Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 09, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through October 09, 2006 « Previous Next »

Sampada_oke
Friday, September 29, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mbhureपर्फ़ेक्ट. आई २ सप्टेंबरच्याच एअर ईंडिया फ़्लाईटला होती.:-)

Bee
Friday, September 29, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तशीही एअर होस्टेस पूर्ण वेळ एरंडेल प्यायल्यासारखा चेहेरा करून खाणं पिणं आदळत होती. म्हातार्‍यांना मदत (?) करताना 'मरत का नाहीत लवकर' असा भाव.>>>> :-) :-)

भुरे, सहीच केले आहे वर्णन. इथे एकाकाचे किस्से अगदी वाचण्यासारखे आहेत.

Arch
Friday, September 29, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुष्कळांच्या posts मध्ये वाचल Indians ना वेगळी वागणूक दिली जाते वगैरे. पण

१. कितीदा indians सोडून इतर lines सोडून गर्दी किंवा धक्काबुक्की करतात?
२. आपल्या seats च्या वरचे overhead compartment मध्ये आपल hand baggage ठेवण्यापेक्षा विमानात शिरल्याशिरल्या पहिल्या रिकाम्या compartment मध्ये आपल सामान कोंबतात?
३. Handbags चे sizes असे असतात की ते overhead compartment मध्ये कोंबता कोंबता Air hostess लासुध्दा नको हा passenger अस होत असेल?
४. Air Hostess ला न कळणार्‍या भाषेत जोराजोरात तिच्यावर comments pass करत असतात?
५. मुलांना isles मध्ये हव तस पळू देत असतात?


Moodi
Friday, September 29, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याबाबतीत तर विचारायलाच नको. मला २ दा हा अनूभव आला. मी माझ्या सीटच्या वर असलेल्या जागेत माझी छोटी बॅग ठेवत होते तर तिथेही आधीच काही शहाण्यांनी आपले सामान कोंबले होते. मी हसू ला विचारले( मलाच हसू येतेय आता या शॉर्ट नावामुळे) तर ती आणि बाकी प्रवासी म्हणाले अहो ठेवा ना या दुसर्‍या समोरच्या जागेत, रिकामीच आहेत ती. ती माणसे चांगली होती हो( भारतीयच) पण दुसर्‍याच्या जागेवर ते कसे ठेवायचे हाच प्रश्न पडला मला. एकदा ठीक आहे, परत परत?

एकदा तर विमानात शिरल्यावर एक माणुस दुसर्‍या वयस्कर बाईला सामान ठेवायला मदत करत होता, म्हणून मागचे आम्ही सारे लाईनीत उभे राहिलो. पण या दोघांनी पार तुमची आमची मुले, नातवंडे, शेजारी काय करतात मग तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता यावर १० ते १२ मिनिटे चर्चा केली, तशीच जागा अडवुनच. शेवटी माझ्या बरोबरचा मध्येच घुसला तेव्हा याला जाग आली. नंतर हा बोलघेवडा त्या बाई शेजारच्या सीटवरच बसला. अरे मग तेव्हा का नाही गप्पा मारल्या?

परदेशात जाऊनही तुम्ही या लोकांकडुन थोडे फार मॅनर्स शिकत नसाल तर काय उपयोग. मी नाही कधी पाहिले की कुणी गोरा किंवा अफ्रिकन जागा अडवुन असे उद्योग करतोय ते. ते लोक क्वचीत असे झाले ना तरी २ दा सॉरी म्हणतात, आपले लोक ते ही करत नाहीत हो.


Savani
Friday, September 29, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकेक अनुभव वाचले आत्ताच..
धन्य ते एअर इंडीया! मी सुद्धा कानाला खडा लावलाय ह्यापुढे एअर इंडीया ने कधी प्रवास करायचा नाही.
मी माझ्या सासुबाई आणि माझा ५ महिन्याचा मुलगा असे आम्ही भारतात चाल्लो होतो. इथून निघून लंडन येईपर्यंत प्रवास बरा चालला होता. लंडनला उतरलो आणि घोषणा झाली की विमान आता इथे दीड तास थांबेल आणि साफ़ सफ़ाई झाली की पुन्हा उड्डाण. सगळ्यांची खाली उतरण्याची तयारी सुरू झाली तेवढ्यात पुन्हा घोषणा.. कोणी खाली उतरू नये. मग काय आम्ही बसुन राहिलो. ते सफ़ाई वाले लोक आले. आणि आम्ही आपले वरती पाय घेऊन बसलो. मग इकडच्या सीट वरुन तिकडे जा. हे झालं. आणि पुन्हा सांगितलं की ज्यांच्याकडे ट्रांसिट विसा असेल त्यानी खाली उतरा आणि ४५ मि. परत या. आम्ही म्हटलं की आम्हाला उतरून आता लगेच नाही येता येणार कारण सासुबाई वयस्कर, लहान बाळ. तरी आम्हाला बळं बळं उतरवलं आणि आमच्या गतीने आम्ही भोज्याला शिवुन पुन्हा आत येऊन बसलो. सगळा लळालोंबा करत नुस्तच ४५ मि. ची पायपीट करून आलो. पुन्हा प्रवास सुरु झाला. विमान दिल्ली ला आलं. बरीच मंडळी उतरली. आणि पुन्हा आपले सफ़ाई कामगार हजर. पुन्हा दीड तास सफ़ाई. आणि पहाटेचे २ वाजले असताना त्यांनी सांगितलं असतं तरी आम्हाला दिल्ली एअरपोर्ट चं दर्शन घ्यायची इच्छा नव्हती.कधी एकदा मुंबईला पोचू असं झालं होतं. हा झाला जातानाचा प्रकार.
येताना तर आणखी कहर. येताना लंडन ला विमान आल्यावर आम्ही अगदी तयारीत होतो खाली उतरायच्या. आणि ह्यावेळेस नवरा बरोबर होता म्हणुन बाळाल घेऊन जायचे कसं हे काही टेन्शन नव्हते. विमान थांबलं आम्ही आपलं वाट बघतोय की कधी खाली उतरा म्हणून सांगतील. २ तास झाले तरी पत्ता नाही. स्वछ्छता झाली, तरी काही सांगायला तयार नाही. आणि फ़ायनली २ तासानी सांगितलं की विमानात बिघाड आहे त्यामुळे बराच वेळ लागेल. कोणालाही खाली उतरता येणार नाही. आणि आम्ही ६ तास विमानात बसून कसे काढले ते सांगायलाच नको.
तेव्हा कानाला खडा लावला की अगदी फ़ुकट तिकिटं मिळाली तरी कधी एअर इंडीया नको रे बाप्पा!


Prasadp77
Friday, September 29, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch has many valid points here.
I have tried Alitalia, SAS, FinnAir, BA and Lufthansa so far on various routes.
1. Alitalia, sister of Air India, absolutely rude staff.
2. SAS & Finn Air, very polite staff. If you abide by the rules, you are the king.
3. BA and Lufthansa - Rude staff only in India, otherwise brilliant once you are in Europe.

Now Arch's points -

This was BA experience. There was a woman whose cabin luggage was of size mentioned but probably was loaded with iron bricks as she could not lift it up and put it in the bin so one european looking fella helped her out and his facial expressions were priceless. OK now, the luggage is in place but what the staffer notices that the bin has bent so he wonders whats in there that made bin to change its shape. He got the bag out and he didn't imagine the weight, he almost dropped it. He was totally furious.
Again in BA, when we were hopping off, one man in his late 50s, takes the blanket and asks staffer if I can take this one. She tells him, you are not allowed to take it and he almost begs. I wish he could be in his 20s, at least I could have passed some sniding remark.

Lufthansa - I was given the last seat, which was fixed and I had a hard time to sit in that RyanAir like seat so I asked one staffer if I could change the seat. She told me that the flight is full but if I find any free seat, I am free to change. Now there was one 50ish man (desi) whose next seats (happened to be window and middle seat in a row of 3) was free. I asked him if I could get in, He asks me WHY? I was like, what you have to do with it, still respectfully I told him my problem and he refuses (I was so furious) but I honestly felt shameful to complain so I sat quitely at my seat. After an hour, I see this guy lying flat on those 3 seats, trying to sleep. I really felt like bothering him so much that he won't sleep whole night but then only the staffer came over to me and asked me if I still wanted to change as the exchange was available with some other guy.

Overall, desis treat other desis with disrespect so as soon as you enter in flight to India, your attitude changes totally (at least mine) I don't know but few sort of carry some kind of superiority complex, don't know really why?

Arch, I partially disagree with you on 1st and 4th point, its everywhere. Staffers also do the same, may be not so often. Having said that, I don't mean to approve these gestures. They are certainly not good.

Zakki
Friday, September 29, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उशीराबाद्दल. मी मागे सहा महिन्यात नूवर्क ते डेटन १७ फेर्‍या केल्या. सत्रा पैकी १५ वेळी विमान २ ते ८ तास लेट! १० वेळी सीट नंबर देण्यात घोटाळे! फक्त उशीर झाल्यावर फुकट ड्रिंक्स द्यायचे, स्वारी स्वारी म्हणायचे!

मी एयर इंडियाने अनेकदा प्रवास केला. घाणेरड्या बाथरूम्स, चेकिंगच्या वेळी थोडासा गोंधळ हे होतेच. पण एरवी काही वाईट अनुभव नाहीत. पण तरी मी शक्यतो एयर इंडिया टाळतोच! इतर एयरलाईन्स मधेहि कधी कधी वाईट अनुभव येतात, पण त्या मानाने कमी एव्हढेच.

त्यातून आताशा भारतावर, भारतीयांबद्दल, वाईट लिहिले की इथले लोक मला फार रागावतात! 'भारताला वाईट म्हणायचे नाही. भारताचे सगळे छान छान!'



Apurv
Friday, September 29, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Singapore Airlines नी एकदाच प्रवास केला, छानच आहे...

Kalandar77
Friday, September 29, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sami, आम्ही Emirates ने गेलो होतो यावेळी भारतात.. एकदम मस्त airline! शिवाय तिकिटे पण AI पेक्षा स्वस्त होती!

Priyab
Friday, September 29, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च आणी प्रसाद च्या points शी मी agree करते
मला आलेला Northwest Airline च अनुभव
मागच्या वर्षी India त जाण्याचा योग आला मी आणि माझा मित्र Mumbai ल निघलो होतो मधे Amsterdam ल ४-५ तासांचा break होत जिथुन आम्हला flight change करायचे होते जेंव्हा परत आम्हि bording केले मी आणि माझा मित्र almost last होतो माझा मित्र त्याचि bag ठेवायला जागा शोधत होता..कारण आमच्या seat वरचे compartment भरलेले होते..
त्याला एका ठिकाणी एक bag सापडलि जी की अगदी आडवी करुन ठेवलेलि होति आणि सगळि जागा व्यापुन होति.त्याने ती just उभि केली आणि स्वतःची bag ठेवली तत तिथे बसलेले एक काका उठुन त्याच्याशी भांडायला लगले कि कोणाला विचतुन तु माझ्या bag ला हात लावला म्हणुन ते तर तिथे जोरजोरने ओरडायला लागले शेवटी Air Hostess ने येवुन त्यान गप्प बसवले.. तर बसल्या वर सुद्धा ते शिव्या च देत होते..बराच वेळ
दुसरा म्हणजे NWA ने Amsterdam हुन India ल परत जाताना तुम्हला drinks मिळतात free कि काय.. आमच्या बाजुला एक India पुण्याला जाणारा मुलगा बसला होता.. चांगला T-Mobile मधे कामाला होता..त्याच्या शेजारि माझा friend आणि मग मि असे ३ लोक बसलो होतो.. Amsderdam पासुन या मुलाने अगदि त्रस्त करुन सोडले Mumbai येइपर्यन्त ह्या प्राण्याने जे प्यायला सुरुवात केलि ते विचारु नका.. माझा friend त्याच्याशी बोलत होत तर या महाभागाने त्याला चित्रविचित्र प्रश्न विचारायला सुरु केले... काय रे girlfriend क तुझि म्हणुन त्याने त्रासवुन सोडले माझ्या friend ला..शेवटि वैतागुन माझ्या friend ने त्याला ignore केले
असे बरेच Indians weird वगतात आणि I think त्यानुसार त्यांना वागणुक मिळते...



Mbhure
Friday, September 29, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, शंभर टक्के अनुमोदन.

DELTA जेंव्हा नविन चालू झाली तेंव्हा मुंबईला उतरल्यावर कॅप्टनने कडक शब्दात सांगितले की विमान पुर्ण थांबल्याशिवाय कोणीही उठले तर दरवाजा उघडणार नाही. तसेच, सीट नंबरनुसारच उतरायचे. मध्येच कोणी उठले तर सर्वाना विमानातच बसावे लागेल. आणि अहो आश्चर्यम्, सर्व भारतिय गपचुप बसून होते आणि विमानातुन बाहेर पडायला अजिबात त्रास झाला नाही. हा पायलट कुठे गेला कोण जाणे? सर्व विमानात हे चालू करायला हवे. ट्रांझिटच्या वेळीही उतरताना लोकांना काय घाई असते कोण जाणे? काहीवेळा युरोपमधील प्रवाशांना कनेक्शन पकडायची घाई असते त्यामुळे ट्रांझीट प्रवाश्यांनी नंतर उतरण्यास काहीच हरकत नसते.

अजुन एक गोष्ट जाणवली ती अशी की, आपलेच लोक बर्‍याचदा एअरपोर्टवर बसले असताना, आपले सामान बाजुच्या सीटवर ठेवून उगाचच सीट अडवतात. गर्दीच्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो, पण त्यांना जाणवतही नाही.

फुकट असेल तर ढोसणारे आणि मग एअर हॉस्टेसला त्रास देणार अगदी Executive Class ला बघितले आहेत.

"This is the Largest Slum Area" हे लाळघोटेपणे गोर्‍यांना दाखवणारेही विमानात असतात.


Rupali_county
Friday, October 06, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूनाला क्वान्टास चा कसा अनूभव आला आहे ते सान्गाल का?

Rupali_county
Friday, October 06, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूनाला क्वान्टास चा कसा अनूभव आला आहे ते सान्गाल का?

Sahilshah
Friday, October 06, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच चागला,

२००२ सालची गोष्ट आहे
सिडनी हुन सिन्गापुरला येतना narrowly escaped from the collision of the two Quantas flight

पण service उत्तम होती. विमान त्यानी लगेच ब्रिस्बेन ला उतरवले २ वेळा खायला घातले A$ ५० ची Voucher पण दिली आणि नंतर दुसरा पायलट ते विमान घेउन singapore ला आले. (पहिला पायलट का नाही आला ते कळले नाही)


Milindaa
Friday, October 06, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. ..

Rupali_county
Monday, October 09, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार सशल

मिलिन्दा असे फ़िदि फ़िदि हस्ताय काय?


Milindaa
Monday, October 09, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, वरचा किस्सा वाचून हसु आवरले नाही म्हणून हसलो :-)

Paragkan
Monday, October 09, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Emirates is real good! Good clean flights and seats, good service, tasty food (just like desi) , lot of options in entertainment including Indian movies etc.

पण पुन्हा दुबईहून भारतात जाताना सगळं तेच. तिथे तर दुबईतली कामगार मंडळी खूप, त्यामुळे जास्तच होतात असे प्रकार. पण दोन अडीच तासच असल्याने चालतं.

Zakki
Monday, October 09, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात, जिथे जिथे भारतीय लोक असतील (म्हणजे आजकाल बहुधा सगळ्याच एअरलाइन्स वर,) तिथे तिथे जास्तच घाण, विशेषत: टॉयलेट्स मधे. म्हणजे इतरांच्या मानाने हो, नाहीतर लगेच म्हणाल, मी पंचवीस वेळा इतर लोकांबरोबर गेलो नि एकदा चक्क दोन मिनिटे ते टॉयलेट तसेच घाण होते!

Radha_gd1
Tuesday, October 10, 2006 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या वर्षी आम्हि चेन्नाई हून france ला जाताअना delta ने गेलो होतो. रात्री माझ्या मुलाला दूध मागितले तर ती ह. सु फणकार्‍याने म्हणाली की आम्ही दूध ठेवत नाही.मग मुलाला मी माझ्याकडे असलेले emergency साठीचे, bru instant cofee with milk powder चे pack गार पाण्यात ढवळ ढवळ ढवळून (ते गरम पाणी पण देत नाहीत) दूध म्हणून दिले.
हा अनुभव असल्यामुळे येताना मुद्दाम दूध आणले तर यावेळी दूध मिळाले.मला येताना १ तमिळ पण मुंबईतील असल्याने मराठी येणारी ह. सु. भेटली.तिला हे सांगितले तर ती म्हणाली कि कधी कधी सलग बरेच दिवस sorry रात्री flights केल्याने त्या ह.सु. कंटाळलेल्या असतात त्यामुळे मग त्या असे वागतात.
पण sing airlines best मागे korea आणि आत्ता us ला येताना अनुभव घेतला आहे. ह. सु. खरच सुंदर असतात आणि service पण चांगली देतात.
us ला येताना आधी delta मिळेल असे वाट्त होते. असे घडू नये असे मनापासून वाट्त होते. आणि नशिबाने sing airlines मिळाले.(हुश्श!!!)

air india चा अनुभव नाही आणी घ्यायची वेळ पण येऊ नये असे वाटते.(वरचे इतके बोलके किस्से वाचल्यावर)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators