Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 18, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through May 18, 2006 « Previous Next »

Deepa_s
Monday, May 15, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शिकायला दोन वर्ष बंगलोरला होते. मला कन्नड अजिबातच यायच नाही पण माझ्या एका कन्नड मित्राने मला "कन्नडा गोतिल्ला" म्हणजे मला कन्नड येत नाही अस म्हणायला शिकवल होत.
एकदा बस मधे एक बाई माझ्यशी तावातावाने बोलत होती. मी तिला १-२ वेळा कन्नडा गोतिल्ला अस सांगून बघितल पण ती काही ऐकेना. ५ मिनिट अशीच गोन्धळात गेल्यावर एक सुशिक्षीत मुलीने मला इंग्रजीत सागितल की ती बाई माझ्याशी तमिळ मधे बोलत होती. आणि तिला माझ कन्नड अजिबत कळल नव्हतं.


Ameyadeshpande
Monday, May 15, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा रात्री मिरजेहून पुण्याला सह्याद्री एक्स्प्रेसनी चाललो होतो... तशी ही नेहमीचीच गाडी त्यामुळे फ़ार नवीन काही नव्हतं... reservation ही हातात होतं आणि गाडी पण वेळेत होती... कोल्हापूरहून गाडी आली वेळेत आणि मी तिकिटावर लिहिलेल्या डब्यात चढून berth शोधला... पाहिलं तर तिथे आधीच एक जण होता आणि त्याच्या कडे पण त्याच berth चं तिकिट! झालं... दोघेही गोंधळात...मग TC ला बोलावलं. तो आला, दोघांची ही तिकिटं पाहिली आणि माझ्याकडे वळून म्हणाला(कानडी tone मधे) "धीस इस यस्टरडेज टिकीट".. मी गार... सुदैवानी फ़ारशी गर्दी नव्हती आणि त्या दिवशीचं तिकीट त्याच्याकडूनच घेतलं आणि जाऊ शकलो त्याच दिवशी. झालं असं होतं की नेहमी सह्याद्री एक्स्प्रेस यायची रात्री ११.५० ला आणि महिन्यभरापुर्वी त्याची वेळ १५ मिनिटं पुढे ढकलली होती आणि आता १२.०५ झाली होती आणि त्यामुळे हा एका दिवसाचा घोळ झाला होता!

Yogesh_damle
Monday, May 15, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्श्वभूमी: नांदेडहून अम्रुतसरला जाणारी सचखंड एक्स्प्रेस ही नांदेड-मनमाड प्रवास Diesel locomotive वर करते आणि पुढे electric loco वर.

प्रसंग: मी 'सचखंड'ने पहिल्यांदाच प्रवास करत होतो, आणि हा loco change चा सोहळा पहायला प्रचंड उत्सुक होतो. मनमाड आल्याबरोबर मी platform वर उतरून diesel loco असलेल्य टोकाकडे पळालो. बराचवेळ वाट पाहिली की W.D.M (डीझेल) loco जाऊन आत्ता W.A.M(Electric) loco लागेल. खूपवेळ वाट पहिल्यावर 'निसर्गाची साद' आली. तिला 'प्रत्युत्तर' द्यायला मी एका डब्यात शिरलो. आणि गाडी एका झटक्यात हलली!!! माझ्या पोटात खड्डा पडला. नशिबाने डब्बे Vestibule (आतून जोडलेले) होते. मी a.s.a.p. माझ्या डब्ब्यात आलो आणि आईचा जीव भांड्यात पडला. मग खुलासा झाला की सचखंड ला Electric engine हे 'पूर्वाश्रमीच्या' गार्डाच्या टोकाला लागतं, आणि आधीचं एंजिनाचं टोक हे गार्डाचं टोक होतं. एक अनवस्था प्रसंग फक्त आईच्या शिव्या खाण्यावर भागला!!! :-)

मला Trains चा इतका प्रचंड शौक की माझ्याबरोबर रेल्वेप्रवास करायच्या कल्पनेने घरच्यांच्या अंगावर काटाच येतो (मला खिडकीतून गम्मत पाहणं below dignity वाटतं. 'दारातूनच प्रवास' असं 'खाईन तर तुपाशी' वालं धोरण. अगदी राजधानीचं booking असलं तरीही...) सिनेमटोग्राफ़ीचा किडा कुठे आणि कसा वळवळेल सांगता येणं कठीण आहे... चालत्या गाडीच्या दारातून कमेर्‍याप्रमाणे आपले डोळे फिरवणं... Don't try it yourself!!!


Ameyadeshpande
Monday, May 15, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापूर हून एकदा मिरजेला passenger नी येत होतो आणि पहिल्या डब्यातच होतो. रुकडी ला गाडी थांबल्यावर मनातल्या एका खूप जुन्या इच्छेनी डोकं वर काढलं.... engine पाशी गेलो आणि driver ला विचारलं "मी engine मधे बसलो तर चालेल का? मला जरा बघायचं आहे train कशी चालवतात ते". "हो या की" म्हणाला! आणि चढताना विचारलं काय हो तुम्ही engineer होणारे का :-)
मग आत बसलो आणि त्यानी समजाऊन सांगितलं ३-४ levers होत्या त्यातली एक ओढ म्हणाला आणि एका मागून एक gear पडायला लागले आणि आगगाडी धाडधाड करत पुढे चालू लागली :-) केवढं अप्रूप वाटत होतं मला त्याचं :-) आणि एक लिवर होती ती ओढा म्हणाला... ओढल्यावर जोSSSSSरात कानठळ्या बसतील असा अवाज झाला शिट्टीचा :-) माझं एक लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण झालं त्या दिवशी :-)


Zakki
Monday, May 15, 2006 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बरेच वर्षांनी भारतात परत गेलो होतो. दिल्लीहून नागपूरला जाणार्‍या गाडीत माझे व बायको, मुलांचे रिझर्व्हेशन केले होते. माझा भाऊ एअर फोर्स मधे Sqd. Ldr. होता. तो आम्हाला भेटायला गाडी सुटायच्या अगदी पाच मिनिटे आधी आला. त्याच्याबरोबर त्याचे हाताखालचे एक दोन NCO पण होते. माझी इथे पाऽर भंबेरी उडालेली. कारण माझ्या जागी इतर लोक बसले होते, नि ते हलायला तयार नाहीत. माझ्या भावाने हे पाहिले, नि तो त्याच्या लोकांबरोबर डब्यात चढला. त्याने पाहिले की माझी तिकीटे त्याच जागेची आहेत, तो एक बोलला नाही की दोन. त्याने त्या बळजबरीने जागा व्यापून बसलेल्या लोकांना विचारले, तुमचे सामान कुठले? त्याने दाखवल्याबरोबर माझा भाऊ बरोबरीच्या एअर फ़ोर्स मधल्या लोकांना म्हणाला, यांचे हे सामान घेऊन डब्याबाहेर टाकून द्या, नि नंतर त्यांनाहि उचलून फेकून द्या कुठेतरी. ते लोक अरे अरे म्हणेस्तवर त्यांचे एक दोन डाग गाडीबाहेर! ते लोक जीव मुठीत धरून पळून गेले! नि मी शांतपणे जणू काही झालेच नाही असे समजून बाकावर सतरंजी अंथरली, बायको मुलांना नीट बसवले, नि पुढे मला प्रवासात कसलाही त्रास झाला नाही. शठं प्रति शाठ्यं चा अनुभव आला. माझा भाऊ म्हणाला तू त्याच्याशी वाद काय घालत होतास? तुझे बरोबर आहे, तुझा हक्क आहे. तुझ्या जागेवर तो आला, म्हणजे तुझ्या घरात घुसलेल्या माणसाला जसा तू धक्के मारून हाकलून लाउ शकतोस, तसेच त्यालाहि हाकलून दे!

Limbutimbu
Tuesday, May 16, 2006 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा, भन्नाटच अनुभव हेत सगळ्यान्चे! :-) हा बीबी भरभरुन वहायला हरकत नसावी! :-)

Mrinmayee
Tuesday, May 16, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागपुर्-दादर express ने मुंबईला ऐन उन्हाळ्यात (न विसरता येणारि तारीख १९ मे) जाण्याची बुद्धी झाली. पहाटे भुसावळला २ तास गाडी जागेवरून हलेना. त्यातून २ माणसं तिकिटाच्या काही problem मुळे नागपूरपासूनच रात्रभर भांडत होती आणि सकाळी तर नव्या दमानी बाचा बाची सुरु झाली. डब्यातले लोक वैतागलेले. सकाळीच उन फार जाणवत होतं. आणि मग २ तासांच्या भुसावळ मुक्कामानंतर समोर जिथे १ track होतो तिथे माल गाडी रुळावरून घसरल्याची आणि त्याचा driver दारू पिऊन चालवत होता ही सुवार्ता कळली. आमची गाडी शेगावला मागे आणली आणि मग नाटकाचा दुसरा अंक सुरु झाला. लोकांनी शेगावच्या प्रसिध्द कचोर्‍या १० मिनिटात उडवल्या. station वरचं पाणी संपलं ही आणखी एक बातमी कळली. आणि कमितकमी ६-७ तास तरी इथेच मुक्काम आहे ही दुसरी बातमी स्वत: driver साहेबांनी जाहीर केली. मग मात्र सगळे कामाला लागले. आमच्या डब्यातल्या २ भांडखोरांची दिलजमाई झाली. station बाहेर पडून पाण्याचे माठ त्यांनी विकत आणले. बरोबर २-४ फळवाल्यांना पकडून आणलं. कुठुनतरी आमच्या डब्यातल्या मंडळींसाठी झुणका भाकरिचीहि सोय केली त्यांनी. डब्यात एक लग्नाचं बिर्‍हाड चाललं होतं. त्यांनी सगळ्यांना प्रेमानं लाडू चिवडा खाऊ घातला. गरमीनं हैराण होऊनही सगळ्यांच्या मदतीनं तिथले ८-९ तास सुसह्य झाले.
फक्ता काही लोकांना गजानन महाराजांच्या दर्शनालाही जायचं होतं तेव्हडं मात्र करू नका हे driver साहेबांनी सांगितल्यामुळे त्यांचा विरस झाला. पण हा प्रवास मात्र गाडितल्या सगळ्यांच्या कायम लक्षात राहील.


Atul
Tuesday, May 16, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक प्रवासाशी सम्बधित किस्सा आहे. मी कॉलेज च्या शेवटच्या वर्षात असताना पहिल्यान्दाच रेल्वे चा पास काढायला गेलो होतो.
मी: "एक पुणे मुम्बै पास द्या"
बुकिन्ग क्लार्क: "आय डी कार्ड बघू"
मी सवयी प्रमाणे कॉलेज चे आय डी कार्ड त्याला दाखवले.
तसा वैतागुन बुकिन्ग क्लार्क: "अरे बाबा रेल्वे चे आय डी कार्ड दाखव
मी: "मी रेल्वे मध्ये काम करत नही" (मला वाटले तो रेल्वे एम्प्लॉयी आय डी मागतोय)
एव्हाना बुकिन्ग क्लार्क ची विकेट उडाली होती. त्याने शान्तपणे मला आय डी कार्ड चा फ़न्डा समजावला. :-)


Ajjuka
Wednesday, May 17, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रवासात घडलेला thrilling अनुभव मी आधी एकदा पोस्ट केला होता.. तीच लिंक परत देतेय..
/hitguj/messages/46/49481.html

Maitreyee
Wednesday, May 17, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! सॉलिड च आहे अनुभव! खराच अविस्मरणीय!

Ameyadeshpande
Wednesday, May 17, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका खरोखरच फ़ार thrilling अनुभव आहे हा :-)

Zakki
Thursday, May 18, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण माझा जुना अनुभव पुन: लिहितो. मी बरेच वर्षांपूर्वी भारतात गेलो होतो. भारतात आल्या आल्या मला एकदम बराच उत्साह येतो. काहीहि ठिक झाले नाही तरी मला त्याचीहि गंमतच वाटते. (अर्थात् मागल्या वर्षी जरा फारच झाले.) असो.
मी मुंबईहून अंबेजोगाई (जि. बीड) इथे एस. टी. ने गेलो. परत येताना पुन्हा एस. टी. ती उशीरा आली. मला त्याचे काहीच वाटले नाही. मग एस टी त चढलो, इतर लोक चढले, कंडक्टर पण चढला, घंटी दिली, नि म्हणाला एस टी. सुटणार आहे, चला सगळे खाली उतरा! मला समजेना ही काय भानगड आहे? पाहिले तर मागच्या बाजूचे बरेच लोक उतरून गाडीला धक्का देत होते. जरा वेळाने गाडीचे इंजिन सुरू झाले. हा प्रकार प्रत्येक थांब्यावर! असे करत रात्री ११ ऐवजी पहाटे दोनला ती नगरला पोचली.

मला काहीच फरक पडत नाही! तिथे असे ठरले की या गाडीची बॅटरी बिघडली आहे, तर गाडी बदला! (दुसरी बॅटरी नाही का घालता येणार? - मी. उत्तर. गप बसा हा भारत आहे, इथे असेच असते. असू दे असू दे म्हंटले मी. मग आता कुठल्या गाडित जायचे? इतक्यात नाही, दुसरी गाडी आल्यावर. जरा वेळाने दुसर्‍या दोन गाड्या आल्या. कंडक्टर ने सांगीतले, त्या गाडीत सगळे चढले. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, सामान चढवायचे आहे, म्हणून थांबावे लागत होते. जरा वेळाने कंडक्टर म्हणतो, आता सगळे त्या दुसर्‍या गाडीत जा, कारण सामान त्या गाडीत टाकण्यात आले आहे, नि पुन्हा सामान हलवण्यापेक्षा, माणसे हलवणे सोपे! भारतातले लोक हुषारच! मग एकदाचे सामान नि प्रवासी एकाच गाडीत आले. चहा, सिगारेट नि आणखी काहीतरी घेऊन तरतरीत झालेला डायवरवाला म्हणाला 'आता हानतो xxx '. नि जोरात गाडी घेऊन, आपले पागोटे डोक्यावर बसवता बसवता समोरून एकदम मोठी लॉरी आली.

अरे, अरे म्हणेस्तवर आमच्या एस टी ने रस्ता सोडून बाजूची वाट धरलेली. नि काय सांगू? एस टी चक्क खड्ड्यात! अश्या गोष्टी फक्त सकाळ मधे वाचलेल्या माहित होत्या. इथे प्रत्यक्ष! त्यातहि मी खो खो हसत होतो, कारण गाडी कलंडली तेंव्हा मी वर, डाव्या बाजूची माणसे खाली. सगळ्यांनी अंबेजोगाई हून आणलेले नारळ एकामागून एक लोकांच्या डोक्यात टपाटप आपटत होते, नि ते ओय ओय ओरडत होते!
मग काय? अनुभवी लोकांनी शेकोटी पेटवली. नि आरामात झोपण्याची तयारी केली. उद्या दुपारपर्यंत दुसरी गाडी येणार नाही. पुन्हा मी शांतच. गंमतच आहे ही सगळी! तेव्हढ्यात दुसरी एक गाडी थांबली. असे ठरले की ज्यांचे तिकीट पुण्यापर्यंत आहे त्यांनाच या गाडीत बसता येईल माझे तिकीट तर मुंबईचे. मग मी म्हंटले मी पण पुण्यालाच जाणार आहे, तिकीट कुठे पडले देव जाणे! कधी कधी माझेहि खोटे बोलणे उघडकीस येत नाही.
मग आम्ही पहाटे पहाटे पुण्याला पोचलो. वाटेत कंडक्टर म्हाणाला की फक्त पुण्याचेच लोक अश्यासाठी, की मुंबईचे लोक घेतले, तर ते पुण्याला जाऊन म्हाणणार की आमचे मुंबईचे तिकीट आहे, आम्हाला फुकट पुणे ते मुंबई पोचवा! ती झंझटच नको. पुन्हा एकदा भारतीय हुषारीचा अनुभव. मी मात्र जाम खूष! मत्प्रिय पुण्यनगरी! दुर्दैवाने चाळीस वर्षानंतर पुण्यातला एकहि गोष्ट लक्षात नव्हती. शिवाय तिकडे बायको मुले मुंबई ला. त्यांना काही काळजी नव्हती, पण सासू सासरे फारच काळजी करतील म्हणून लगेच मुंबईचे डबलडेकर गाडीचे तिकिट काढून वाटेत बटाटे वडे, चिक्की, करवंदे इ. वर यथेच्छ ताव मारला नि रमत गमत घरी पोचलो! उशीर का झाला विचारले तर म्हंटले, काही नाही एस टी खड्ड्यात पडली म्हणून! लोकांना वाटले मी गंमतच करतोय्. कानफाट्या नाव पडले आहे ना!



Milindaa
Thursday, May 18, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL Zakki

Wakdya
Thursday, May 18, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jhakki माफ करा पण एक विचारू का? प्रवासात अशाप्रकारचे अपघाती अनुभव वरचे वर येतात का? असे विचारले कारण गेल्या वर्षी, जर तुम्हाला आठवत असेल तर, आपण कार मधुन तमन्ना हॉटेलकडुन माझ्या घराकडे जात होतो, वाटेत जिथे कात्रज देहूरोड बायपास आहे तेथिल चौकात चौक क्रॉस करण्याकरता बाकी गाड्यांबरोबर मी माझी गाडी थांबवली होती. हे क्रॉसिंग तिरके असल्याने आणि माझ्या उजव्या बाजुस बर्‍याच दुचाकी चारचाकी वहानांची गर्दी असलेने मला उजवीकडून हायवेवरुन येणार्‍या गाड्या दिसत नव्हत्या आणि एका चुकार क्षणी मी माझी कार थोडीशी पुढे सरकविली तोच सुसाट वेगात केवळ काही सेंटीमीटर्स वरुन एक बस गेली, त्या क्षणी एक क्षणभर माझ्या छातीचा ठोका चुकला होता. आपली तेव्हाची प्रतिक्रिया काय होती ते कळले नाही किंवा आता आठवत नाही पण तुम्हाला "मी नीटपणे घेवुन जातो आणि परत सोडतो, काळजी करु नका" असे आश्वासन दिल्याचे मला स्मरते आहे

Zakki
Thursday, May 18, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या, असे अपघात वारंवार होत नाहीत, असे प्रसंग वारंवार होत नाहीत, म्हणूनच कधी झाले की गंमत वाटते!
तमन्ना इ. ची सुखद आठवण जागी आहे. पण तुम्ही गाडी चालवत असल्याने तुम्हाला जास्त जाणवले, मी नेहेमीप्रमाणे अचकट, विचकट, उथळ नि पांचट बोलत बसलो होतो, माझे लक्ष नव्हते. शिवाय भारतात अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे गोष्टी होतील, ही अपेक्षाच चुकीची आहे. Positive दऊष्टीने पाहिले, तर भारतातली प्रचलित (कायदा काहीहि असो) पद्धत, रस्त्यावरील गर्दी सतत वाहती ठेवण्यासाठी उपयोगी पडत आहे. कदाचित् 'गोंधळ' आहे असे परकीयांना वाटत असले तरी अपघातांचे प्रमाण नि अपघातात गंभीर दुखापति किंवा मृत्यू यांचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने भारतात कमीच असावे.

इथे काय, जरा धक्का लागला की लोक पैसा उकळण्याची संधि मानून त्याचा फार गाजावाजा करतात.

माझे असे स्पष्ट मत आहे की केवळ मुन्शिपाल्टि ला पैसे मिळावे म्हणून लहान सहान नियमांचा आधार घेऊन इथले पोलीस लोकांना अक्षरश: 'छळतात'. जसे संपूर्ण रिकाम्या रस्त्यावर रात्री दोन वाजतासुद्धा, ' Stop ' ला अगदी पूर्ण न थांबल्याबद्दल तिकीट! नि तो माणूस त्याच भागातला गेली पंचवीस वर्षे रहिवासी असला तरी! याला काय वाहतुकीचे नियम अंमलात आणतात म्हणायचे की विनोद? अश्या वेळी त्या वाहनचालकाने विचारले, काहो पोलीसदादा, सगळे Drug dealers , जे उघडपणे धंदा करतात, त्या सगळ्यांना अटक करून झाली म्हणून आता आमच्या मागे लागलात का? किंवा सकाळी भर गर्दीच्या वेळी लाल दिवा तोडून जाणारे सगळे पकडल्या गेले का?


Lopamudraa
Thursday, May 18, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.... jhakkii.... .. .. .. . .. .. hyaa <bb> var yeun kharachkaramaNuk jhaalii...

Mrinmayee
Thursday, May 18, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, ST खड्ड्यात पडण्याचा अनुभव फारसा सुखावह नसला तरी तुम्ही लिहिलय खूपच धमाल! by the way तुमच्या डोक्यात किती नारळ बसले?

Moodi
Thursday, May 18, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुमचा अनुभव गंमतशीर आहे. हा अंबेजोगाईचा प्रवास आम्ही स्वतंत्र जीप करुन गेलो होता तेव्हाचा आठवला. मात्र आम्हाला संपुर्ण प्रवासभर अजीबात त्रास झाला नाही. आधी वेरूळ, घृष्णेश्वर मग बीडला जेवण पुढे परळी वैजनाथचे दर्शन अन मग आंबेजोगाईला गुरुजींकडे मुक्काम, सकाळी मंदिरात झालेले देवीचे छान दर्शन अन मग मुकुंदराजाची समाधी हे बघुन आलो. काही प्रवास खरच अविस्मरणीय असतात.

Robeenhood
Thursday, May 18, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अम्बेजोगाईवरून नारळ? अम्बेजोगाई कोकनात आहे?
कैतरीच कै?
अगदी कालची पोरेसोरे भेटली म्हणून ठोकुनि देतो ऐसाजे असंच चाललय म्हणायचं

हाय काय न नाय काय........


Zakki
Thursday, May 18, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, नारळ काय फक्त कोकणातच मिळतात का? कुठल्याही देवळात खणा नारळाने ओटी भरण्याची पद्धत आहे. तिथे प्रसादाचा नारळ असणारच. उगाच पातोंडा रिटर्न म्हणजे अमेरिकेतून हार्वर्डची Ph.D. घेऊन आल्यासारखे बोलायचे! पातोंडे! हे काय गावाचे नाव झाले? काहिही ठोकून देणारे कोण हे कळतच आहे!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators