Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 29, 2006

Hitguj » My Experience » Typical Lok » Archive through November 29, 2006 « Previous Next »

Chyayla
Tuesday, November 28, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारे तुम्ही वैदर्भियान्ची पण फ़िरकि घेत आहात मी पण खिलाडु पणेच घेउन राहिलो आहे....

मला हे मान्य आहे आम्ही वैदर्भिय असे बोलतो पण का ते पण ईथे सन्गितले आहे. मला पण कोकणस्थान्चा एक मुद्दा काढायचा आहे. आणी हो कोकणस्थ म्हणजे केवळ ब्राह्मण नव्हेत (उगाच गैर्समज) मी एकदा लहानपणी एका कोकणस्थाकडे जेवायला गेलो तर समोर अगदी नीट मोजुन ३ पोळ्या, छोटासा भात, भाजी, निवडक भजी मी जेवायचा खुप प्रयत्न केला पण अगाउपणे मला अजुन द्या असे म्हणायचा भिडस्तपणा नव्हता. तर काय शेवटी पोटभर न जेवताच पोट भरले म्हणुन सान्गितले आणी घरी येवुन मी चक्क परत जेवलो होतो. मला तर ते जेवण अजुनही आठवत. त्यानन्तर अजुनही मी एकदा कोकणस्थाकडे जेवायची हिम्मत केली नाही.

मी पण एक फ़िरकी घेणार... क्षमा मागुन

एकदा रस्त्यावरुन एक ठेलेवाला "कोकणस्थ घ्या कोकणस्थ...." असा आवाज देवुन काही तरी विकत होता.
सगळ्याना खुप आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे म्हणुन, सगळे बाहेर आलेत.. पहातात तर काय...
तो ठेलेवाला चक्क चिक्कु विकत होता...

कोकणस्थानमधे बरेच चान्गले गुण आहेत ते मला माहिती आहे, पण या विनोदाला दिलावर घेवु नका ह.


Nandini2911
Tuesday, November 28, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, तसे तर माझेही अनुभव आहेत पुणेरी लोकाबद्दल,,
जाऊ दे नाही तर ते परत चालू होतील..
तू मला अजून हवे हे का नाही बोललास? का त्यानी तुला विचारले नाही परत वाढू का म्हणून?
आणि तू नक्की कोब्राकडेच जेवायाला गेला असशील.. नाहीतर एवढा निरामिष थाट कुठे असेल?


Chyayla
Tuesday, November 28, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, तेन्व्हा मी लहान होतो एवढ काही सुचत नव्हत शिवाय लाजाळुपणा... जेवढ समोर दिसत होते तेवढ सगळच जेवलो... आता पोळ्या सम्पलेल्या दिसत होत्या मग विचार केला आपण अजुन मागितली की त्यान्ना परत बनवावी लागेल, आणी त्यान्ची पण पन्चाईत...
तुसी ग्रेट हो... अगदी बरोबर ओळखलस मी कोब्रा कडेच गेलो होतो जेवायला. शिवाय ते माझ्या शाळेचे हेडमास्तर होते त्यामुळे आधीच भीती होती.


Jadoo
Tuesday, November 28, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे या कोब्रा लोकांची विचारु नका घरी गेले कधि तर or जेवायच्या वेळी गेले तर हि लोक बसुन बोलणार वगेरे पाणि देतिल.. आणि काम झाले कि दाराशी सोडायला येतिल आणि म्हणतिल थोडे खावुन गेले असते तर बरे झाले असते or चहा घेतला असता ना थोडा..घरात असेपर्यन्त काहिहि नाहि... आणि जाताना विचारणार
खूप अनुभव आहे या लोकांचा भरपूर कोब्रा friends आहेत ना
school च्या canteen मधे तेर २५ पैस्यां साठि एकमेकांशि वादावादि करणारे कोब्रा पहिले आहेत मी
याउलट विदर्भातिल लोक... अगदि प्रेमाने आग्रह करुन करुन विचारणार


Manishalimaye
Tuesday, November 28, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो नाही हो! कोब्रा असे नसतात हे सगळे रंगवुन सांगितलेले किस्से असतात. हं हे खरे की कोब्रा काटकसरी असतात. पण हे सारे प्रसिध्द किस्से बर्‍याचदा अतिरंजित असतात.

Sunidhee
Tuesday, November 28, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खि खि खि... च्या** तुझा चिक्कु चा जोक जबरदस्त आहे.. माझी बहिण असेच एका को. कडे जेवायला गेली होती. असेच थोडं थोडं जेवली. आणि ताई मोठी होती, संसारी बाई. शेवटी पानावरुन उठु लागली तेव्हा त्या काकुंनी विचारले, अग इतक्यात काय उठलीस? निदान सुपारी एवढा भात तरी घे. तर तिला वाट्ले चला भात तरी खाऊ, आणि काकुंनी अक्षरश्: सुपारी इतकाच भात वाढला!!
कोकणस्थांनो माफ़ करा.. सर्व असे नसतात पण काही नमुने लक्षात रहातात.. गंमतच हो शेवटी.


Jadoo
Tuesday, November 28, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिशा रंगवलेले किस्से नाहित ग खरोखर experience आहे मला.... mostly सगळे friends कोब्रा नाहितर देब्रा
देब्रा लोकांचा खूप चांगला अनुभव आहे..पण कोब्रा इथे आल्यापासुन तर त्यांच्यापासुन थोडे दूर रहणे पसंद
काटकसरि असणे आणी चिक्कु पणा यातला फ़रक लगेच कळतो ठिक आहे school मधे असतांना आपण आई-वडिलांवर अवलम्बुन असतो पण professional school मधे सुद्धा?? ३-४ वर्षांच्या experience नंतर आलेलि हि लोक कधि कधि खूप बालिशपणा करतात


Chyayla
Tuesday, November 28, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, हे किस्से खरच अतिरन्जित नाही, गोष्ट छोटीशी असते पण कायम स्मरणात रहाते. जादु तु सान्गितलेले अनुभव पण निश्चित येतात. अगदी घरी गेल्यावर म्हणतील चहा घेउन तर आलाच असाल... मग समोरचा कसचा चहा मागतोय... आधिच कटवल्या जात... त्याच्या बिचार्याच्या सौजन्याचा पुर्ण फ़ायदा करुन घेतल्या जातो.
त्यामुळे मैत्री करताना पण साम्भाळुनच करावी लागते. कारण आपण मित्राकडे जाउन दोन प्रेमाच्या शिव्या घालुन बेधडक फ़्रिजमधले जपुन ठेवलेले जिन्नस फ़स्त करु शकतो.
आणी हो सगळे को. असे असतात असे नाही पण आपण काही टिपीकल लोकान्बद्दल बोलतोय म्हणुन हा विषय काढला. माझ्या ओळखीचे एक कोब्रा आहेत त्यान्च्याकडे मी असा बिन्धास्तपणा करु शकतो. कदाचित देशात इतके वर्ष राहिल्यामुळे फ़रक पडला असावा.


Sami
Tuesday, November 28, 2006 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याशेजारी एक देब्रा आहेत. भयंकर कंजूष आहेत. एक सी. के पी शेजारीण आहे... घरी आणि गाडीत कधीच a.c लावत नाही. एक south indian शेजारीण आहे नेहमी जेवण कमी पडतं हिचं.. मला वाटतं मागच्या जन्मी ही सगळी मंडळी को. ब्रा असावीत बहुतेक ~D

Atul
Tuesday, November 28, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोब्रान्विषयी वातावरण तापलेल दिसतय, तर माझा ही एक अनुभव. हा खराखुरा किस्सा आहे माझ्या बाबतीत घडलेला. खरे अडनावाच्या कुटुम्बात मला हा अनुभव आला आहे. त्यान्च्या कडे जेवायला गेलो असताना अचानकपणे मला श्रीखन्ड पोळीवर वाढण्यात आले, मला वटले चुकुन झाले असावे, पण नन्तर खुलासा मिळाला की 'श्रीखन्ड ताटाला तसेच राहून शेवटी वाया जाते, तसे होउ नये म्हणून आम्ही ते नेहमी पोळीवरच वाढतो!'
मी मनात म्हटले शिवाय भान्डी घासायची पावडर पण वाचते :-)
सगळेच को असे नसतात अपवाद आहेतच


Lalu
Tuesday, November 28, 2006 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समि,
*मी समीच्या शेजारी राहात नाही.


Limbutimbu
Wednesday, November 29, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला?? नेहेमीप्रमाणे कोब्रान्वर घसरलात का? ठीक हे! आत्ता वेळ नाही, नन्तर बघुन घेईन! अगदी मुक्त हस्तान!

Mahesh
Wednesday, November 29, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे बरेच मित्र कोब्रा आहेत. पण त्यातले काहीजण खुपच देब्राळलेले आहेत. कदाचित माझ्यासारख्या देब्रा मित्रांमुळे.
कोब्रा लोक देण्याच्या बाबतीत चिक्कु असतात तसेच घेण्याबाबतही असावेत.
मी कोलेजमधे असताना माझा एक मित्र संध्याकाळी ७ वाजता माझ्याबरोबर माझ्या घरी आला.
आईने नेहेमीप्रमाणे चहा करून आणला, त्याला पण एक कप देऊ केला, पण हा बाबा म्हणाला की मी दिवसातुन फक्त दोनदाच चहा घेतो (सकाळी उठल्यावर आणी दुपारी ४ वाजता) आणी नाही तर नाही घेतला.
कालांतराने त्याच्यात बराच बदल होउन तो कोणत्याही वेळी काहीही घेऊ लागला...


Nandini2911
Wednesday, November 29, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i differ on a point noted above विदर्भातले लोक आग्रहाने जेऊ घालणार...

माझी एक वैदर्भीय मैत्रीण आहे.. आणि ती स्वर्थीपणाचा कळस आहे. ही माझी रूम मेट होती.. जेवायला बसल्यावर सगळे अधाशीपणे खायची..
वर वाढून घेताना विचारायची सुद्धा नाही.. तुम्हाला हवे का मी घेऊ...
मी आणी दुसरी मुलगी गप्पा मारत जेवायचो.. आणि ही अर्धा स्वयपाक सम्पवून उठलेली पण असायची.. वर "मला इतकुसा भात लागतो" हिचा इतकुसा भात खाऊन झाल्यावर मी कित्येकदा ब्रेडवर dinner संपवलय..

शेवटी काय प्रदेश कुठचाही माणूस typical असतो. प्रदेश नाही..


Chafa
Wednesday, November 29, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी समि. माझ्या पहाण्यात सुद्धा असे बरेच non कोब्रा आनि typical महा चिक्कू आणि कंजूष लोक आहेत. म्हणजे इतके की ते मॅकडोनाल्ड्स, बर्गर किंग मधे जाऊन ती साखरेची छोटी छोटी पाकिटे असतात ना, ती ढापतात, घरी साखर विकत कमी घ्यायला लागावी म्हणून. एक ओळखीचं देब्रा कुटुंबं आहे ते Car insurance पूर्ण विकत घेत नाहीत पैसे वाचवावे म्हणून. एक सीकेपी मित्र आहे तो दिवसा फोन केला तर कधीच उचलत नाही सेल फोनची मिनीटे खर्च होतील म्हणून!

आणि आधीपासूनच पानात भसाभस जेवण वाढूच नये. अन्न फेकून द्यायला लागून त्याचा अपमान करु नये. आधी कमीच वाढलेले बरे. मग ज्याला त्याला आवडीप्रमाणे आणखी मागून घेता येतेच की. लाजायचे नाही अज्जिबात. :-O


Chyayla
Wednesday, November 29, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी तुला च्यायला पुर्ण लिहायला काय जातय? तु च्या**(तारे तारे) लिहिलेस म्हणुन विचारतोय. (सॉरी... विचारुन राहिलो आहे)

लिम्बुटिम्बु, नेहमीप्रमाणे नाही हो मी पहिल्यान्दाच हा मुद्दा काढला. अरेच्या जेन्व्हा तुम्ही वैदर्भियान्चा टिपिकल पण काढाल तर मग आम्ही पण का चुप बसावे... आशा करतो की सगळे खेळीमेळीने घेतील हा टिपिकल पणा सगळ्यानमधे असावा असे वाटते.

नन्दिनी, अश्या व्यक्ति असतात, पण हा स्वभाव काही देब्राच्या टिपिकलपणा मधे नाही येत... काय मित्रानो तुम्हाला पटतय ना? दिवा घेण्यात चिक्कुपणा नको करु ह.

टिपिकल पणा म्हणजे सामान्यपणे ठरावीक लोकानमधे आढळुन येणारा गुण. त्याचे उदाहरण, गुलटी, कोब्रा, देब्रा सगळेच आले. याचा अर्थ असा नव्हे की सगळेच तसे असतात. आजकाल जग जवळ आलय लोक जगातल्या नवीन गोष्टी शिकतात, तसेच परिस्थितीमुळे बदलतातही. कदाचित काही परिस्थितीमुळेच हा टिपिकलपणा आला असावा.
कोब्राच्या चिक्कुपणा मागे कदाचित कोकणातली त्या काळची गरीबी कारणीभुत असावी की ते काटकसर शिकले पण त्याचा चान्गला फ़ायदा धनात्मक ( +ve ) म्हणजे बचत, उधळपट्टिला लगाम. तर रुणात्मक ( -Ve ) म्हणजे चिक्कुपणा, मनाचा कोतेपणा वैगेरे... ही जर कारण मिमान्सा कळाली न तर सगळ लक्षात येईल बघ. त्यात कोणाला नावे ठेवायचा हेतु नाही मी आधीच म्हटले कोब्रा मधे चान्गले गुण आहेत. आता परिस्थिती बदलत चालली आहे.
देब्राच्या सन्गती मुळे कोब्रा पण सुधरत आहेतच ना? (थोडा इर्सालपणा)





Rahul16
Wednesday, November 29, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chyayala post khup chan aahe. mala 'Typical'
mhanaje kay mhayache hote te tu sangitales.

mandali, maza hetu fact maharastra nahi tar jagatala typical pana kalawa mhanun hota. desh pardeshatil lok yethe yetat , tyanchya observation skill mule jagaltlya wegweglya typical lonanchi olakh hoil ase watate.

mi tamil lokanbaddal baddal lihile, jagat vaidarbhi aani kokani sodun khup lok typical aahet. tyanchya baddal sanga. tumachya jawal nakkich kahi sanganyasarkhe asel.

yacha arth asa nahi ko kobra baddal sangu naka....:-)

Wel, kobra chi aankhi ek saway. yanna wad vivad karanyat far ras aahe, mitran madhe sadhe bolane suru asel tar kuthun tari nirarthak mudhyawar wad ukarun kadhatat aani mag mich kasa khara ya sathi pot tidakine bhandatat. itake ki shewati lok katkat nako mhanun ' ho , tuzech khare mhanatat'. aani wad sampawatat. bhandanyat kay maja watate yanna kay mahiti. maze sagale kobra mitra asech hote.

Nandini2911
Wednesday, November 29, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! इथे देब्रा ची majority आहे वाटते..
चला कुठे तरी आपण आहोत..
आता थोडे मराठयाबद्दल..
याची मुले कितीही शिकलेली असली तरी लग्नाच्या बाजारात मात्र पुराणमतवादी असतात...
चष्मा असलेली मुलगी नको म्हणणारा एक ढापण्या माझा मित्र आहे..


Kedarjoshi
Wednesday, November 29, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाडी कोब्र्यांवर आहे म्हणुन..

मी नुकताच नांदेड सोडुन पुण्याला शिकायला आलो होतो. लायब्ररीर थत्ते नावाचा माझ्या मित्र झाला. पुण्याचे गेम मला तेव्हा फारसे माहीती न्हवते. म्हणल थत्या चल चहा प्यायला जाऊ. साहेब आले. त्यानी मस्त चहा व क्रिम रोल घेतला. माझ्या चहा संपत होताच तर साहेबांनी लगेच ३.५० रु काढुन टेबलावर ठेवले. म्हणल हे काय? तो म्हणला हे माझे पैसे.

अबे. राहुदे च्यायला दळभद्री माझा १ ५० जड झाला होता त्याला. मग मीच ५ रु दिले चहा वाल्याला. थत्या परत खुष. (बहुतेक जाताना परत चहा वाल्या कडे थांबुन त्याने ते पैसे खर्च केले असतील, नाहीतर त्याचे बाबा हिशोब विचारुन परत दुसर्या दिवशी पैसे देनार नाहीत.)
नंतर त्याचे हे गुण लक्षात आल्यावर मी त्याची चांग्ली फिरकी घ्यायचो. पुढे बराच सुदरला. मी जेवायला नेल्यावर पुढच्या चहाचे वा मसाला पानाचे पैसे तो द्यायचा.

पण सर्वच कोब्रा तसे नसतात. (फक्त पुण्यातलेच पेठीच तसे असतात). माझा ओरगांबाद्चे मित्र बापट्या न गोगट्या एकदम देशी होते.

आणी पेठेत राहील्यावर एखादे शिंदे पण तसच विचारतील.


Jadoo
Wednesday, November 29, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chyayla एकदम १००% मुद्द्याचे बोलला बघ..
kedarjoshi माझे सुद्धा कोब्रा मित्र अगदि असेच, एकदम perfect example दिले बघा तुम्हि

माझा एक मित्र तर नेहेमि हे ऐकवायचा

..भटाला दिली ओसरि आणि भट हातपाय पसरि

..भट्ट येवुनि तट्ट फ़ुगले घरि जवुनि स्वस्थ निजले

दिवे घ्या....

no offence please




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators