Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Worst traffic

Hitguj » My Experience » Worst traffic « Previous Next »

Bee
Thursday, May 11, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यावेळी माझे परतीचे विमान रात्री अकराचे होते. मी साडेआठला घरून निघालो. ऍटो घेतला. अंधेरीलाच घर होते म्हणून साडेआठला निघालो आणि वाटले फ़ार फ़ार तर एक तास लागेल. पण चकाल्याला इतकी ट्राफ़िक होती की मला air port वर पोचायला पावणे अकरा झाले नि माझे विमान चुकले. विमान Jet Air ways चे होते. तिथल्या लोकांना मी खूप विनवणी केली मी मला घ्या पण ते म्हणाले ते आता इतक्या उशिरा शक्य नाही. दुसर्‍या दिवशी ट्राॅफ़िकची भिती बाळगून साडेसातला घराबाहेर पडलो आणि बरोबर दहाला Air port वर पोचलो. अंधेरीच्या चार बंगल्यापासून air port म्हंटले तर फ़क्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे पण traffic ने मात्र कमाल केली. दुसर्‍यावेळी देखील माझे विमान चुकेल की काय अशी अवस्था झाली होती.

Rahul16
Thursday, May 11, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jara Banglore chya traffic baddal koni sanga.
Mumbai la mala taxiwala ekda air port te Hilton hotel (35 Km) 45 minitat gheun gela. ratri 8:30 la. this is amazing. mumbai cha traffic baracha changala aahe. discipline pan changala aahe.

bangalore la yatale sagalech kharab aahe , I mean raste,amount of vehicles, discipline.

Chennai is very fast in traffic.100% better than pune and bangalore.

Rahul16
Tuesday, May 16, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ya BB war konich kase lihit nahi.....agadi punekarhi...

ki sagale traffic jam madhe adakale?..:-)

Alpana
Tuesday, May 23, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kahi diwasanpurvi mumbaichya traffic cha mast anubhav ghetala...ek mission project review sathi mumbaihun bhiwandila yenar hote...they were supposed to reach at Bhiwandi by 11.00...This Mr. Kennith started around 7.30 to 8.00 from some hotel in south Mumbai. He has to pick another person from Andheri and then start for Bhiwandi.. Generally it takes 1& half hr to 2 Hrs from Andheri to Bhiwandi...These people reached at 3.30 in afternoon...and that too we called traffic police on wireless to help them get through traffic....and return journy to Airport we did in 1.25 hrs only..
that too in eveining around 5.00 in evening which is also pick hrs...

Radha_gd1
Monday, July 03, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे,मी पुणे,बंगलोर आणि चेन्नई ला रहिले आहे त्यामुले ते अगदी पटते.
पुण्याचा ट्रफ़िक एक्दम बकवास.बंगलोर तसे बरे आणि चेन्नई चांगले.(सध्या मि चेन्नै ल असते ना!)

अरे तुझ्या प्रोफ़ाईल वरून कळाले कि तु पण चेन्नई ल असतो, कुठे असतो? आम्ही अड्यार ला असतो


Zakki
Monday, July 03, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सुद्धा माझी मुलगी डेलावेअर हून साऊथ एडिसन ला यायला निघाली तर दीड तासा ऐवजी तिला चार तास लागले. ट्रॅफिक जॅम!

अर्थात इथले लोक खुळचट आहेत. आपली गाडी air conditioned आहे नि Sound system चांगली आहे म्हणून मुकाट्याने गाडीत बसून रहातात. त्यामानाने भारतीय हुषार. त्यांनी हे ओळखले की रस्त्यावर यायचे कारण कुठून तरी कुठेतरी पोचणे हे आहे, वाटेत रखडणे नाही. म्हणून ते लेन मधून जाणे, कायदा पाळणे अश्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करून, 'घुसा, घुसा. कोण आधी पुढे घुसे तो!' अशी शर्यत करून गाडी चालवत असतात. इतके करूनहि माझी खात्री आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात इथल्या पेक्षा तिथे जीवघेणे किंवा गंभीर अपघात कमी होत असणार!


Raina
Tuesday, July 04, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणे, मुम्बई, बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई यात.. सगळ्यात भयानक वाहतूक- अंधेरी ते सिप्झ किंवा साकीनाका ओलांडातानाची...
बंगलोर चे रिक्षावाले बाकी आपली रिक्षा हे ३ चाकी विमान समजून take off करतात.


Kiran
Tuesday, September 05, 2006 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा बन्गलोर बरे?? तिथले ट्रफ़िक हवालदार पाहून मी impress झालो होतो. मस्त बाईक्स वर्ति US style transparent sheet वर पोलिस असे लिहिलेले. पण सिग्नलला त्यांना कोणीही जुमानत नाहीत त्यांच्या समोरच सिग्नल मोडून लोक जातात. अक्षरश्: रडकुंडीला आलेले पाहिलेय मी त्यांना!!

Arc
Wednesday, February 14, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pan tarihi bangloreche traffic punyahun kaik patine changale aahe mukhya mhanaje tyanchi public transport system farach changali aahe,aani punyat pollution jevadhe janvate tevhade bangloremadhe janvat nahi.

Mandard
Wednesday, February 14, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दिल्ली व चेन्नाई ची वाहतुक बरी वाटली. दिल्लीत खुपच बेदरकार गाड्या चालवतात.मी अनुभवलेला सगळ्यात भयानक ट्रफ़ीक शारजाह ते दुबई. चार वर्षे ते सुख घेउन सध्या दिल्लीत आहे. मी भारतात गाडी अजुन चालवलेली नाही इथली ट्रफ़ीक बघता चालवायची हिम्मत होत नाही.

Anjalisavio
Wednesday, February 14, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार मी गेले ३-४ वर्ष हाच अनुभव घेतेय शारजाह दुबई रोड वर, पण जेव्हा जेव्हा सुट्टित घरी जातेना ठाण्यात तेव्हा, हाच विचार येतो कि ईथले (दुबई-शारजा) चे traffic बरेच बरे आहे.

Zakki
Wednesday, February 14, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातल्या, विशेषत: पुण्यातल्या वाहतुकीवर टीका करू नका. मी दोन वर्षंपूर्वी पुण्यात गेलो असता मला खालील गोष्टी सांगण्यात आल्या:

१. पुण्यातील वाहतुकीवर टीका करू नका, आम्हाला डिग्निटी आहे, आम्ही ऐकून घेणार नाही!

२. रस्ते हे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणि जाण्यासाठी बांधलेले आहेत. त्यावर आपली वहाने अडकवून ठेवण्यासाठी नाही. आपल्याला जिथे जायचे असेल तिथे झटकन् जा नि रस्ता इतरांसाठी मोकळा करा. कारण भारतात लोकसंख्या खूप आहे, नि श्रीमंत लोकांचे प्रमाण वाढल्यामुळे बर्‍याच लोकांकडे दुचाक्या, चारचाक्या आहेत.

त्यामुळे वाहतुकीच्या कृत्रिम नियमांचे पालन करायचे, म्हणून घुसाघुसी न करता, एकामागे एक उभे राहून पेट्रोल व वेळ खर्च करण्यात काय अर्थ आहे.

रिक्षावाल्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. रस्त्यात शक्यतो न थांबता गिर्‍हाईकाला वेळेवर पोचवणे नि दुसरे गिर्‍हाईक शोधणे महत्वाचे.

रस्त्याच्या उजव्या बाजूला जर कमी गर्दी असेल तर उजव्या बाजूने चालवून लवकरात लवकर पुढे जाणे बरे.

शिवाय कधी कधी उजव्या बाजूने चालवूनच अपघात कमी होतात, पेट्रोल, नि वेळ वाचतो. त्यामुळे प्रदूषणहि कमी होते. रस्ता जर Divided असेल (पुणे मुंबई हायवे सारखा) तर आधी डाव्या बाजूने पुढे जाणे, मग समोरून येणार्‍या वहतुकीचा सामना करून U Turn करणे, नि मग परत उजवीकडे वळण्यासाठी थांबून पुन: अपघाताला निमंत्रण देणे. यापेक्षा सरळ जरासे उजव्या बाजूने गेले तर काय बिघडले?

सायकल, नि मोटरसायकलवाल्यांनी तर जमेल तसे भराभरा पुढे जात राहून रस्ता मोकळा करावा.

इतर देशात रस्त्यावरून किती गाड्या गेल्या ते मोजतात. पण महत्व माणसांना आहे. एका तासात किती माणसे इकडून तिकडे गेली हा आकडा महत्वाचा आहे. त्यामुळे सहा सीटर रिक्षात बारा जण नेता येत असतील तर बरेच.

भारतातील वाहनचालक हे अत्यंत कुशल चालक आहेत, म्हणूनच त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरी रेसेस मधे भाग घेऊ शकणारे तरूण निर्माण होतील.

कदाचित् क्वचित् अपघातामुळे प्राणहानि होते, पण एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार हे प्रमाण इतर प्रगत देशातील टक्केवारीपेक्षा कमीच!


Deepanjali
Thursday, February 15, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हैदराबादी ट्रॅफ़िक पुण्या पेक्षाही चार पाउले पुढे आहे !
( तिथले रस्ते अतिशय चांगले असून सुध्दा )


Mandard
Thursday, February 22, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजलि आता टोल भरुन ट्रफ़ीक मधे थाम्बणार का रोज. बरे झाले मी दुबई सोडली ते. नाहीतर उरला सुरला पगार टोल भरण्यात गेला असता.

Anjalisavio
Monday, February 26, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोल जुन मधे चालु होतोय, पण सगळि कडे नाहि. त्यामुळे जिथे टोल नाहि तो रस्ता पकडायचा मग कधी पोहोचु तेव्हा पोहोचु. विचार करायचा नाहि. Metro सुरु करुन काय करणार आहेत देव जाणे. त्याचा फ़ायदा पण कुणाला होणार ते कळत नाहिये. जाऊ दे. डोक्याला ताप अजुन काय?

Mandard
Tuesday, February 27, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेट्रो ही टुरीस्ट लोकांसाठी आहे. त्याचे कोच पण लहान आहेत आमच्यायेथील मेट्रोपेक्षा (दिल्लीतील). त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा काही फ़ायदा नाही. आई बाबांना (पाहुण्यांना) फ़िरवायला ठिक आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators