Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मराठी लोकांचे हिन्दी » Archive through February 19, 2007 « Previous Next »

Vinaydesai
Wednesday, October 18, 2006 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजचा किस्सा. Zee News वर बाळासाहेबांचे विचार...

'किसीने राज के कान फुंके है....'


Asami_asami
Thursday, October 19, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश,
दोन देऊ का?:-) हे खरचं खुप सही होते. Office मधे हे वाचून मी इतका हसलो की बाजूचा japanese माझ्याकडे बघायला लागला. आता त्याला काय सांगू की मी का हसलो ते.
अफ़सोस त्याला हा विनोद enjoy नाही करता येणार:-)


Nilam1211
Thursday, October 19, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yogesh..great.
2 min me vichar karat hoti..ase kya tu lihile aahes...nantar tube petali..mag itki hasali na ki vicharu nako...

Yogesh_damle
Friday, October 20, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीसाठी घरी आल्यावर आईला मायबोलीचं हे पान दाखवलं. गतस्मृती उजळल्याने आईसुद्धा भरपूर हसली, तिची (तेव्हांची)मराठी 'ई'वेशीवर टांगल्यामुळे थोडी उखडली, आणि सांगू लागली, "हे तरी बरं होतं, नाहीतर तुझा आत्याने मला फरक शिकवला- 'अगं चहातनं वाफ येते, 'धूर' येत नाही! आणि गॅस 'पेटवायचा' असतो, त्याला 'आग लावयाची नसते'!'" :-)

चला, 'मराठी लोकांच्या हिंदी' कडे परत वळूयात... हे एक नवं रत्न...
"मैं पानी में शिरा और पोहा!" :-)

खरंतर ह्या धर्तीवर एक नवा विषय सुरू करता येईल. 'अमराठी लोकांचं मराठी'! काॅलेज मध्ये आणि मुंबईतल्या इंडस्ट्रीत 'बाहेरून आलेल्यांची' काही कमी नाही! :-)


Chyayla
Friday, October 20, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ऑफ़िस मधला एक सोबती

अपुन कल सुबह Morning मे जायेन्गे
साला बस मे मुझे Standing मे खडा हो के आना पडा


Dineshvs
Saturday, October 21, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची शेजारीण कुर्गी होती. मराठी बोलायची खुप हौस. तसे बरेचसे बरोबर बोलायची, पण क्रियापदात मार खायची. जिथे नेमके क्रियापद सुचणार नाही तिथे लावणे हेच क्रियापद वापरायची.
टिव्ही लावते, कुकरमधे डाळभात लावते एवढे ठिक.
पण मिक्सरला चटणी लावते, अंगाला साडी लावते, पोरीला झोपेला लावते ईथपर्यंत मजल जायची.
कहर म्हणजे कुत्र्यांबाबत पण हेच क्रियापद (!!!) वापरायची, सॉरी लावायची.


Rajeshad
Saturday, January 06, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी रेडीओवर काॅमेंट्री ऐकायचो तेव्हाची गोष्ट. माझं हिंदी मुळातच कच्चं. मधेच काहीतरी आरडाओरडा व्हायचा व सुशिल दोशी म्हणायचा "बाल बाल बचे". ते मला निट न समजल्याने "बार बार बच्चे हुए" असं वाटायचं व "बार बार बच्चे होना" हा एक हिंदी वाकप्रचार आहे असं वाटायचं. तसच बरेच दिवस तनहाई म्हणजे "तान्ही मुलं" असा माझा समज होता.

Vipasak
Wednesday, January 10, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Once my boss's car broke down near his house. He reached office by walking.

He told us,
Meri gaadi ka breakdown ho gaya isiliye main "Panv Panv" aaya.

This is my first posting on maayboli and trying to learn how to write in Devnagari.

Vipasak

Sheshhnag
Wednesday, January 10, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

``ऐ यार, क्या बताऊ यार, कल मै और इसाक एक चाय मे आधा बटरा डुबा, डुबा के खाया, फिर भी उर्‍याच.''

Shendenaxatra
Wednesday, January 10, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा रेल्वेने एक मराठी गृहस्थ प्रवास करत होते. एक सरदारजी आपले पोते घेऊन त्याच डब्यात चढला. त्याचे स्टेशन आले तेव्हा त्याला झोप लागली होती म्हणून गडबडीत उतरला आणि पोते घ्यायचे विसरला. हे मराठी गृहस्थ त्याला म्हणतात, "सरदारजी तुम्हारा पोता रह गया". सरदारजी बुचकळ्यात. "पोता? मेरी तो शादी भी नही हुई. ये पोता कहासे पैदा हुआ?" आता मराठी गृहस्थ बुचकळ्यात. "पोत्याचा आणि लग्नाचा काय संबंध असावा?"

Swapnil_deshi
Saturday, January 27, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मित्राच्या शेजारच्या काकु एकदा सकाळी सकाळी त्यांच्या मुस्लिम शेजारणीला सांगत होत्या..."थंडी मे आंग पे भोत काटा आता है ना!"

Expresshighway
Thursday, February 01, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या काकूने एकदा एका दुकानदाराला हिन्दीत विचारले "वो बरनी का झाकन (बरणीचे झाकण) कितने को दिया?"

Nalini
Thursday, February 01, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहूत असे लिहिलेले असले तरी बोलताना / वाचताना बहोत असे म्हटले जाते. पण होते काय की बरेच जण वाचाताना बहूत असे वाचतात किंवा लिहिताना बहोत असे लिहितात.
चू. भू. द्या घ्या.


Vinaydesai
Thursday, February 01, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यह (ये) आणि वह (वो) च्या बाबतीत पण असाच घोटाळा... बहुतेक हिंदी शिकवणारे मराठी मास्तर 'यह' असाच उच्चार करायचे..


Bee
Friday, February 02, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विदर्भातील लोकांचे हिंदी हे त्यांच्या मराठीपेक्षा अधिक चांगले असते. म्हणजे बहुतेकांचे तरी..

Yogesh_damle
Friday, February 02, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee! खरंय अगदी!! वैदर्भीय मराठी म्हणजे, "बंदर दिवालावरून कुदलं!" म्हणायला मराठी पण... :-)

Tivlyabavlya
Friday, February 16, 2007 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वडिलां कडचे सर्व नातेवाईक भोपाळ्-ईँदोर कडचे.... आम्ही हिन्दी बोलतो तेन्व्हा ते आमची खिल्ली उडवतात आणि ते मराठी बोलतात आम्ही त्यांची... काही नमुने त्यांच्या मराठीचे....
-- खुप दिवसानी भेट्ल्यावर "तु किती दुबळा (बारिक) झाला आहेस रे ??"

--- मी तुझ्या आईशी शिकायत करून देईन (म्हनजे तुझ्या आईला सांगेन)

--- हे सर्व सामान घरीच धाडुन देउ

:-)


Sachinbhide
Friday, February 16, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maza mitra amit, tyala hindi bolaychi far khaj. ekda to kalyanatalyach tahasildar kacherit gela. baher basalelya shipayala tyane vicharla, "Woh Dicholkar madam kaha basti hein? Mereku unko bhetna hein". Hyavar to shipaai shantapane mhanala,"He samorcha cabin Dicholkar madamcha aahe". Mhatala, chala... tya shipayala pan kalala ki ha manus marathi aahe te... hahahaha!!!!

Sanghamitra
Monday, February 19, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिन मराठीत का नाही लिहीत बाळ? सोप्पं आहे खूप.जरा प्रयत्न करा.
नाहीतरी हापिसात काऽऽऽही काम नसतेच.


Sachinbhide
Monday, February 19, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर झाल सान्गितलस ते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators