Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Shalecha pahilaa diwas.....

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Shalecha pahilaa diwas..... « Previous Next »

Suruchisuruchi
Monday, August 28, 2006 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या घरी जास्त वेळ द्यायचा, मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं म्हणून कमी वेळेची आणि सोपी नोकरी ( फ़क्त वाटणारी)म्हणून शाळेची नोकरी स्विकारली. मी आणि मुलगा, एकाच शाळेत असल्यामुळे नोकरी अधिकच सोपी वाटू लागली (अर्थात, जोइन करण्या आधी). शिक्षकांचे ट्रेनिन्ग वगरे आटोपून अखेर तो अविस्मरणीय दिवस उगवला.
मी आणि माझे विद्यार्थी. आम्ही सर्व मीळून केवळ तेवीस जण. शालेची वेळही फ़क्त तीन तास. पण हे तीन तास मला खरोखरीच लक्षात राहण्याजोगे आहेत. तारेवरची कसरत कशाला म्हणत असावेत ह्याची कल्पना मला त्या दिवशीच्या "खुर्चीवरच्या" कसरतीतून आली.
माझा हा शळेत शिकवण्याचा पहीलाच अनुभव. मुलांचाही त्यांच्या अयुष्यातला शळेचा पहिलाच दिवस, जागाही अगदी नवीन...तरीही खुप संयम, अन कोन्फ़िडन्स्चा मुखवटा चढ्वून येणर्‍या प्र्त्येक मुलाला मी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करित होते.
येणारी ती बाल गोपाल मंडळी अवघ्याअडीच तीन वर्षांची. एकतार कोणतीच शान्तता त्यावेळी तिथे शक्य नव्हती अम्ही सगळेच रडतच होतो....ते मोठ्याने आणि मी मनात! आणी हो,पालक दारात...पण रडत नव्हे तर ओरडत होते..
एकएका मुलाला कडेवर घेऊन आधीच पाठ कंबर धरून आलेली, कानात असह्य्य अश्या किंकाळ्या, आरोळ्या आदळत होत्या, विविध रंगी ख़ेळणे,बाहूल्यानी सगळीकडे उधम मान्डला होता, अड्कण म्हणून लावलेल्या टेबलाखलून अन वरून एकाच वेळी खोलीबहेर पळून जाणार्या त्या लाहन्ग्या जिवांना शोध्ण्यात डोळे, पकडून ठेवण्यात हात अन रमवण्यात माझे सर्वस्वा पनाला लागले होते. आशाच वेळी पालकांची होनारी वर्दळ थाम्बवय्ची, टेबलाखाली अजून अड्कण लवय्चं, त्यात एखाद्या बाळाच्या बाल मुठीतून आप्ल्या जटांची (एव्हाना केसांच्या जटाच झाल्या होत्या) सुटका करून घेत त्या बाळाशी तितक्याच प्रेमाने बोलून त्याला शान्त करयच अशी अनेक कामं मी एकाच वेळी अन पहील्यांदाच करत होते.



Suruchisuruchi
Monday, August 28, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून जवळ जवळ दोन तास शिल्लक होते. माझ्याजवळ मुलांच्या नावची यादी होती. आज किति मुलां शाळेत आलेत, किती वर्गात थांबले, किती पळून जाण्यात यशस्वी झालेत याचा सर्वच हिशोब बाकी होता. मुलांसाठी मागवलेल्या लिमलेट्च्या गोळ्या काही अंशी जमिनीवर, काही पाकिटात आणि काही आ वासून रडणर्‍या मुलांच्या इवल्या इवल्या मुखातून डोकावत होत्या. वोटर बेग्स मधल्या पाण्यात अजूनही काही वेगळ्याच प्रकारचं पाणी मिसळून जमिनीवर लोळण घेत पडल होतं. त्यावरून घसरून न जाता मला अन मुलांना वागवणा हे ही जिकरीचच काम. मुख्याध्यपकांची परिक्षण फ़ेरी अगदी हसत मुखाने पार पाडता पाडता मीच पडून नेस्तनाबूत होते की काय अस वाटायाला लागल होतं. मुलांमधला "जोश" अजून्ही कायाम होताच. माला हाणून पाडण्याची त्याम्ची जिद्द दांडगी होती.
अजूनही एक तास शील्लक होताच.
आता मात्र मझ्यातली निद्रिस्त शक्ती जागी होवू लागली. अर्थात दुसरा काहीच ईलाज नव्हताच! मी, मझ्या समोर येणर प्रत्येक मुल, आनि समोरच टेबल अन त्या टेबलावर्ची ती खुर्ची...बस....इतकच माझ्या
डोळ्यांसमोर दिसत होत. खुर्चीकडे पाहून पायतले त्राण मागे हटत होते...आता माघार नाही... निश्चीतच नाही... माझ्या नकळतच मी त्या टेबलावरच्या खुर्चीवर जाऊन बसले अन वर चढू पाहणार्‍या प्रत्येक मुलाला उचलून पुन्हा खाली ठेवू लागले...एकदा, दोनदा, तीनदा... अनेकदा...त्यांनी वर चढायचं, मी उडी मरून त्याम्ना उतरवायच....(आणि हो... सोबत जमत नसतानाही हसरा चेहरा..उत्साह.. खेळकरपणा दाखवण आवश्याकच बरका) असा खेळ्च (फ़क्त मुलांच..मझा नव्हे) सुरु झाल. अता हा (माझ्यासाठी जीवघेअणा ) खेळ त्यांना अवडू लागला... नीदान इतके कष्ट घेतल्यावर काहीतरी त्यांना आवडतय या सुखात माझा विजय मानून उरलेला वेळ मी खुर्चि वरची कसरत करण्यात घालवला.
मझ्या शालेच्या( मी शिकत असतानाच्या) पहिल्या दिवसाची आठवण पार विसरून जावून माझ्या ह्या शालेच हा पहिला दिवसच माझ्या लक्षात राहणार हे नक्की



Asmaani
Tuesday, August 29, 2006 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही सुरुची, अगदी डोळ्यासमोर चित्र उभं केलंस.

Suruchisuruchi
Tuesday, August 29, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asaamii..veLeabhavii sarvach ghatana lihu shakale nahi....aso..punha kadhitarii...kaaraN shala suruch ahe


Raina
Tuesday, August 29, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलयं. अस्मानी नी वर म्हणल्याप्रमाणे खरोखर डोळ्यासमोर चित्र उभ राहतय.

Bee
Tuesday, August 29, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझीही तिच प्रतिक्रिया की एकदम डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. पण सुरुची तुला एक सल्ला देऊ का. मुलांच्या आईवडीलांना मुल शाळेत आणून दिल्यानंतर वर्गाच्या दारात किंवा खिडकीतून मुलांना दिसेल असे त्यांना उभे राहू देऊ नकोस. नाहीतर ती जास्त रडतील त्यांच्या आईबाबांकडे बघून. मुलांना जे घरी मिळत नाही असे काहीतरी ठेव वर्गात. जसे मोठाले चित्र. हवे तर तुझे पोषाकही जरा वेगळे शिव. माझ्या पुतणीची टीचर नेहमी प्राणी कार्टून असलेले ड्रेसेस घालायची. त्यामुळे ती टिचर वर्गात खूप चाहती होती सर्वांची.

जमेल तेंव्हा अनुभव लिहायला येत जा..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators