Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 23, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through September 23, 2006 « Previous Next »

Apurv
Friday, March 10, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्राच्या भूतावरून आठवले, शाळेत असताना आम्ही काहीतरी गप्पा मारत होतो, मित्राने मध्येच काहितरी basic प्रश्न विचारला, मी म्हटले, सगळे रामायण ऐकल्यावर तू विचारतोस रामाची सिता कोण? तो लगेच म्हणाला बायको! आम्ही म्हटले काय?? रामाची सिता बायको? असे म्हणून आम्ही हसू लागलो, बर्याच वेळ त्याला ताणले, मग तो विचारू लागला, सांगाना रामाची सिता कोण ते. :-)

Moodi
Saturday, March 11, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आठवीत असताना सुरु झालेला अन १० वी पर्यंत continue राहिलेला हा इब्लीसपणा. दर बुधवारी आम्हा सर्वांचा शेवटचा ८ वा तास हा PT चा असायचा. सामुदायीक व्यायाम मग तेव्हा साग्रसंगीत सादर व्हायचा.

सर आम्हा सर्वाना असा व्यायाम सांगायचे की मांडी घालुन बसायचे अन मग दोन्ही हात डोक्यावर ठेवुन डोके जमिनीला लावायचे. पण सर्व मुले मुली असे करताना डोके जमिनीवर टेकवायला सुरुवात केली की हुं ssss उं असा आवाज करायचे. लागोपाठ ३ वर्षे हे झाले, सरानी आधी दुर्लक्ष केले पण शेवटी एकदा इन्स्पेक्शनला आलेल्या दुसर्‍या सरांच्या ही गोष्ट लक्षात आली मग ते आमच्या सराना बोलले, मग काय एकदा सर सगळ्याना बोलले, बजावले पण तो प्रकार सुरुच, मग एकदाच्या आम्हा सर्वाना हातावर २ छड्या मिळाल्या, मग ते बंद झाले.


Chingutai
Wednesday, March 15, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं आजोळ वाटेगाव. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची रवानगी हमखास तिकडे व्हायची. शेजारच्या वाड्यातल्या आजी जाम खडूस. काही ना काही कारणानी आमच्या तक्रारी करत रहायच्या. सुट्टीत आम्ही तिघी, मावशी, मामा यांची मुलं मस्त मोठा ग्रुप व्हायचा.
सगळ्यांनी मिळुन येकदा प्लान केला. दुपारी ३ च्या सुमारास आजी झोपल्याच पाहुन खुरप्याने त्यांच्या परसातला केळीचा खांब मधोमध आडवा चिरला. नि तसाच वर रचुन ठेवुन दिला.
बराचं दिवस कुणाच्या लक्शात आलं नाही. पाणी घालूनही केळी का सुकली!!!!
अचानक येक दिवस आजींचा हात लागला नि वरचं खोड अलगद हातात आलं.
आमची टोळी पडवी गाठून.......

चिंगी


Divya
Wednesday, March 15, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केलेला इब्लिसपणा नाहीये पण माझ्याबरोबर केलेला आगाउ पणाचा अनुभव मी लिहीणार आहे आणि please काही लिहीण्यात चुकल तर उगीच काका आणि बाप असल काहीतरी लिहुन वर दुसर्याला दिवे देण्याचा आगाउपणा कुणी करु नका झाल, तो प्रकार मला तरी सभ्य वाटत नाही.

तर माझा engineering चा पहिला दिवस होता. कोणी ओळखीचे नाही अगदी क्लास मधे निदान मुलीतरी आहेत ना इथपासुन धाकधुक. शेवटी क्लास मधे जाउन बसले. क्लास सापडतो कि नाही म्हणुन जरा लवकरच गेले होते. वर्गात कोणीच नव्हते हळुहळु मुल, मुली यायला लागली तसे हायसे वाटले. तरी ८ ते १० मुली होत्या, सगळ्या ओळखी करुन घेत होत्या तेवढ्यात सर आले सर आले म्हणुन सगळीच मुले जागेवर जाउन चिडीचुप. सर आले खरे पण इतके young सर बापरे अगदी आमच्या वयाचे वाटावेत, उन्च, धिप्पाड पन सर म्हणायला काही मन तयार होइना. आणि सारखे हसत होते. तो आज हमारा पहेला दिन पहेला लेक्चर. शुरुवात करने से पहेले क्यो ना हम एकदुसरे को जान ले. आणि सगळी मुले या सर, या सर. मग सर मुलीन्च्या बेन्च पाशी आले. मी पहिल्या बेन्च वरच मलाच उठवल हा तो तुम्हारा नाम?..... कहा रहेती हो?.... पहेले कौनसे school मे थी?.... तुम्हारे पिताजी क्या करते है?... आणि हे प्रश्न विचारताना हातात पुस्तक घेउन त्यात बघत होते. मी खाली मान घालुन उत्तर देत होते, एवढी नर्व्हस झाले होते. आणि तेवढ्यात दारातुन कुणीतरी आत आल आनि हे मला प्रश्न विचारणारे महाशय पळत जाउन बेन्च वर बसले. सगळा क्लास उभा राहिला good morning sir . काय झाले ते लक्षात आले आणि सन्तापाने आनि रागाने माझी नुसती वाइट अवस्था झाली होती. ते सर जे आले होते ते इतके जॉली होते, इतके मस्त जोक करत होते सगळा क्लास हसत होता पण मला काही हसायला येइना उलट अजुनच राग यायला. क्लास सम्पल्यावर सराना भेटुन सान्गीतले सर त्या मुलाने असे केले, कोण मुलगा ते ही दाखवले. तर हे सर पोट धरुन हसत होते. सर काय काय नाही विचारल त्याने फ़क्त फ़ोन नम्बर विचारायचा बाकी ठेवला होता. तर सर म्हणे त्याच्या जागी मी असतो तर मी ते हि विचारले असते या सगळ्या पोरीन मधे तु दिसायला चान्गली आहेस तुला सगळ्या पोराना handle करायला शिकल पाहिजे. झाल पुन्हा हसायला लागले मला कळेना आता काय कराव ते पण नन्तर त्या मुलाला बोलावुन सरानी दम दिला तिला जर तु किन्वा क्लास मधल्या मुलानी जर त्रास दिला तर मी तुला सोडणार नाही. त्याने पण माझी माफ़ी मागीतली पण मला वर्षभर त्याचा राग यायचा आगाउ कुणीकडचा.



Avdhut
Thursday, March 16, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ६-७ वीत असतांना केलेला हा उपद्याप. नुकतेच शाळेत sulfuric acid कसे बनते ते शिकलो होतो. मी dairy-farm वर राहायचो. तेथे जनावरांच्या जखमांसाठी sulphur असायचे. मी sulphur मीळवले, एक Ponds Powder सारखा गोल उंच डबा घेतला. त्याच्या झाकनाला भोक पडुन त्यात नळी fit केली. आत sulphur टाकले. Plan असा होता की डब्यात जळता काग़द टाकायचा. तो sulphur पेटवेल. लगेच झाकन लावायचे. नळी चे दुसरे टोक mug भर पाण्यात सोडले होते. suphur जाळुन बनलेला SO2 पाण्यात absorb होवुन sulphuric acid बनते ना. मी शाळेतुन Litmus paper आधीच चोरला होता.
पण sulphuric acid कधीच बनले नाही. Litmus ची साक्ष. डबा बंद करताच कागद विझायचा. suphur somehow कधी पेटलेच नाही. काही दिवस चालवुण प्रयोग सोडला. कोणाला कधी खबर लागली नाही. Farm चे घर फ़ार मोठे होते.


Champak
Thursday, March 16, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादा oxygen cyllinder का न्हाई चोरला मग:-) डबा बन्द करुण सलाईन च्या नळी नी oxygen आत सोडला असता त जमले असते :-)

Yogesh_damle
Friday, March 17, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एका photo essay च्या assignment वर दौलताबाद आणि एलोरा च्या शिल्पांचे आणि किल्ल्यांचे फोटो काढत होतो माझ्या assignment चा उद्देशच मुळी 'एतिहासिक स्थळाची विटंबना' होता. एलोरा च्या थेट बाहेर एक प्रेमळ माता आपल्या मुलाची वस्त्रे उतरवून 'स्वच्छतेचा सोहळा' उरकायच्या बेतात होती. (शौचालयाची इमारत उर्फ 'संडास' एका दगडाच्या टप्प्यात होता तरीही निव्वळ आळस...:-( )

माझी खोपडी ते पाहून आधीच सरकली होती. पण मला फोटोसाठी आयतं सावज सापडलं होतं. पटकन फोटो काढून जरा तिच्या नजरेच्या टप्प्यात जाऊन उगाच कमेरा 'उगारला'.

"आरं बाबा उघड्या ठिकाणी कसचे फोटू काडायचे आन कसले न्हाईत हेबी कळू नये का तुमा पोराना ??!!" असं ओरडत दुसरीच एक दोन स्थानिक मंडळी माझ्या
अंगावर चालून आली. तोपर्यंत 'हमारी इज्जत पे' 'गैरप्रकार' झाल्याचा साक्षात्कार त्या बाईला झाला.

"पब्लिक 'पलेस' ते एसे 'फॉट्टो खैन्चते हो?' शर्म नही औन्दी?" असा तिचा अम्रुतसरी का लुधियानवी स्वाभिमान जागा झाला.

"तुस्सी इतना तो मानदे हो कि यह पब्लिक प्लेस है.
इत्थे एसे काम करदे हो, आप नू शर्म नी औन्दी?" ( दिल्लीच्या सुट्ट्या आठवून पंजाबी चा 'वॉर्म-अप' सुरू!!!)

"नही... आप को हमे निगेटिव देना पडेगा. अस्सी पुलिस केस करांगे" (आता कशी आली राष्ट्रभाषेत !!!)

"क्यो दे? मुझे तो पीछे वाला नज़ारा शूट करना था (
No puns intended !!! ) आप अपने पुत्तर दे नाल बीच आ गये. कैमरे नू हाथ नही लगाना. पुलिस केस दीया गल्ला करदे हो? पुलिस केस हुआ ता पहले तुस्सी अंदर होगे." (ताईसाहेब ओशाळल्या !!)

( आता परत हिन्दी ज़िन्दाबाद) "और वही पास मे टॉयलेट था. आप से दो कदम और नही चला गया?" बया गुमान चालती झाली.

आता मी अस्सल 'घराकडच्या' मराठीत आधी आलेल्या 'लोकलाईट्स' ना विचारलं "पावनं तुमच्या अंगणात येऊन मुतलं तर चालंल का? ह्ये तर लई जुनं देऊळ हे !!" ( 'आहे' नाही, 'हे'
is more authentic)

आता मला मराठीत शिरलेला पाहून बाजूचा फेरीवाला पळाला कारण इतका वेळ तो मला निगेटिव्ह रोल्स आणि पाण्याच्या बाटल्या दीडदुप्पट भावात विकत होता आणि मी पण गप्प राहून किवा 'ठेवणीतल्या' इन्ग्रजीत माफक उत्तरे देत त्याची 'च ची बाराखडी (६व्या उच्चारापर्यंत)' बनवत होतो. त्याचीसुद्धा उतरवायचा मोह खूप कष्टाने आवरला.

माझ्यात big time कली शिरल्याचा हा प्रसंग. ह्याला आता एक महीनाभर होत ये ईल. कधीकधी वाटतं जरा अतीच केलं म्हणून... असो.

ह्या assignment चे 'चान्गले' photos
http://photos.yahoo.com/yogesh_yogibear
ह्या संकेतस्थळावर आहेत.

कळावे, लोभ असावा.
योगेश दामले.

Yogesh_damle
Friday, March 17, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ, बाकी सगळ्या जगाचा इब्लिसपणा वाचल्यावर वरील एन्ट्रीबद्दल मी जरा खजील झालो. खूपच मनरलेस वाटतय ह्या त्या मानाने जरा निरुपद्रवी आठवणी...

१) उसाच्या 'रसवंती' वर किवा restaurant मध्ये गेलो की आम्ही मित्र मीठ मिरीचे shakers घेऊन त्यान्ची झाकणं सैलसर करून ठेवायचो. पुढच्या माणसाचा रस किवा कुठलीही डिश एक झटक्यात खारट किवा तिखटजाळ हो ऊन जायचा

२) औरंगाबादला उस्मानपुरा नामक एक बर्‍यापैकी शीख वस्ती असलेला area आहे. एका रात्री (mind you, रात्री!!!) तिथून ड्राईव्ह करत येत असताना समोरून एक 'संतासिह' बाईकवरून येत होता. त्याला सरळ 'तुझा दिवा चालू' वाला इशारा केला. अहो, त्याने चक्क दिवा विझवला !!!! (तो U turn घेऊन मला मारायला येणार नाही ह्याची खात्री होती म्हणून हा उद्योग केला !!!)

३) सिम्बायोसिस चा crowd तसा अठरापगड्-बहुभाषिक. एखादा / एखादी अमराठी मित्र / मैत्रीण "Hey, teach me Marathi na !!!" म्हणत आला / आली, की This means "I'M A VERY GOOD BOY/GIRL" ची थाप मारून मराठी पोरं वाट्टेल ते अर्वाच्य वाक्य (Not worth typing here !!! भा. पो ?) म्हणवून घ्यायची.

४) जयजयवंती रागातली एक चीज होती. शब्द होते "लाल मोरी चूनर भीजे" or something like this . तर ही बंदिश conclude करताना आम्ही जाणूनबुजून 'तिहाई' मारायचो... ती अशी.. "लाल मोरी चू- लाल मोरी चू- लाल मोरी चू........ नर भी...........जे"

पुरे आता... खूप झालं !!! कितीही झालं तरी 'रेड्याच्या' तोन्डून वेद वदवणार्‍या अजयभाऊन्ची सर नाही Hats off brother !!!
:-)

Sanghamitra
Monday, March 20, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बारावीच्या व्हेकेशन बॅचमधे एकदा आमच्या पुढे एक दोन वेण्यावाली मुलगी बसली होती. तिच्या वेण्या सारख्या मागे यायच्या आणि आमच्या बेंचवर - खरंतर वहीवर - पडायच्या. दोनतीनदा सांगून पाहीले. परत आपले तेच. मग शेवटी तिच्या एका वेणीचे टोक माझ्या कंपास बॉक्स मधे आणि दुसर्‍या वेणीचे टोक मैत्रिणीच्या कंपास बॉक्स मधे ठेवले. ट्यूशन संपल्यावर ती मुलगी उठली तेंव्हा आमचे दोन्ही कंपास तिच्या वेण्यांना लोंबकळत उठले आणि बेंचेस वर आपटले. ते आम्ही शांतपणे काढून घेतले. ती मुलगी अर्थातच काही बोलली नाही. :-)


Manuswini
Monday, March 20, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मी school मधे असताना वरिल प्रमाणे असेच काहीतरी केलेले आठवले

एकदा चुकुन खाली वाकले माझी खाली पडलेली pencil उचलायला
पुढील bench वर बसलेल्या मुलिचे shoes ची lacE सुटली होती
गुपचुप एकमेकात बांधली आणी बसले

नंतर हळुच तीला सांगितले की पाणी प्यायला येतेस का
ती उठली आणी अडगळली आधीच benches ची फट लहान जरा बर्यापैकी आपटली

पण तेव्हा मी लहान होते ना 5th grade मधे :-)


Raja_of_net
Wednesday, March 22, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉंम्पुटर डिप्लोमा करत असतानाचि गोष्ट.. त्या वेळी विंडोज़ लोड कराव लागत असे. माज़ा एक मित्र भरपुर दांड्या मारायचा आणि नंतर आमचं डोकं खायाचा. एके दिवशी क्लास मधे आल्यावर त्याला विंडोज लोड करण्यासाठि मि त्याला डॉस वरुन "काइन्डलि स्टार्ट विंडोज" कमांड टाइप करायला सांगितलि आणि तो हिरो पण टाइप करत होता. एरर अल्यावर मि त्याला स्पेलिन्ग चेक करायला सांगायचो. आम्ही सगळे क्लासमेट्स पोटधरुन हसत होतो पण कुणिहि त्याला बरोबर काय आहे ते सांगत न्हवत. आमच मोठ्याने हसणं ऐकुन आमचि फ्याकल्टि (बरोबर शब्दं सापडत नाहि आहेत.) धावत आली. आणि स्क्रिन वरचि कमांड वाचुन तिहि हासु लागलि आणि तो मित्र माज़्ह्या कडे रागाने बघत बसला आणी क्लास नंतर भरपुर शिव्या घातल्या मला.
---------------------------------
तसच त्यावेळी आम्हंला बसायला समोरा समोर जागा असायचि, आम्हि काहि टारगट मुलं अशावेळी कि बोर्डस च्या केबल्सचि अदला-बदलि करुन ठेवायचो त्यामुळे आपण जे टाइप करतोय ते न दिसता भलतचं काहि तरि स्क्रिन वर यायचं.
ह्याकरता ओरडा हि खुप खाल्ल्या.


Storvi
Wednesday, March 22, 2006 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मझ्यावर (crush) असलेल्या मुलाने गाडी घेतोय कुठली घेऊ असा प्रश्ण विचारला. मी पहिल्यापसुनच AVK category मधली असल्याने त्याला गरुडा घे असे सांगितले. ( आता मला काय माहित त्याचा crush आहे म्हणून? ) पुढे यथावकाश त्या गरुडाने उड्डान केले आणी आम्ही US भूमीत प्रवेश केला :-O

Storvi
Thursday, March 23, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW गरुडा ही त्या काळी नविनच येऊ घातलेली रिक्षा (I think diesel with rear engine) मॉडेल होते :-O

Vinaydesai
Thursday, March 23, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरुडा वाला क्रश झाला की कृश? ते सांगितलं नाहीस...
मोडेल अशी रिक्षा घेतो म्हणून वाटलं...


Storvi
Thursday, March 23, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय यू आर किनई फ़ारच टू मच

Saranga
Friday, March 31, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namsakar mandali!
tumchya iblispanache namune aikun anand zala! tyat amchi thodi bhar ghalto

mi 11 vi astanachi gost aahe. amche junior collage he convent shalet hote. mhanun varsha suru hotana,'orientation'navacha prakar hot ase. tyat amhala weekend la shalet bolvun baryach joshtin baddal sangitle jayche. ani shanivari ratri sahet zopave lagayche.
ratri amhi sarva mule kholit zopaicha sodun gondhal jhalit hoti. ani amchya madam dar 1/2 tasane chakkar marun oordun jaychya. pan asha gondhalat ek prani mast zopun gela hota, agadi ghorat pan hota. mi ek sardar mitra la uthavle ani mag ratri chya 2 vagta tyala anthruna sakat kholi baher neun zopavle ani corridor cha diva band kela. nantar amhi daar lavun zopun gelot.
pahate 5 vajta madam chakkar marayla aalya ani tya mulachya angavarun dhadpadun padlya. tyani tya mulala itkya shivya ghatlya ki toh mulga radkundila aala aani kahi boluch shakla nahi. mag mi haluch pudhe houn, madam na sangitle ki tya mulashi chuk nhavti, toh ghorat hota mhanun amhi tyala baher zopavle hote. zale doosrya divshi saglya karyakraman madhye amchi kharadpatti zali.

Sonchafa
Saturday, April 01, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार वर्षांपूर्वी Lions Club of France ने आयोजित केलेल्या एका cultural exchange साठी coordinator म्हणून माझी निवड झाली होती.. अर्थात ही निवड मी आधी एकदा participant म्हणून भाग घेऊन झाला असल्याने झाली होती.. तर आता खरेतर माझ्यावर बावीस देशांतल्या एकूण तीस जणांची जवाबदारी होती. काही संस्कृतिक भेटींमध्ये फ़्रेंच कवी Ronsard चे घर, ज्याचे आता musium मध्ये रुपांतर केले आहे ते बघायला आम्ही गेलो होतो.. तिथे एक पांढरा शुभ्र पुतळा होता.. अर्थतच Ronsard चा.. सुरुवात कोणी केली आठवत नाही पण काही क्षणात त्या पुतळ्याच्या डोक्यावर एक हॅट, डोळ्यांवर एक गॉगल.., गळ्यात एक स्कार्फ़ आणि कहर म्हणजे ओठांसमोर एक सिगारेट होती...! मी coordinator त्यांना दटावायचे सोडून उलट घाई करून मी Ronsard च्या ओठांवरचे हसू Kodak मधे टिपले.. काय म्हणायचे ह्याला?? खर तर कोणाच्याही लक्षात न येता आम्ही एवढ्या शिताफ़ीने आणि क्षणार्धात हा प्रकार पार पाडला होता की मला अजूनही त्या चपळाईचे कौतुक वाटते..

काही महिन्यांपूर्वी हा फोटो माझ्या मैत्रिणीच्या अति उत्साहापोटी माझ्या
MA च्या professor च्या हातात पडला आणि 'रुपाली तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती' असे काहीसे कानावर पडले.. :-(

आता त्यांना थोडेच सांगायला जाऊ की अजूनही तो फोटो पाहिला की हसून हसून माझ्या डोळ्यात पाणी येत म्हणून..

ह्या आधीच्या ट्रिपमध्ये मी एका
musium मधल्या खूप जुन्या गाडीत जाऊन बसले होते आणि मैत्रिणिने फोटो काढला होता.. Balzac च्या लिखाणाची टेबल-खुर्चीही ह्याला अपवाद नाही..

Shankasoor
Friday, September 08, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच दिवसांनी आलो इथे.
सगळ्यांचे किस्से वाचून मजा आली एक किस्सा आठवला

आमच्या college च्या hostel मध्ये एक बंगाली मुलगा होता. he had an inferiority complex because of his skin colour . आणि वेगवेगळी cosmetics तो try करयचा रंग उजळवण्यासाठी.
आणि महागडी cosmetics वापरली तर रंग नक्कीच उजळेल अशी त्याची श्रध्दा होती. त्याने बरेच पैसे उधळले होते.
एक दिवस मी मजेमजेत त्याला म्हणालो की चेहर्‍याला toothpaste लाव. त्यावर तो मला म्हणाला की "मजा करू नकोस मित्रा, मी serious आहे ." मी म्हणालो "मित्रा मी पण seriously सांगतोय, ऐक्; जर toothpaste लवून दात पांढरे आणि चमकदार होत असतील तर चेहरा नक्कीच उजळेल give it a try and is a cheap option ".
नंतर काही दिवसांनी सकाळी सहजच त्याच्या room वर गेलो होतो, थोडा लवकरच गेलो होतो. साहेब of course झोपलेले होते. परत जायला निघलो तेव्हा त्याचा चेहरा एकदम लाल दिसला, म्हणून थोडं जवळ जाउन पाहिलं तर अख्ख्या चेहर्‍याला gel toothpaste फासलेली होती.

आमच्या बाकी सगळ्या मित्रांची हा प्रकार पाहून हसून हसून पुरेवाट झाली. :-)


Chyayla
Saturday, September 16, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोलेज मधे असतान्ना आम्ही नागपुरला अजनीच्या रेल्वे क़्वार्टेर मधे रहात होतो, दुपारी लवकरच कोलेज मधुन घरी आलो क्वार्टर भोवती मोठ आन्गण होते, बाहेरच एक थोडी छोटी सायकल दिसली आणी लक्षात आले कि माझ्या बहीणीची मैत्रिण घरी आली आहे झाल ती सायकल उचलली आणी बाजुन्च्या घरी ठेवुन दिली मग घरात आलो.

बर्याच वेळाने मैत्रिण घरी जायला निघाली, सोबत बहिणाबाई होत्याच. बाहेर सायकल न दिसल्यामुळे दोघी घाबरुन गेल्या मी पण बाहेर आलो आणी दोघीन्च्या चिन्तेमधे शामिल झालो, वरुन साळ्सुद्पणे एक दोन नुकत्याच चोरी गेलेल्या सायकलचे किस्से सान्गितले, म्हटल आजकाल ना ईकडे खुपच चोर्या व्हायला लागल्या, मग तुच बरोबर लोक नसेल केल, किन्वा अजुन दुसरी कडे विसरली असशील वैगेरे मखलाशी लावली. झाल आता आपल्याला आई- बाबा रागवणार, "नविनच सायकल होती रे माझी" वैगेरे सुरु झाले, बराच वेळ लाम्ब चेहरा करुन आम्ही तिघेही जण बसलो म्हटल आपण पोलिस तक्रार करु तु काळजी करु नको शेवटी अगदीच रडवेला चेहरा बघुन दया आली आणी गुपचुप शेजारचान्च्या घरुन सायकल आणुन दिली अर्थातच त्यान्च्याकडचे दोघे बहीण्-भाउ माझ्या नाटकात शामिल होते.

आणी त्यानन्तर ..."का रे अशी गम्मत करतात का?" म्हणुन दोघी सुरु झाल्या आणी आम्हाला काही केल्या हसु आवरेना.


Chaffa
Saturday, September 23, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेंधळेपणाचा कट्टा सोडून जरा ईकडेही फिरकावं म्हणतो.
आमच्या ऑफिसमध्ये एकदा कसलीतरी सुटी आम्हाला सगळ्यांना हवी होती. H.O. ला आधिच डिक्लियर झाली होती, आमचा बॉस काही ऐकेना. काम खुप आहे हे नेहमिचं रडगाणं चालुच. बस आमची काही हिकमती डोकी एकत्र आली. टाकल्या टेलिफोन एक्स्चेंजच्या वायर्स बदलुन. दिवसभर हा राडा, आमच्या केरळी भाईने दिवसभरात चारवेळा जि. एम. ला फोन करुन चहा मागवला ( या प्राण्याला कधिच फोनवर पलिकडे कोण बोलतय हे समजुन घेण्याची गरज वाटत नाही ) वर तुला निट सर्व्हिस देता येत नाही हि तक्रार. त्यात एका ताज्या प्रेमविराच्या प्रेमपात्राचा फोन एच. आर. मनेजरकडे. नुसता हलकल्लोळ माजलेला. एक्स्चेंज मधला गोंधळ निस्तरेपर्यंत बरेच जणांनी फोन या प्रकाराचा धसका घेतला होता. स्पेशियली G.M ने कारण त्याला जोडला गेलेला नंबर कँटीनचा होता.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators