Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through March 13, 2006 « Previous Next »

Arusule
Tuesday, March 07, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा वेन्धळेपणा.... कथा सान्गायला गेले तर सम्पता सम्पणार नहीत. थोडा मराठी लिहायचा सराव करते आणि सान्गते १ २ दिवसात. तो पर्यन्त तुमच्याकडुन येउ देत ना. काय म्हणता?
अरुणा


Maanus
Tuesday, March 07, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुधाची स्निग्धदा किती आहे हे ओळखण्याची एक पद्धत आहे. बोली भाषेत त्याला Fat मोजने असे म्हणतात.

पद्धत थोडी क्लिष्ट असते. म्हणजे एका काचेच्या tube मधे पहिले थोडे acid घ्यायचे... मग त्यात थोडे alcohol टाकायचे व शेवटी थोडे दुध. मग त्या tube ला झाकण लाऊन एका विशीष्ठ प्रकारच्या भांड्यात ठेऊन ते भांडे जोरजोरात हलवायचे असते.

तर आमचा रामनाथ एकदा मला ही Fat कशी मोजतात हे शिकवत होता. रामनाथ ने ती tube हतात धरली आणि माला acid, alcohol, दुध त्यात टाकायला सांगीतले. माझ्या हतातल्या बाटली मधे acid आहे ह्या कल्पनेनेच माझे हात थरथरायला लागले आणि माझ्या हातुन जरा जास्तच acid रामनाथच्या हातावर सांडले.

रामनाथने एक क्षण माझ्याकडे पाहीले आणि सरळ हौदा कडे धुम ठोकली. बर त्याच्या हाताला जास्त इजा नाही झाली.

मी केलेल्या ह्या वेंधळेपणामुळे / चुकीमुळे मी परत त्या Fat मोजायच्या भानगडीत नाही पडलो.


Arusule
Wednesday, March 08, 2006 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक छोटासा किस्सा आधी लिहुन पहाते.
हल्लीच मी दादाला लिहिलेला ई-मेल मेसेज चुकुन मैत्रिणीला पाठवला. नशिब.. दादालाच लिहिला होता.
तुमच्यापैकी कुणी कपडे उलटे घालुन गेलय बाहेर? मी गेलेय. ओफ़िसमध्ये पण... असे अनन्त किस्से आहेत. लिहिन हळुःहळु
अरुणा


Jaaaswand
Wednesday, March 08, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो..
अजून एक अजब किस्सा..माझ्याच बाबतीत घडलेला...

पुण्यात सारखी बाईक ने जाण्याची सवय असल्याने
No Parking, Odd/Even Date Parking, One Way असल्या पाट्यांची माहिती व भिती दोन्ही आहे...

एक दिवस Burger King (camp side) ला गेलो.. parking full असल्याने
जरा दुसरीकडे गाडी लावली आणि चालत येत होतो..
समोर one way ची पाटी दिसली अन मी चक्क दुसर्‍या lane ने तिकडे चालत गेलो..
पर येताना..माझ्या लक्षात आले... तेव्हापासून मी..
आणि ज्यांना ज्यांना मी हे सांगितले आहे..ते माझ्यावर हसत आहेत.. :-)

BTW कोणी kitchen मधून बाहेर hall मधे जेवायला येताना..ताट घेऊन कोणी कधी baathroom मध्ये शिरले आहे काय

जास्वन्द...


Dakshina
Wednesday, March 08, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद
मी पण एकदा दांडेकर चौकातून पायी जाताना चक्क Circle ला चक्कर मारून
आणि शिवाय, Indicator सारखा हात दाखवून वळले होते.


Gajanandesai
Wednesday, March 08, 2006 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद, दक्षिणा
चहासाठी कुणी थाळी खाली काढून तिच्यात चहा गाळला आहे काय?


Dakshina
Wednesday, March 08, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थंडीच्या रात्री अंधारात चुकून कुणी ओठाला अमृतांजान आणि डोक्याला Petrolium Jelly लावली आहे का? मी लावलिये....
आई...गं... अजुनी झोंबतय...


Sarkar
Wednesday, March 08, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ओठाला अमृतांजान नाही लावले पण .. चुकुन ते vicks समजुन नाकात लावलेले ... अर्धा तास नाक धुत बसलेलो :P


Athak
Wednesday, March 08, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा , थंडीत नाकाची काय अवस्था होते हे तुला माहित असेलच :-)

माझाही एक वेंधळेपणा म्हणा की आणखी कुठलातरी पणा :-)

अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपुर हे रुख्मिनीचे माहेर म्हणुन प्रसिद्ध ठिकाण . आमच्या गांवापासुन अगदी जवळ . कार्तिक पोर्णिमेला मोठी यात्रा भरते . लहानपणी दरवर्षी आम्ही जायचो , एकदा यात्रेला गेलो असतांना आठवत असलेला का किस्सा , बहुतेक तेव्हा मी शाळेत जात नव्हतो असे वाटते , वडिलांनी १ रुपयाची नोट दिली आम्हा दोघा भावांना मिळुन अन वाटुन घ्यायला सांगितली , मी सरळ दोन तुकडे केले अन वाटुन घेतले :-)


Maanus
Wednesday, March 08, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक :-)

कुणी गार पाणी म्हणुन फ्रिज मधुन व्हिनेगर ची बाटली काढुन तोंडाला लावली आहे का?


Mita
Wednesday, March 08, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,जास्वंद
माझे एक काका, सर्दि झाली होती, रात्रीच्या अंधारात vicks ची चपटि डबी समजुन काजळाची डबी घेतली आणि कपाळाला,नाकाला चोपडली आणि झोपले,घरात त्यावेळि वास्तुशांती साठि म्हणुन आम्हि सगळे नातेवाईक जमलो होतो,तेव्हा सकळि उठल्यावर काय झाल असेल याचा विचार करा..
तेच काका त्याच दरम्यान म्हणजे सर्दि झालेल्या दिवसात पहाटे उठुन टुथपेस्ट म्हणून ओडोमाॅस ब्रशवर लावुन दात घासायला लागले होते..


Divya
Wednesday, March 08, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वन्द, दक्षिणा, मिता बापरे डोळ्यात पाणि आले हसुन हसुन.
मी लहान असताना वाड्यात रहायचे. गणपतीच्या दिवसात वाड्यातल्या गणपतीच्या आरतीला सगळे एकत्र जमायचे. आरती झाल्यावर प्रसाद दिला जायचा त्या आधी मन्त्र पुष्पान्जली ला अक्षता दिल्या जायच्या. एकदा अक्षता वाटत होते आणि एक ७० ७५ वर्षाच्या आजीना काय घाई झाली होती अक्षता प्रसाद म्हणुन खाल्ला, नन्तर शी थु शी थु सान्गता येत न्व्हत अक्षता आहेत म्हणुन बापरे काय हसले होते सगळे.

Pinkikavi
Wednesday, March 08, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मज्जा आली वाचून ....
माझापण एक किस्सा... मी एकदा खोकल्याचे औषध समजून इसेन्स पिले होते.... कारण दोन्ही बाटल्या brown होत्या आनि शेजारीशेजारी ठेवलेल्या होत्या..:-)


Dakshina
Thursday, March 09, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे टेबलवर ठेवायची मिठाची छोटी डबी असते त्यात खाण्याचा सोडा ठेवला होता. ( अजुनही आहे. )
तो सोडा आहे हे मला माहीती नव्हतं. मी बर्‍याच वेळेला विचार करायची की चला जर कधी मीठ संपलं तर.. वेळेपुरतं आहेच. आणि खरच एकेदिवशी मी तो सोडा भाजीत घातला...
तुम्हीच विचार करा त्या भाजीचं काय झालं असेल ते.


Ameyadeshpande
Thursday, March 09, 2006 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रकार नवीन मुंबई कराला नक्कीच झाला असेल...
साधारण दहावीत मी माझ्या आत्या कडे पार्ल्यात गेलो होतो एकट्यानी पहिल्यांदाच आणि मला परत पुण्याला जायचं होतं...मी उगाच फ़ुशारकी मारून म्हणलं जातो की एकटा train (कोयना) नी दादर ला जाऊन एवढं काय त्यात... पहिल्यांदा चाललो आहे म्हणून १ तास आधी निघालो...आणि पार्ल्याच्या स्टेशनात चुकून harbor line च्या लोकल मधे चढलो! अर्धा तास झाला दादर यायलाच तयार नाही! एकाला विचारलं तेव्हा त्यानी सांगितलं अहो ही दादर ला जातच नाही! मग माहीम ला परत येऊन दादर गाठलं... दादर ला १७ चुकीचे पुल पार करून एकदाचा पोचलो बरोबर platform वर आणि बघतो तर काय...सिनेमात दाखवतात तसा train चा शेवटचा डब्बा असा दूर निघून गेलेला दिसत होता...आणि हे सगळं सकाळी ८ च्या वेळेल धो-धो गर्दी ... पार वाट लागलेली त्या दिवशी ...


Psg
Friday, March 10, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई वरून आठवल.. मे मुंबईत रहायला आले तेव्हा मला खरी भिती ती या east-west प्रकाराचीच वाटायची! मग थोड्या दिवसांनी त्याची trick कळली. एकदा भावाकडे निघाले बोरिवलीला.. पत्ता बघून घेतला. मझ्या डोक्यात की हा west ला रहातो, म्हणुन न चुकता west side ला गेले आणि rikshaw ला ऐटीत पत्ता सांगितला.. तो म्हणाला येणार नाही! मी चाट! अजून १-२ जण पण नाही म्हणले! म्हणल अस का करत आहेत? शेवटी एकानी सांगितल की ताई, east ला जा.. तुम्हाला east च्या पत्त्यावर जायचे आहे. west चा रिक्षा तिकडे येणार नाही!! मी डोक्यावर हात!!! :-)

Kiroo
Friday, March 10, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घरचा mixer आईने धुवायला sink मधे ठेवला होता.मी खूप लहान होते. आईला खूश करण्यासाठी आई बाबा नसताना मी तो धुवायला घेतला आणि mixer च्या भांड्याबरोबर motor चा part पण धुवून काढला होता.
आई बाबा येवून बघतात तर
motor मधे पाणी जावून पुर्ण वाट लागली होती. :-)

Mepunekar
Friday, March 10, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amchya building madhlya group cha ekatra patte kutaycha karykram hota ratri.
Ratri 2 la chaha karaycha tharle. Ek Utsahi mitr chaha karnyasathi uthla. 15 minitani to chaha gheun ala. Amhi ek ghot ghetla teva chav kahitarich lagli. Jiche ghar hote ti uthun aat kitchen madhe geli teva tila kalle ki tya sahebani fridge madhun dudh samjun tak kadhle, garam kele v te chahat ghatle....
Amhi tyachya baycola ajun chidvto, tuza navra mast chaha karto...

Ameyadeshpande
Friday, March 10, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा ईस्त्री करताना मधेच कपडा उलटा करून परत ईस्त्री धरताना handle च्या ऐवजी दुसर्‍या बाजूनी ईस्त्री उचलली होती

Pinkikavi
Friday, March 10, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा माझा गाऊन लाॅंड्रीवाल्याला दिला होता इतर कपड्यांबरोबर...... दुसर्या दिवशी धुवुन इस्री करुन परत आला होता..:-)

Shyamli
Saturday, March 11, 2006 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१०वीच्या वेकेशन क्लासेस साठि पुण्याला गेले होते मामा कडे...
एक मामा कोथ्रुड्ला रहायचा आणि एक सदाशिवपेठेत...
मी कधि ईकडे तर कधी तिकडे अशि असायचे....जोग क्लासमधुन बाहेर पड्ले
आणि नादात मंडईतच पोचले.....तिथे गेल्यावर
लक्षात आल आणि गेले भांबाऊन... रस्ताच आठवेना सदाशिवपेठेतल्या घराचा...मग रिक्शा केली.... तुम्ही म्हणाल "यात काय वेंधळेपणा?"

ईथेच तर गम्मत आहे मला सदाशिवपेठेतल घर कोथ्रुडच्या घरापासुन माहिती होते म्हणुन आधी कोथ्रुड्ला गेले
आणि त्याच रीक्शेनी परत सदशिवपेठेत आले मग मात्र घर बरोबर सापडल...




Deepanjali
Sunday, March 12, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Morrisville ला असताना एका Indian store मधे dvd आणायला जायचे होते , तेवढे एकच काम असल्याने माझा नवरा car मधेच थांबला .
dvd घेउन मी बाहेर आले , नवर्‍यानी car फ़ार लांब park केल्याचे वैतागत गेले , car चे door उघडून भांडायला सुरवात ही केली , पाहिले तर car मधे दुसराच मुलगा , मग कळले की माझ्याच car सारखी दुसरी car पाहून मी भलत्याच car मधे शिरली आहे ते
असच एकदा Durham च्या देशी store मधे केलेला वेंधळेपणा ..
माझ्या नवर्‍यानी नुकतेच diet control चे mission हाती घेतले होते ,
तेंव्हा Durham च्या Indian store मधे आम्ही grocery ला गेलो असताना माझा नवरा समजून भलत्याच मुलाच्या हाततले काजुचे pack हिसकावून rack मधे ठेवून दिले होते


Vaishali_hinge
Sunday, March 12, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मी जिम मध्ये असतांना तन्द्री लागली, विचारात मी भरतातल्या मंदीरात जाउन पोहचले, आणि डोळ्यासमोर गणेश मुर्ती उभी रहीली, आणि मी चक्कं त्या मशीनलाच नमस्कार केला, लगेच भानावर येउन इकडे तीकडे पाहीले.... thank god कुणाचेच लक्ष नव्हते!!! इथे तर बायका, पुरुश सगळे एकत्रच असतात जिम मध्ये,पण त्या दीवशी गर्दी नव्हती म्हणुन बरे!!!

Ajjuka
Monday, March 13, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा आम्ही म्हणजे मी आणि माझी एक बहीण अत्यंत उदार झालो होतो त्याची ही गोष्ट.
मी होते १० - ११ वीत आणि ती माझ्या एक वर्ष मागे. नातं तसं दूरचं असलं तरी लहानपणापासून एकत्र खेळलेलो असल्याने मैत्री घट्ट होती. ती पार्ल्यात रहायची आणि माझा सख्खा मामा मालाड मधे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मुंबईला तिच्या घरी गेले होते आणि तिच्या घरून आम्ही दोघी मामाकडे मालाडला जायला निघालो होतो. आत्याने (तिची आई) खास घरचे सुंदर हापूस एका पिशवीत भरून मामाकडे द्यायला दिले होते. गप्पांच्या नादात आंबे किती होते, पिशवीचं वजन काय हे काही समजलं नव्हतंच. पिशवी होती प्लास्टीकची, साड्यांच्या दुकानात मिळते तश्या जाड प्लास्टीकची. गप्पा मारत मारत आम्ही तिकिट काढले, ब्रिज चढून, उतरून फलाटावर पोचलो. गाडी आली तसे चढलो आणि मालाडला उतरून मग मामाकडेही पोचलो. या सगळ्यामधे कुणीतरी आम्हाला काहीतरी ओरडून सांगतय असंही एकदा वाटलं पण कुणीतरी उगाचच आपल्याला आवाज टकत असेल अशी ठाम समजूत करून घेऊन आम्ही पुढेच गेलो.
मामीच्या हातात आंब्यांची पिशवी दिली. पिशवीत दोनच आंबे. पिशवी एका बाजूने फाटलेली. पण ती तशीच होती आधी असे सांगणार्‍या आम्ही दोघी. मामी, आई सगळेच जरा चक्रावले पण दोनच आंबे कसे काय असे कोणी काही म्हणाले नाहीत. मी आणि केतकीही (बहीण) जरा गोंधळलो पण खूप मोठे आहेत आंबे म्हणून दोनच दिले असतील आत्याने असे मीच आईला सांगितले. विषय तिथेच संपला पण गप्प बसेल तर ती केतकी कसली. तिने हळूच स्वतःच्या आईला फोन लावला आणि विचारले की काय हे दोनच काय आंबे दिलेस? जास्त नाही का देता येत? पेटी आख्खी आहे ना? आणि असेच काय काय... आत्या भडकलीच कारण तिने चांगले मोजून डझनभर आंबे भरून दिले होते. मग आत्या मामी आणि आईशी बोलली आणि आमच्या कोर्ट मार्शल ला सुरूवात झाली. गप्पांच्या नादात वहावत जाता तुम्ही दोघी, कुठे लक्ष असतं असं मामा, आई आणि तिकडून फोन वर आत्या... सगळ्यांनी तोंडसुख घेतले. छोट्या मामेबहिणीला तर हातात कोलीतच मिळालं. आमच्यात येऊ नकोस ह तू लहान आहेस अजून असं आम्ही जे तिला सारखं सांगायचो त्याचा तिने पूर्ण वचपा काढला. आणि आम्ही आपल्या झालेल्या गमतीला हसतच होतो. आमच्याबरोबर मामीही हसत होती. सगळ्यांनी यांना सांगण्यात काही अर्थ नाही असे परत एकदा ठरवले आणि कामाला लागले. तेवढ्यात मधेच आम्हाला आठवलं की जे कुणी काहीतरी ओरडून सांगत होतं ते आंबे पडले आंबे पडले असं होतं आणि आम्ही त्याच्या दिशेने तुच्छतापूर्वक लूक टाकून पुढे आलो होतो. आता तर आम्हाला हसू सहन होईना. शेवटी हसण्यावरून तंबी मिळाली आणि आम्ही लाजेकाजेस्तव गप्प बसलो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators