Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 22, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through October 22, 2006 « Previous Next »

Rajeshad
Friday, October 20, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुर्वी काही दिवस दहावीच्या पोरांना गणित शिकवायचो तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांनी केलेला हा इब्लिसपणा. मी त्या दिवशी Circle हा धडा चालू करणार होतो. क्लासमधे शिरलो, खडू हातात घेतला व फळ्याकडे वळून लिहायला लागलो तेव्हा फळ्यावर या अतिशहाण्या पोरांनी लिहीलेलं मला दिसलं - "सर कल"

Swa_26
Friday, October 20, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर... युक्तिची आयडीया??? ही ही ही......

आणखीन एक निरुपद्रवी इब्लिसपणा... आमच्या इथे लहान मुलांचा एक सरदार आहे.
more SMART !! तो नेहमी सगळ्यांना खूप सतवायचा. एकदा आम्ही ठरवले कि याची पण विकेट काढायची.
आम्ही सगळे एकत्र जमलेले असताना हा हिरो आला, हातात एक मोठी झाडू आणि ती अशा पध्द्तीने फिरवत होता कि जणू बाजीप्रभू दांडपट्टा फिरवत आहेत... मग माझ्या डोक्यात आले, आज याला मस्त शेंडी लावायची..... थोडा वेळ त्याला तसेच करु दिले आणि मग मी त्याला म्हटले," अरे, पिंट्या.... तु कुठे गेलास?, अरे हा तर गायब झाला.." आणि मग बाकीच्यांना पण इशारे केल्यावर मग सगळेच सुरु झाले... "पिंट्या कुठे गेला?, पिंट्या कुठे गेला?" म्हणुन...
...झाले ह्याला वाटले ह खरोखरच गायब झालाय... तसाच धावत घरी गेला, आणि नेमकी त्याची आई काहीतरी करत होती, ह्याने त्यात हात घातला आपण गायब झालोय म्हणून.... आणि मग आईचा अस्सा ओरडा खाल्ला की बस्स.... !!


Chaffa
Friday, October 20, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकंदरीत बरेच प्राणीमित्र जमलेले दिसतायत. आणखी एका किश्श्याची भर घालु का.????
हे थंडीचे दिवस म्हणजे गवतावरच्या किटकांची झुंबड असते. अशाच एका थंड दिवशी केलेला हा ईरसालपणा.
त्या दिवशी काही खास काम नव्हते, इकडे तिकडे बागडताना भन्नाट कल्पना सुचली. ते भिंतिवर येणारे गवतातले टोळ पकडून पकडून एका हेल्मेटमधे भरले(हे गाडीवरचे हेल्मेट नव्हे बरं का.!!!!! प्लांट मधे घालायचे हेल्मेट ) माहित नव्हते कुणाचे हेल्मेट ते (माझे नव्हते हे नक्की ) हे टोळ असतात ना ते अंधारात एकदम शांत बसतात. ज्या महोदयांचे ते हेल्मेट होते ते आमचे निकटचे सहकारी, न बघताच त्यांनी उचलले हेल्मेट आणी डोक्यावर ठेवले मात्र एऽऽऽऽकच जोरदार किंकाळी आणी पुढचा गोंधळ विचारु नका.

कारण जगातल्या बहुतेक सर्व प्राणी, किटकांना हे बहाद्दर घाबरतात.


Kiru
Friday, October 20, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रकार आम्ही जाणूनबुजून केला नव्हता. पण खूप गमतीदारपणे घडला होता.

कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राने नवीन सायकल घेतली होती. त्याच्या ब्रेक्स चा खुप जोरात आवाज व्हायचा. त्या मित्राला सायकल जोरात चालवताना अचानक ब्रेक दाबून लोकांना दचकवण्यात मजा वाटायची.
एकदा आम्ही दोघे डबल सीट चाललो होतो पार्ल्यात हनुमान रोड वरुन. मित्र नेहमीप्रमाणेच जोरात चालवत होता.
अचानक मागून एक बस आली आणि आम्हाला overtake करुन पुढे गेली आणि पुढेच असलेल्या stop पाशी उभी राहिली. आम्ही मागून जोरात येतच होतो.
अचानक बस उभी राहिलेली पाहून आमचा मित्र गडबडला. आम्ही बसपर्यंत पोहोचेपर्यंत एक माणूस बस मधून खाली उतरला होता.
करकचून ब्रेक मारत मित्राने सायकलचा वेग आवरायचा बराच प्रयत्न केला. प्रचंड आवाज करत करत सायकल त्या माणसाच्या अगदी जवळ जाऊन कशीबशी उभी राहिली.
त्या आवाजाने तो माणूस एवढा दचकला की त्याने सरळ पुन्हा बस मध्ये उडी मारली आणि तोपर्यंत कंडक्टर ने बेल वाजवली होती.
त्या माणसाने बस मध्ये उडी मारली आणि नेमकी ड्रायव्हरने गाडी चालू केली.
म्हणजे कंडक्टर ने बेल वाजवणे, त्या माणसाने बसमध्ये उडी मारणे आणि ड्रायव्हरने गाडी चालू करणे या तिनही क्रिया एकाच वेळेस.. फक्त काही सेकंदांच्या फरकाने घडल्या..

नंतर मला फक्त पुढल्या stop कडे जाणारी बस, बस मधून आमच्या दिशेने डोकावणारा त्या माणसाचा, काहीही नं समजल्यासारखा blank चेहरा... एवढच आठवतय..

आम्ही दोघेजणं दहा पंधरा मिनिटे तिथेच थांबून वेड्यासारखे हसत होतो. आणि आजुबाजूची माणसं आमच्याकडे 'काय वेड्यासाखे हसताहेत' असे पहात होती.


Shyamli
Friday, October 20, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग किरू.........
सगळ चित्र आल डोळ्यापुढे एकदम
अगदि ह ह पु वा


Kedarjoshi
Tuesday, October 24, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

check this out. A new search engine. Its really cool

http://msdewey.com/

Chaffa
Friday, October 27, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या सिनीयर बरोबर केलेला हा ईरसाल पणा
हे महोदय TG ला नविन आणी पहीलिच हॉग्कॉग वारी. दिवसभर साइटवर आमच्याच कल्पना स्वतःच्या सांगुन भरपुर शायनींग मारुन घेतली.
संध्याकाळी डिनरच्यावेळी गडबडले.
हे दिवसभर फ़ुशारक्या मारुन दमलेले हुश्शार हळूच मला येउन विचारतात ` ईथल्या टेबल मनर्सच काही माहित आहे का हो.?????’ कोण सोडेल ही संधी म्हंटल फ़क्त मी करीन तसं करा. भाइसाहेबांनी टेबलवर माझ्या समोरची जागा मिळवली टेबलवर अर्थात दिवसभराच्या गप्पा चालु होत्या. दिवसाचे हिरो असल्याने बाकिच्यांचा गप्पांचा रोख त्याच्यावर हे हळूच मी काय करतो तिकडे पहातायत.!!!!!!!! मी जे काही करत होतो हे महाशय त्याची कॉपी करत होते. मी हळूच चॉपस्टीक उचलल्या त्यांनीपण उचलल्य, मी आगदी सराइतासरख्या त्या बोटात धरल्या( ह प्रकार म्हणजे कयामतच ) त्यांनी पुन्हा तेच केले ( तो पर्यंत बाकिच्या मंडळीनी सुरुवात केली होतीच ) आणी जश्या महा मुश्कीलीने त्यांनी चॉप स्टीक हातात धरल्या ( या सगळ्या उठाठेवीत त्यांचे माझ्याकडे दुर्लक्षच झाले ) मी चॉप स्टीक खाली ठेवल्या आनी सरळ काटे चमचे घेतले. आता या बहाद्दरांची पंचाइत, माझ्या समोर बसण्याच्या नादात हे यजमान मंडळींच्या समोर, सगळ्यांचे लक्ष यांच्याकडे, आणी हातात चॉपस्टीक काय हाल झाले ते बघण्या सारखे.!!!!!!!!!! जवळ जवळ उपाशी उठले बिचारे.

वेळ मिळालावर मला आगदी काकुळतीने विचारले...........................
मी साळसुद पणे उत्तर दिले ` मला तरी कुठे येतय चॉप स्टीकने खाता मी आपला प्रयत्न करत होतो’

भारतात येइपर्यंततरी पुन्हा माझा समोर जेवायला बसले नाहीत. ....................................................


Bhagya
Friday, October 27, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलांचा एक किस्सा...

दोघांना घेउन मी मॉलमध्ये शॉपिंग करत होते. तेवढ्यात एक आजी जवळ आल्या.
हाSSSय (पोरं,शॉपिंग ट्रॉलीत उभी राहून )
हाSSSय, सच लव्हली किड्स.. (आजी)
यू लूक लाईक अ मॉSSSन्स्टर!.... (पोरं, आजींना दबक्या आवाजात)

बिचार्‍या आजींना कमी ऐकु येत होतं. म्हणून त्या हसून विचारत्या झाल्या,
व्हॉट आर दे सेईंग?
ओह, नथिंग....दे आर कॉलिंग यू ग्रांडमा.... (मी ओशाळून, सावरून घेण्याचा प्रयत्न करत )

नोSSSS वी आर सेईंग that you look like a big monster!! पोरं जोरात, आजींच्या जवळ तोंड नेत ओरडती झाली... आता आजींना पण ऐकू गेलं... बिचार्‍या तिथून कसंनुसं तोंड करत चालत्या झाल्या. माझ्या सॉरी कडे पण लक्ष न देता.

पोरट्यांना त्या दिवशी हव्या असलेल्या गोष्टी घेऊन दिल्या नाहीत हे सांगायला नकोच.


Kedarjoshi
Friday, November 03, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सोमवार चा किस्सा.

अमेरिकेत हलोविन हा सण असतो. ह्या दिवशी आपण भुता सारखे कॉस्चुम्स करायचे व भिती दाखवायची. लहान मुल घरोघरी जाउन trick or treat असे म्हणत फिरतात व लोक त्यांना चॉकलेट वैगरे देतात.

माझा शेजारी एक गुलटी आहे. अतिशय कंजुश. अगदी एकही डॉलर रादर सेंट ईकडे तिकडे होनार नाही याची काळजी घेतो. सर्व गुलटे जसे लुंगी घालतात तसेच हा पण मस्त रंगीबेरंगी लुंगी रोज घालतो. मी त्याला म्हणालो की बाबा hallowin चे पोर येतील. जरा पैसा खर्च करुन चॉकलेट आण. तो म्हणाला आपने घर मे काय कु आयंगे. म्हणल थांब जरा दाखवतोच आता.

hallowin च्या दिवशी मी त्याचा घरासमोर एक पमकीन ठेवुन दिला. त्याचा त्याला काही पत्ता न्हवता. संध्याकाळी नेहमी प्रमाने आमच्या अपार्टंमंट मधीले मुल चॉकलेट मागत फिरत होती. घरासमोर पमकीन पाहुन त्याचाही दरवाजा त्यांनी ठोठवला. वेनुगोपाल ने मस्त ब्यनेन व लुंगी परिधान केली होती. त्याने दरवाजा उघडला व विचारले व्हॉटSS. पोर एकदम घाबरली व म्हणाले ट्रिक ऑर ट्रीट. हा परत व्हॉटSS. नो नो नो. एका मुलाने त्याला म्हणले नाइस कॉश्चुम विच म्हुवी. परत हा चिडला व दरवजा लावुन घेतला.

आता त्याचे रुममेट नाइस कॉस्चुम म्हणुन चिडवतात.


Meggi
Tuesday, November 07, 2006 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तिसरीत गेले तेव्हा माझी शाळा बदलली. मला एका जाड आणि धिप्पाड मुलीच्या बाजुला बसवलं. मी नवीन असल्याने ती मुलगी मला खुप त्रास द्यायचि. त्रास म्हणजे दप्तर ठेवायला जागा द्यायची नाही, माझ्याच वस्तू वापरायच्या, माझा डबा संपवुन टाकायच इ.
मी हे माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं. ती नेहमीच माझ्या बाबतीत protective होती. तिला एक कल्पना सुचली. अम्ही त्या जाड्या मुलीला आमची आई घरी नसतानं गृहपाठ करायला बोलावलं. आम्ही अभ्यास करत असतानाच ताई किचन मधुन सुरी घेउन आली आणि तिला म्हणाली ' पुन्हा माझ्या बहिणीला त्रास दिलास तर हातच कापुन टाकेन. ' . ती रडायलाच लागली. मग आम्हि तिला खुप ओरडलो. नंतर तिने मल कधिच त्रास दिला नाही.


Detroitkar
Tuesday, November 07, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप पूर्वी, TELCO मधे असतानाचा किस्सा. संध्याकाळी TELCO बस मधून घरी येताना, बस मधले अर्धे अधीक लोक झोपायचे. माझा मित्र सुद्धा त्यातलाच एक. तो माझ्या एक स्टॉप आधी उतरायचा. त्याचा स्टॉप आला कि त्याला उठवायची कामगिरी माझ्या कडे होती.
एकदा तो गाढ झोपला असताना, त्याच्या ३-४ स्टॉप आधीच त्याला जोर्-जोरात हलवून "अरे तुझा स्टॉप आला" असा म्हणलं. आणि तो सुधा न बघता धावत्-पळत जाउन खाली उतरला. खाली उतरल्यावर त्याला लक्शात आल. पण बस तो पर्यंत पुढे निघुन गेली होती. मग तो चालत घरी गेला. आणि दुसर्‍या दिवशी माझी चांगली काढली.


Kedarjoshi
Wednesday, November 15, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर झाले काय मी नी माझा आचरट मित्र लकडीपुला वरुन डेक्कन च्या बाजुला येत होतो. चोकात आल्यावर आम्हाला दोन मुलींनी थांबवले व म्हात्रे पुलाचा पत्ता विचारला. आम्ही तिला म्हणालो की ईथुन बर्यापैकी लांब आहे तुम्ही रिक्षा करुन जा किंवा बसने जा असे म्हणुन त्यांना तिथे कसे जायचे सांगीतले व निघालोच की त्यातील एक मुलगी म्हणाली आम्ही कसेही जावो तुम्हाला काय करायचे? म्हणल ओके पण गपचुप बसेल तर पशा कसाला त्याने विचारले तुम्ही पायी जानार आहात काय? ति म्हणाली हो म्हणुनच म्हणते आम्ही कसेही जाओ तुम्ही डिटेल मधे सांगा.

मग मी पत्ता सांगायला सुरु केले

मी - बर्यापैकी लांब आहे.
त्या - तरीही आम्ही पायीच जानार.
मी - ओके तर असा करा ताई तुम्ही ईकडे बघा (कर्वे रस्त्याकडे बोट दाखवीले) तिकडुन सरळ चालत राहा. मग एक बसस्टॉप यील पण तिथुनही सरळ चालत जा. थोड्यावेळाने गरवारे कॉलेज येईल पण तुम्ही चालत राहा त्याच दिशेने.
त्या - ओके
मी - मग थोड्या वेळाने एक मोठेसे सिग्नल येईल. एक सेकंद ही न दवडता पशा म्हणला - मग ईतके चालल्यावर तुम्हाला फेस येईल तो पुसायला रुमाल काढुन पुसा ज्या दिशेला तोंड वळेल त्या दिशेला पुल येई पर्यंत चालत राहा मग दिसेल म्हात्रे पुल. हा पशा म्हणजे जेम्स बॉन्डचा पोता आहे.
मला वाटले आता परत एकदा ताई ओरडनार पण त्या न बोलता कोथरुड च्या दिशेनी चालायला लागल्या होत्या.

तात्पर्य - पत्ता विचारनार्याने ज्याला पत्ता विचारत आहोत त्यांच्या बद्दल त्यांचा समोर अनुदगार काढु नयते नाहीतर ' पशा ' सोकावतो.


Chyayla
Thursday, November 16, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हिनेगार चे किस्से ऐकले पण कुणी सोडा पिउन पाहिला का पाणी समजुन? हा पण त्या दिल्लीच्या सरदारजीकडे घडलेला किस्सा.
उन्हाळ्याची सन्ध्याकाळ होती, माझ्या बाजुच्या अमितने मेड कडुन पाणी मागवले, तीनी चुकुन सरदारजीची सोड्याची बॉटल आणुन ठेवली दिसायला हुबेहुब पाणी... कदाचित सरदार रोज कार्यक्रम करत असावा. ईर्साल पब्लिकला लक्षात आलेच असेल.

अमितनी आधी पाणी प्यायला आणी थु..थु करत बाथरुममधे पळाला पण चुपचाप बसला.

थोड्या वेळानी योगायोगानी मला तहान लागली.
मी: यार अमित पानी है क्या? मुझे बहुत प्यास लगी है.
अमित्त: (साळसुदपणे) है ना... यार येले पानी, बुलाने ने की जरुरत नही.
मी जसा घोट घेतला मी पण थु..थु.. करत बाहेरच्या मोकळ्या गच्च्यावर आलो, आणी आता तिथे अजित तो पण पन्जाबीच... मोबाईल वरुन बोलत होता. त्याने ते पाहिले आणी त्याला वाटले की मला हसु आवरले नाही म्हणुन पाणी पिता पिता फ़वारा उडाला.

मी आत जाउन.. अबे साले अमित बताया क्यु नही सोडा है करके तो म्हणाला यार मै भी धोका खा गया, अब मै अकेले क्यु भुगतु ईसलिये तुझेभी बकरा बनाया.

आता म्हटल आपण दोघे ही फ़सलो, आपण अजितला बकरा बनवायचे.

ती बॉटल मग अजितच्या खोलीत त्याच्या पलन्गापाशी ठेवली. आम्ही पण त्याच्या खोलीत जाउन बसलो, अजित मोबाईलवरचे बोलणे सम्पवुन खोलीत नेमका त्या पलन्गावर बॉटल जवळ बसला. आम्ही वाट पहात होतो आता पाणी पील नन्तर पील पण पट्ठा काहे पीत नव्हता.
मग आम्ही पाण्याचा विषय घेउन बोलायला सुरुवात केली. त्यावर अजितने लेक्चर देणे सुरु केले.
पानी खाने से पहेल पिना अछा, खाते समय पिना थोडा ठिक पर खाने के तुरन्त बाद नही पिना चाहिये...वैगेरे वैगेरे.... पण साला पाणी पित नव्हता आम्ही कन्टाळलो शेवटी...
मी: यार चलो चल्ते है
अमीत्: यार समीर बहुत प्यास लगी पानी है तो देना.
मी: है ना वो क्या अजित के पास बॉटल रखी है, अजित वो पानी देना.

अजितनी बॉटल उचलली आणी म्हणाला यार मुझे भि प्यास लगी है मै... छी... छी... थु... थु... करत स्वारी बाथरुम मधे पळाली.

आणी आम्ही दोघान्नी टाळ्या पिटुन ईब्लिसपणा साजरा केला. आणी मग धमाल हसुन हसुन स्वता:चे सगळे किस्से सान्गितले.
तुझे पानी पिलाने के लिये क्या क्या कहानी बनानी पडी... आखिर तु बकरा बन ही गया.

पुढे ती बाटली ढेरपोट्या, आळशी, अगडबम्ब असलेल्या श्रीधर मोटुच्या खोलीत... हा तामिळ होता आणी नुसता दिवसभर खात रहायचा आणी झोपा काढायचा सुखी प्राणी... रात्री उठुन पाणी समजुन सगळा सोडा पिउन घेतला पण पट्ठ्याला काही फ़रक पडला नाही.


Manyah
Saturday, November 18, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा आज पर्यन्तचा सगल्यात मोत्ता एब्लिसपना.......
आमचे कोलेज पुर्न मुलाचे होते.... एकहि मुलगि नव्ह्ती
मी कोलेग ला असताना आम्हि नातक बसविले होते....त्यात मी एका मुलिच काम केले होते. नातक सुरु होइपर्यन्त कोनालाच काहि पत्ता नव्हता. मी नातकच्या आधि भरपुर दिवस दाधि केलि नाहि. आनि अचानक नातकच्या अर्धा तास आधि दाधि करुन मुलिचा मेक अप करुन बाहेर आलो. नातकाला थोदा वेल अजुन बाकि होता. मी मुद्दम ताइम पास करायला तोय्लेत मधे गेलो.... मी आत गेल्यावर आत मधे एक दोन मुले होति. ति जाम दचकलि..... तरि मी त्याच्याकदे न बघता तोन्दावर पानि वगिअरे मारुन फ़्रेश होत होतो. ते सगले बाहेर पलाले. नन्तर मी बाहेर आल्यवर सगले जन मज़्या कदे बघुन हसत होतें. नातक सुरु झाले तेव्हा सुधा कोनालाहि काहिच कल्पना आलि नाहि सगले जन अचबित झाले होते..... कि कोलेग मधे मुलगि कशि काय आलि?
नातक चालु असतना बाकिचि मुले वर आलि अनि हलुहलु सगलिकदे पसरले कि मुलिचे काम करनारा मन्या आहे म्हनुन......
त्या नातक मधे मी बेस्त अभिनेता (अभिनेत्रि) चे प्राइस घेतले


Chyayla
Thursday, November 23, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाति, थोडा फ़ार ईब्लिसपणा सगळ्यानमधेच असतो.

आता हा नकळत घडलेला किस्सा...परत मी बालपणी लहान होतो माझ्या दोघी बहिणी आणी मी एकाच शाळेत शिकायचो. मला कोणी अश्विनी नावाची मुलगी भेटली की सगळ्याना विचारायचो..."अश्व म्हणजे काय?" अर्थात उत्तर यायच घोडा... मग माझा ईब्लिस प्रश्न "आता सान्गा अश्विनी म्हणजे काय होईल?"... घोSSSSडी.

माझ्या बहिणीनी हेच तिच्या वर्गातल्या एका घोडीला सान्गितले तिला इतके रडु आले की ती चक्क प्रिन्सिपॉल कडे रडत गेली व विचारले की सर अश्विनी म्हणजे खरच घोडी होते काय? सरान्नी तिला समजाउन सान्गितल नाही ग बाळे वैगेरे... नशिब कोणी हा महान शोध लावला म्हणुन विचारले नाही, पण ती शाळा व हे जग एका महान सन्शोधकाला मान्यता देण्यापासुन मुकले. माझ्या बहिणीनी जेन्व्हा घरी येउन सान्गितले तेन्व्हा आमची खुप ह. ह. पु. वा. झाली अजुनही माझे नातेवाईक व बच्चा मन्डळी माझी अश्विनीवरुन आठवण काढतात.

मायबोलीवर कुणी अश्वीनी असेल तर माझ्या कडुन दीवा घेउन जावा.

पण हे माझ्या डोक्यात आणणारी अजुन एक महान व्यक्ती होती, त्याचा प्रश्न काय होता माहिती आहे. रेड्याचे स्त्रिलिन्ग काय होईल?.... द्या आता उत्तर.


Limbutimbu
Thursday, November 23, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> एक बांगडी, एक रबरबँड, आणी एक माचीसची काडी कागद बस्सऽऽ
अगदी अगदी!
हल्ली तर तशी खेळणीच मिळतात काडेपेटीसारखी, उघडायला गेल की आतुन प्लॅस्टिकचा किडा बोटावर झडप घालतो!
आम्ही लहानपणि कधिही चनेमने बोर खाल्ली तर बिया फेकुन द्यायचो नाही!
जमलेल्या वाळक्या बिया, किन्वा टनटनीची हिरवी फळे चालु वर्गात मागल्या बाकान्वर बसुन अन्गठ्याच्या पुढल्या पेरावर ठेवुन मधल्या बोटाने स्ट्रायकर सारखा झटका देवुन परफेक्ट निषाणावर मारायचो! अतिशय अचुक नेम! त्यान फार दुखायच नाही पण समोरचा वेडा नक्कीच व्हायचा कारण त्याला कोण मारतय ते कळायच नाही अन मास्तरान्ना सान्गण्याची सोय नाही
मात्र कधी नेम चुकला तर थेट मास्तरान्पर्यन्त पोचल्याचे किस्से देखिल आठवताहेत

शाळेतल्या पोरान्ना मधल्या सुट्टीत लघुशन्केला गेल्यावर भारी वाईट्ट खोड असायची ती म्हणजे प्रत्येकाच्या मागे रान्गा लागल्या की ऐन रन्गात आलेल्या पुढच्याला कोणतरी हमखास धक्का देई!
माझ्या बाबतीत एकाने हा प्रयोग दोन तिन दिवस लागोपाठ केला, शिन्चे सगळे पायावर ओघळ! मग काही नाही, शाळा सुटल्यावर त्याला असा बदकला ना की बस्स रे बस्स! ही असली इब्लिस कार्टी भावेस्कुलची बर का!


Sheshhnag
Tuesday, December 05, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे नवीनच (आजच रजिस्टर) आहे. पन गेले खूप दिवस तुमचे खट्याळ लिखाण वाचून माझी ह. ह. पु. वा. झाली. आता माझा पण हा एक अनुभव द्यावासा वाटतोय.
हा मी केलेला इब्लिसपणा नाही. हा माझ्या भावानी केलेला वात्रटपणा आहे. हे दोघेही भाऊ (एक सक्खा आणि दुसरा मानलेला) आम्ही सगळे इथे गोव्यात एकाच कम्पनीत कामाला आहोत.
आमचा एक गजानन नावाचा सहकारी आहे, महाकन्जुष. चहा प्यायला घेऊन जाणार आणि बिल देताना पैसे आणले नाहीत असे सांगून आम्हाला खिसे मोकळे करायला लावायचा.
एकदा आम्ही त्याची गंमत करायची ठरवले. आम्ही सर्व चहा प्यायला गेलो. भरपूर खाल्ले, चहापान झाले, आणि गप्पा मारत बसलो. गप्पा करताना एक भावाने सहज गजाननला विचारले, `तुला गम्मत दाखवू का?' गजानन म्हणाला, `दाखव.' दुसर्‍या भावाने त्याला टेबलावर अगदी कडेला हात पालथे ठेवायला सांगून त्यावर दोन ग्लास उपडे ठेवले आणि हे ग्लास काढ आणि बिल देऊन ये असे सांगून आम्ही आलो.
पठ्ठ्या पुन्हा भावांबरोबर चहा प्यायला आला नाही.


Nandini2911
Friday, December 08, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा इब्लिसपणा कालच केला..
management review meeting होती... वैतागवाणा प्रकार असतो. एकतर आमच्या department ला मोजून सात जण.. मी एकटीच मुलगी आणि juniormost माझे सगळे collegues a bove 45 आहेत.
boss ची secreatay पण होती. तिला तर जाम कंटाळा येतो. मायबोलीच्या selected इब्लीसपणा आणि वेंधळेपणाच्या print outs काढल्या आणि सांगितले वाचत बस.
काय आहे ते तिला माहित नव्हतं. मीटिंगमधे सगळ्याचं एकमत पडलं, नीताला अधून मधून उगीच जोरात हसायची सवय लागली आहे डॉक्टरला दाखवणे..


Dakshina
Wednesday, December 20, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रिण ३ महिन्यांसाठी बेंगलोरला चालली होती, तिला भेटायला सारख्या तिच्या मैत्रिणी यायच्या... अशीच एक मैत्रिण तिच्या नवर्‍यासकट आली. बोलून संपल्यावर माझी मैत्रिण आणि तिची मैत्रिण जिना उतरून बोलत बोलत खाली गेल्या...
आणि तिचा नवरा दारात शूज घालत उभा होता, आता मी पटकन दरवाजा तरी कसा बंद करणार ना? आता काहीतरी बोलायचं म्हणून मी त्याला म्हणलं "या परत, आता मी एकटीच आहे" (खरंतर मला म्हणायचं होतं की ती नसली तरी तुम्ही दोघं अधुन मधून चक्कर टकत जा)
त्याला काहीच कळलं नाही. आणि माझा मुर्खपणा लक्षात आल्यावर मी अर्थातच गप्प बसले.
मैत्रिण परत आल्यावर मी तिला माझा गाढवपणा सांगितला. आणि ती great तिने "त्या" मैत्रिणिला सांगितला. ती तिच्या नवर्‍याला म्हणाली, "बघ पोरी तुला open invitation देतात आणि तुला कळत पण नाही".


Chaffa
Saturday, January 06, 2007 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खंरंतर हा ईरसाल उद्योग मी कालच केला होता पण आज त्याचा परीणाम बघायला थांबलो होतो.
त्याचं काय झालं मला एका मित्राने एक प्रोग्राम ( किंवा जे काही असेल ते मला नाही माहीत ) मेल केला होता थोडक्यात तो असा होता की चालु केला रे केला की आपल्या PC वरच्या फ़ाईल धडाधड डिलीट होताना दिसतात आणी सगळ्या फ़ाईल डिलिट झाल्याचं दाखवुन शेवटी एकदम shut down ची खीडकी दिसते आणी त्याला फ़क्त OK ईतकाच पर्याय रहातो.त्याला क्लिक केले की एक मेसेज येतो आणी तो प्रोग्राम संपतो.

आता हा सगळा प्रकार मी कालच ऑफ़ीसच्या सगळ्यांना मेल केला. आणी आज सकाळी हीऽऽ धावपळ. कारण सगळ्यांना आल्या आल्या आपले mail box उघडुन आलेली मेल वाचायची घाई मग काय.!!!! कुणी धडाधड PC बंद केले काही हुश्शार तर सॉकेट मधुन प्लग पण उपसुन बसले. तासभर नुस्ती घाबरगुंडी. नंतर फ़ोनाफ़ोनी करुन आमचे संगणकीय वैद्य आले आणी त्यांनी झाल्या प्रकाराचा उलगडा केला.
आता हा chaffa कोण याचा युद्धपातळीवर शोध चालु आहे. आणी मलाही त्याचे मेल आल्याने माझा काहीही संबंध नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators