्हणजे इबलिसपणा वाटला काय?
अरे बापरे.!! मग हा काही सिरीयस प्रकार असतो का.??
दिशा,
बायकोला अनुष्काबद्दल सांगितले की नाही अजुन??
काही काही गोष्टी आधिच सांगुन ठेवणे बरं नव्हे तसं या ID बद्दलही काही सांगीतलेले नाहीये बरं.
स्वा२६,

अरे नेकी और पुंछ पुंछ.? केव्हाही फ़क्त तुम्ही हजर व्हा आणी माझ्या सौ.ला चाफ़्फ़्याचं रहस्य सांगु नका म्हणजे झालं.








Zakasrao
Monday, March 12, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/1/123595.html?1173516878अरे चाफ़्या इकडे जावुन बघ तु किती फ़ेमस आहे ते.

Suvikask
Monday, March 12, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, आणि सौ. चाफा आपल्या
वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा!!

झकासराव,
पाटीवर उमटत नाही कि हो... कोळ्शाने घासावी की काय?


Zakasrao
Tuesday, March 13, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोळ्शाने घासावी की काय?>>>>>.काही लोकांनी पाटिवर लिहुनदेखील पाहिल. एक काम करा तुम्ही ती पाटी save as name.html करा. आणि लिहुन बघा. नाही लिहता आल तर डिलिटुन टाका.

Heraspparesh
Tuesday, March 13, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे यार इथे पाटी कशाला हवी आहे कुणाला आम्ही बालवाडीत नाही आहोत.

Nandini2911
Wednesday, March 14, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा इब्लिसपणा असा करावा...
आधी दूर देशीच्या मित्राला मेल करून आपण किती वाजता ऑनलाईन असू ते सांगावे. त्याला आमंत्रित करावे.
तो ठरल्या वेळी आल्यावर आपण दुसर्‍या नावाने आगमन पावावे. मग त्याला मेसेज टाकावा.
भलत्याच नाव वय आणि लोकेशन सांगून.. हाय हेलो झाल्यावर. ये दणादण शिव्या घालाव्या.. त्याच्या धर्मावरून वगैरे बडबडून घ्यावे
तो आधी दुर्लक्ष करेल मग तोही भडकेल. त्याने शिव्याची लाखोली सुरू केल्याबरोबर आपण आपल्या मुळ रुपात प्रकट व्हावे. मग उगाच त्याला तुझा मूड का खराब आहे वगैरे विचारावे.
त्याने कारण सांगितल्यावर आपण हसावे. असे कमीत कमी पाच सहा वेळा करावे.
(त्याला सत्य सांगू नये कधी ना कधी तो परत येईल आणि मग आपल्याला भेटेल तेव्हा सावधगिरीची सूचना:-)


Chyayla
Wednesday, March 14, 2007 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, आता ज्येष्ठ नागरिक झक्कीन्नी ही पोस्ट वाचली ना तर ते तुला नक्की A.V.K ही पदवी बहाल करतील, ज्येष्ठान्कडुन जेन्व्हा मिळेल तेन्व्हा मिळेल मी तर तुला अती वात्रट कार्टी ( A.V.K. ) हा पुरस्कार जाहीर करतो.

पण यार यालाना दोन सन्गणक पाहिजे ना, एकाच सन्गणकावरुन दोन वेगळ्या नावाने Login करता येत नाही ना...

तर मी पण माझा ही सन्गणकावरचा इर्साल किस्सा सान्गतो, माझ्या ऑफ़िस मधे एक कोलकात्याच्या बन्गाली बाबु मित्र होता. तर एक दीवस त्याच्या सन्गणकावर काम केल्यावर अगदी मिस्किलपणे हासत हासत त्याचा सन्गणक परत केला, बन्गाली बाबुला तेन्व्हा माझे रहस्य कळाले नव्हते...

तुम्हाला माहिती आहे का Windows 98 ची Operating System Shutdown होताना शेवटी एक सुचना येते It is now safe to shutdown your computer ... तर काय झाल सन्ध्याकाळी सन्गणक बन्द करताना त्याला दुसरीच सुचना.. अगदी देवनागरीत अबे गधे, कॉम्पुटर बन्द कर
बन्गाली बाबु चरकलाच आणी मग माझ्या हास्यामागे काय दडल होत ते आत्ता उघड झाल होते... बीचारा परेशान झाला की हा Message कसा हटवायचा मी त्याची मजा घेत होतो त्याच्या सोबत ईतर सहकारी पण तो Message नेहमी पाहुन हसायला लागले त्यान्ना पण तो Message हटवता आला नाही. शेवटी स्वारी माझ्या जवळ आली आणी तब्बल ४ दीवस सगळ्यान्ची हसवणुक झाल्यावर मी तो Message काढुन दीला.

जर कोणी सन्गणक क्षेत्रात असेल आणी त्याला हा टेक्निकल ईब्लिस्पणा करायचा असेल तर एक Logon.sys नेमकी File Name आठवत नाही त्याला paint मधे Open करुन हवा तो Message बनवा आणी Save करा आणी पहा मजा.


Nandini2911
Thursday, March 15, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला... दोन वेगवेगळे मेसेंजर ओपन कर ना...
याहू आणि गूगल वगैरे..
बाकी काही म्हण.. मेसेंजरवरून मस्त इब्लिसपणा करता येतो :-)


Zakasrao
Thursday, March 15, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबे गधे, कॉम्पुटर बन्द कर >>>>>>>.

च्यायला तुला आणि नंदिनी दोघाना विभागुन हा पुरस्कार आपले इब्लिससम्राट चाफ़ा यांच्याकडुन देण्याचा प्रस्ताव आजच मांडतो.

Sakhi_d
Thursday, March 15, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव तुमच्या प्रस्तावाला माझे अनुमोदन....

Sheshhnag
Thursday, March 15, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझेही... मला वाटते, सर्वच अनुमोदन देतील.

Ultima
Thursday, March 15, 2007 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला आणि नन्दिनी...तुमची खरच धन्य आहे...

माझेही अनुमोदन बर का.... आणि सोबत एक किस्सा पण..

माझ्या एका मित्राची एक ऑनलाईन मैत्रिण होती.... खुप दिवस त्यांच्या छंद, आवडी निवडी वगैरे भरपूर गप्पा झाल्या. त्याने वाट्टेल त्या थापा मारल्या होत्या. तो पुढची स्वप्न पण (प्रपोज कराव का ?)बघायला लगला बिचारा....आणि नंतर एके दिवशी समजला की त्याचा हा क्रश म्हणजे अमच्याच कंपनी मधला त्याचाच एक इब्लिस दोस्त होता.
हे कळाल्यावर बिचारा इतका अपसेट झाला होता......

अशी ही मेसेंजर ची क्रुपा.............



Chyayla
Thursday, March 15, 2007 - 10:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टिमा... जाम हसलो बुवा तुझा किस्सा वाचुन .... खरच ह्या मेसेन्जर मुळे असल्या गमती जमती नेहमी केल्या जातात या मायावी जगतात सगळेच बुरखा पान्घरुन फ़िरतात... मला पण माझा मित्र शाकिरची आठवण झाली... तुला सान्गतो अगदी हाच प्रकार त्या बन्गाली बाबुनी माझ्या शाकिर नावाच्या मित्रासोबत केला त्यानी "फ़ातिमा" नावाचा आयडी वापरला होता व उर्दुप्रचुर वाक्ये वापरुन च्याट करायचा आणी हा शाकिर ही आम्हाला त्या फ़ातिमा बद्दल सान्गायचा आणी आम्ही त्याची पुर्ण मजा घ्यायचो कित्येक दीवस हे चालु होते आणी एक दीवस त्या बन्गाली बाबुनी चुकुन खरे सान्गितले की तो या ऑफ़िस मधे आहे तेन्व्हा कुठे बिन्ग फ़ुटले.

अरेच्या तुम्ही सगळ्यानी एकमतानी आमच्याविरुद्ध कट केलेला दीसतोय


Runi
Friday, March 16, 2007 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, आमच्या department मध्ये एक इराण चा माणुस होता, तो पण असेच कोणाशी तरी गप्पा मारायचा, आणि ह्या बहद्दराने त्या मुलीला फोटो वगैरे मागितला email मध्ये, आणि नेमके त्याच्या बायकोने तो बघितला, मग मामला खुप सिरीयस झाला होता. त्याची बायको department हेड कडे गेली... बराच गोंधळ झाला. आणि मग जो मुलगा चॅट करायचा त्याने येवुन सांगितले तिला की तो फ़िरकी घेत होता म्हणुन तिच्या नवर्‍याची.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators