Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through September 28, 2006 « Previous Next »

Storvi
Thursday, September 28, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असंच काही नाही. मी एकदा AI ने गेले असता ती हवाई सुंदरी एका माणसाबरोबर flirt करत बसलेली ( तो भारतीयच होता ) आणि ती बाकीच्यांनी काही मागितले तर इतका त्रस्त चेहरा करत होती की माझी काही मागण्याची हिम्मतच नाही झाली :-O

पण असा अनुभव मी इतरही ठिकाणी घेतला आहे. मागच्या वर्षी Korean ने भारतात गेले होते. परतीच्या प्रवसात, विमान खुप भरलेले होते. मी bassinet मागितले होते सो मला पुढची सीट मिळाली. पण आणखी एका कुटूम्बालाही ते पुढच सीट मिळाल होतं त्या समोर्च्य सीट्स मध्ये ते चार लोक होते. बाळाचं त्यांनी तिकीट काढलेल नव्हतं सो एक सीट रिकामं होतं. त्याबाईने खुशाल आपल्या मुलाला तिथे ठेवल ( ही बाई कोरीयन होती ) . आता हे मलाही करता आलं असतं पण आम्ही पडलो सभ्य, इतरांचा विचार वगैरे करणारे. आणि त्यांची एक सीट बॅसिनेट समोर होती आणी मीही बॅसिनेट मागितल्याने तीच्या नवर्याला कडेची सीट होती. मग एवढे करून तिने ह. सु. ला सांगितले आमची family split होते ह्य बाईला हलव. अरेcचा? आणि ती बाई मला म्हणते तु कडेला बस. म्हटलं मुळीच बसणार नाही. मी बॅसिनेट मागितलय मी बॅसिनेट समोरच बस्णार. नाःइतर पोरीला कुठे ठेउ? त्यांना ही जागा हवीच असेल तर मला दुसरीकडे दोन सीट्स रिकाम्या दे तरच मी इथुन हलीन. पण त्या बाईला खुSः करण्याच्या नादात ह्या ह.सु. ने एका गोर्या ग्रुहस्थाला हलवायला लावले, त्याला माझ्या ऐवजी कडेची सीट दिली, मग मला तिथल्या दोन सीट्स दिल्या. हे सगळा का तर त्यांच्या परिवाराला एकत्र बसायच होतं. मला बरच झालं मागुन सुद्ध दोन सीट्स मिळाल्याच नस्त्या, आणि आरोही तशी सारावेळ बॅसिनेट मध्ये बसली नसती, आणि मावतही नव्हती. आणि turbulance इतका होता, की सारखा तिला cover करून पाठाण मोडलं असता ( येताना पाठीचा पार भुगा झालेला )


Kalandar77
Thursday, September 28, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टो, का sss ही कळलं नाही! कोण कुठे बसलं होतं ते परत सांग!

>> मी एकदा AI ने गेले असता ती हवाई सुंदरी एका माणसाबरोबर flirt करत बसलेली

LOL! मी पहिल्यांदा अमेरिकेत येत असताना तर Air India मधील एक हवाईसुंदरी आणि एक हवाईसुंदर यांची जेवण झाल्यावर मंद दिव्यांमध्ये 'मुखशुद्धी' चालु होती मधल्या जागेत अर्धवट पडदा लावुन! :-) मी म्हटलं, शिव शिव, अमेरिका यायच्या आधीच अश्या गोष्टी सुरु! :-)

मला व्यक्तिश: Air India चा म्हणावा असा वाईट अनुभव आला नाहीये, पण त्यांचे safety issues एवढ्यात बरेच वाचण्यात आल्यामुळे AI ने जाणे बंद केले आहे.


Rachana_barve
Thursday, September 28, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यात चांगली सर्व्हीस मला तरी सिंगापुर airlines ची वाटली. बाकी कोरीयन सगळ्यात जवळची म्हणून गेले होते पण मधे सेउल ला ते जो काही प्रकार करतात तो काही कळला नाही उगीच उतरून रांगेत उभ राहून परत फ़्लाईट मध्ये चढायच.

Dinesh77
Thursday, September 28, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी,
मला तरी एअर इंडियाचा असा काही अनुभव आलेला नाही. आत्तापर्यंत ५ वेळा विमानात बसायचा प्रसंग आलेला आहे. पण एअर इंडिया सर्वोत्तम.
खरोखरीच सुंदर असलेल्या हवाई सुंदर्‍या, तरुण, व्यवस्थित साडी, काहिही मागितले तरी हसुन देणे आणि अतिशय स्वादिष्ट जेवण.
कदाचित अपवाद असावा किंवा सौजन्य सप्ताह चालु असावा.


Sashal
Thursday, September 28, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं पण रचना, Singapore चाही refuelling halt असतोच सोल मध्ये आणि मग security check करायला लावतातच परत .. मला तर ते बरं वाटतं .. साडे बारा तासांच्या flight नंतर किमान पाय मोकळे करायला मिळतात .. बरंच आहे एका अर्थी ते ..

Rachana_barve
Thursday, September 28, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो विसरलेच होते. :-O बरोबर बरोबर

Milindaa
Thursday, September 28, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहिही मागितले तरी हसुन देणे <<<
दिनेश, असं वाटलं म्हणजे तुमचं विमान पण उंच असणार

मला वैयक्तिक अजिबात वाईट अनुभव नाही एअर इंडीया चा, पण हसून सर्व्हीस म्हणजे हॅ हॅ हॅ (असामी असामी मधल्यासारखं हसतो)



Moodi
Thursday, September 28, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हसून सर्व्हीस देतात की नाही आठवत नाही. हं जेवण झकास असते, छोले काय मऽऽस्त असतात. मी पहिल्यांदा आले तेव्हा त्या ह. सु. ला लंडनला उतरण्या आधी फॉर्म मागीतला तर ती आ वासुन बघायला लागली, तुम्ही लंडनला उतरणार? तिने विचारले, (मी मनात म्हटले, विमान शिकागोला चालले म्हणून मी पण काय पुढचा प्रवास फुकट करु का?) कारण तिने सर्वांना नुकतेच खाणे दिले होते.

आता मी फुकट खाल्ले असा तिचा गैरसमज असेल तर असो.( तिने कुठे सांगीतले की लंडनला उतरणार्‍यांनी आधी सांगा म्हणजे आम्ही अर्ध्याच प्रवाशांना खाणे देऊ) पण या लोकांना माहीत असतेच की कोण कुठे उतरणार ते.



Dinesh77
Thursday, September 28, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा,
अहो नाही हो, त्या विमानाच्या वाटेलाही गेलेलो नाही अजुन.


Storvi
Thursday, September 28, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अहो नाही हो, त्या विमानाच्या वाटेलाही गेलेलो नाही अजुन.
>>जाऊदेखिल नका... आताच ही अवस्था अहे तर त्या वाटेला गेल्यावर ' आधीच मर्कट ' व्हायचे

Sami
Thursday, September 28, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, सर्वात सुंदर असलेल्या हवाई सुंदर्‍या नेहमीच नसतात काही AI मधे... मी आणि माझा नवरा एकदा उत्साहाने AI ने गेलो होतो मुंबई ते दुबई... नवर्‍याला फार आशा होती. पण आमच्या वाट्याला एक जाडिअम्मा आली होती कोणीतरी south indian होती... juice चा ग्लास देताना सुद्धा वाकणं जड झालेलं तिला. मला वाटतं काही काहीच सेक्टर्स ना छान छान ह.सु पाठवत असावेत. :-p

Deepanjali
Thursday, September 28, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना - सशाल ,
खरच Singapore Airlines is the best..! आणि कॅथे पॅसिफ़िक चा पण चांगला अनुभव ऐकला बर्‍याच लोकां कडून ( बहुतेक हवाई सुंदर्‍यांचा चा महिमा ) :-)



Swaatee_ambole
Thursday, September 28, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग सुंदर नसतात तर हवाई सुंदरी का बरं म्हणत असावेत? उपहासाने तर नव्हे? त्या पुरुषांना कोणी हवाई सुंदर म्हणत नाही ते?

बाकी, मलाही AI चा वाईटच अनुभव आहे.


Kedarjoshi
Thursday, September 28, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे ऐकले (भावाने सांगीतले) की भारतातच चालनारे spice jet आहे त्यांचा हवाई सुंदर्या खरच सुंदर असतात. बाकी अमेरिकन एअरलाईन्स चे दिल्ली शिकागो दिल्ली हे विना थांबा विमान फारच मस्त आहे. हवाई सुंदर्या व सर्विस पण. चक्क समोसा वैगरे देतात खायला.

Rachana_barve
Thursday, September 28, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॅथे पण ठीक आहे म्हणे पण त्यांचा हॉल्ट जास्त आहे. मला पण सिंगापुरच आवडते. परत समज मुंबईहून लेट झाली फ़्लाईट पोचायला आणि connecting मिळाली नाही (हे असे बर्‍याचदा घडते) तर जेवण, रहाणं सगळ्याची सोय व्यवस्थीत करतात. आणि वर फ़ुकट सिंगापुरचे tours :-)


तुम्हाला ह सु सुंदर आहेत की नाहित ह्याचा खरच फ़रक पडतो का? मी तर निम्म्यापेक्षा जास्त वेळ झोपतेच फ़्लाईटमध्ये. विचारलेल्या प्रश्णांची आणि काही मदत हवी असल्यास तत्परतेने केली तरी पुरे इतकीच अपेक्षा असते माझी ह सु कडून


Sashal
Thursday, September 28, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

it might matter a great deal for a man travelling without a company ..

Sayuri
Thursday, September 28, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी AI ने अजून गेले नाही. (Thank God!) पण माझे एक नातेवाईक गेले होते. ते Business class मधे होते आणि तिथे त्यांच्या सीटपुढे भरपूर मोकळी जागा होती. त्यांना वाटलं असं काय, तर नंतर कळलं की पुढ्ची सीट नादुरुस्त झाल्याने पूर्णच काढून टाकली होती.
मी आत्तापर्यंत सिंगापूर, थाय, कोरिअन try केल्यात. मला सिंगापूरच बेस्ट वाटली. Food आणि service साठी. कोरिअन पण चांगली आहे पण मला त्यांचं food नाही आवडलं. घरून डबा नेलेला उत्तम. Jet Airways पण चांगली आहे म्हणे..कोणाला काही अनुभव? अर्थात ती फ़क्त सिंगापूर आणि लंडन साठीच आहे ना.

Deepanjali
Thursday, September 28, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अम्हाला last India trip हून येताना Singapore airlines ची flight काही तास late होती म्हणून तिथल्या समुद्रकाठी असलेल्या एकदम classy hotel rooms दिल्या होत्या :-) 80 th floor वर , झकास समुद्राचा view.
आणि room पण एकदम सही होती octagonal shape ची ,Room चे front panel पूर्ण transperent काचेचं वगैरे .
शिवाय US मधे आम्ही mention केलेल्या family,friends ना आम्ही late येणार आहोत याची personal phone करून माहिती वगैरे दिली होती .
:-)

Svsameer
Thursday, September 28, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा..
मि तर म्हणतो असं असेल तर आमचंही flight येताना delay होउदे
:D

Adtvtk
Thursday, September 28, 2006 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतापर्यन्त ३-४ वेळा Air-India ने प्रवास केला. एकदा १ वर्षाच्या मुलीसोबत पण फ़ारसा काही वाईट अनुभव नव्हता पण मागचा २ मुलांना घेउन केलेला NY JFK Mumbai प्रवास वाईटच झाला.
मुलगा दिड वर्षाचा होता म्हणुन आम्हाला basinate seat नही दिली. त्याचे फ़ारसे काही वाटले नाहि पण मधलीच seat दिली ३ तास आधी जाउनही. पोर (१.५ व ३.५) समोर लाथा घालु नये म्हनुन अक्षरश त्यांचे पाय धरुन बसवे लागले. तरी एकदा भांडण झालेच.
येताना ४-५ तास आधी गेलो. पण मला आणि मुलाला पुढची basinate Seat आणि नवरा आणि मुलगी कुठेतरी पाठी. आणि वर via दिल्लि. विमानतळावर seats एकत्र द्यायला सांगितले तर अर्धा तास computer वर खुडबुड करुन नंतर इथुन काही करता येत नाही पण विमानात करु शकाल असे संगितले. दिल्लिपर्तन्त तग धरला व नंतर एकत्र seats मिळतील का तर विचरले तर ह.सु. चे उत्तर That's your problem what can I do? नशिबाने एक वयस्कर attendant ने विमानच्या शेवटच्या seats एकत्र दिल्या. पाठच्या कितितरी seats रिकम्या होत्या.
आणि पुन्हा कध्धी Air India ने जावे लगले (नाईलाजाने)तर Via London जाणार नाही. पुर्वी stop over ला एका दाराने बहेर पडुन दुसर्‍या दारने आत घेत पण आता आख्खा Air Port फ़िरुन जावे लागते त्याच gate कडे


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators