Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 02, 2007

Hitguj » My Experience » माझा शब्दकोष » Archive through February 02, 2007 « Previous Next »

Athak
Wednesday, January 24, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाने लग्नप्रत्रिकेत MABF डिग्री लिहीली होती , संशोधनानंतर कळले Matric Appeared But Failed :-)

Zakasrao
Wednesday, January 24, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर चालत जायचे असेल तर 'टांगा' किंवा '११ नंम्बरची बस'
जर बसने जायचे असेल तर ' माझी १८ लाखांची गाडी येणार आहे'
सायकलला यामा किंवा होन्डा
एखाद्याला काहितरी खर्च करायला भाग पाडल्यास ' आंबा पाडला त्याला फाडला '



Zakasrao
Wednesday, January 24, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वडाप म्हणजे trax जीप यामधुन होणारी बेकायदेशीर वाहतुक
हा शब्द बाहेर कुठेच ऐकला नाही. हा शब्द वापरणारा आपला गाववाला आहे हे आम्ही ओळखत होतो.
तसेच,
नळ चावी,
electric pole = डांब हे काहि शब्द.


Dineshvs
Wednesday, January 24, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वडाप, हा शब्द मलाहि अनोखा वाटतो. त्याचे मूळ काय असावे ते कळत नाही. आणि तो फक्त मी कोल्हापुर भागातच ऐकला.


Nandini2911
Wednesday, January 24, 2007 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वाहतूकीचा मूळ उद्देश हा फ़क्त पाशिंजर ओढणे.. (वडणे) हा असतो..
त्यामुळे हा शब्द आला असावा.


Zakki
Wednesday, January 24, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्याला काहितरी खर्च करायला भाग पाडल्यास

काही ठिकाणि पूर्वी याला 'चड्डी बसली' असेहि म्हणत.

आमच्याकडे खीराचे गोदरेज आणाले आहे, असे भारतात म्हणत. इथेहि आम्ही सीअर्सचा हूवर आणला आहे असे म्हणत.


Zakasrao
Thursday, January 25, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही ठिकाणि पूर्वी याला 'चड्डी बसली' असेहि म्हणत >>>>>>>
आता पुण्यात ' त्याला कसा टाकला' असे म्हणतात

Sakhi_d
Thursday, January 25, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रविचित्र किंवा रंगीबेरंगी कपडे घालणा-याला
"रंगबिरंगा राजस्थान"
म्हणायचो



Robeenhood
Thursday, January 25, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रविचित्र किंवा रंगीबेरंगी कपडे घालणा-याला
>>>>पुण्यात त्याला खडकी दापोडी म्हणण्याची पद्धत आहे...

Robeenhood
Thursday, January 25, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर चालत जायचे असेल तर 'टांगा' किंवा '११ नंम्बरची बस'
>>>>त्याला कदमशेठचा टांगा म्हणतात...
तसेच' विनोबा एक्सप्रेसही म्हणतात


Runi
Saturday, January 27, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काॅलेज मध्ये असताना आमचे maths चे सर खुप जास्त homework द्यायचे आणि बर्‍याच वेळा वर्गातल्या मुलीच homework करायच्या, (मुलांना बहुदा cricket मुळे वेळ मिळायचा नाही) सरांनी विचारले मुलांना कि homework का नाही तर ते सांगायचे की सर आम्हाला ladymade उत्तर हवयं म्हणुन...... त्यामुळे मुलींनी कडुन काही आयते हवे असेल तर सगळेजण readymade च्या ऐवजी ladymade च म्हणत.
रुनि


Chyayla
Wednesday, January 31, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवरा शोधणार्या मुलीला PhD - Perfect Husband Discovery

तर बायको शोधणार्या मुलाना PWD - Perfect Wife Discovery
आता कृपया ज्या सुखी नवर्यान्ची बायको हरवली आहे तीला शोधणार्याला काय म्हणावे हे विचारु नये....


Deepanjali
Thursday, February 01, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात असताना ही term खूप वापरायचो .
ट्रॅजेडी होणे = ए . के . हंगल होणे
ए . के हंगल होण्याच्या perfect situations:
* हापुस अंब्याच्या पेटीतले बरेचसे आंबे नासके निघणे .( एका सिझन मधे आम्ही आणलेल्या लागोपाठ तीन अंब्यच्या पेट्यां मधे अनेक आंबे खराब झाल्याने मी आमच्या घराच्या nameplate खाली A.K. हंगल असे paint केले होते )
*फ़ोटोफ़ास्ट मधे photo आणायला गेल्यावर समजणे कि अख्खा रोल expose झाल्याने एकही फोटो आला नाही !
* चित्रहारला नेमके आवडते गाणे लागल्यावर light जाणे .
* आवडत्या सिनेमाच्या तिकिटां साठी रांगेत तासंतास उभे राहिल्यावर नेमका आपला नंबर जवळ येताच house full चा बोर्ड पहायला लागणे !
* सुट्टीच्या दिवशी केसांना तेल लावल्यामुळे चिपच्पीत केस असताना नेमके बाबांच्या एखाद्या चिकन्या student ने घरी येणे !
* चिपचिपीत तेल लाउन बसले असताना केस धुवायला गेल्यावर नेमके बेमुदत काळासाठी पाणी जाणे .
* एखाद्या special ठिकाणी जाण्या साठी dress ला इस्त्री करायला घेणे आणि नेमके light जाणे .




Zakki
Thursday, February 01, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली, ते ए. के. हनगल वारले म्हणे. तर आता तुम्ही केसांना चपचपित तेल लावून खुश्शाल बसा घरात! शिवाय इथे तर कुणि चिकणे लोक घरी आले तरी आता, त्यांच्यावर imp मारायची तुम्हाला गरज नाही, शिवाय शो. ना. हो.

Sia
Friday, February 02, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही कोणला खोकला झाला असेल आणी तो सतत खोकत असेल तर त्याचा अ.क. हन्गल झाला आहे अस म्हणतो.

Nandini2911
Friday, February 02, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कॉलेजात शिकलेले शब्द्:
कुणी हाइट्मधे कमी असल्यास्: टुबुक
चपटा नाकवाले: हकनाक
एकदम छोटे छोटे ड्रेस घालणारी मुलगी: बीचकन्या
फ़ार बडबडणारा: रेडिओ
प्रेमी युगुल्: सास बहु (?) वडापाव
दारु: दूध :-) पेट्रोल
दूध्: a glass of milk
फ़ारच पकाऊ प्रोफ़ेसर्: मम्मीजी
फ़टाकडी लेडी प्रोफ़ेसर्: रॉकस्टार.
मित्रमैत्रीणीचा ग्रूप्: gang
न पटणारी मुलगी: नाना पटेल
लाम्ब केस मोकळे सोडलेली मुलगी: भूत बहेनजी
कुणीगायक असल्यास्: सोनू निगम का जमाइ


आणि शेवटी बावळटसाठी हे समानार्थी शब्द्:
झम्पक. चम्पू, च्याम्प, बेवफ़ूफ़. पौव्वा, मन्दाकिनी, येडुराम, नल्ला, गधेडा, भैस का दुश्मन, भाइजान, ससुरजी, शाहरुख (?)


Mahesh
Friday, February 02, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, ए के हंगल खरच वारले की काय ?
केव्हा ? जर बातमी खरी असेल तर अरेरे...


Robeenhood
Friday, February 02, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली, ते ए. के. हनगल वारले म्हणे.>>>
बोवाजी ए. के. हंगल वारले याबद्दल खात्री आहे तुमची? माझ्या मते हंगल अजून आहेत. देव त्याना दीर्घायुष्य देवो!!

Deepanjali
Friday, February 02, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर आता तुम्ही केसांना चपचपित तेल लावून खुश्शाल बसा घरात! शिवाय इथे तर कुणि चिकणे लोक घरी आले तरी आता, त्यांच्यावर imp मारायची तुम्हाला गरज नाही, शिवाय शो. ना. हो.
<<<अहो झक्की किती ही असंबध्द वाक्ये !
आणि काय शो . ना . हो ?
तेल लावणे कि impression मारणे ?
बाकी RH म्हणतो ते शंका आली मलाही ... गेल्या वर्षी च्या पहेली मधे होते हंगल साहेब .. चुडीवाल्याच्या रोल मधे !



Limbutimbu
Friday, February 02, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> <<<अहो झक्की किती ही असंबध्द वाक्ये !
दीपा, मग काय होणार? व्यसनाच्या बीबीवर मोजून मापुन आतशेर पावशेर नवटाकचे डोस देताना, हा झाला अर्धा, हा पुर्ण, हे १३..... ओळीऽऽने एकापाठोपाठ! मग असच व्हायच ना?
जर्रा आपणच समजुन घ्यायच ना!!!
ddd

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators