Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
MaaNasaatalaa maaNus

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » MaaNasaatalaa maaNus « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 06, 200720 03-07-07  3:03 am

Sunidhee
Wednesday, March 07, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आजच वाचले हे अनुभव. सर्व अगदी टचिन्ग. प्रिया खरच त्या दोघांची कृपा तु वाचलिस...

माझ्या मावशीचे मिस्टर तसे लवकर वारले. मोठा मुलगा तेव्हा १५ चा होता. तर माझे इतर मामा मुंबईत रहात असत म्हणुन ती पण तिथेच शिफ्ट झाली व एक नोकरी करुन मुलांना घेउन पण वेगळे राहू लागली. तेव्हा नोकर्‍या लवकर मिळायच्या. फारशी काही पुंजी नव्हती जवळ. होती ती घर घेण्यात बरीच कमी झाली होती.
आणि त्या मुळे तिला महिन्याचा पगार आला कि त्यात सर्व गणिते बसवावी लागत.

एक्दा पगार घेउन कामावरुन परत येत असताना ती रिक्षाने घरी आली. पोचल्यावर रिक्षावाल्याचे पैसे देउन घरी आली आणि तिला लक्षात आले की पगाराचे पाकिट रिक्षातच राहिले. ती पळत पळत गेली रस्त्यावर पण तोवर रिक्षावाला निघून गेला होता.

दू:खी होउन ती घरी आली. आता कसे भागवायचे असा विचार करत करतच रात्र घालवली आणि दुसया दिवशी कामावर गेली.

असेच २ दिवस गेले आणि तिसया दिवशी संध्याकाळी दार वाजले. तर दारात तो रिक्षावाला उभा. त्याला पाकीट मिळाले पण काही कारणाने तो लगेच तिथे जाऊ शकला नाही. पण २ दिवसानी वेळ झाल्यावर पुन्हा जिथे मावशीला सोडले (अपार्टमेंट कोम्प्लेक्स च्या बाहेर) तिथे शोधत गेला. आत ३-४ बिल्डिन्ग्स होत्या. त्याला नाव माहीत नव्हते मावशीचे पण तिचे वर्णन आणि ती मराठी आहे इतके त्याला लक्षात होते. मग त्याने आत गुरख्याकडे चौकशी केली आणि वर्णन जुळल्यावर तो तिच्या घरी गेला. आणि पाकीट परत दिले. इतकेच म्हणाला 'अहो, मी पण पगारावरच जगतो. मला कळते कि १ तारखेवर पगार हरवला तर किती हाल होतात '. आज ती ८० ची आहे पण अजुन पण आठवण काढते ह्या गोष्टीची.. त्याला सहज शक्य होते पाकीट परत न करणे..


जाता जाता एक ह्या विषयाशी संबंधीत नसलेली १ गोष्ट सांगावीशी वाटते. माझी आजी नेहमी मुलींना सांगायची, 'तुमच्या अंगात एखादी कला असेल तर ती नेहमी वापरावी, वाढवावी कारण आयुष्यात केव्हा तिचा उपयोग होइल हे सांगता येत नाही'. मावशीची चित्रकला उत्तम होती. तिने नोकरी करत नसताना आधी हौस म्हणुन त्यात बरेच काही केले होते, शिकुन घेतले होते.. आणि नवर्‍या नंतर तिला त्याचा फार उपयोग झाला. रिटायर होइपर्यंत तिने मफतलाल, बाॅम्बे डाइन्ग मधे डिझायनर म्हणुन नोकरी केली, क्लासेस चालवले आणि मुलांना मोठे केले..



Nandini2911
Thursday, March 08, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रीपोर्टर म्हणून काम करायला लागल्यावर पहिलीच assignment होती २६ जुलै... (२५ जुलैला ऑफ़िस ज़ॉईन केलं.. दुसर्या दिवशी मी ऑफ़िसात आणि मुंबई पाण्यात)
त्यावेळेला असे खूप माणूसकीचे किस्से बघायला मिळाले.
या पावसानंतर जुन्या इमारती पडायला सुरुवात झाली. मी पडायला आलेल्या जुन्या इमारतीचे फ़ोटो काढत होते. अशा इमारतीची लिस्ट MHADA ने काढली होती. यामधे तीन ते चार इमारती कामाठीपुर्‍यात होत्या. दुपारी एकच्या सुमारास मी तिथे पोचले. कशासाठी आले काय वगैरे सांगितलं. आधी मी खूप टेन्शनमधे होते
पण हळू हळू ओळख व्हायला लागली.. एक खुपच सुंदर बाई त्या घरात होती. तिने मला चहा आणुन दिला.
मी नको म्हटल्यावर बाजुला बसलेली म्हातारी म्हणाली..
"अपने हाथ की चाय नही चलती "
"ऐसा बात नही आंटी.. इतने दोपहर मे चाय.. इसलिये ना बोला.."
म्हातारी पार डोळ्यात पाणी आणुन म्हणाली..
"बेटा.. जिंदगी गुजरी है यहा पे.. अब आके बोलते है. के खाली करो नही तो मकान गिर जायेगा. अब जाये भि तो कहा? यहा से बाहर हमारि कोई इज्जत तो है नही. इससे अच्छा हो के यही घर हमपे गिर जाये और हम मर जाये.."
मी निमूटपणे चहा घेतला. "घर" या आपल्या संकल्पनेत तिचं घर कधीच बसलं नसतं. पण तरी तिची जी ममता होती.. (नुसती घराबद्दलच नव्हे तर घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल एक काळजी होती) त्याने मी भारावून गेले होते.

सुदैवाने तिची शंभर वर्षाची बिल्डिंग पडली नाही आणि MHADA ने तिला अजून transit camp मधे नेलं नाही...


Abhijeet25
Thursday, May 15, 2008 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सापडला एकदाचा शोधुन शोधुन. माणसांचे चांगले अनुभव लिहिण्यासाठी एखादा बिबि आहे का बघत होतो. ते बोचणारे किस्से वाचुन वाचुन कंटाळा आला होता. उगाच नवीन बिबि चालु करायच्या आधी जरा शोधावे म्हणून शोधला तर सापडला शेवटी. बोचणारे किस्से ५०० अणि माणुसकीचे फक्त ईतकेच?????

काहि महिन्यांपुर्वीचा किस्सा. ईकडे कतारला नवीन आलो तेंव्हाचा किस्सा. आल्यावर कसा काय माहित वातावरणातल्या फरकामुळे असेल किंवा कामाच्या दगदगीने असेल आजारी पडलो. ताप चांगलाच चढला. दवाखान्यात जावुन आलो कंपनीच्या गाडीतुन. नवीन असल्याने कोणी ओळखीचे नाही. एक मित्र होता म्हणा इम्तियाज नावाचा. पण कशाला कोणाला त्रास द्यायचा म्हणून फोन केलाच नाही. योगायोग म्हणजे दुसर्‍या दिवशी सहज म्हणुन त्याचा फोन आला काय चालले आहे कसे चालले आहे विचारायला. त्याला आवाजावरुन कळालेच कि मी आजारी आहे ते. त्याला माझी अवस्था लक्षात यायाला वेल लागला नाहि. मेस मधले अन्न पचत नव्हते. ते आजारीपणात भर टाकत होते. अन्न पचत नसल्याने गोळ्यांचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. पण मी तरी काय करणार जवळपास कुठेच काहि नाही. आता मला ईथे कतार मधे कोण वरण भात आणुन थोडिच देणार.

तिसर्‍या दिवशी सकाळी सकाळी फोन वाजला. नंम्बर अनोळखी होता. उचलला तर एक बाइ फोनवर " हेलो कोन अभिजीत बात कर रहे हो ना" मी कोण असेल याचा विचार करत " जी हा"
" अभिजीत मै इमतियाज कि बहन बात कर रही हू"
" जी सलाम वालेकुम आपा"
"वालेकुम अस्सलाम"
" अभिजीत ये आपका कॅम्प किधर है? मै दस मिनिट से ढुंढ रही हू, लेकिन नहि मिल रहा."
"जी क्या हुवा ?"
"नही कुछ नहि हुवा, आप मुझे आपके कॅम्प तक कैसे आणा है बताईये"

दहा मिनिटानि दरवाजा वाजला गेटवरचा माणुस एक पिशवी घेऊन आला म्हणाला "कोई अरबी मॅडम दे के गयी अभी अभी."

पिशवी उघडली तर आतमधे दोन वेळचा डबा आणि सफरचंद. मी उडालोच. अगदि मन भरुन येणे वगैरे म्हणतात त्यातला प्रकार झाला. आणि हे क्रमश: चार दिवस, जो पर्यंत मी बरा होवुन कामाला जायला लागलो नाहि.

तसे म्हणायाला साधीच गोष्ट पण त्यामागे किती श्रम आहेत हे विचार केल्यावर कळते. तिचे लग्न एका अरबीशी झाले आहे, तिच्या घरातल्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या. तिला फक्त माझ्यासाठि त्या सगळ्यांचा स्वयंपाक करुन झाल्यावर माझ्यासाठि वेगळा स्वयंपाक करायला लागत असणार. हे सगळे सकाळी साडेआठच्या आत कारण तिला मग मला डबा देवुन कामावर पण जायचे असायचे. घरात दोन छोटि मुले त्यांचे सगळे उरकुन माझ्या साठि हा उपद्व्याप. शिवाय रोज आठ नऊ किलोमिटर चा फेरफाटा तो हि रस्त्यावर जेंव्हा सगळ्यात जास्त गर्दिचे तास असतात तेंव्हा.

ईतके सगळे कशासाठी तर मला आजारपणात जेवण चांगले मिळावे म्हणुन. सगळे जण म्हणतात माणुसकी नाहि राहिलि आजकालच्या जगात.

मी हिंदु असुन सुद्धा, कसलाहि आकस न बाळगता. अगदि प्रेमाने किती केलं तिने माझ्यासाठी......






Dineshvs
Thursday, May 15, 2008 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, खून छान वाटले, मी कतारमधल्या नाहीत, पण ओमानी माणसांचे असे खुप चांगले अनुभव घेतले आहेत.

Dakshina
Friday, May 16, 2008 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली तुझा अनुभव खरंच हादरवून टाकणारा आहे. मी नुसती वाचून सुन्न झाले. तु अनुभवून बसलियेस... hats off.
मी तर अवसान गाळून रडतच बसले असते अशा वेळी... पण या पुढे थोडी सांभाळूनच रहा बाई...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators