Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 06, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through October 06, 2006 « Previous Next »

Kiran
Tuesday, September 12, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मेरे हमसफ़र, ईक जरा ईन्तजार
.......
अब है जुदाई का मौसम दो पल का मेहमान

ही ओळ मी अशी म्हणायचो
अब है जुदाई का मौसम दोपहर का मेहमान :-)


Asami_asami
Friday, September 15, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़्ही भाची हे गाणे असे म्हणते...

धुम मचाले गरम मसाले धुम...धुम..धुम...:-)
लयीत म्हणुन बघितले की आपल्याला पण मजा वाटते म्हणायला:-)



Yogesh_damle
Friday, September 15, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती लिहिलेल्या फ़ारसी गाण्यावरनं अजून एक आठवलं... Bluff Master मधल्या Borre Borre गाण्याचे हे फ़ारसी शब्द...

"रोज़े खोदी आशिके-ता-बोदां,
अज़ दस्ते-तोह ख़ैली राज़ी बोदां,
आम्माह तोह बद शैतूनी कर दी,
नज़दीक़े मां ना या तोह
बोरो बोरो दिलम तोरा दिग़ेह ना-मीख़ाॅद,
दीग़े-दीग़े ना-मीख़ाँ बे-बीनामेद्"

अर्थ: खूप दिवस मी तुझ्यावर प्रेम करत होतो (बोदां-होतं). तुझ्या हातासाठी ( rather , हात धरायला) (दस्त्=हात, दस्ताना=हातमोजा) मी खूपच (ख़ैली) तयार (राज़ी) होतो. पण तू (तोह) वाईट (बद)-सैतानी कृत्य (शैतूनी) केलंस, आता माझ्या (मां) जवळपासही (नज़दीक़ो) भटकू नकोस तू!! (तोह).

नीघ!! नीघ!! (बोरो बोरो) तुझं दिल (दिल) मला नकोय!! [पुढचा अर्थ नाही काढता आला :-(]

ह्या गाण्याचा उच्चार मात्र वेगळा का होतोय कळत नाही...
"रोज़े खोदी आश्काताबोदा
अज़्दास्तेतो ख़लीराज़ीबोदा,
आम्मातो बाद् शॅतूनी कर्दी
नॅज़्दीक़ेमान्नायाताॅ -----(हो!!असाच उच्चार करतो तो!)
बोरोबोरो दिलम् तोरा दिग़ेनेमीख़द्
दीग़े-दीग़े नेमिख़ाबेबिनामैद्"

फ़ारसी रॅप. जय हो!! :-)


Yogesh_damle
Friday, September 15, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुसरो च्या द्वैभाषिक कौशल्याचा साक्षात्कार निवडुंग मधल्या शांता शेळकेंनी लिहिलेल्या 'ना मानोगो तो दूंगी तोहे गारी रे" वरूनही होतो.. हे गाणं मला अजूनही नीट ऐकू आलेलं नाही!!

ना मानोंगो तो दूंगे तोहे गारी रे (हिंदी)
अंग भिजविले माझे, माझी ओढली शेलाटी रे
जा जा जा कान्हा छेडू नको भारी रे, (मराठी)
ऐसो होरी को खिलाडी भर मारी पिचकारी रे.. (पुन्हा झटक्यात हिंदी, यमकासकट!!)

Hats off!! Shantabai!! पुढची पद्यावली कुणी कळवेल काय?


Vinaydesai
Friday, September 29, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



माझी बहिण एक वर्षं कोकणातल्या एका शाळेत होती... तिथे एका ऑफ तासाला 'चंदन सा बदन' म्हणून दाखवलं... त्यानंतर कधी असा वेळ मिळाला की मुलं....

बाई चंद चंद सफरचंद म्हणा असा आग्रह धरायची.



Swaatee_ambole
Friday, September 29, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश,

गोरी गोरी बांकी मैं, कुरूप तू काळा रे
गवळ्याच्या पोरा तुझा भलता हा चाळा रे
फोर(ड)दी गगर मोरी कंकरिया मारी रे

नयी रे चुनरिया अबही मंगायी
खेचाखेची पदराशी, काय करू बाई
बाजुबंद तोड मोरी चुनरीभी फारी रे..


Rajeshad
Saturday, September 30, 2006 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"तेरी दुनिया मे दिल लगता नही वापस बुलाले मुझको ए मालिक उठाले" असं एक मुकेशचं गाणं आहे. पुढे त्याच्या ओळी "...पर नोच डाले, मुझको ए मालिक उठाले" अशा आहेत त्या मला "परलोक सिधारे, मुझको ए मालिक उठाले" अशा वाटायच्या.
अजुन एक कर्णदोष
"आज मै उपर आतमा निचे..."
"टेल मी ओ खुदा अब मै क्या करु चलु सिधी के उलटी करु"

Kaumudi
Wednesday, October 04, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तारिल हा तुज गिरिजाशन्कर च्या ऐवजी मी म्हणायचे, ताडिल हा तुज गिड्डा शन्कर.....

Zakki
Wednesday, October 04, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ' ऐवजी माझा मित्र 'लठ्ठ तुझा पुत्र मला ... असे म्हणत असे. कदाचित् गमतीत पण म्हणत असेल. पुण्याचा तो, त्याला काय कळले नसतील शब्द?

Rujutajoshi
Thursday, October 05, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala khoop diwas he bhajan...Vitthalla tu veda kumbhar he asa watat hota..
Vitthala tu veda ahes phar....
Bap re me tar chakka vittalaach vede kela hota....

Mrinmayee
Thursday, October 05, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई दूरदर्शनवरून प्रसारित होणार्‍या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात एक खूप जुनं गाणं यायचं: "माझ्या होटाचं डाळिंब फुटलं, सांगा राघु मी नाही कधी म्हटलं"(ललिता पवार?) मला ते गाण "माझ्या पोटातलं डाळिंब फुटलं, सांगा बघु मी आई कधी म्हटलं" असं वाटायचं. पोटातलं डाळिंब म्हणजे अपेंडिक्स वगरे सारख्या अवयवाचं सिंबॉलिक वाटायचं. आणि ते फुटल्यावर इतकं दुखूनही "आई गं" न म्हणणारी बाई मला फार धीट वाटायची.

Kedarjoshi
Thursday, October 05, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ. मी तुला वाटनारे गाने ईमॅजीन करुन पाहीले. जाम हसायला आले. धन्यवाद.

Robeenhood
Thursday, October 05, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता पवारच्या ओठाचं डाळिम्ब? काय भीषण आयडिया आहे हो ही!

Lajo
Friday, October 06, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ. हसुन हसुन डोळ्यातुन पाणी यायला लागले.

RH , खर आहे...कल्पनाच करवत नाही...


Mrinmayee
Friday, October 06, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बघा ललिता पवार, खाष्ट सासूच्या दिवसांपूर्वीची lalita pawar

Limbutimbu
Friday, October 06, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> खाष्ट सासूच्या दिवसांपूर्वीची
अगदी खाष्ट सून वाटत्ये, नाही?

Mrinmayee
Friday, October 06, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी!!! "मला बोलतेस होय थेरडे?? दाखवू का इंगा?" अशीच दिसतेय.

Rajeshad
Friday, October 06, 2006 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ४-५ वर्षाचा असताना शाळेत "हादरे बसती या टांग्याला" अशी एका कवितेतली ओळ होती तिला "हागरे बसती या टांग्याला" अशी म्हणायचो.

Rupali_county
Friday, October 06, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजेश काय तरिच काय.... ह ह पु वा

Robeenhood
Friday, October 06, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

apart from joke ललिता पवार महान अभिनेत्री होत्या. अल्प शिक्षण, गरिबीतून त्यानी जी मजल मारली ती थक्क करणारी आहे.त्यानी जो हिन्दी लहेजा आत्मसात केला तो तर अशोक सराफ आणि अमोल पालेकराना देखील जमला नाही.खाष्ट सासू तर बिनतोड होतीच पण श्री ४२० मधील केळेवाली, आनन्द मधील नर्स अशी प्रेमळ रूपेही सुखदच होती.
बाईंचा मृत्यू तर फारच चटका लावून गेला. विद्यापीठाजवलील फ्लॅट मध्ये एकाकी अवस्थेत वारल्या. तीन चार दिवस कोणाला कळले सुद्धा नाही.
लग्न न केल्याने संसार झाला नाही. मुले नातेवाईक नाहीत. जवळचे कुणीच नाही...

विषयान्तराबद्दल क्षमस्व!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators