Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 15, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through December 15, 2006 « Previous Next »

Nandini2911
Wednesday, November 29, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझी दप्तर शाळेतच विसरले होते (इयता नववी)

Jhuluuk
Wednesday, November 29, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सगळ्या विसरभोळेपणाच्या गोष्टी चालल्यात वाटतं.
मी कालच ऑफ़िस मध्ये स्वेटर विसरले :-(
नशिब परत मिळाला ते !!
तरी माझा कलिगला चेष्टा केल्याशिवाय रहावले नाही, म्हणाला "कामवाली कडे दिसला, तिला सांगुन ठेवुन घेतला." :-)


Rahul16
Wednesday, November 29, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीट्स, पीलानी, ला वार्षिक परिक्षा ३५ मार्काची असते. त्यातील एका पेपर मधे ७ मार्काच्या थेअरी प्रश्नाचे उत्तर म्हणून एक दुसर्याच प्रश्नाचे उत्तर लिहिले ( बरोबर उत्तर येत असुन) . ३ तासाचा पेपर या प्रश्नाचे उत्तर लिहायला दिड तास लागला.

आणी तसाच पेपर देउन बाहेर आलो. संध्याकाळी मित्र म्हनाले काय सोपा पेपर होता, आणी ७ मार्कान्चा प्रश्न काय सोप होता. त्यावेली माझी ट्युब लागली.

आणी पोटात उठलेला गोळा मला अजुन आठवतो. एक पाठोपठ २-३ उल्ट्या झाल्या. मित्र विचारत होते काय झाले. पण मी केलेला मुर्खपणा त्यांना सांगता पण येत नव्हता.

अजुनही ति गोष्ट आठवली कि खुप वाईट वाटते. बी ग्रेड ची सी ग्रेड झाली होती.


Nandini2911
Wednesday, November 29, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, तुला चुकीची उत्तरे दिल्यावर उलट्या होतात. कठीण आहे बाबा

Rajeshad
Saturday, December 02, 2006 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी १२वीत होतो तेव्हाचा हा वेंधळेपणा कम इब्लिसपणा (ज्यादा). सुट्टीत काकाकडे ग्वाल्हेरला गेलो होतो. त्याच वेळेस काकू मुलींना घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे काकाला नेहमीपेक्षा जास्त वेळ देता यायचा माझ्यासाठी. दर सुट्टीत काहीना काही शिकावं असं मी ठरवायचो. यावेळेस काकाकडे स्कुटर शिकायचीच असं त्याला न विचारता परस्पर ठरवलेलं होतं. पण तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की स्कुटर शिकण्याच्या मानाने माझं वय बरच जास्तं आहे. तिथे बहुतेक सर्वांकडे २ व्हिलर्स असल्याने लोक ७-८वीतच या गोष्टी शिकलेल्या असतात. डोंबिवलीत तशी संधी न मिळाल्याने माझी मजल सायकल पर्यंतच गेली होती. त्यामुळे ओशाळुन मी स्कुटर शिकण्याची माझी इच्छा काकाकडे काही व्यक्त केली नाही. त्याऐवजी त्याच्या मागे बसुन तो स्कुटर कशी चालवतो आहे हे फक्त नीट न्याहाळणं चालू ठेवलं. सायकल मुळे बॅलन्स प्रकार माहीत होता. त्यामुळे गिअर क्लच ब्रेक या गोष्टी कशा वापरायच्या हे समजलं तर स्कुटर चालवणं फारसं कठिण नसावं असं मला वाटलं. पण m.p. च्या रहदारीमधे चालवण्याचं काही धाडस होत नव्हतं. व पहिल्यांदा चालवताना मागे कोणी बसलेलं असेल तर बर होईल असा विचार करुन मी एकट्याने त्याची स्कुटर चालवण्याचा प्रयत्न केला नाही.
एकदा काका व मी मुंबई-आग्रा हमरस्त्याजवळील एका मंदीरात गेलो. दर्शन घेऊन निघायला काकाने स्कुटर चालू केली व मला ती स्कुटर चालवून बघायची अनावर इच्छा झाली. "मी चालवू का?" असं मी त्याला विचारलं. माझं वय पाहून मला स्कुटर चालवणं येत नसेल असं त्याला वाटलं नाही. "नीट येते नं" एवढच त्याने मला विचारलं. सुदैवाने (का दुर्देवाने) मला स्कुटर येत नाही हे त्याला कुणाकडुनही कळलं नव्हतं. "हो!" असं छाती ठोकून मी त्याला उत्तर दिलं. डोंबिवलीला मित्राची चालवतो अशी थापही मारली. पाण्यात पडल्यावर पोहता येतं तसं स्कुटरवर बसलं की स्कुटरही येईल असा विचार करून मी पुढे बसलो. न्युट्रल मधुन पहिल्या गिअर मधे टाकताना accelerator वाढवल्याने जो काही आवाज झाला तो ऐकुनच काकाला थोडी शंका आली असावी पण मी लाडका पुतण्या असल्याने बिचारा मागे गप्प बसुन राहीला. त्या आवाजाने माझीही थोडी टरकलीच व त्यामुळे पहिल्याच गिअरमधे मी स्कुटर हायवेपर्यंत ढकलली. आता पुढची गिअर्स टाकण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आधीचा आवाज accelerator खुप दिल्याने झाला आहे हे मला कळलं होतं. त्यामुळे यावेळेस गिअर बदलताना accelerator अगदी कमीवर आणायचं असं ठरवलं पण टेन्शनमुळे क्लच टाकुन गिअर बदलला व तेव्हाच accelerator चुकुन उलट्या दिशेने पुर्णपणे फिरवला. विचारता काय, स्कुटर ४५ च्या अँगलमधे फक्त मागच्या चाकावर त्या हायवेवर भरधाव सुटली. पुढचे चाक हवेतच! काका मागुन "राजेश राजेश, बाजुला घे बाजुला घे" असं ओरडायला लागला. मी घाबरुन जोराने ब्रेक दाबला तशी ती स्कुटर परत जमीनीवर आली. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती व फार काही घडामोडी न करता मी स्कुटर रस्त्याच्या बाजुला आणून थांबवली. काहीही न बोलता काकाने माझ्या हातुन किल्ली घेतली व मला मागे बसवून घरी आणलं. घडलेल्या प्रकाराचा घरात कधीच उल्लेख झाला नाही व मी ही ग्वाल्हेरला स्कुटर शिकण्याचा बेत सोडून सुट्टीत दुसरे काही शिकता येइल का याच्या शोधात लागलो.

Dinesh77
Sunday, December 03, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बायकोच्या मैत्रिणीचा किस्सा आहे. त्या काॅलेजमधे असताना कोल्हापुरला एका exhibition ला जाणार होत्या. त्यासाठी मुलांनी सगळ्यांचा मिळून १ च डीडी काढला होता.
मुलांनी तो सगळ्या मुलींना दाखवला. आणि डीडीच्या
amount वर १ सेलोटेप लावलेला असतो.तो पाहून माझ्या बायकोची १ मैत्रीण जोरात ओरडली............... हा डीडी फ़ाटलाय का????????


Chyayla
Thursday, December 07, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा अभ्यास करताना माझ्या बहिणीनी अचानक सगळ्याना कोड्यात टाकले होते... BTW तुम्ही सान्गु शकता का याचे उत्तर. ? दादा... हे एम ओ टी एच ई आर... मॉथर म्हणजे काय? मी पण ५ मिनट डोक खाजवत विचारच करत बसलो आणी मग लक्षात आल्यावर कप्पाळावर हात मारला... तेन्व्हा ती लहान होती म्हणा. पण हा किस्सा आठवुन आम्ही तीला अजुनही चिडवतो.

Aaftaab
Thursday, December 07, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा बोस्टनच्या दक्षिणेकडून फ़्रेमिंगहमच्या मंदिराकडे जाताना Mass turnpike जवळ एक exit चुकलो अणि अगदी थोडाच पुढे गेलो.
मी काय केलं? freeway वर छोटा U टर्न घेतला आणि पुन्हा बरोबर exit ला लागलो!! हे एक मिनिटाच्या आतच झालं.. मागून येणार्‍या गाड्यांची हे कृत्य पाहून वाट लागली.. नशीब कुठल्या गाडीने उडवले नाही..


Jhuluuk
Thursday, December 14, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय, या BB वर कुणीच नाही
सगळे सोडुन फक्त मीच वेंधळेपणा करते की काय??

हा मी मागच्या आठवड्यात केलेला वेंधळेपणा
आई बरोबर ATM मध्ये गेले होते आणि अचानक पणे PIN विसरले :-(
वेग्-वेगळी combinations try करुन पाहिली. शेवटी लॉक झाले कार्ड.
हात हलवत परत यावे लागले.

आणि पुन्हा आज मला आठवले की, मी जुना पासवर्ड टाकत होते.. पण आता काय उपयोग? :-(
बंकेत जाउन निस्तरणे आले.... :-(


Sakhi_d
Thursday, December 14, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रोज डोंबिवलीहून ठाकुर्लीला down करायची.
जाताना गणपती मंदिर लागाते, रोज नमस्कार करायची.
एकदा चुकुन मी नमस्काराऐवजी अच्छा केले गणपतीला :-)


Nandini2911
Thursday, December 14, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या रविवारी shopping ला गेले होते. बर्‍यापैकी दुकानं लुटली. payment च्या रांगेत बिल झाल्यावर त्याला कार्ड दिलं.

' mam , ये नही चलेगा.." इति सेल्समन...
अरे क्यु नही चलेगा. डेबिट कार्ड तो कही पे भी चलता है.."
" yes mam, पर ये डेबिट कार्ड नही... आपका pan card है...."


Kiru
Thursday, December 14, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
इथे लिहिता यावं म्हणून सगळे अगदी ठरऊन वेंधळेपणा करताहेत की काय? (ए.भा.प्र.)


>>>>>> एकदा चुकुन मी नमस्काराऐवजी अच्छा केलं गणपतीला...

उद्या इथे त्या गजाननाची post असेल..
'मी चुकुन नमस्कार केला सखीला.'
दिवा घे गं सखी...


Supermom
Thursday, December 14, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज खूप दिवसांनी या बी बी वर आले अन मनापासून हसले.
मी लहान असतानाचा किस्सा आहे. अकोल्याला काकूकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो होतो. सिनेमे, खाणेपिणे,खेळ यांची नुसती धमाल असायची.काका काकू आंब्यांचे खूप प्रकार आणत. रोजच्या जेवणात आंब्याचा रस असेच.

असेच एक दिवस मी, चुलतभाऊ अन दोघी चुलतबहिणी दुपारी सिनेमा बघून आलो. काकू व्हरांड्यात भरतकाम करत बसली होती. तिने तिथूनच आवाज दिला, "टेबलावर कैरीचं पन्हं ठेवलय. सगळ्यांनी घ्या." मी त्यातल्यात्यात मोठी. मारे कपाटातून नक्षीचे ग्लास काढून सार्‍या भावंडाना दिले अन स्वत देखील घेतलं. वर बर्फ़ टाकून दिला. आज काकूच्या हातून भांडं उघडं राहिलं वाटतं असही पुटपुटले.
एका घोटातच जाणवलं की आंब्याचा वास आहे पण चव नाही.तरी तसंच संपवलं. भाऊ बिचारा माझ्याहून एक वर्षाने लहान.तो सारखा कुरकुरत होता,' ताई कसंतरीच लागतय ग.'
काकू बाहेरून ओरडली, 'त्या पोरींनी मुकाट्याने घेतलं अन तुझेच का रे नखरे? पी चुपचाप.'

थोड्या वेळाने काकू घरात आली.बघते तर पन्ह्याचं झाकलेलं भांडं तसंच.
'अरे. पन्हं नाही का घेतलत?'
मग उलगडा झाला. आम्ही सकाळचं आंबे धुतलेलं पाणी काकू फ़ेकायचं विसरली होती तेच प्यायलो होतो.
अजूनही भेटलो की सारी भावंडं जाम हसतो.


Nandini2911
Friday, December 15, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरू,,, ठरवून केला की तो इब्लिसपणा होतो.. त्या बी बी वर वाच... आम्ही आहोत तेथेही.... इथे तरी मी सर्व किसे नाही लिहिलेयत.. वेंधळेपणा करते आणि विसरते की काय गडबड केली ती...मग अधे मधे कधी आठवलं की लिहिते :-)

Giriraj
Friday, December 15, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा खुपदा घडणारा प्रकार...

मोबाईलला hands-free लावलेले असतांना मोबाईल्ल कानाला लावून हॅलो हॅलो करत राहिल्याने मला आणि पर्यायाने BSNL लाही शिव्या बसल्या आहेत


Kiru
Friday, December 15, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या, अगदी.. अगदी.... .. ..

Himscool
Friday, December 15, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्राचे घर पाचव्या मजल्यावर आहे... त्यामुळे लिफ्ट असणे ओघानेच आले... तर मी त्याच्या घरून परत येताना लिफ्ट मध्ये शिरलो... तोही बरोबर होताच... आणि शांतपणे ५ नंबरचे बटण दाबून लिफ्ट खाली कधी जाते याची वाट बघत बसलो... परत एकदा तेच केले.. तसे करताना मित्रानी बघितले आणि तो माझ्यावर किंचाळला... "अरे हिम्या आपल्याला खाली जायचे आहे आणि तू पाचव्या मजल्यावर असलेल्या लिफ्ट मध्ये परत ५ नंबरचे बटण काय प्रेस करतो आहेस. ग्राऊंडचे बटण प्रेस कर की..."

Rupali_rahul
Friday, December 15, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>एकदा चुकुन मी नमस्काराऐवजी अच्छा केले गणपतीला <<< मी दादरला प्लॅटफ़ॉर्म नंबर १ वरच्या मारुतीला नेहमी नमस्कार करायचे. एकद देउळ समजुन दादरच्या इंडीकेटरलाच नमस्कार केला होता... मैत्रिणीने विचारले हे काय करतेस??? तेव्हा लक्षात आले…


Jhuluuk
Friday, December 15, 2006 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>एकदा चुकुन मी नमस्काराऐवजी अच्छा केले गणपतीला
हा हा हा

hims gr888


Pillu
Friday, December 15, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
निशिदिनी तुला नमस्कार केला पहिजे प्यान कार्ड हा हा हा पु वा.ला. ( हे प्यान कसे लिहायचे ते सांगा रे जरा)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators