Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 02, 2007 « Previous Next »

Jdkulkarni
Thursday, March 01, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन काही मजेशीर उदाहरणे देता येतील. बळीराम बजरन्ग दांगट ह माणुस गणितात हुशार आहे आणी त्याला व्यायामाची चीड आहे. कसे वाटते? मोरेश्वर दत्तात्रय जोशी ह्यांचे मटन प्लेट हाऊस आहे. आणि राहुल शारंगपाणी ह्या पेन्शनरची कवळी हरवली आहे.

Maku
Thursday, March 01, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks zakki माझी बाजु घेतल्याबद्द्ल

आणि रोबिन्हूड तुम्ही माझ्यामते असे दिसता

उंच असाल. शरीर बारिक रंग काळा चेहरा उभट आणि चश्मा भिगांचा


Nandini2911
Thursday, March 01, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला नावाची व्यक्ती महा इब्लीस असेल.. याचे मित्र नक्की याला कायम बदडायचा चान्स शोधत असतील...
हे माझे निरिक्षण....
उगाचच विषयाला फ़ाटे फ़ोडणे हे याचे प्रमुख काम असावे.. याला भेटायला जाताना डोकेदुखीची गोळी घेऊनच जाणॅ इष्ट.. मुळात याला भेटावे का हा प्रश्न स्वत्:ला विचारावा. :-)


Saavat
Thursday, March 01, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या(यला) नंदिनी, मी पण हात धुवून घेतो...

माझ्या मते, 'च्यायला' नावाची व्यक्ती, शब्दात अडकलेली वाटते. बाष्कळ वाचन बरच असत पण "च्यायला! नक्की करायच काय?" या शब्दद्वंद्वात सापडलेली वाटते. 'उथळ पाण्याला खळखळाट फ़ार' यामूळे मुळ प्रतिमा झाकोळलेली वाटते. या पाण्यात कचरा रहातच नाही,पण 'खळखळ' आवाज जास्त!

यांनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी नाव न वापरता, रात्री पाण्यावर चालण्याचा सराव करावा....एका हातात दीवा धरावा, दुसरा डोक्यावर! डोळे मिटलेले आणि तोंडाने 'प्रतिमा-प्रतिमा' असा जप करावा...


Suvikask
Thursday, March 01, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझच घेतल तर नाकात चमकी घातलेल्या फुले वेचणार्या परकरी पोरीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी रहाते

तुझ्यासारख्या लिंबुटिंबूला परकरी पोरीच दिसणार!!!

अर्थातच "दिवे घ्या"





Jdkulkarni
Thursday, March 01, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्तापर्यंत पाहिलेली मन्दार नावाची मुले गोरी, अव्हेरेज हाईट ची, स्मार्ट आणी मुलींमध्ये लोकप्रिय असतात.

Mandard
Thursday, March 01, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयंत कुलकर्णी धन्यवाद मंदार

Nkashi
Thursday, March 01, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry , मंदार या नावाबद्दल माझ मत वेगळ आहे.
हि मुल बहुदा थोडी सावळी, निवांत काम करणारी Kind of आळशी अशी असतात... (no offense)
:-)

Bee
Thursday, March 01, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नावावरुन मी कसा आहे ह्याचा अंदाज येतो का कुणाला इथे :-) 'बी' ह्या नावावरुन नाही तर ज्यांना माझे नाव इथे माहिती आहे त्यांना मी विचारत आहे.

Shonoo
Thursday, March 01, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंगापूर मराठी मंडळाच्या साइटवर फोटो आहेत की

Lalitas
Thursday, March 01, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्या फोटोतल्या मंडळीत "बी" ही व्यक्ती कशी ओळखायची?

Chyayla
Thursday, March 01, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी आणी सावट तुम्ही माझाशी पन्गा घेतलास , जवाब मिळेन्गा बरोब्बर मिळेन्गा.

या BB वर ज्यान्नी आतापर्यन्त भेट दीली त्यान्च्याबद्दल मला काय वाटत.

झक्की- मानेला झटके देउन नेहमी झटका आल्या सारखे छ्या.. छ्या.. हटकेश्वर.. हटकेश्वर असे काही म्हणत असतील पण बोवाजी साधे सरळ व मिश्किल आहेत. कधी उगाच कोणाच्या खोड्या करतील तर कधी टवाळक्या, हुडाने त्याना "खवट्या महान्काळ" ही पदवी दीलेली आहेच.

रॉबीनहुडा- आता झक्कीन्च नाव निघाल तर रॉबीनहुड कसा विसरणार.

रॉबीन्हुड नावाप्रमाणे तेही दुसर्यान्च्या पोस्टवर डाका टाकताना दीसतात. मुद्दा लिहिण्यापेक्षा मस्त पैकी तन्गड्या खेचुन शेरेबाजी करण्यात वस्ताद आहेत. (ओर्कुटवर गर्दभराजाचे चित्र लावले आहे) पण नेमक कळत नाही कशी दीसत असेल. पण त्यान्नी केलेल्या कोट्या वाचुन खरच ह. ह. पु. वा. होतेच. मस्त बिलन्दर वाटते ही व्यक्ती.

लिम्बुटिम्बु- अस्सल पुणेरी नमुना आता कुणी पुणे आयकॉन म्हणुन उदात्तीकरण करुन घेउ नका... कारण माझ्या पाहण्यात काही सौज्वळ पुणेकरही आलेत. यान्च म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान अस काही तर वाटत, सुचेतानी केलेल्या वर्णनाशी सहमत... फ़क्त शेवटचे असे नाही काढले तर.

सुचेता म्हटल तर साधी सरळ दोन वेण्या घातलेली बाकी लिम्बु टिम्बुनी छान वर्णन केलेच आहे एकदम पटल म्हणायच ते परकर वाली मुलगी.

जयन्त- ही व्यक्ति मला एकदम सुटाबुटात वावरणारि अदबशीर पणे बोलणारी म्हणजे एकन्दरीत व्यावसायिक वाटते ( Professional ).

मकु- ईशिकाचा हा आयडी "मकु" वाचला की माझ्या समोर मेक्सिकन व्यक्ती उभी रहाते आम्ही त्याना नेहमी मक्कु म्हणतो. बाकी ईशिका हे नाव एखाद्या बॉलीवुड मधुन आल्या सारखी वाटते. बॉय कट, जीन्स, फ़्याशन वैगेरे आलेच.

मैत्रेयी नावाप्रमाणे ज्ञानवन्त, प्रज्ञावन्त पण विनयशील, समजुतदारपणे हळु बोलणारी पण दीलखुलास.

सन्दीप माझ्या पहाण्यात सन्दीप नावाची व्यक्ती ही कायम अभिमानी अशीच आली आहे, सोबत काही कलाकार पण.

केदार एक समन्जस, गोरा, मजबुत बान्धा, गुबगुबीत गाल आणी हुषार असेच केदार मला भेटले आहेत.

मनिषा लिमये साधी सरळ मध्यम उन्चीची मनसोक्त खळखळुन हसणारी. भावगिते म्हणणारी माझ्या पहाण्यात तरी अशीच मनिषा आली आहे. त्यामुळे माझ्या मनात चान्गलीच प्रतिमा आहे. त्यातल्या त्यात लिमये म्हणजे अगदी गायच असतात.

मन्दार या व्यक्तिबद्दल मी जयन्तच्या मताशी सहमत.

निलाम्बरी या व्यक्तिबद्दल मला काहीच अन्दाज येत नाहिये. मला मुकाट्याने माफ़ करशील ह.

शोनू तोन्डाचा चम्बु करुन लडीवाळ पणे बोलणारी वरुन "आम्ही नाही जा... " असे तोर्यात म्हणणारी.

लालितास खर सान्गु माझ्या समोर ना एखादी तम्बोरा घेउन मोठ्ठा आSSS करुन गाणारी अशी काही तरी प्रतिमा निर्माण होतेय तर दुसरी कडे "जय ललिता".

शेवटी आता या दोघान्ना बदडतो....

नन्दिनी खर म्हणजे एखाद्या सुरेख राजकुमारीच्या नावा सारख वाटत. पण तीचे पोस्ट पाहुन कधी कुणाला शिन्गावर घेईल सान्गता येत नाही, नन्दी म्हणजे बैल तर नन्दीनी म्हणजे बैलीण होउ शकते ना?. पण ही पोरगी म्हणजे भन्नाट आहे खर ईब्लिस, वेन्धळेपणाचे आणी गुलमोहोर मधले किस्से वाचुन तरी असच वाटत... मला भेटताना डोकेदुखीच औषध काय... माझ्या कडे पाहुन माझे मित्र मला बदडायला नाही धजत म्हटल सान्गुन ठेवतो. उगीच हात, पाय मोडले म्हणजे.

सावट हे देवा माझ्या लिखाणावर हे कोणत सावट आलय रे? उथळ पाण्याला खळखळाट काय... आणी बाष्कळ वाचन काय... अरेच्या मी तुमची पोस्ट वाचणे म्हणजे बाष्कळ वाचन होते माहीत नव्हते अरे देवा.. देवा काय हे? हेची फ़ळ काय मम तपाला. आणी मी त्या प्रतिमाच नाव घेउन का चालु माझ काही लफ़ड नाही हो सान्गुन ठेवतो.
सावट मी दीवा घेतला थोडासा चटका बसला. आता तुमची पाळी. बाकी तुमच्या सोबत चर्चा करुन मजा आली. मग घेताय ना दीवा


Manuswini
Friday, March 02, 2007 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे interesting आहे.
मला कायम मंदर नावाची मुले लबाड असतात असा अनुभव आहे.

माझे दोन्ही मित्र अतीशय लबाड category होते.



Nandini2911
Friday, March 02, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, कुणाचे हात पाय मोडले म्हणजे?
तुझे की तुझ्या मित्राचे?
आणि नंदिनीचा अर्थ होतो "मुलगी" जी जन्मल्यानंतर घरात आनंद घेऊन येते ती. आणी दुसरा अर्थ होतो पार्वती.. समझा क्या?


Dineshvs
Friday, March 02, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजेशीर आहेत कल्पना,
पण मायबोलीकरांच्या लेखनातुन निर्माण होणारी प्रतिमा, आणि ती व्यक्ती, यांच्या रंगरुपात मला नेहमीच प्रचंड विरोधाभास आढळला.
माझ्याहि दिसण्याबाबत लोकांचे हेच मत आहे.


Zakasrao
Friday, March 02, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला तु पण ना यार. अरे office मधे असे उगीच एकट हसताना बघुन लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर ना. बाकी नंदिनी एकदम भन्नाट मुलगी वाटते ते तिच्या आजपर्यंतच्या post वरुन. ती एक तरुण आणि जबरदस्त आत्मविश्वास असलेली मुलगी वाटते. थोडी इब्लिसदेखिल आहे.
अर्थातच हे आजपर्यंतच्या post वरुन
मकु एकदम तरुण आणी modern मुलगी वाटते.
च्यायला हा एक अत्यन्त महाइब्लिस असा मनुश्य आहे.
रॉबिनहूड म्हणजे एकदम हातामधे धनुष्यबाण घेवुन कोणावर तरी नेम धरुन बसलेला शिकारी आणी त्याचे नेम अचुक असतात.
झक्कि म्हणजे रॉबिनहूडचे आवडते व्यक्ती त्याशिवाय त्याना करमत नाही.
मनिषा लिमये एक साधी सरळ प्रेमळ ग्रुहिणी
लिम्बु म्हणजे एक इब्लिस लहाण मुल. पण गरजेच्या वेळी मदत करणार, आणी बिलकुल हार न पत्करणार
दिनेशदा एक प्रेमळ व्यक्तीमत्व
बाकीच्याविषयी काही लिहिता येत नाही पण एक चाफ़ा राहिला तो तर इब्लिससम्राट ह्या पदवीचा मानकरी
सर्वानी दिवे घ्या. हे सर्व तुमच्या आज पर्यंत वाचलेल्या post वरुन लिहले आहे.





Ajjuka
Friday, March 02, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे अजिबात नाही.. दिनेशव्हीएस.. ह्या नावातून एक साधा माणूस असावात असंच वाटतं.. म्हणजे दिसायला साधा. :-)
आणि तसे दिसायला साधेच आहात तुम्ही..
बाकी मंदार नावाच्या मुलांमधे कधीही मला कुठल्या special characteristics आढळल्या नाहीत. सध्या एक अपवाद भेटलाय. नाहीतर बाकी सगळे चौकोन.
तसं समीर नावाची मुलं.. महाटवाळ च सापडली आहेत.. उदाहरण आपलाच समऱ्या आणि अपवाद आपला SVS. तो संतजातीत येतो. :-)


Bee
Friday, March 02, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दिपाली ह्या नावाबद्दल नेहमीच असा अनुभव आहे की ह्या नावाच्या व्यक्ती मित्रांमधे खूप प्रसिद्धा आणि त्यांना आवडीच्या असतात. खूप प्रेमळ आणि शालीन असतात.

स्वाती नावाची प्रत्येक मुलगी मी अति बुद्धीमान बघितली आहे. त्यांचा जीवनाप्रतीचा दृष्टीकोण खूप निराळा असतो. त्या खूप गुणी असतात.


प्लीज माझ्या नावाबद्दल सांगा :-) मग मी त्यांच्या नावाविषयी सांगण्याचा प्रयास करीन :-)


Limbutimbu
Friday, March 02, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, तुझ्याविषयी काय सान्गायचे???? मी तर तुझे चित्रच नव्हते का काढले????
च्यायला, झकास आणि इतर सर्व...... चालुद्या! मज्जा हे! फक्त थोड जपुन! :-)
अज्जुका, बाकी सगळे चौकोन...... पटेश!
अज्जुका हे नाव प्रथम जेव्हा वाचले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एका खवचट, तिरकस घार्‍या गोर्‍या हट्टी तरुणीचे चित्र उभे राहिले होते! DDD


Jdkulkarni
Friday, March 02, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव म्हणजे एकदम पद्धतशीर मुंडासे बांधून निवडणूक प्रचारला निघलेला गावचा पाटील. बी म्हणजे शान्त सरळ व्यक्तीमत्व वाटते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators