Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Maj ani majurdi loka

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Maj ani majurdi loka « Previous Next »

Sandu
Thursday, June 01, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही कधी माज केला आहे का? आजिबात लायकी नसणारया माजलेल्या लोकान्चा काहि अनुभव?

Maanus
Thursday, June 01, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज.... माऽऽऽज असा लिहीतात.

http://palshikar.blogspot.com/2006/01/blog-post_113679518557947043.html

Mangeshwagh
Friday, June 02, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यात सोपे उदाहरण म्हनजे आर टि ओ पोलिस काय सोल्लिड मा ज करतात

Ninavi
Friday, June 02, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं, सागर, भारी आहे हा लेख.

Ameyadeshpande
Friday, June 02, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे मला तो लेख वाचल्यापासून कुठला ही "म" "मा" अद्याक्षराचा शब्द तसाच वाटू लागला आहे :-)
माणूस चा माजूस झालाय मंगेश चा माजेश... आणि कहर म्हणजे मायबोलीची माजबोली.

पोस्ट आक्षेपार्ह वाटल्यास उडवून टाका पण ह्यात वैयक्तिक रोखानी काही नाहिये शब्दांचा खेळ आहे जरासा फ़क्त.


Manuswini
Friday, June 02, 2006 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़लटु लेख आहे हा
बरेच 'गैरसमज' माजाचे clear झाले


Suhani
Thursday, October 05, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप मनापासून आवडला हा लेख. दिवसात असं काही छान वाचायला मिळालं कि चांगलं वाटतं.

Arc
Tuesday, March 13, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kadhi kadhi maaaaj karane must asate nahiter lok tumhala gruhit dharayala lagtat, pan nehmich maaaz kela ter espeially layaki nastana bajula fekale janyachisudhha shakyata asate.
aaamchi officemadhe ek maitrin hoti.fukat maaaaz karayachi sagalyani milun tichyashi bolane takale aata ekati padali aahe.tyamule maaaz kartana sambhalun kela pahije.
layaki nasatana maaaaz kela ter pudhe pudhe tyacha tras hou shakato karan aapalyala watat asate aapan maaz kartoy pan iter lok maaaz na karata (pakshi:layaki asalele lok)aapalya pudhe nighun gelele asatat aani aapalya lakshat yete tevha sandhi nighun geleli asate, aani aapal maaz entertain karayalasudhha kuni uralele nasate.

Ultima
Thursday, March 15, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक हो...माज वरुन एक मस्त जोक आठवला...

एकदा विमानातून एक पोपट आणि कुत्रा प्रवास करत असतात. पोपट एअर होस्टेस ला बोलवतो, "येस सर?" पोपट "नाही, काही नाही."असे ३-४ वेळा होते.
कुत्रा हे सारे बघत असतो, तो पोपटाला विचारतो, "काय रे, हे काय चाललय?" पोपट म्हणतो, "काय नाय रे, असच माज!" कुत्रा विचार करतो आयला एवढासा पोपट आणि माज करतोय. मग कुत्राही एअर होस्टेस ला बोलवुन परत पाठवातो. पोपटाला म्हणतो, "असच, जरा माज!"
पोपट आणि कुत्र्याचे हे चाळे बघुन शेवटी स्टाफ़ त्यांना तंबी देतो, तरिही पोपटाचे चाळे सुरुच असतात. या वेळी कप्टन येवून सांगतो की पुन्हा अस काही घडलं तर गंभीर दखल घेण्यात येइल.
या वेळी कुत्र्याला रहावत नाही. शेवटी सगळे जमा होउन त्या दोघान्ना ३०००० फ़ुटावरुन खाली फ़ेकून देतात.
पडता पडता पोपट कुत्र्याला म्हणतो,
"काय रे, तुला उडता येत का"
कुत्रा म्हणतो नाही.
"मग माज कशाचा करत होतास"


Chyayla
Thursday, March 15, 2007 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा अल्टिमा एकदम Ultimate आहे तुझा किस्सा जोक पेक्षाही याला बोध म्हणता येइल.

Sas
Tuesday, March 20, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा
छान लेख आहे. लेखकाने माणसाच, माणसाच्या मनाच बारिक व अचुक निरिक्षण केल आहे.

Zakki
Wednesday, March 21, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा असाच एक लुकडा मित्र होता. पण बोलणे मात्र जाम रुबाबात! त्याला म्हंटले, लेका एक दिवस तुझ्याच तंगड्या तुझ्याच गळ्यात येतील नि दणकून मार खाशील!

तो म्हणाला छे:! पळून जायची ताकद असली की कुण्णाला घाबरत नाही मी!


Limbutimbu
Thursday, March 22, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> छे:! पळून जायची ताकद असली की कुण्णाला घाबरत नाही मी!
रॊबिन लुकडा हे का???? DDD

(मागे वळुन न बघता धुम्म पळून जातो)

Maanus
Thursday, August 30, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय कोणीच माजुरडा माणूस नाही आला मायबोलीवर आजुन?

Aktta
Friday, August 31, 2007 - 10:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मानुस आहे वाटत.... :-)

Aashu29
Thursday, October 11, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल एक माजुर्डी बाई भेटली, जाम पाउस होता, माझ्या मुलाला प्राम मधे टाकुन मी जात होते, फ़ायनलि इमारतिजवळ पोचल्यावर ४-५ पायर्या होत्या, त्या मी प्राम हातात धरुन चढु लागले, हात ओले, प्रामहि ओलि त्यामुळे जिन्याच्या मध्यातच प्राम हातुन सटकली, म्हणजे एका हातातुन, दुसर्या हाताचि पकड होती अजून, मुलगा घाबरुन रडायला लागला.
शेजारुन एक बाई गेली, चुक्चुक करुन निघुन गेली.
पण हात दिला नाहि बरं का!! वर जाउन पाहिलं तर ती बाई तिच्या ३ वर्षाच्या मुलाला भेटलि,म्हणजे हीला मुलबाळ असुनहि.......
मीच सावरुन पुन्हा प्राम उचलून वर आणलि, सहसा परदेशात कोणि असे करत नाहि.
पण माजुर्डे लोक सगळिकडे असतातच!!

Tiu
Thursday, October 11, 2007 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी... ह्याला माज नाही, नालायकपणा म्हणतात!

माजुर्डी असती तर मदत केली असती पण वरुन 'मी किती माझ्या मुलाची किती काळजी घेते. तुम्ही अश्या निष्काळजीपणे कश्या काय वागता. आता मी नसती तर काय झालं असतं बरं' वगैरे lecture ऐकवलं असतं...


Amruta
Friday, October 12, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी टीउ:-), तो माजोरेपणा नाहीच तो नालायकपणाच..

Ramani
Tuesday, December 04, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक किस्सा आठवला, मी कॉलेजात असतानाचा. मी सॉफ़्टबॉल टीम मधे होते, आणि आमची टिम नुकतीच एक मॅच जिंकली होती. कॅन्टीनमधे आम्ही सगळ्या आनंद साजरा करत होतो. त्यामधे पेप्सी शॅम्पेनसारखे उडवण्याचा प्रकारही होता. ते बघुन एक सर (हे अति खडुस म्हणुन प्रसिद्ध होते, त्याना आम्ही 'लाल गेंडा' म्हणत असु.) तरातरा आलेत. वस्सकन ओरडुन म्हणालेत, "ह्या प्रकाराला (पक्षी: पेप्सी उडविणे) माSSज म्हणतात." आणि मी अत्यन्त माSSजुर्डेपणाने उत्तर दिले, "नाही सर, ह्याला 'मजाSS' म्हणतात."
मात्र त्या दिवसानंतर त्यांची माझ्यावर करडी नजर राहीली. ते रसायनशास्त्र शिकवित. प्रत्यक्षिकांच्या वेळी प्रत्येक टेस्ट आणि रिझल्ट दाखविल्याखेरिज माझी सुटका झाली नाही. पण मार्क्स कमी देण्याचा हिणकस प्रकार त्यानी कधीही केला नाही.


Mrdmahesh
Tuesday, December 04, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप्ति, असं लिहायचं मॅच = ma.cch

Ramani
Tuesday, December 04, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद महेश!! सुधारणा केली आता.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators