Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Office stuff

Hitguj » My Experience » Office stuff « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 23, 200620 03-23-06  3:27 pm

Maudee
Tuesday, March 28, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pan maza ek doubt aahe......
bossla mahit aste kuthlya welela kuthlya employee kade kay kam aahe te.....ekhadyakade kaam nasel tar tehi tyla mahit aste....tarihi to tya respctive employeela timesheet magto....ashyaweli kay sangayache aste tyala????

Zakki
Tuesday, March 28, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यावर अशी वेळ बरेचदा येत असे. नुसतीच टाईम शीट नाही तर स्टाटस रिपोर्ट सुद्धा. त्यात Last week's accomplishments, percent completion, any problems? असेहि लिहायचे. तर चाळीस तास, Learning (काहीतरी) नि accomplishments मधे अर्धे वाचले, प्रॉब्लेम्स नाहीत असे काहीतरी लिहायचे. सुदैवाने माझे bosses असे होते की त्यांना मी नक्की काय करतो याचा पत्ताच नसायचा.

Ghoshita
Thursday, September 14, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazepan khupwela ase hote. me try karunhi planning hot nahi. pan majha boss changala ahe.

Nilam1211
Thursday, October 12, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maza boss jara jastacha changala ahe...to manto ki tumala time bhetel tewa report submit kara...ghai nahi..ghai asel tar me swataha sangen na...???????????? but iam particular abt my work..may be hey ek reason suda sasu shakate...

Swatidhoom
Tuesday, February 27, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amchyakade asa rule ch aahe ki roj adhichya diwasche time sheet bharayache. te welewar kele nahi tar timesheet block hote. tyamule boss la kahi wishesh efforts ghawe lagat nahit :-)
tyat billable ani non-billable hours asa hi funda asato. rojche kaam wegweglya activities madhye break karun lihawe lagate. kadhi kadhi khup waitag yeto. wishesh mhanje kaal kaay kele he pan wisarayla hote :|
me roj sakali officemadhye alyanantar pahile kaam tech karate. ata tar ekdam sawaych zali aahe. tras watat nahi :-)

Mahaguru
Tuesday, October 02, 2007 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑफीस मधल्या कंटाळवाण्या आणि तासन तास चालणार्‍या मिटिंग्स नी तुम्ही वैतागला असाल तर हा
बिंगो खेळ तुमच्या साठीच आहे :-)

Zakki
Tuesday, October 02, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातिधूम, मग त्यात timesheet भरायला लागणारा वेळ कुठे घालायचा? बिलेबल मधेच?

आमच्या इथे मागे अशीच टाईमशीट मधे इतकी वर्गवारी केली होती की आम्ही कस्टमरला सांगून आठवड्याकाठी टाईमशीट भरायला चार तास बिलेबल मागून घेतले होते, नि ते त्यांनी दिले पण! अमेरिकेत बक्कळ पैसा!

तसा भारतातहि आहे, पण लोक खडूस असतात असे ऐकले नि अनुभवले! असो.Yogesh_damle
Friday, October 05, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे ह्या रिपोर्ट ला हॅण्ड-ओव्हर म्हणतात. ह्या handover मध्ये आपल्या शिफ़्ट ला कायकाय बातम्या चालवल्या हे तर असतंच, शिवाय काय काय करायचं राहून गेलं हाही एक प्रकार टाकावा लागतो.

रात्रपाळीला येणारी माणसं दुसर्‍या दिवशीचं पहिलं बातमीपत्र बनवतात. आता त्या दिवशी सूर्यदर्शन न झाल्याने दिवसभराच्या बातम्यांचा एकेका ओळीचा तपशील्- थोडे सब पाॅइंटर्स, दुसर्‍या दिवशी इतर शहरांतले रिपोर्ट्स कशाचा माग घेणार आहेत, त्या दिवसभरात कुठली बातमी किती महत्वाची असा दीड-दोन पानी तपशील येतो.

माझ्या ओळखीच्या एका दुसर्‍या चनलमध्ये ' error report' नावाचं एक हत्यार आहे. दर बुलेटिननंतर कुणाचं काय चुकलं (तात्पर्य: आम्ही जबाबदार कसे नाही!) ह्याचा पाढा वाचल्या जातो. ह्या चुका पण- 'स्क्रीनवर ही अक्षरं वेळेवर पोचली नाहीत', 'तुमच्या चुकीमुळे एंकर गोंधळली', 'स्टोरीमध्ये जंप कट्स खूप होते (वाईट संकलन)', 'हेडलाईन ची स्टोरी वेळेवर पोचली नाही- एव्हढी महत्वाची बातमी ब्रेक नंतर scond half मध्ये गेली' वेगवेगळ्या गांभीर्याच्या तक्रारी असतात.

ब्रेकिंग न्यूज़ची परिस्थिती अगदी रोज नसली, तरी आयत्या वेळी फुटलेल्या बातम्या आणि १०-१० मिनिटांच्या डेडलाइन्स मुळे चांगुलपणा दाखवणं हा ऐच्छिक प्रकार आहे. तेव्हां सगळे तणतणतात, पूर्वजांचा उद्धार होतो.. पण शिफ़्ट संपली की सगळे शाळूसोबती असल्यासारखे मिसळतात.


Maanus
Tuesday, October 23, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dilberts

Sad part is many of us can understand this strip

Maanus
Tuesday, October 23, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

diff one two three

difference between fresher and exprianced person.

Gsumit
Tuesday, October 23, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही कामच नाहीये मला, टाईमशीट काय डोंबलं भरणार? दिवसातुन दहा वेळा मायबोलीवर येतो... भारतात असतानी चांगलाच बिझी रहायचो मी, इथे साला कामबी नाय अन घरीबी जाउ देत नाय... :-(

Akhi
Wednesday, October 24, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काम असो वा नसो मायबोली is must.....
टाइम शीट तर भरावी लगतेच. १ तास काम १२ मायबोली असेल तर दीड तास काम....

Gsumit
Thursday, October 25, 2007 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर येण्याबद्दल काही खंत नाही मला, पण काम पण महत्त्वाचेच आहे ना... काम नाही म्हणजे सगळं थांबल्यासारखं वाटतं...

स्वत:हुन वाचायचा बराच प्रयत्न करतो, पण कुठलिही गोष्ट डोक्यावर आल्याशिवाय हातात न घ्यायची इंजिनियरिंगमधे लागलेली सवय आडवी येते... परिक्षा आल्याशिवाय अभ्यास कधी करायचो नाही तेव्हा... :-)

म्हणुन कामच बरे वाटते...
deadlineच्या नादानी माणुस काहीतरी करत तरी रहातो...

Maanus
Thursday, October 25, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणतीही नविन कंपनी join केली की जो रिकामा वेळ असतो त्यात मी एखादे generic framework लिहीतो. requirement असो वा नसो.

मग हळु हळु त्या framework ला सगळ्या team मधे promote करायचे.

साधारण ७-८ महीन्याने त्याची फळ मिळायला लागतात. दिवसभर वेगवेगळ्या teams मधुन कोणीतरी येत असते, अमुक एक गोष्ट कशी वापरायची विचारायला, आणि मग माणूस busy रहातो :-)


Kanak27
Friday, October 26, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gsumit, Same here.
Office मधे काम नाहि म्हणुन कंटाळुन नविन Company शोधलि आहे. बघु तिथे काय होईल ते. कमित कमि Change तर भेटेल.
It's very hard to stay in office without work for 8 hours

आमच्याकडे Timesheet हा प्रकार नहि आहे म्हणुन बर.


Kanak27
Friday, October 26, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maanus, what is Generic Framework?


Savyasachi
Friday, October 26, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>Office मधे काम नाहि म्हणुन कंटाळुन नविन Company
आणि मी अशी कंपनी शोधत हिंडत असतो :-)
जी मला काम न करता पैसे देत राहील.
एक नेट असले आणि सगळ्या साईट्सना जाता येत असले की बास :-)
माणसा, अरे मी पण असेच छोटे छोटे GP कोड केले असायचे. पण आता हेच विसरायला लागलो आहे की तो कोड कशासाठी केला होता :-)


Sakhi_d
Saturday, October 27, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It's very hard to stay in office without work for 8 hours
हे मात्र अगदी खर..... सव्यासाजी आमची कंपनी तुम्हाला चालेल. जास्त काम नाहि नेट आहे, सगळ्या साईटना जाता येते पण तरी त्याचा कंटाळा येतोच..... कामाच्या वेळेला काम हवे हेच खरे...... :-)


Nandini2911
Saturday, October 27, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे यारे तुम्ही सगळे माझ्या कंपनीत, अगदी भरपूर काम आहे. शारिरिक आणि मानसिक मनस्ताप आहे. चिमूटभर केलेली पगारवाढ आहे. एक सो एक मूर्ख बॉस आहेत. डोकेखाऊ मॅनेजर आहेत. आणि भर म्हणून कंओअनीच्या बाहेर पडल्यावर दगड मारायला गावकरी आहेत. या एकडे या.......

Manjud
Saturday, October 27, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय गं स्वत्: resign करते आणि इतराना welcome करते..... ऐसे नही चलेगा.........

Maanus
Monday, November 12, 2007 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाम कंटाळा आलाय ऑफीस मधे बसुन बसुन... हा msg post करायचा देखील कंटाळा आलाय. पोस्ट करु का नको.

माझ्या सगळ्यात पहील्या कंपनी मधे मजा होती, आम्ही ईन मीन चार टाळकी, त्यात माझे एकाशी पटायचे नाही. आम्हाला दोघांना कंटाळा आला की आम्ही ऑफीसमधे कुस्ती खेळायचो... म्हणजे कंटाळा देखील जायचा आणि कुस्तीतुन न पटनारे मुद्दे देखील मिटायचे :-)


Manuswini
Monday, November 12, 2007 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर ऑफ़ीस मध्ये जाम कंटाळा येतो, एक नाही संपले तर दुसरे असे आहे आता. मग कंटाळून साचवून ठेवले नी आता वैतागच आलाय घाण उपसायला.
गेल्या आठवड्यात दिवाळी मूड होता म्हणून काही ना काही कारणे सांगून पळ काढायची नी आता वैताग..................
साला बाजूचा मठ्या फक्त फ़ूटबॉल score बघत surfing करतोय, हे बरेय त्याला ते काम येत नाही सांगून सुटका.


Dakshina
Tuesday, November 13, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑफ़िसचे काम हे कधीही संपत नाही. घरी गेल्यावरही सुरूच असते. पहील्या पहील्यांदा मी खूप enjoy करायची पण आता कंटाळा येतो, फोन तरी कधी पण वाजतो, घरचे खूप वैतागतात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators