Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 21, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through February 21, 2007 « Previous Next »

Gajanandesai
Tuesday, February 20, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबब! ४५ किलोमीटर? हा खरेच वेंधळेपणा झाला. :-)

Sachinbhide
Tuesday, February 20, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेन्धळेपणा आणि गाढवपणा ह्यात फ़ार फ़रक असतो का?? मी ६ वी मधे अस्ताना English च्या ऐवजी ग़णिताचा अभ्यास करुन गेलो होतो. कारण मी वेळापत्रक तसेच लिहिले होते. हा हा हा, पास झालो, देवाची क्रुपा.

Sanghamitra
Tuesday, February 20, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो नक्षत्र इस्त्री केलेल्या बेदाण्यांचं पुढं काय केलंत? म्हणजे प्लॅन काय होता नक्की?

Chyayla
Tuesday, February 20, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सचिन तु पास झालास हा त्या देवाचाच वेन्धळेपणा असेल... खर म्हणजे त्या देवानीच ईथे पोस्टायला हवे होते... ही ही ही....

सन्घमित्रा त्या बेदाण्याला इस्त्री केले तर ती "बेदाणी" झाली असेल.


Lajo
Wednesday, February 21, 2007 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

{सन्घमित्रा त्या बेदाण्याला इस्त्री केले तर ती "बेदाणी" झाली असेल.}

chyayla , तुम्ही म्हणजे अगदी....

Zakasrao
Wednesday, February 21, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन ४५ नव्हे ४ ते ५ की.मी.
४५ लिहले हासुद्धा एक वेंधळेपणाच.


Nandini2911
Wednesday, February 21, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला... धमाल आली बरं का...
माझी एक मैत्रीण विंटर केअर लोशन समजून सन स्क्रीन लोशन रात्री लावून झोपायची.
दुसरी एक महाभाग घरातून जेव्हा पळून चालली होती तेव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या भलत्याच बाईकवाल्याच्या पाठी बसली आणि म्हणाली, "कोई देखने से पहले निकल पडो.." त्याने मागे वळून पाहिल्यावर इतकी घाबरली की सरळ घरात परत आली.
अजून एकीने निकाहनंतर बिदाईमधे धमाल उडवली होती.
एक तर डोक्यावर तो मोठा घुंघट आणि निघतानाची रडारड.. सगळ्या भावाच्या गळ्यात पडून रडून झाल्यावर विद्वान पोरगी नवर्याच्या गळ्यात पडून.."संभालके रहना" म्हणून रडायला लागली.
आधी प्रकार काय चाललाय तेच समजेना.. तो बिचारा इतका गडबडला.. सगळे हसायला लागल्यावर तिला समजले


Sanghamitra
Wednesday, February 21, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कोई देखने से पहले निकल पडो.."
नंदिनी कमाल आहे बाई तुझ्या मैत्रिणीची. मुव्हीमधला सीन झाला अगदी.
विंटर केअर लोशन समजून सन स्क्रीन लोशन रात्री लावून झोपायची.
यावरून एक आठवले.
माझ्या मैत्रिणीला कुणीतरी बनाना फ़ेस मास्क बद्दल सांगितले होते म्हणून चेहर्‍याला केळे फासून झोपली होती. आणि केळ्याच्या वासाने उंदीर चावला गालाला.


Gajanandesai
Wednesday, February 21, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.."संभालके रहना",
केळ्याच्या वासाने उंदीर चावला गालाला. <<<

काय काय घडत असतं या जगात. जाम हसलो बॉ आज!


Nandini2911
Wednesday, February 21, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि केळ्याच्या वासाने उंदीर चावला गालाला.
काय हे.. ऑफ़िसमधे एकटीच हसतेय ना :-)
सगळे बघतील म्हणून फ़ोन उचलून कानाला लावला आणि हसून घेतले..
परत ऑफ़िसमधे हा बीबी वाचणार नाही....


Nkashi
Wednesday, February 21, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छ्या.. हे post office मध्ये वाचणे म्हणजे मोठी रिस्क आहे...

आत्ताच मी फ़स्सSS करुन हसले आणि माझ्या शेजारचे दोघे माझ्याकडे बघायला लागले.. :-)


Sachinbhide
Wednesday, February 21, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण तुम्हा सगळ्यान्शी सहमत आहे. ह BB वाचण महा भयन्कर risky आहे. बर, सन्घमित्रे, पुढे त्य उन्दराच काय झाल?? नन्दिनी, मल तुझा किस्स जाम म्हणजे जाम आवडला..

Sanghamitra
Wednesday, February 21, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही नाही उंदीर दुसर्‍या दिवशी पण आला होता केळ्याच्या अपेक्षेने. पण त्या दिवशी काही हिने लावले नव्हते त्यामुळे चिडून पुन्हा चावला. :-)

Suvikask
Wednesday, February 21, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल आली वाचुन.... जगात वेंधळ्या माणसांची किती गरज आहे पहा.. सगळ्यांना ते हसत ठेवतात आपल्या करामतीने

Sheshhnag
Wednesday, February 21, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. पु. वा. धमाल. आज कमाल झाली.

Dinesh77
Wednesday, February 21, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसानंतर बनाना फ़ेस मास्कमुळे उंदराचा चेहरा गोरा झाला :-)

Nitinghorpade
Wednesday, February 21, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उंदिर भलताच रोमॅनटिक दिसतोय हा हा हा...........


Nitinghorpade
Wednesday, February 21, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि पहुने आशे आसतात कि जे घरि न यावे आस वटत
आणि त्यांच्या बरोबर च आस व्हाव
नेहमिचि उशिरा उठायचि सवय त्यात घरात ले सगळे गावि गेले होते
सकाळि ९.३० वजले होते आणि बेल वजलि वाट्ल दुध वाला भय्या आला बराच वेळाने हातात दुधाच पातेल घेउन दार उघड्ल आणि हातत्ल पतेल पुधे केल पण भय्या कहि दुध देत ( पतेल्यात ) नव्हता जोरात म्हट्ल जल्दि देदो भय्याजि
पण दुध कहि पतेल्यात दिल नहि डोळे निट चोळुन पहिले
चक्क तेच न आवडनारे पाहुने...........
रागा रागने पहात होते मझि झोपच उडालि
पहुण्यांना दुधवाला भय्या समजलो............
पन परिनाम आसा झाला कि त्यांनि सकाळि घरि येन सोडुन दिल.


Sunidhee
Wednesday, February 21, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्घमित्रा-नंदीनी, मस्त हसवलंत आज... उंदरानी तर कमाल केली... :-) गेल्या २ दिवसातले बाकी किस्से पण धमालच..

Zakki
Thursday, February 22, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'काल रातीला सपान पडलं अन् सपनात आला तुम्ही
नि गालावरती खुणा बघूनि आई म्हणाली काय घडले?'

तर आता सांगायला एक कारण मिळाले, गालावर खुणा का झाल्या!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators