Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 05, 2006

Hitguj » My Experience » घरची बाग » Archive through May 05, 2006 « Previous Next »

Manuswini
Thursday, March 30, 2006 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो mod मी एथे ह्यावर bb शोधत होते आहे का हो बाग कशि फुलवायची
लोकांनी US मधील winter च्या दिवसात झाडे कशी जपावी experience share करावा म्हणुन उघडला.
मला gardening चा खुप छंद आहे.

पण unfortunately आवडिने लावलेली बरिच्शी झाडे कितीहि निगा घेतली की मरतात
एकतर travelling पण खुप असते म्हणुन मधे auto watering च्या बाटल्या आणल्या ज्या दूधाच्या बाटल्या सारख्या असतात पण परत आले तर गुलाब मेलेला

specially winter मधे माझा अंनत( gardenia in english ) मेला, जास्वंद सुधा सुखते घरात ठेवली की एकतर heater चालु असतो म्हणुन बहुतेक मी humidifier पण ठेवला पण काही उपयोग नाही.

बाकी मोगरा तर पटकन मरतो.

कोणाला माहिति आहे का काही उपाय?

लोकांनी टिंगळ टवाळी कमी करुन एथे exp share करावा ही प्रभु चरणी प्रार्थना :-)



Manuswini
Thursday, March 30, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पहा एक link
हे मी सगळे केले पण काय माहित नाही

http://www.hgtv.com/hgtv/gl_seasonal_winter/article/0,1785,HGTV_3630_1399100,00.html

Shonoo
Tuesday, May 02, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी:

मी देखील अनेक गुलाबांची अशी वाट लावली आणि मग एका वर्षी साक्षात्कार झाला आमच्याइथे US Zone 6 मधे कित्येक लोक गुलाब आंगणात लावतात. हिवाळ्याच्या सुरवातीला सर्व फांद्या छाटून टाकयच्या- जमिनी पासून साधारण १ ते १.५ फूट उन्ची पर्यंत फान्द्या राहतील असे बघायचे. बुन्ध्यापाशी परत एकदा भरपूर मल्च घालायचे.

एप्रिल च्या पहिल्या आठ्वड्यापासून पालवी यायला लागते. माझ्याकडे आता चार पाच वर्षे बागेत गुलाब आहेत. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे मे महिन्यापासून आॅक्टोबर महिन्या पर्यंत फुलेच फुले.

अनंत आणि मोगरा मात्र कुनईतच! अशा झाडांना हिवाळ्यात पाणी पण कमी लागते. Fertilizer अजिबात नाही. त्यातल्या त्यात उज़ेड जास्त मिळेल अशा जागी, पण गरम किंवा गार हवेच्या झोतांपासून दूर ठेवावी.


Manuswini
Tuesday, May 02, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shoonoo

you keep pots inside the home during winter?

do you water them?
can u give me details?

now I am relocated to CA so enjoying my gardening, no snow here ..

thanks

Pendhya
Tuesday, May 02, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, तू दिलेली लिंक, ऊपयुक्त वाटते. घरात कुंड्यातली झाडं ठेऊन पाहिली, पण जगत नाहीत.
अर्थात, आमच्या कडील winters जरा जास्त harsh असल्याने, कितपत फ़रक पडेल माहीत नाही. पण त्यातले काही ऊपाय करुन बघीन.
मला आता पुर्वी सारखी बागकामाची हौस राहिलेली नाही.
माझ्याकडे HGTV चॅनल आहे, पण कधीच बघीतला जात नाही. आता तिकडे वेळोवेळी भेट देईन.


Punyanagarikar
Tuesday, May 02, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fall च्या शेवटी नाजुक झाडांना tarp च cover घातलं तर ती थंडिनी सुकत नाहीत. tarp cover मुळा पाशी बुंध्याला बांधतात. मुळं वाचवण्या साठी भरपूर mulch घालावा लागतो. झाडं हिवाळ्यात बर्फ़ा पेक्षा वार्‍यानी खराब होतात, असा माझा अनुभव आहे.

btw , मी USDA zone 5 मध्ये रहाते


Shonoo
Thursday, May 04, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी:

मोगरा, अनंत आणि अबोली ह्या कुंड्या हिवाळ्यात घरात आणि उन्हाळ्यात डेक वर ठेवते. आत बाहेर करायच्या वेळी एकदम बदल न करता ३-४ दिवस थोडा थोडा वेळ असं करून मग सम्पूर्ण दिवस आत किंवा बाहेर असं करते.

कढीपत्ता मात्र वर्षभर घरातच असतो. तो आत बाहेर करताना काही झालं तर अशी भिती काही जात नाही अजून. जेंव्हा तुळस होती तेंव्हा ती पण अशीच आत बाहेर करत असू. एका वर्षी आत आणल्यानंतर आठवड्याभरात सगळी पाने गळून झाड सुकून गेले. त्यानंतर तुळस कधी आणली नाही.

बाकी शतावरी, नेचे, dracena, snake plant, oxalis, poinsetta आणि इतर houseplants वर्षभर घरातच असतात


Manuswini
Thursday, May 04, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूनू

माझी पण अशीच बरिच झाडे मेली. तुळस ईतकी छान झाली होती आणी आत आणली नी मेली.

झेंडु तर मरतोच म्हणा.

जास्वन्द मी एथे खुप शोधुन आणला होता
त्यावेळी मी Boston ला होते. सध्या काहीच नाहे फक्त गुलाब आहेत.
माझी सगळी आवडच गेली ह्या प्रकारानंतर
आता ca ला move झाले तर पुन्हा लावाय्चे म्हणतेय

thanks for suggestion


Storvi
Thursday, May 04, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कढिपत्ता कुठे मिळतो?

Savani
Thursday, May 04, 2006 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनंत आणि अबोली इथे कुठे मिळते?

Ninavi
Thursday, May 04, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, अनंत म्हणजे gardinia मिळतो home depot मधे. मोगरासुद्धा मिळतो. पण तो early spring मधेच असतो. लवकर जाऊन बघ. अबोलीच काय माहीत नाही बाई.

Karadkar
Thursday, May 04, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, अग कढिपत्ता फ्लोरिडाहुन किंवा ह्युस्टनहुन मागवावा लागेल. मी आणला तर सांगेन तुला.
आबोली - बहुदा देशातुन बिया आणल्या असतिल.


Seema_
Friday, May 05, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा,मिनोती इथुन मागवता येत कडिपत्त्याच झाड. मी मागवणार आहे.
http://www.bhatia-nurseries.com/curry.htm

Puru
Friday, May 05, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I remember we had planted Daisy & Tulip bulbs just before winter (it was in Lousiville,KY) & then waited patiently till spring & they did blossom then!

Ok, now coming back to India - which are the decorative flower-plants which bloom through out the year? (I already have Pentosa/Exora/gerbera etc)

Shonoo
Friday, May 05, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनंताला गार्डेनिया Gardenia म्हणतात. होम डेपो किंवा इतर कुठल्याही फुलांच्या दुकानात मिळेल. साधारण इस्टर पासून मिळू लागतात. पण एकदा घरी आणल्यावर फारशी फुले आली नाहीत. वर्षाकाठी २-४ :-(

अबोली चे शास्त्रीय नाव crossandra आहे. इथे common नाव काय आहे ते विसरले मी. पण होम डेपो मधे मिळते. मी तिथूनच आणले होते. फ़्लोरिडा, टेक्सास या राज्यांमधे मी रस्त्याकडेला, पार्किन्ग लॉट च्या कडेला अबोली पाहिली आहे.

मला कढीपत्त्याचं झाड कोणीतरी दिलं होतं त्यांनी कुठून आणलं माहीत नाही. भाटिया नर्सरी मधून एकदा मदनबाण मोगरा मागवला होता. तो एकदम छान निघाला.

तुळस एडिसन मधून आणली होती. मी तुळस आणि अबोलीच्या बिया अनेकदा आणल्या पण झाडे काही उगवली नाहीत. इथे गोवाकारवार भागातल्यासारखी लाल चुटूक रतन अबोली मिळत नाही आणि कृष्ण तुळस म्हणून ही ( अजूनतरी विफ़ल) धडपड.



Shonoo
Friday, May 05, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु:

बोगनवेल, त्यासारखीच पण अजून नाजूक पांढरीगुलाबी फुले असणारी antigonan नावाची वेल, जास्वंद, गुलाब, हे नेहेमी फुलणारे प्रकार. जागा भरपूर असेल तर बकुळ, सुरंगी, पारिजात, सोनचाफ़ा,रातराणी, हे पण लावता येतील.

मधुमालती bignonia ह्या वेली लावता येतील.
अशोक, कॅशिया च्या अनेक जाती, शन्कासूर, पळस, पांगारा, गुलमोहर शिरीष या सर्वांची फुले अतिशय देखणी असतात. वर्षभर नाही फुलली तरी जेंव्हा बहरतात तेंव्हा कवि कुलगुरू कालिदासा पासून रवींद्रनाथांपासून सर्वांना मोहून टाकणारी झाडे आहेत ही सर्व.

रस्त्यावरून जाता येता कुठे काय झाडे दिसतात या कडे लक्ष ठेवले तर आपल्याला काय आवडते/ आवडेल याचा विचार करून मग झाडे आणता येतील. उगाच नर्सरीवाल्याने ( किंव नर्सरीवालीने) सांगितले म्हणून घेतले असा प्रकार नको.



Savani
Friday, May 05, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, शोनू, thanks .
मी उद्याच बघते अनंत आणि मोगरा मिळतोय का?


Storvi
Friday, May 05, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते भाटीया नर्सरी आम्हा california वाल्यांना फ़ारच महाग पडते. इथे बाहेरुन येणार्या झाडांवर स्पेशल कर लावतात. त्यामुळे कढीपत्त्याची मुळ किम्मत ७ $ आणि तो कर वगैरे धरुन तो २५ $ ला पडतो... सो मी मिनोतीचीच वाट बघते कशी? :-)

Seema_
Friday, May 05, 2006 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग बाई ! अस आहे होय . आम्हा tax free texan ना हे कस माहित असणार ?

Manuswini
Friday, May 05, 2006 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

home depo सगळी प्रकारची झाडे मिळतात

मला अनंतापासुन ते अबोली सुद्धा मिळाली.
मोगरा, तगर सुद्धा florida ला असताना मिळाली होती...
florida ला तर रांगीत जासवन्द मिळायची yello ते purple मधे सुद्धा


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators