Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 06, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 06, 2007 « Previous Next »

Ajjuka
Monday, March 05, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अनुष्का आणि चाफ्फा काय घोळ आहे?? साधारण ३ ते ४ ठिकाणी हा अनुष्का आयडी चाफ्फ्याबद्दल असंच काहीतरी बोलताना आढळलाय.
प्रेमभंगाची केस की परत एकदा ’मिल्याची अवंती’ प्रकार.. :-)
अनुष्का, खरंच काही घडलं असेल तर कृपया तुमचे खाजगी व्यवहार इथे सार्वजनिक ठिकाणी किंवा थोडक्यात चव्हाट्यावर आणू नयेत. नाहीतर मग खाजगी ते खाजगी रहाणार नाही आणि कुणाची काय प्रतिक्रिया येईल ते सांगता येणार नाही. प्रतिक्रिया नेहमीच तुमच्या बाजूने असेल असे नाही. त्याची तरी तयारी ठेवा. बर इथे एका ’क्ष’ व्यक्तीची बदनामी करून काहीही उपयोग नाही. कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि मुळात कुणी खाजगी आयुष्यात कसे आहे याबद्दल बऱ्याचश्या जणांना काहीही घेणे देणे नाही.

Psg
Monday, March 05, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'गौरी' नावाच्या मला माहित असलेल्या सगळ्या मुली साध्या, सरळ स्वभावाच्या, मनमोकळ्या आणि बडबड्या असतात.

तसंच सर्व 'सचिन' मधे काहीतरी स्पार्क असतोच.. कुठे ना कुठेतरी ते चमकतातच.


Dineshvs
Monday, March 05, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मागे लिहिले होते एकदा, कि सचिन या शब्दाला मराठीत काहिच अर्थ नाही. ( चीनसकट म्हणाने, तर नेमका चि र्हस्व आहे. )

ईंद्र आणि शचि, यांचे मिळून झाले शचेंद्र, त्याचे बंगाल्यानी केले शोचिन, आणि मराठीत झाले सचिन.


Jdkulkarni
Monday, March 05, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवधूत्: कपाळाला गन्ध लावणारा, सात्विक, आज्ञाधारक मुलगा.

सुमन्: टिपीकल मराठी ग्रुहिणी.सन्ध्याकळी गरम चह करुन आणी पोहे करुन 'ह्यांची' वाट बघणारी. एक मुलगा आणी एक मुलगी असनारी.

बाबू: बावळट मनुष्य

पप्पू: टुकार पोरगा

सुनील्: शांत पणे स्वत:चा स्वार्थ साधून घेणार

---------
ज़यंत कुलकर्णी


Swa_26
Monday, March 05, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका... हा घोळ तुझ्या आत्ता लक्षात आला होय??? :-) अरे तो तर खुप जुना matter आहे. मागे एक BB पण होता specially 'ह्यावर'...

बाकी इथे रंगपंचमी मस्त रंगलीय.... :-)


Ajjuka
Monday, March 05, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतेस? मला फारच उशीरा लक्षात येतात बहुतेक गोष्टी..

Yuvrajshekhar
Monday, March 05, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयंत कुलकर्णी हे नाव एखाद्या नाटकातल्या कलावंताचं वाटतं, ज्याला सतत छोट्या विनोदी भूमिका कराव्या लागतात पण मोठ्या किंवा गंभीर भूमिकांसाठी ज्याचा कुणीही दिग्दर्शक विचार करत नाही.

Lajo
Tuesday, March 06, 2007 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच सही BB आहे. मायबोलीकरांच्या 'प्रतिमां' बरोबरच 'प्रतिभा' ही पहायला मिळाल्या...
मी अजुन तशी नवीनच आहे मायबोलीवर पण काही ID ंच्या आणि नावांच्या माझ्या डोळ्यांसमोरच्या प्रतिमा..

च्यायला: खूप डांबरट व्यक्तिमत्व..
झकासराव: मराठी चित्रपटातले विनोदी खलनायक
झक्कि: एक नंबरचे झक्की...वेंधळेपणा, इब्लिसपणा, आगावुपणा इ. इ. यांचे cocktail
सुपरमाॅम: गोल चहर्‍याची, घारी गोरी, सुबक ठेंगणी, मदत करणारी, प्रेमळ, ताई
मनुस्विनी: आपल्या मनाची राणी, पण आगाऊ नव्हे, मनमिळाऊ
ललिता: सावळी, सडसडीत, डोळ्यावर चष्मा...कवीयत्री किंवा लेखिका
दिनेशदा: सभ्य, प्रेमळ, थोडेसे सावळे, कुरळे केस, सगळ्यात हरीरी ने भाग घेणारे लहान मुलांचे आवडते काका...


Marhatmoli
Tuesday, March 06, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmmn ,

मी पण नविनच आहे इथे त्यामुळे जास्त लिहिता येणार नाहि पण मायबोलि वरचा मला सगळ्यात आवडलेला ID म्हणजे लोपामुद्रा! फ़ारच सुन्दर नाव आहे हे. नावावरुन ति मला अतिशय रसिक, कलाकार आणि modest वाटते.


Badbadi
Tuesday, March 06, 2007 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सही च आहे ही चर्चा :-)
"स्नेहल" नावाबद्दल काय म्हणणं आहे तुम्हा लोकांचं?


Limbutimbu
Tuesday, March 06, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>लिंब्या... कोक्या आहे हे कळतंच तिरक्या बोलण्यातून.. तेव्हा आपसूकच किडकिड्या, गोरा पण रापलेला, घारा माणूस समोर येतो..
किडकिड्या म्हण की काटकुळा किन्वा हाडकुळा म्हण..... मी शिडशिडित म्हणवुन घेतो!
गोरा नाही पण रापलेला नक्कीच!
अन घारा अजिबात नाही.... घारा पण नाही अन भुरा पण नाही! (देशस्थाला लाजवेल अस काळेपण हे! :-) किम्बहुना मला बघितल्यावर कोक्या राहूदेच देब्रा म्हणुन पण कोणी मानत नाहीत....)
त्यामुळे माझ रुपड कधी प्रत्यक्ष पहायला मिळालच तर अपेक्षाभन्गाच दुःख होण्याचीच जास्त शक्यता हे!

बाकी मस्त बीबी हे!

स्वाती नावाच्या मुळी बुद्धिमान असतात हे खर हे! माझ्या पहाण्यातल्या सगळ्या तशाच होत्या!

गौरी नावाच्या व्यक्तीन्ना खुप कष्टातून दिवस काढावे लागतात असा अनुभव हे! (यात श्रीमन्त गरीब असा भेदभाव नाही)

हूडाबाबत, उन्चनिन्च, धडधाकट बान्धा, उभण्टा चेहरा, चेहर्‍यावर मिश्किल भाव, नजर सदोदीत दुसर्‍याचा आरपार शोध घेणारी......! (हापिसातले ज्युनिअर याच्या वार्‍याला फिरकत नसणार.....! DDD ), पण मदत करण्याची तयारी.. असे एकन्दरीत वाटते!


Zakasrao
Tuesday, March 06, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्नेहल एक छान आणी मनमिळावु मुलगी वाटते कारण मी पाहिलेल्या स्नेहल अशाच आहेत आपल नाव सार्थ करणार्‍या.

लाजो सर्व स्त्रियांबाबत चांगल लिहलय आणी पुरुषांच्या बाबतीत मात्र अस का हो?
ये इतना दुस्वास मत करो लाजोजी पुरुषोंका?
दीवा घ्या


Manishalimaye
Tuesday, March 06, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा!! मी अशी आहे तर!!
मला हे आजच कळलं[म्हणजे मी ते आजच--आत्ताच वाचल!!
आणि हो मिलिंद मी लिमये जरी नंतर झालेली असले तरी आता लिमये होऊनही मला
बरी SSSSSSSSSSSSSSSSSSS च वर्षे उलटुन गेल्येत!!
:-)


Limbutimbu
Tuesday, March 06, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>. SSSSSSSSSSSSSSSSSSS
हे अस ऽऽऽऽऽऽऽऽ काढण्यासाठी देव टॅगमधे .a.a.a.a आणि बरहा मधे &&&&&& वापर! :-)

Swa_26
Tuesday, March 06, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलु या नावावरुन एक साधारण ५' उंच, गव्हाळ रंग, तरतरीत मुलगी समोर येते. जिला खुप बोलायला आवडते, मैत्री करायला आवडते. allover एक extrovert मुलगी.... :-)

Kashi
Tuesday, March 06, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी..... मी सांगु तुझ्या बद्दल.....?????????

Bee
Tuesday, March 06, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी तुला तर मी माहिती असणारच ना कारण इतक्या वेळा आपण भेटत राहतो त्यामुळे. अगदी वेगळ मत असेल तर अवश्य सांग. वाचायला आवडेल.

तुझ्याबद्दल सांगायच म्हणजे एक अति सौज्वळ व्यक्तीमत्त्व. कधीही तुझ्यापासून त्रास होणार नाही अशी व्यक्ती. तशा अश्विनी नावाच्या मुली समजदार दयाळू वृत्तीच्याच मी अधिक पाहिल्या आहेत. आपली इथली अश्विनी देखील तुझ्यासारखीच मला वाटते. एक आणखी गुण म्हणजे थोड्या मितभाषी गटातील असतात किंवा खूप कमी जणांशी जास्त बडबड करणार्‍या असतात.

अज्जुका, माझ्याबद्दल दोन शब्द लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आहे त्या चौकोनातून बाहेर पडण्याचा खटाटोप करीन आता :-)


Bhramar_vihar
Tuesday, March 06, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा लिमयेला विचार गं!

Deepanjali
Tuesday, March 06, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त BB आहे
माझी काही मतं लिहिण्या आधी हे आधीच सांगते कि याच नावाच्या इथल्या हितगुजकरांना हे अजिबात उद्देशून नाही .
शैलेश , राजेश , आशिष नावाची नेहेमी smart,brown eyes, आणि attractive looks ची असतात , मराठी मुलां मधली handsome कॅटॅगरी . :-)
राहुल , सचिन , अमित , समीर वगैरे मुलांची image वर बर्‍याच जणांनी लिहिलेय तशीच friendly, गप्पिष्ट , हसरी simple, पटकन मैत्री होतील अशी होतकरु:-)
समीर हेच नाव जर मुस्लीम मुलां मधे असेल तर एकदम देखणे असतात:-)
अच्युत , मुरली , माधव नावाची मुलं handsome असणे अजिबात शक्य नाही , ती कायम बावळट्ट - तेलकट्ट - हिप्पी कट वाली , जाड जूड , घनदाट मिशा असलेली असतात .
पल्लवी नावाच्या किमान तीन मुली नाकाचे हाड वाढलेल्या , नाक गळणार्‍या पाहिल्या आहेत .
रेशमा, स्वप्ना नावाच्या मुली लठ्ठ च पाहिल्या आहेत .
चेतन , किरण , सुहास , शीतल , हितेश , हिरेन , हिमेश , कल्पेश , रुपेश , जिग्नेश , नवीनअशा नावांची मुले बरेचदा बायकी , मानेला लटके देत बोलणारी पाहिली आहेत .
महेश - मंगेश - वैभव - सतीशनावाची मुलं " भाउ " कॅटॅगरी मधली असतात .
राज - सिध्दार्थ - मेहुल - देव - ऋषभ - अमन - साहिल - वरुण - करण - कुणाल - रजत - निखिल - गौतम - अंकुर - अक्षय नावाची मुलं एकदम stylish and handsome असतात .
प्रशान्त , प्रमोद , संजय नावाची मुलं solid मवाली ..
अंजली - अपर्णा - जुई - अश्विनी , गौरी , सोनाली , सुप्रिया नावाच्या मुली friendly असतात .
चित्रा - शिल्पा - अनघा - मुग्धा - सुजाता - योगिनी - विद्या या सादाशिव पेठी मुली असतील असं वाटतं:-)
सखाराम , बहादुर , राजा नावाची माणसं फ़क्त driver च वाटतात .
अत्ता पर्यंत पाहिलेली राजन - बिपिन - विकास नावाची मुलं प्रचंड विनोदी , सॉलिड sense of humour असणारी पाहिली आहेत .
मिलिंद , मुकुंद , श्याम , घनश्याम , दिनकर , अरविंद , गजानन ही नावे मैत्रीणींच्या वडिलांची असतील असे वाटते .
सगळ्या बंगाली मुलींची नावं ऐकून सावळ्या पण बिपाषा सारख्या hot असतील असं वाटतं आणि सगळी बंगाली प्रौढ माणसं फ़ार विद्वान साहित्यिक असतील असं वाटतं !
:-)




Zakasrao
Tuesday, March 06, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि "सखी" ह्या नावावरुन काय वाटते>>>>>
मला तर फ़ार मस्त वाटत पण त्याचे फ़ुल मार्क व. पु. काळेंना. त्यानी लिहिलेली सखी वाचुन मला सर्व ह्या नावाच्या मुली अशाच असतील असे वाटते.
त्याच्या आधी सखु म्हणजे कुठल्यातरी खेडेगावातील नवुवारी पातळ नेसणार्‍या बाइचे नाव वाटायचे.
तेच सखी म्हणल की एकदम तरल अस काहितरी.........


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators