Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 24, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through October 24, 2006 « Previous Next »

Deepanjali
Tuesday, September 26, 2006 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहानपणी दुसरीत असताना वार्षिक परीक्षेला जाताना दप्तर विसरून गेले होते .. पूर्ण रिकामी काहीही न घेता !
तेंव्हा शाळेत ans paper पण आपला आपला आणायला लागायचा आम्हला ..
मग काय सर्वात आधी ans paper कोणाकडे extra आहे विचारत सुटले , शेवटी दुसर्‍या class मधल्या एका मुलाकडून उधार घेतला .. pen, pencil, eraser, scale सगळं एकेकाला मागावं लागलं !
नंतर माझी बहिण घेउन आली सगळं तेंव्हा बाई तिला म्हणाल्या कि ती स्वत : आली पुष्कळ झालं !
:-)

Storvi
Wednesday, September 27, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मी लहानपणी दुसरीत असताना वार्षिक परीक्षेला जाताना दप्तर विसरून गेले होते>>मोठेपणी परत दुसरीत होतीस काय? :-O

Manishalimaye
Friday, September 29, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>मी लहानपणी दुसरीत असताना वार्षिक परीक्षेला जाताना दप्तर विसरून गेले होते>>मोठेपणी परत दुसरीत होतीस काय?<<<
पण हे असं नेहमीच होत नाही का? आपण सहजच म्हणतो"एकदा मी लहान होते ना" म्हणजे दोनदा तिनदा किंवा किती वेळ्;आ लहान असतो आपण पण सहज बोलताना तसंच बोलुन जातो नाहीका!~ गंमत.

Aditih
Friday, October 06, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही सर्वजण माझ्या एका आतेबहिणीच्या लग्नासाठी जमलो होतो..मेंदी काढत सगळ्याजणी जाग्या होतो.. कामं करुन दमलेल्या घरातल्या मोठ्या बायका झोपल्या होत्या.. पहाटे त्यातली एकजण उठली.. किती गं जागता पोरींनो ..असं म्हणत तिने पेंगत पेंगतच दात घासायला सुरुवात केली.. दोन मिनीटांनी म्हणते की...यांच्याकडची पेस्ट काही वेगळ्याच चवीची आहे आणि फ़ेस पण अतिच झालाय...म्हणुन आमच्यातली एक जण उठली आणि तिने काय लावलं म्हणुन पाहायला गेली... बघते तर काय ..तिने शेवींग क्रीम ने दात घासले होते... माझी तर हसुन हसुन मुरकुंडी वळ्ली..

Atul
Friday, October 06, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्राच्या साखरपुड्या साठी मित्र व त्याचे कुटुम्बिय गाडी करुन परगावी (मुलीकडे) गेलो असतानाचा हा किस्सा आहे. मित्राची आत्येबहिण पण बरोबर होती. तिच्या वेन्धळेपणाची किर्ती सर्वना माहीत असल्याने तिला तम्बी दिलेली होती नीट वागण्या बद्दल पण काय करणार आदत से मजबूर. २-३ तासान्च्या प्रवासा नन्तर मन्डळी नगर ला पोहोचली. साखरपुड्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर चहा पाणी गप्पाटपा चालू असताना या काकून्नि एकदम बॉम्ब टाकला. समोरच एक इसम चहा घेत होता त्याला हिने प्रश्न विचरला, 'आपण कोण मुलीचे काका आहात का?'. सगळी कडे सन्नाटा पसरला. नन्तर कोणीतरी तिच्या कानात सन्गितले 'अग हे आपल्या गाडीचे ड्रायवर आहेत'. सगळा खुलासा झाल्यावर सगळीकडे हशा पिकला :-)

Arch
Friday, October 06, 2006 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतुल, .. .. ..

Mayur_g_deodhar
Saturday, October 07, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मझ्या वेन्धलेपनचा एक किस्सा सन्गतो मी एकदा १० वीच्या परिक्शएला जाताना हाल तिcकित विसर्लो तेव्हा मी खुप घामाघुम झलो होतो मित्रनि मला लधाईला येताना तलवार विसरला,असे चिद्वले पन मग मी घरी फोन केला आनी हाल तिcकेत माग्वले आनी मग परिक्शेला बसलो

Rajeshad
Saturday, October 07, 2006 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा कुणा दुसय्राने केलेला वेंधळेपणा.
माझ्या एका दुरच्या (सुदैवाने) आजीची साधारण अशीच गोष्ट आहे. ती थोडी गावंढळ आहे. एकदा ती तिच्या गावाहुन आमच्याकडे २-४ दिवसांसाठी आली. ती फारसा प्रवास करत नसावी. रात्रीच्या गाडीच्या प्रवासात तिची झोप झाली नव्हती. सकाळी ११ च्या आसपास ती आमच्या घरी पोचली, जेवली व जेटलॅग आल्यासारखी जे ढाराढुर झोपली ते एकदम संध्याकाळी ६-६:३० लाच उठली. खोलीतुन बाहेर आली व खिडकीतुन बाहेरचं वातावरण पाहुन तिला सकाळ झाल्यासारखं वाटलं. तरातरा बॅगेतुन आपला टुथब्रश काढला व बेसीन मधे ठेवलेली पेस्ट घेऊन दात घासणं चालू केलं. मी कॉलेजमधे असल्याने संध्याकाळची दाढी करून बाहेर हिरवळ पहायला जाण्याच्या तयारीत होतो व चहा पीत बसलो होतो. दाढी करून झाल्यावर सवयीप्रमाणे पाल्मोलीव (का जवाब नही) मी बेसीन मधेच टाकली होती. २-३ मिनिटातच आजीबाईंच्या तोंडाला फेस यायला लागला. ती घाबरून माझ्यासमोर येऊन उभी राहिली. क्षणभर मी ही ते द्रुश्य पाहून चक्रावलो पण लगेचच मला काय झालं असेल याचा अंदाज आला. मी बेसीन जवळ जाऊन खात्री केली व तिला झालेली दुर्घटना हसु आवरत सांगितली. तशी ती इतकी घाबरली की आता तिच्या तोंडाला खरोखर फेस येतो का काय असं वाटायला लागलं. आता काय होईल आता काय होईल असं सारखं विचारत होती. "तुझ्या दाताला आता केस येतील" असं सांगुन तिला अजुन घाबरवावं असं मला वाटत होतं पण तेवढ्यात आजोबा येताना दिसल्याने मी चहा ढोसला व हळूच तिथुन पळ काढला.

Chaffa
Monday, October 23, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक किस्सा आठवला म्हणुन लिहीतोय,
जुनाच आहे
एकदा आईने कुणासाठी तरी डिंकाचे लाडू करायचा घाट घातला होता. आता या प्रकारा बद्दल मला काहीच माहीती नाही. मी सहज किचन मधे गेलो तर तिथे तळलेल्या साबुदाण्याने भरलेली परात (किंवा त्याला जे काय म्हणतात ते) दिसली हा चुरचुरीत साबुदाणा मला भयंकर आवडतो म्हणुन समोर दिसल्या दिसल्या भरला बोकाणा तोंडात.!!!!!!!!!!!!!!!!!!!
हाल हाल झाले हो पार.!!!!
आता डिंक चिकट म्हणजे काय भयानक चिकट असतो हो.!!!!!!!
आणी तळल्यावर (की भाजल्यावर) त्यानेही अगदी तळलेल्या नायलॉन साबुदाण्या सारखच दिसावं................??????


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators