Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
संभाजी नगर

Hitguj » My Experience » भटकंती » संभाजी नगर « Previous Next »

Indradhanushya
Thursday, February 02, 2006 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

औरंगाबाद
संभाजी नगर हे नामकरण फ़क्त कागदोपत्री राहिलेल...
लोकवस्ती बहुतांश मुसलमान
बाजारपेठ - निराला बाजार

फ़िरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत पैकी राहुन घेलेली ठिकाणे भद्रा मारुती, पिठलखोरा, बनी बेगम गार्डन, लक्ष विनायक मंदिर, खुलदाबाद इ.

देवगीरी Exp ने रात्रिचा प्रवास करुन पहाटे पाचला स्टेशनात दाखल...
पहिल्या दिवशी एलोरा लेणी पाहिली.... कैलास मंदीर हे शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध कलाकुसरीचा भव्य दिव्य देखावा... संपुर्ण कातळात कोरलेले हे शिव मंदिर पाहुन राजे सुद्धा उद्गारले होते... " मंदिर पाहुनी जिवन धन्य जाहले. " शिवाजी महारज आग्य्राला जाताना देवगिरी व कैलास मंदिरला भेट देऊन पुढे गेले होते) एकाच डोंगरात कोरलेली ती विशाल वास्तु, म्हणजे अजोड कलाकारीचा अदभूत नमुना... या मुख्य लेणीच्या शेजारी इतर छोटी लेणी आहेत...
पुढे घृष्णेश्वाराचे ( शंकराचे ) मंदीर आहे... पुरुषांना कमरेच्यावर उघड्या वस्त्रांनीशी जावे लागते... हेमाडपंथी आहे असं म्हणतात

जायकवाडी... समुद्रा इतकाच अवाढव्य पसारा सांभाळणारे नाथसागर धरण पाहिल ( २१४८ SqKm ) भन्नाट
जवळच संत ज्ञानेश्वर उद्यान आहे... संध्याकाळी रंगीत - संगीत कारंज्यांचा थयथयाटात आम्ही सर्व भिजून गेलो :-)

२६ जानेवारी निमित्त येथील पैठणि विणकाम केंद्र बंद होत त्यामुळे पैठणिवरचा खर्च वाचला

दुसर्‍या दिवशी अजटाला जाताना पानचक्की आणि बिबी का मकबरा पाहिला... बांधकामाचा खर्च वाढला असवा म्हणुन की काय मकबर्‍याचा बरचा भाग सिमेंटचा केला असावा... बाकी खालचे संगमरवरी काम ताजमहालची आठवण करून देतं.

दुपारी रखरखत्या उन्हात अजंटा गाठलं... प्रत्येक ठिकाणि आकारण्यात येणार्‍या प्रेवश शुल्काने बेजार करून सोडले... गाईड तर चक्क ५०० रू. सांगू लागले. त्याला पर्याय म्हणुन सरळ विस रुपये किंमतीचं पुस्तक विकत घेतल...
एकूण २६ लेणी पैकी १, २, ४, ६, १०, १९ आणि २६ लेणी महत्वाची आहेत.. पहिल्या सहा लेणींमध्ये २२०० वर्षां पुर्विचे रंगीत नक्षीकाम पहायला मिळते... (त्यावेळी रंग तयार करण्यासाठी झाडांच पाला, हस्तीदंताचा वापर केला जाई) चित्ररुपात गौतम बुद्धांच्या कथा मांडलेल्या आहेत चित्रांमधील स्त्रीयाची केशबुषा १६०० प्रकारची आहे. आभुषणे आधुनीक काळातही वापरली जातात... ऐकीव माहिती) प्रत्येक लेणीत छतावर केलेले कोरीवकाम लक्ष वेधून घेई... यक्ष, यती, किन्नर, अप्सरा यांच्या ९०० वर्षाच्या कठोर परिश्रमाचे फ़ळ म्हणजेच या वेरुळच्या लेणी असे सांगीतले जाते. पण अर्ध्याअधिक लेणींचे भुकंप आणि मानवि विकृतीने नुकसान झालेले आहे. :-(

३ तास कमी पडले सगळ्या लेण्यांना भेट द्यायला.. काही लेणींमधे भगवान बुध्दाची मुर्ती होती तर काही लेणींमधे विशाल आकारचे स्तुप होते... पैकी एक लेणी २ मजली होती.... बस्स अवाक होऊन आम्ही सर्व पहात होतो.
ITDC ने काही मुख्य लेणींमधील डागडूजीच Chemical Conervation च काम हाती घेतलं आहे. प्रत्येक मुर्तीसाठी कमीतकमी १५ दिवस ते ६ महिने इतका कालावधी लागतो.

तिसरा दिवस आरामात निघालो... दोन दिवस खुप धावपळ केली होती... सकाळी औरंगाबाद शहरापासून जवळच असलेली लेणी पाहिली... समोर देवगिरी खुणावत होता... नकळत पावले तिकडे वळू लागली... चिनच्या भिंतीप्रमाणे देवगिरीचे कडे उभे तासलेले आहेत... प्रत्यक्ष किल्ल्यापर्यंत पोहोचायला १० मि. किल्ल्याच्या तटबंदीतुन प्रवास करावा लागतो... त्यात एक भारत मातेच मंदिर आहे. यादवांच्या पराभवानंतरही ते टिकून आहे याच आश्चर्य वाटलं.
किल्ल्याकडे जाताना चांद मिनार दिसतो... पुढे एका बुरुजावर अजस्त्र मेंढा तोफ़ आहे. बालेकिल्याला चोहोंबाजूंनी ३० ते ४० फ़ुट खोल असे पाण्याचं खंदक आहे... तटबंदी कडून बाले किल्ल्यावर जाण्यास फ़क्त एकच पूल आहे... तो पूल पार करून गेल्यावर भुलभुलैयाचे भुयार लागले... आमच्या सोबत ladies बायका असल्यामुळे मागे फ़िराव लागलं :-(

औरंगाबाद विद्यापिठ इकडच्या कलिना पेक्षा बरच मोठ आहे... तब्बल ५ किमीच्या क्षेत्रफ़ळात वसलेल आहे... त्यात सोनेरी महल आणि काही लेणी आहेत... पण रात्री उशीरा पोहचल्या कारणाने नाही पाहू शकलो.

शेवटी पैठणिचा बारगळलेला कार्यक्रम आम्ही औरंगाबाद मधेच पार पाडला...
एका संध्याकाळी तेथील बालोद्यानाला भेट दिली... सफ़ेद वाघ सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र होतं.
शिवाजी महराज वास्तु संग्रहालय, दिल्लि गेट, सफ़ॅद गेट,
आकाशवाणि, म्हैसमाळ बराच सफ़र करून थकल्यावर परतीची तपोवन पकडली

ट्रेन मधून सुध्दा देवगिरी आमचे लक्ष वेधून घेत होता :-)


Shyamli
Thursday, February 02, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईंद्रा,
छान वाटल आपल्या गावाच वर्णन ऐकुन,
मी थोडी भर घालते यात.......
सोनेरी महालात हल्ली वेरुळ महोत्सव आयोजीत करतात.तेंव्हाच वातावरण खुपच छान असत......
वीद्यापीठाचा परीसरसुद्धा खुप रमणिय आहे.
बीबीका मुकबरा आणि विद्यापिठ ह्यामधे एक कॉलनी आहे माझ घर तिथेच आहे(आधी कल्पना असती तर माझ्या घरी तुमच्या चहापण्याची व्यवस्था केली असती)
भद्रामारुती
म्हणजे औरंगाबाद्करांच अराध्या दैवत आहे......
दर शनिवारी तिकडे भरपुर गर्दी असते.तीथला मारुती जमीनीवर झोपलेला आहे. गाभारा म्हणजे तीनफुट भिंती आहेत त्याच्या बाहेरुनच बायकांनी दर्शन घ्यायचे.
पितळखोर सुधा छान आहे.
अजुन तिथेच म्हैसमाळ म्हणुन गाव आहे hillstation ......
त्याच्या जरा अलिकडे नवीनच झालेल बालाजि मंदिराची जागा आणी मंदिर खुपच सुंदर आणि रमणिय आहे.
पुढल्यावेलेला विसरु नकोस

आणि लोणारला जाणार होतास नाही गेलास का?


Mukman2004
Thursday, February 02, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आहेच आमच औरंगाबाद सुंदर. आणि ईतकी छान लिहिल्या बद्दल धन्यवाद
अस्स माहेर सुरेख बाई....... हो ना ग श्यामली :-)


Indradhanushya
Thursday, February 02, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रे रे...
श्यामली भद्रा मारुती राहिल्याच शल्य सारखं बोचत रहाणार :-(
म्हैसमाळ्ला गेलो होतो... TV Tower ला प्रदक्षीणा घातली... येताना बालजी मंदिरचे रस्त्यावरुनच धावते दर्शन घेतले...
आम्हा मुंबईकराला उन्हाचा जास्त त्रास नाही सहन होत... म्हणुन लोणारला जाणे टाळले...

मुकमन... माहेरी गेल्यावर यजमान पैठणिची हौस पुरवत असतील ना... :-)


Shyamli
Thursday, February 02, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मग.. .. .. ..!!!!!!

Gajanandesai
Friday, February 03, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इन्द्रा, सही रे!

ladies बायका


Indradhanushya
Saturday, February 04, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही घ्या फ़ोटोंची लिंक...

http://pg.photos.yahoo.com/ph/draj_599/album?.dir=/bb2c&urlhint=actn,del%3as,4%3af,0


Yogi050181
Saturday, February 04, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय इंद्रा, बोलणार कधि हि लिंक टाकलिस ती..
फिरत फिरत आलो म्हणुन नाहि तर एवढे सुंदर फोटो मिस केले असते..
खासकरुन अजठा, कारजा, मेंढा तोफ नि सोनेरि महल..
एकदम सोलिड यार..


Paragjoshi
Sunday, May 21, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कागदोपत्री संभाजीनगर आहे का नाव ? माहित नव्हते. खरे औरंगाबादकर "औरंगाबाद"च म्हणतात. सगळ्या राजकारण्यांना इथलीच नावे बदलायची काय हौस आहे कळत नाही. विद्यापीठाचे बदलून झाले आता शहराचे. (संभाजी महाराजांविषयी पूर्ण आदर असूनही असे वाटते) संभाजीनगर हे काय नाव आहे? ३००+ वर्षे जे नाव रुढ आहे ते उगाच त्या गावाशी संबंध नसलेले लोक बदलू पाहून काय साधतात देव जाणे. औरंगाबादचे मूळ नाव खडकी होते. या गावात औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेच्या वेळी मुख्य ठाणे वसवले म्हणून ते झाले औरंगाबाद. अर्थात, त्याआधी देखील शहरास महत्त्व असावे. शहरातील एक महत्त्वाची वास्तू पाणचक्की मलिक अंबरने औरंगजेब येण्याच्या बर्याच आधी, अहमदनगरच्या निजामाची राजवट असताना बांधली होती.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators