Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 18, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through October 18, 2006 « Previous Next »

Chaffa
Monday, September 25, 2006 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक किस्सा टाकावासा वाटतो.
आमची रिसेप्शनिस्ट गोयंकर आहे.पण मराठी छान बोलते(आणी कोकणीतुन शिव्या पण छानच देते) तिच्या बाबतित नेहमी एक गोष्ट घडते ती म्हणजे तिच्या फाईल मधुन झुरळे निघणे. अजुन तरी तिला कळले नहिये पण खास तिच्याकरता मला कधि कधी झुरळे बाहेरुन आणावी लागतात.


Lopamudraa
Tuesday, September 26, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. ... ... ... ... ..

Rupali_rahul
Tuesday, September 26, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा फ़ोन नंबर दे बघु तिचा...

Chaffa
Wednesday, September 27, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक किस्सा
माझा एक शेजारी होता त्याला अत्यंत वाईट सवय. म्हणजे काहिही झालं तरी मला विचारायला येणार, आपको ऐसा हुवा था तो आपने क्या किया जणु त्याच्या बाबतित घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्या बाबतित घडुन गेलेली असते (अरे मी काय अनंत काळा पासुन ईथे आहे? )
आणी सल्ला दिला की लगेच प्रयोग करुन पहाणार. वर येउन सांगणार "मेरे साथ ऐसा हुवा आपके साथ क्या हुवा था ?"
एकदा महाशय बाथरुम मध्ये धडपडले कपाळावर जखम, आणी वर छाऽऽऽनसे टेंगुळ, आला मला विचारायला आपके साथ ऐसा हुवा तो आपने क्या किया ? (च्यायला मी काय बाथरुम मधे सारखा पडत असतो काय?) म्हंटलं मैने आयोडेक्स लगाया था!! गेलं येडं आणी विस मिनिटात परत, सगळा चेहरा लालबुंद डोळ्यातुन पाणी (जखमेवर आयोडेक्स लावले की काय होतं ते ज्यांनी लाउन पाहिलेय त्यांना माहित असेल. नसल्यास प्रयोग करुन पहाणे) येउन विचारतोय मेरे सरमे बहुत जलन हो रही है आपके साथ क्या हुवा था? (मारी टोपी पुन्हा आहेच ) म्हंटलं ' मेरे साथ भी ऐसाही हुवा था". बिचारा परत बरेच दिवस काऽऽही विचारायला आला नाही.



Chaffa
Wednesday, October 04, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एकदम नवा किस्सा:

माझा एक अत्यंत खोडकर सहकारी आहे त्याच्या खोडकर असण्या बद्दल आपलं काही म्हणणं नाही पण साला माझ्याच खोड्या काढण्यात त्याला आनंद वाटतो सारखे काहिना काही उपद्व्याप करुन मला छळत असतो. माझा बरेच दिवस त्याच्यावर डोळा होता आज सापडला कचाट्यात.
आज त्याचा वाईट दिवस असावा.!! सकाळीच माझ्या MB मधलं सिम त्याने बदलवुन त्याचे सिम टाकले (हे उद्द्योग बरेच दिवस चालू आहेत,हा सिम बदलणार आणी ह्याच्या कॉलनितले फोनवर तो समजुन मला झापणार कारण दिवसागणीक एक राडा तरी ह्याची मुले त्याच्या कॉलनीत करत असतात. आणी सबंध दिवसात येणार्‍या माझ्या फोनचा खोळंबा होतो तो वेगळाच)
आज पठ्ठ्या हौसेनं सिमची अदलाबदली करुन गेला आणी पाचच मिनिटात त्याला TM ने बोलावला. विस पंचविस मिनीटांनी स्वारी बाहेर आली तेंव्हा साफ कारगील युद्धातुन आल्यासारखा वाटत होता. .........पण खरा फटका नंतरच बसायचा होता. नंतर Conference hall मध्ये Presentation करताना बहाद्दर त्यांच्या Achievement च्या स्लाईड दाखवत होते एकाएकी एका स्लाईडमध्ये त्याचा स्वतचीच गाडी धुतानाचा फोतो आला(दसर्‍याच्यादिवशी मी हळूच घेतला ) आणी आख्खा हॉल हसण्याने दणाणला कारण त्याच्या आधिचि स्लाइड होतॉ My contribution . वाट आहे त्याची दोन दिवस तरी मान वर करता येणार नाही........


Kiru
Wednesday, October 04, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़्या, नशीब रे बाबा.. फोटो गाडीच धुतानाचा काढला होतास..

Dineshvs
Wednesday, October 04, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या ऑफ़िसमधे एक चष्मा घालणारी मुलगी आहे, पण तिला तो फक्त पीसीवर काम करतानाच लागतो.
एरवी टेबलवर काढुन ठेवुन ती फिरत असते.
आज दुपारी मी तो उचलुन तिच्याच पर्समधे टाकला. तिची शोधाशोध सुरु झाल्यावर, सगळ्यानी तुला चष्मा घातलेली सकाळपासुन बघितलच नाही, असे खात्रीने सांगितले. सगळ्यानी आपापले ड्रॉवर्स उघडुन दाखवले. मी तिचाहि दाखवला.
तिने घरी, बसमधल्या मैत्रीणीला, सगळ्याना फोन करुन विचारले.
आणि शेवटपर्यंत तिने स्वतःची पर्स बघितली नाही. उद्या काय होणार ते माहित नाही.


Kedarjoshi
Wednesday, October 04, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हॉस्टेल वर राहने म्हणजे एक गंमत असते. एकदातरी हॉस्टेल वर राहायलाच पाहीजे.
डिंसेबर मधील एका दिवशी मी अगदी मन लावुन अभ्यास करत होतो. (परिक्षा असल्यामुळे). माझा रुमी अली (माझ्याच गावचा व जवळचा मित्र) नांदेड ला गेला होता व तो आज उगवनार होता. त्याचा एक मित्र होता त्याचे नाव पोपटलाल. हा व्यक्ती मला अजिबात आवडायचा नाही. पण अली ने पोपट मध्ये काय पाहीले काय माहीत. सकाळ झाली तो आमच्या रुम वर येऊन टिपी करायचा.
परिक्षा असल्यामुळे मी प्रेमाने त्याला सांगीतले की बाबा ईकडे येऊ नको. पण तरीही तो रुम वर यायचाच.
अली आज येनार होता पण तो आला नाही व त्याने तसे काही कळविले पण नाही. पोपट्या मात्र लगेच आला सकाळी ७ वाजता. जाम चिडलो मी. त्याला सांगीतले की तो आला नाही. पोपट गेला व ११ वाजता आला परत सांगीतले की तो आला नाही. २ वाज्ता आला नंतर परत ५ वाजताही आला. आता मी जाम वैतागलो होतो.

त्याला सांगीतले की अली आला, तो तुझ्याकडे जाताना त्याचा accident झाला व पायाला खूप मार लागला आहे तो हॉस्पीटल मध्ये गेला आहे. एवढे ऐकुन पोपट गेला. परत एक दोन तासाने आला व म्हणाला अरे अली कोनत्या दवाखान्यात आहे. त्याचे पुर्न नाव काय आहे. मी त्याला सांगीतले तो पुणा हॉस्पीटल मधे आहे व त्याचे पुर्ण नावा मोईनोद्दीन अली आहे.
तो निघुन गेला मला वाटल संपले आता तरी ब्याद गेली. पण नाही.

पोप्ट महाशयानी आम्हा दोघांचा सर्व मित्रांना फोन करुन सांगीतले की अली ला पाय गमवावा लागनार व त्याचे ऑपरेशन पुणा हॉस्पीटल मधे आहे. झाले सर्व मित्र पुणा हॉस्पीटल जवळ जमा झाले पण त्यांना अलीचे नावच यादीत सापडेना.
दोघेजन माझ्या कडे पर आले व अली बद्दल विचारु लागले. एका मैत्रीनीने खिचडी पण करुन आणली.
त्यांना मग मी सांगीतले की अरे बाबानु त्या पोपट्याचा पिच्छा सोडविन्यासाठी मी चिडुन तसे सांगीतले. पण पोपट हा नावाप्रमानेच पोपट निघाला त्याने सर्वांना गोंधळात टाकले.
पुढे अली आल्यावर त्यालाही समजले की त्याचा पाय कापुन टाकन्यात आला आहे म्हणुन.


Tibli
Wednesday, October 04, 2006 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे नविनच आहे. इब्लिस्पणाच्या गोष्टी वाचुन मस्त वाटल एकदम! माझीही एक गोष्ट लिहिते यामधे.
मी कॉलेज मधे असताना तम्बुमधील शिबिर घ्यायचे. अश्याच एका शिबिरात आम्ही सगळ्या प्रमुखानी गम्मत करायची ठरवल. रात्री सगळे शिबिरार्थि झोपल्यावर आम्ही ५-६ मुख्य घड्याळे पुढे करुन ठेवली. आणि रात्रीच्या २ वाजता सगळ्याना उठवले आणि सांगितले आवरा लवकर आज उशिर झाला आहे उठायला. तंबुतले शिबिर गावाबाहेर असते आणि तिथे लाइट चा काही सोर्स हि नसतो त्यामुळे घड्याळ ही कोणी बघितले नसावे. सगळ्याजणी बिचार्‍या आंघोळ करुन तयार झाल्या आणि योगासनांसाठी आल्या. नेहेमी यावेळी सुर्योदय होत असे. त्यामुळे सगळे आपापसात चर्चा करु लागले. मग आम्ही सगळ्याना सांगितले कि आत्ताशी रात्रीचे २.३० वाजले आहेत आम्ही तुमची मजा केली. मग सगळ्यानी जो आरडा ओरडा केला आहे विचारु नका.

असे अनेक किस्से आहेत. अजुन काही पुढच्या वेळेला.


Bee
Thursday, October 05, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदारचा आणि टिब्लिचा इब्लीसपणा जरा जास्तच महागात पडणारा वाटला.

एकदा April fool असताना, मी ममता नावाच्या माझ्या कलीगचे Keyboard दुसर्‍या monitor शेजारी ठेवले आणि त्या monitor चे keyboard ह्या monitor शेजरा ठेवले. दोन्ही monitors एकमेकांच्या पाठिला पाठ चिकटवून होती. माझ्या कलीगला काही केला ctrl-alt-del type होईना. त्यादिवशी मी नेमका एक तास उशिरा आलो. हे सर्व मी रात्रीलाच करुन ठेवले होते. त्यातला एक जो PC होता तो माझा होता. तिला बिचारीला एक तासभर प्रयत्न करुनही लक्षात आले नाही की monitor ची अदलाबदल झाली आहे. समोर IT customer support चे engineer बसले होते. त्यांनाही हा प्रकार लक्षात आला नाही. मग April fool केले असे सांगितले तेंव्हा तिने sportingly घेण्या ऐवजी boss ला complaint करते असे सांगितले. पण केली नाही. संध्याकाळी ती मला भेटली तेंव्हा रागानी बघत होती. घरी जाता जाता मी तिला तंबी दिली.. तुला April fool उगाच केले कारण तू तशीच मुर्ख आहे. मी असे म्हंटले आणि ती खळखळून हसायला लागली.


Chyayla
Thursday, October 05, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भारतात असताना ऑर्डिनन्स फ़क्टरी मधे सिस्टीम ईन्जिनीयर म्हणुन सप्पोर्ट देत होतो, तिथे लन्च टाईम मधे आमच्या IT office मधे काही लोक spider game खेळायचे मी आणी माझा ज्युनियर आम्ही सर्वर रुम मधे बसायचो, आम्ही VNC चे सॉफ़्टवेयर कॉम्पुटर वर लोड केले होते जेणेकरुन आम्हाला Network मधल्या कॉम्पुटर वर दुर बसुन किबोर्ड व माउस द्वारे कन्ट्रोल करता येत होते, ते त्याना माहित नव्हते.
त्यान्नी जसा गेम सुरु केला तसे आम्हीच त्यान्चा गेम खेळुन घ्यायचो किन्वा पुर्ण गेम बिघडवायचा, ते बिचारे आपोआप पत्ते सरकताना बघुन घाबरुन जायचे ही काय भुताटकी आहे म्हणुन कॉम्पुटर बन्द. काही दिवसान्नी कोणी हळुच आम्हाला कम्प्लेन्ट करायचा की त्याच्या कॉम्पुटर वर पत्ते आपोआप सरकतात आम्ही त्यान्ना सान्गायचो की असे शक्यच नाही तुम्हाला काही भास झाला असेल वैगेरे, काही झणान्नी कम्प्लेन्ट केली की व्हायरस आहे. पण हा प्रकार बरेच दिवस चालला त्यान्नी खुप प्रयोग केले एकामेकाला दाखवले व ह्या प्रकाराची चर्चा पण सुरु केली. आम्ही आपले त्यान्चे भाम्बावलेले चेहरे पाहुन मजा घ्यायचो. शेवटी एक जाणकार व्यक्ती तिथे आली आणी त्याच्या लक्षात आल, व मग आमच बिन्ग फ़ुटल त्यानन्तर एकच हास्यधमाल उडाली, जो तो स्वत: कसा घाबरला व काय काय विचार करत होता ते सान्गु लागला. काय मज्जा यायची तेन्व्हा.

पण बी च्या पोस्ट मधल्या सारखी खळ्खळुन हसणारी कोणी नव्हती तीथे


Rupali_rahul
Saturday, October 07, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

६-७ वर्षापुर्वींची गोष्ट. माझी आई पलीला खुप घाबरते. तिचि भिती घालवीण्यासाठी मी एक प्लान आखला. तेव्हा रसनाच्या पॅकबरोबर छोटेछोटे खोटे किटक मिळायचे( कोळि, पाल, झुरळ). त्यात माझ्या एका मैत्रिणिला खोटी पाल मिळली होती. तिला पण माझ्या आईला पालीची कित्ति भिती वाटते हे माहित होते. एकदा मी तिल ती खोटी पाल आणायला सांगितली. आईच्या नकळत हळुच ती मी स्वयंपाकाच्य आ ओट्यावर तिला दिसेलशी ठेवुन दिली. (ती खाली बसुन पीठ मळत होती, म्हणजे ती उठेल तेव्हा तिला दिसेल अशीच व्यवस्था केली होती ) पण खुप वेळ झाला काही आरडओरडा न करता ती बाहेर आली. तिने तिला बघितलेच नव्हते आत्ता परत कसेही करुन आईला स्वयंपाक घरात पाठवायचे होते म्हणुन मी तिल मला थंड पाणी हवे म्हणुन संगितले. त्याप्रमाणे ती आत गेली आणि तिने ती पाल बघुन आरडओरड सुरु केला की," आत पाल आहे ओट्यावर म्हणुन," इथे आमची सगळ्यांची म्हणजे माझ्या भावाची, माझी, मैत्रिणिची हसुन हसुन मुरकुंडी वळली. तिला समजावले,"आग ती खोटी पाल आहे घाबरतेस काय?? हे बघ मी हातात उचलते". तरिहि ती घाबरतच होती... आणि मला माझ हसण कंट्रोल होत नव्हत. हसुन हसुन शेवटी डोळ्यात पाणी आल पण तिची भीती काही केल्या गेली नाही.

काल पण मी घरी होते तेव्ह घराबाहेर कचरा काढताना पाल मरुन पडली होती. मला खुप मस्क लावुनही मी सांगितले की तुलाच फ़ेकायची अहे ती. तरिहि त्या मेलेल्या पालीला फ़ेकुन द्यायला तिने १५-२० मिनिटे लावली. तेही भरपुर समजाविल्यानं तर डोळे बंद करुनच...


Chaffa
Friday, October 13, 2006 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता आलोय तर एक होउनच जाउदे. !!(किस्सा)

कॉलेजला असतानाची गोष्ट आहे.
आमचे एक विद्वान मित्र कायम सर्दीने पछाडलेले असायचे, केंव्हाही बघावं तर इन्हेलर या प्राण्याच्या नाकात घुसलेला असायचा, नेहमी नाकपुर लाईन बंद. असंच वाटलं खेचावी जरा याची, घरातुन जुना इन्हेलर शोधुन काढला त्यात महाप्रयत्न करुन तपकिर भरली दुसर्‍या दिवशी संधी साधुन त्याच्या इन्हेलरशी हा स्पेशल इन्हेलर बदलला दहाच मिनिटं गेली आणी वर्गात शिंकाची आतिषबाजी सुरु. लेक्चरचा बट्याबोळ, आणी ह्या छत्रपतींची कहाणी त्याहुन विदारक वगैरे..... डोळे पाण्याने वाहून जातायत, चेहरा पार वाकडां नाकाची कहाणी तर विचारु नये.!!!! (बहूतेक पुर्‍या महिन्याची सर्दी एकदम बाहेर पडली असेल.)
एकंदर प्रकार लक्षात आल्यावर बहाद्दराने इन्हेलर प्रकरण कधी कॉलेजमधे तरी आणले नाही आख्खी व्हीक्सची डबीच आणायला लागला.


Chaffa
Saturday, October 14, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉलेजच्या आठवणी निघाल्यात तर आणखी एक किस्सा. आता हा मी लिहितोय कारण मी त्यातुन वाचलो होतो.
आमच्या ग्रुप मधे एक मुलगी होती रत्नागिरी तिचे मुळ गाव पक्की अन्नपुर्णा इतके छान छान पदार्थ करायची की वा.!!!!!!!!!
आणी काही नविन पदार्थ केला की डबा घेउनच यायची (हे मुळ कारण वाहवा करायचं)
तिला कसे काय ते सगळ्यांची खेचायचा मुड आला कुणास ठाउक. तिने डबा आणला वड्या होत्या, छान दिसत होत्या. फणसाच्या (गरे सोडून जो भाग उरतो त्याच्या नाव नाही माहीती ) बनवल्या होत्या. तिने डबा उघडला मात्र आमचं टोळकं तुटून पडलं त्याचावर हातातल्या वह्या ठेउन मी त्यांच्यात घुसखोरी करेपर्यंत एकच वडी उरली आणी त्यावरुन आणखी एकाशी वाद. म्हंटलं वाटून घेउ आणी वडी तोडे पर्यंत बाकी सगळे तोबरे भरुन मोकळे. आणी बस रे बस गोंधळच गोंधळ सगळा सगळ्यांची तोंडं पहाण्यालायक तोंडात हाऽऽऽ चिकट घोळ ओठ दात सगळेच चिकटायला लागले तो फणसातला बाकिचा भाग भयंकर चिकट असतो हे तो पर्यंत कुणालाच माहित नव्हते. (ज्यांनी फणस कापताना बघितलाय त्यांना माहीत असेल ) बरं ते प्रकरण पाण्याने निघत नाही त्याला गोडेतेल लावावे लागते. सगळाच लोच्या तेवढ्यात या प्रकाराच्या कर्त्या करवत्या आल्या. तिने तेल आणले होते ते दिल्यावर एकेकाची सुटका. मी वाचलो कारण त्याच वडी वरुन भांडत होतो ना.!!!!!


Chyayla
Saturday, October 14, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा हा दिल्लीला नौकरीनिमीत्य असतान्नाचा ईब्लिसपणा, दिल्लीला मी एका सरदारजीकडे पेयिन्ग गेस्ट म्हणुन रहायचो, खाली मिल्ट्री रिटायर्ड सरदारजी आणी त्यान्ची पत्नी "पर्मिन्दर" आम्ही त्यान्ना आन्टीजी म्हणायचो, वरती आम्ही ४ मित्र वेगवेगळ्या खोलीत रहायचो.

एक दिवस, मस्त रविवार होता, आम्हाला कळाले की आन्टिजीचा वाढादिवस आदल्या रात्री झाला, झाल आता आपण ही त्यान्ना शुभेछा: देउ म्हणुन विचार केला अर्थात ईब्लिस शुभेछा: मी माझ्या मोबाईल वरुन खाली फ़ोन लावला. अन्कलजी फ़ोनवर...

अन्कल्: हेल्लो
मी: हेल्लो अजी परमिन्दर है, मैनु उसका दोस्त लुधियाना से (म्हातारीला कोण मित्र म्हनून अन्कल्जी बिचकले तरी त्यान्नी आवाज देउन फ़ोनवर बोलावले)

मी: हाय परमिन्दर कितणे दिणो के बाद बात हो रही हैन्दी
आन्टी: कौन बोल रहा है ऑ
मी: अरी मुझे नही पैचाना....? मैनु बलजीत लुधियानासे, प्यारसे तुम मुझे बल्लु बुलाती थी याद आया...? मुझे तेरा बर्थडे अभीभी याद है, इस्लिये फ़ोन किया हु, माफ़ करना कल मै फ़ोन नही कर पाया था, आज कर रहा हु
आन्टी: कौन बल्लु मैनु किसी बल्लु को नही जानती.
मी: परमिन्दर क्यो नाराज होती हो? मुझे याद है जब तुम १६ की थी और मैने गलतीसे उस बर्थडे पे २४ फ़ुल दिये थे, और तुम मुझसे बेहद गुस्सा हुई थी और आजतक बात नही की.
आन्टी: (एकदम रागात येउन) शट अप..यु स्टुपिड!!! आय डोन्ट नो हु यु आर टॉकिन्ग?
मी: परमिन्दर प्लीज ऐसा मत कहो

आन्टीना भयन्कर राग आलेला, अन्कल ला घाम फ़ुटलेला व बीपी वाढु लागलेला मग म्हटल आता अजुन खेचण्यात अर्थ नाही. व मित्राला फ़ोन दिला म्हटल तु बोल आता त्याला हा प्रकार पाहुन हसु आवरेना तो हसतच फ़ोन वर बोलला आन्टीजी रीलेक्स ये अपना समीर बोल रहा था "हप्पी बर्थडे"

शेवटी ते दोघे पण वरती मिठाई आणी केक घेउन आले व धमाल हसायला लागले. व कसे टेन्शन आले होते वैगेरे सान्गायला लागले.
आन्टी खिलाडु निघाल्या "बेटा आज तुम्हारे वजह से थोडी हसी तो आ गई"
आणी अन्कल "मै तो सोच रहा था ईस उमर मे ये इसके दोस्त के साथ भाग गई तो मेरा क्या होगा?"

मग काय सगळ्यान्ची ह. ह. पु. वा.


Rajeshad
Tuesday, October 17, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा मी स्वत:वरच केलेला इब्लिसपणा. काल रात्री झोपण्याआधी पत्नीला चहा प्यायची लहर आली व मला नाकारता येणार नाही अशी विनंती कम आज्ञा (ज्यादा) तिने मला केली. मला उगिचच तो चहा जरा जास्त चवदार करायची लहर आली. मी नेहमीप्रमणे कुटुन आलं टाकलं व तिचं लक्ष नाही हे पाहून अगदी थोडी जायफळाची पूड ही टाकली. हे करण्यामागचा हेतू मुख्यत: तिला ते लक्षात येतं आहे का नाही हे पहाणे (व कदाचित या BB चा परिणाम!) हा होता कारण नेहमीच्या गोष्टींमधे जरा बदल झाला की तिला चटकन लक्षात येतं. मी चहा पित असताना तिच्याकडे पहात होतो पण सुदैवाने तिच्या ध्यानात हा बदल काही आला नाही. आम्ही नेहमीप्रमाणे झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली तर ती चडफडत तयार होत होती व मला म्हणाली आजकाल दिवस लहान होत असल्याने आज सकाळी जागच आली नाही. मी खरे कारण काही सकाळी सकाळी सांगण्याचे धाडस केले नाही. पण सोमवारीच आमच्या दोघांच्या कामावरती सकाळच्या मिटींग्स बुडाल्या होत्या.

Kaviash
Wednesday, October 18, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीन चार वर्षापुर्वी, मी आणि माझी १ मैत्रिण एका वर्कशाॅप साठी गेलो होतो. तिथे १ मुलगा जरा जास्तच मुलींच्या पुढे पुढे करत होता. ओळख करुन घेण्याचा पण प्रयत्न चालला होता त्याचा. जरा जास्तच ओव्हर काँन्फ़ीडन्ट होता. मुलींकडे बघुन चिडवुन हसणे, कमेंट करणे असे प्रकार चालु होते. आम्ही या मुलाचा पोपट करायच ठरवल.

त्याच्या बुटांकडे आणि पॅन्ट कडे बघायच आणी एकमेकींकडे बघुन हसायच. आधी आम्ही हळु हळु हसायचो. जस त्याच्या लक्षात यायला लागल, तस आम्ही जास्त हसायला लागलो. तो
consious झाला होता. तो आमच्या कडे बघाताना दिसला, की परत त्याच्या बुटांकडे आणि पॅन्ट कडे एकटक बघायच. आता तर आम्ही एकमेकींना टाळ्या देवुन हसत होतो. त्याच्या काँन्फ़ीडन्स च पुर्ण खच्चीकरण झाल होत. बिचारा एकदम मागच्या खुर्चीवर जावुन बसला. आम्ही पण मागे जावुन त्याला निरखु लागलो.

शेवटी तो आमच्या कडे आला आणि त्यानी विचारल की माझ्या ड्रेस मधे काही प्राॅब्लेम आहे का? आम्ही, आम्हाला का विचारतो आहेस असा आव आणुन त्याच्याकडे दुर्लक्ष केल. पण तो परत जाताना पुन्हा टाळ्या देवुन हसलो. बिचारा.... नतंर मात्र त्याला त्रास दिला नाही.


Lopamudraa
Thursday, October 19, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा.. नानेटीचा प्रकार खरच महा ईब्लिस झाला... बर... ..
आम्ही सुट्टीत मामाच्या गावाला... काही गमती जमती करात असु.. मामा आमच्यात बरोबरीने खेळायचा.. तो आमच्यात लहान मुल होउन रहायचा.. एकदा.. तो झोपला असताना.. आम्ही त्याच्या तोंडाला... थोडीशी कोळसा पावडर लावली..(त्याच्या रूममध्ये मोठ्ठे आरसे होते, उठल्यावर आरशातच लक्ष जायचे आधी) आणी लपुन बसलो दारामागे.. आम्ही ५..६ जन होतो.. प्रत्येकाने मी पण मी पण म्हणत दोन दोन बोट काळी पावडर लावली.. आणि अजुन कसा.. उठत नाही म्हणुन आम्ही बघायला.. थोडेपुढे झालो...... तो डोळे मिटुनच म्हणतो.. अजुन कोणाला काही लावायचे राहिले नसेल तर उठु का?....
..


Swa_26
Thursday, October 19, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक आमचा लिम्बुटिंबु (छोटासा) इब्लीसपणा
आधी ज्यांना सतवायचे असेल त्यांच्या घरच्या वस्तूंचे मेक बघून ठेवायचे. (होमवर्क चांगले करुन मगच सुरुवात).. नंतर मग कोणाच्या तरी घरुन शेजारच्याच घरी फोन लावायचा आणि विचारायचे.. "मी अमुक कंपनीतून बोलतेय, तुमचा फ़्रिज चालतोय का?"
समोरुन उत्तर आले की 'हो' म्हणून कि मग बोलायचे, "अरे मग पकडून ठेवा त्याला नाहीतर पळून जाईल ना !!''


Zakki
Thursday, October 19, 2006 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्वत: अगदी फारच गंभीर प्रकृतीचा माणूस आहे. इब्लिसपणा वगैरे जमत नाही. पण काही काही गोष्टी पाहिल्या. उदा. बरोबरीने गाडीतून जात असताना पॅसेंजरने शेजारच्या गाडीच्या चाकांकडे पहायचे. असे बराच वेळ पाहिल्यावर त्यांचे लक्ष गेले की हाताने काहीतरी फिरतय् अशी खूण करायची. मग कुठे दिव्याला थांबल्यावर त्याने विचारले काय, की अत्यंत गंभीर चेहेरा करून सांगायचे, 'तुमच्या गाडीची चाके फिरताहेत', नि मग कुठेतरी वळून जायचे. बराच वेळ कित्येकांच्या लक्षात येत नाही. ते बिचारे खाली उतरून बघतात चाकाला काय झाले?

जिथे मी शिकवायला जात असे, तिथे एक रिकामी खोली होती. एक वाह्यात् मुलगा इतरांना सांगे, त्या खोलीत एक माऊस आहे, काळा, छोटा. त्याच्या अंगावरून हात फिरवला तरी तो काही करत नाही. आता बर्‍याच जणांना उंदराची भीति, ते कसे बसे घाबरत घाबरत आत जाऊन पहायला तयार होतात. नि मग हा त्यांना घेऊन खोलीतला कॉम्प्युटरचा माउस दाखवतो!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators