Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through January 18, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Thursday, December 22, 2005 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्र काऽऽळी
चादर काळी...
यमुनाजळीऽ हो काळी होऽऽ माऽऽऽय
दृष्ये काळी
बिलवर काळी
डोळ्यान्मधी आहे की हो काळी हो माय!

मला अजुनही या गाण्याचे चुकीचे ऐकलेले बोलही नीट समजले नाहीहेत! :-(


Moodi
Thursday, December 22, 2005 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु ते चादर काळी नाही पण घागर काळी असे आहे. अन मला तर अजुनही जळावरती, शेखावरती असे काही तरी ऐकु येते.

Dakshina
Thursday, December 22, 2005 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू,.......

मी पण बर्‍याचवेळेला हे गाणं नीट लक्षपुर्वक ऐकायचा प्रयत्न केला..
पण छे!
मलाही त्याचे बोल कधिच कळले नाहीत.


Bee
Thursday, December 22, 2005 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे LT हे गाणे तुला कळायलाच हवे होते. विष्णुदास नाम्याची गवळण आहे ती. पूर्वी पहाटे सहा वाजता मंगल प्रभातवर ही गवळण लागायची. मधूर चालीची आणि तितक्याच मधूर आवाजात गायली गेली आहे. I truly miss it! But I can sing it quite nicely..

तिचे शब्द असे आहेत

रात्र काळी, घागर काळी
यमुनाजळेही काळी वो माय
बुंथ काळी, बिलवर काळी
गळामोती एकावळी काळी वो माय

ह्यात कुठेच काळे' नाही. वाचायला जरी थोडे अडखळत असेल तरी ते काळी' असेच आहे.

ह्याची ध्वणीफ़ित मिळत नाही. ती आता लागते का माहिती नाही पण लहानपणी ही गवळण रोज ऐकायला मिळायची.


Limbutimbu
Thursday, December 22, 2005 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, मला कळायलाच हव अस बरच काही मी मिस केल हे, करतो हे, करणार हे!
अन मला काहीच कळत नाही यावर लिम्बीसहित बर्‍याच मोठ्या जनसमुदायाच एकमत हे!
तर ते जाऊदे!
गाण्याचे नेमके बोल दिल्याबद्दल तुला थॅन्क्यू!
मूडी, दक्षिणा, सेम हिअर! :-)

मी खर तर त्या गाण्यावरुन हेमा इशा बिपाशा रेखा वगैरे नावे गुम्फुन एसजीकरान्च्या आॅप्शनला काळे पर्याय देणार होतो पण तो बेत कॅन्सल केला कारण असले बाॅम्बगोळे तिकड फुटले तर माझी धडगत र्‍हाणार नाही!


Moodi
Thursday, December 22, 2005 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी धन्यवाद, गाणे खरच छान आहे पण बर्‍याच जणानी याच्या वर फ़िश पॉंडस पण केलेत.लिंब्या शांती शांती,गडावर शांती.


Dakshina
Thursday, December 22, 2005 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता हे गाणं ८ ते ८.१५ च्या भक्ती - संगित मध्ये लागतं कधी कधी...

Bee
Thursday, December 22, 2005 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा मी तुला विचारणारच होतो कुठे नि कधी लागत.

जर तुला record करता आले तर किती छान होईल :-)

मूडी, लिंबु तुम्हाला हे गाणे पूर्ण नाही दिले मी. पण ह्या लिंक वर बघा
/hitguj/messages/35/4504.html?1004708197

मला थोडा संदेह आहे, सगळेच शब्द अचूक लिहिले गेले की नाही पण दक्षिणा तुला ऐकायला मिळते तेंव्हा तू तपासून पाहू शकतेस.

लिंबू तुला मिस करायची गरज नाही, तू पुण्यातच आहेस ना.. मग एक radio ची फ़क्त गरज आहे..

इतक्या छान गीताची आठवण करून दिल्याबद्दल खरच धन्यवाद!

Moodi
Thursday, December 22, 2005 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी परत एकदा धन्यवाद, मी ऐकेलय हे गाणे किती तरी वेळा पण आज शब्द कळले. जुनी गाणी अविट गोडिचीच आहेत.

Gandhar
Thursday, December 22, 2005 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, " आशिक बनाया " हे गाणं त्या गाण्याचे संगीतकार हिमेश रेशमिया यांनी स्वतः गायलं आहे. त्यांच्या जोडीला गायिका आहे श्रेया घोशाल..
हे गाणं " चुंबन सम्राट " इम्रान हाश्मी आणि तनुश्री दत्ता यांच्यावर चित्रित केले आहे :-)


Maetrin
Thursday, December 22, 2005 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

malaa he gaaNa barobar aiku aalela,paN tyachaa arth pharach chukichaa hota..

lekin madhil "yaaraa sili sili" ase gaaNe aahe.lahaan astaanaa malaa sili sili mhanjay"silly silly"(english word) waTayche,and "Dhola" ha shabd jaD maanus yaa arthi waTaaychaa.
barech divas ashich samjut hoti ki lata mangeshkar konala tari chiDvat hoti...:-)))

Dakshina
Friday, December 23, 2005 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंधार........
चुंबन सम्राट काय?



Rachana_barve
Friday, December 23, 2005 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


... ... .... ...


Robeenhood
Saturday, December 24, 2005 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त ग्रामस्थ हो

हिरव्या पानात हिरव्या पानात चावळ चावळ चालती अशा ओळी आहेत

चावळ म्हणजे सळसळ खसपस असा आवाज

ज्वारी ऊस इत्यादी पिकातून चालताना पाने एकमेकावर घासून अगर आपल्या अंगाशी घासून पानांचा आवाज येतो व कोणीतरी चालत असल्याचे आवाजाने समजतेही.

ग्रामीन भागात बरीच प्रेमी युगुले उसात अगर ज्वारीत जाऊन बसतात

जाऊ द्या मला आता जास्त नका बोलायला लावू...


Kandapohe
Wednesday, December 28, 2005 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अब के सजन सावन मे
आग लगेगी बदन मे
घटा बरसेगी, मगर तरसेगी नजर
मिल ना सकेंगे, दो मन एक ही आंगन मे

आज सकाळ पर्यंत हे गाणे मी

अब के सजन सावन मे
आग लगे जीवन मे
घटा बरसेगी, मगन ( हा कोण? ) तरसेगी नजर
मिल ना सकेंगे, दो मन एक ही आंगन मे

असे म्हणत होतो.


Ami79
Wednesday, December 28, 2005 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि आणि माझा भाउ

&#३४; हले हा नंदा घरी पाळणा&#३४;

ही ओळ नेहमी

&#३४; अरे हा नंदाघरी पाहुणा&#३४;

अशी म्हणायचो


Sas
Wednesday, December 28, 2005 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोलमालच आने वाला पल गाण कोणाला पुर्ण येत असेल
तर Pls post करा.

Vinaydesai
Thursday, December 29, 2005 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Here is the song ....

http://www.cs.wisc.edu/~navin/india/songs/isongs/0/35_gif.html

Manuswini
Thursday, December 29, 2005 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गाणे मी नेहमी गोकुळाअष्ट्मीला एकायचे

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिका जरा लपुन जा तुझ्या घरी

ते लपुन का जपुन अजुन माहीत नाही

आणखी एक गाने/आरती होती ती अम्ही गमतीने अस म्हणु कारण आमच्या दोन्ही कामवाल्याची नाव रमा आणि भारती होती त्या दोघिही गप्प मारत बसायच्या आणि आई आपली वाट बघत रहायची

रमा भारतीचे जिथे चित्त लागे तिथे नित्त्य गप्पा फक्त चाले


Parijat30
Thursday, December 29, 2005 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, ते गाणे असे आहे.

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी


Vijaykulkarni
Thursday, December 29, 2005 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे,
हा बिबि वाचुन हसुन हसुन पोटात कळ आली.


Sas
Friday, December 30, 2005 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Vinay n Vinayak

Thanks

एक बार यु मिली, मासूम सी कली
खिलते हुए कहा, खुशबाश में चली

याचा अर्थ कोणी सांगा PLS.
गाण्यात ह्या ओळी मला unrelated वाटतात



Moodi
Saturday, December 31, 2005 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

english मधील एक गाणे आहे त्याचे शब्द मला कायम टीका बिल्ला नाऊ असे ऐकु यायचे.
एकदा TV चा खुप मोठा आवाज करुन कान जवळ नेऊन ऐकले तर त्याचे शब्द असे होते I think I better it leave now .


Phdixit
Saturday, December 31, 2005 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहिणिच्या शाळेच्या गाॅदरीग मधे तिथल्या शिक्षीकांनी एका गाण्यावर नाच बसवला होता, त्याचे बोल असे होते,

पंचमीचा सण आला,
या गं बयांनो चाला ग सयांनो.

तिला शाळेतुन आणायला गेलो तेव्हा बाईच्या मागे तीने एकदम हे गाणे म्हणायला सुरवात केली आणी सगळा शिक्षकवर्ग जोराने हसु लागला
कारण तिने म्हणले होते
या ग बयांनो चला ग टवळ्यांनो....




Bkashish
Saturday, December 31, 2005 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मी इथे पहिल्यांदाच आलो. मागच्या एक तासापासून HHPV अगदी. काय धूम चालली आहे ईथे.

माझ्या लहानपणाच्या दोन चुका आठवून अजुनही खुप हसतात सगळे. गाणे लागले की मी त्यासोबतच मोठ्याने म्हणायचो.

उगवला चन्द्र पुनवेचा या गाण्यात दाही दिशा कशा फुलल्या अशी ओळ आहे व ती धृवपदासारखी ४-५ वेळा येते. दाहीदिशाऐवजी मी मोठ्याने दाढीमिश्या कश्या फुलल्या म्हणायचो. सगळे खुप हसायचे पण काय चुकले ते सांगायचे नाहीत. तू गाणे निट ऐक तुझी चुक तुला कळली पहिजे असे ंहणायचे. मित्रानो तुम्ही ते गीत ऐका तुम्हाला तसेच ऐकू येइल कारण ते अनुनासिक स्वरात गायलेले आहे.

त्याचप्रमाणे माझे माहेर पंढरी या भिमसेन जोशीनी गायलेल्या अभंगात त्याची ख्याती काय सांगू याला मी त्याची छाती काय सांगू म्हणायचो.


Milya
Wednesday, January 04, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा किस्सा वडीलांनी सांगितलेला

त्यांच्या लहानपणीची गोष्ट रेडिओ सिलोन वर बरसात की रात मधले ' ये इश्क इश्क ये इश्क इश्क ' गाणे लागले होते. ते ऐकल्यावर त्यांचे आजोबा म्हणले वा काय छान गाणे आहे. बाबांना आश्चर्य वाटले कारण तो काळ म्हणजे जुन्या पिढीने चित्रपटांना नावे ठेवण्याचा काळ होता त्यामुळे त्यांनी आश्चर्याने त्यांच्या आजोबांना विचारले की तुम्हाला खरेच गाणे आवडले?
त्यावर आजोबा म्हणले अरे इतके चांगले शब्द असतिल तर का नाही आवडणार? छानच गातोय तो ' ये कृष्ण कृष्ण'....


Birbal
Wednesday, January 04, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असेच चुकीचे ऐकत असलेले गाणे

ऐ गुलबदन ऐ फुलबदन
फुलोंकी मेहेक काटोंकी चुभन
तुझे देखके केहेता है मेर मन
कही आज इसीसे मोहोब्बत ना हो जाये

ही शेवटची ओळ मी चुकीची ऐकत होते.

मी ऐकायची कही और कीसीसे मोहोब्बत ना हो जाये

आणि ती नटी मला वाटते कल्पना) तशीच भयानक दिसायची. त्यामुळे मला खरोखरच वाटायचे की हीरो तिला असे सांगतो आहे.


Birbal
Wednesday, January 04, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रीणीचा भाऊ म्हणायचा

सावध हरीणी सावध ग
धरील कोणीतरी चावट ग

खरे आहे
करील कोणीतरी पारध ग...


Anilbhai
Wednesday, January 04, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला म्हणायचा का ग :-)

स्वकुल तारक सुता

हे गाण माझ्या एका मित्राने ऐकले आणी मला म्हणाला

हे गाणेमधी ते तेला सुव्वर ( डुक्कर ) कायला म्हणते.

मग त्याला समजावुन सांगवे लागले, ते
सुव्वरा नसुन सुवरा आहे
:-)

Abhishruti
Tuesday, January 10, 2006 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजेश खन्ना आणि मुमताजच एक गाण मला वाटत आप की कसम' मधल
पास नही आना दूर नही जाना
तुमको पसन्द है के आज मोहोब्बत बन्द है

अस मला ऐकायला यायच पण खर तर ते

पास नही आना भूल नही जाना
तुमको सौगन्ध है के आज..

अस आहे.


Moodi
Tuesday, January 10, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती मलाही असच ऐकु यायच.

अन कजरारे मधील एक कडवे आहे ते मला अजीबात कळ्त नाही ते अस आहे.

तेरा आना भी गरमी या लू है.

वास्तवीक उन्हाच्या गरम झळांना उ. भारतात लू म्हणतात.



Maetrin
Tuesday, January 10, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे गाणे तेरा आना भी गर्मी या भीलू है,असे ऐकु आले होते:-)
मला वाट्ते तिला म्हणाय्चे असेल की तो हॉट आहे:-).......
हे,हे,हे


Neeta_boltiy
Friday, January 13, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर ते "गरमी या पिलु है" असे वाटले होते...पिलु म्हणजे पिलु राग...ऽआता त्याचा आणि गरमी चा काही संबध आहे की नाही ते माहीत नाही बुवा!!!!

Moodi
Friday, January 13, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण दातेंचे एक भावगीत आहे.
जेव्हा तिची नी माझी चोरुन भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली.

तर झाडे भरास आली या ऐवजी मला ते झाडे घरात आली असे ऐकू यायचे, आज अंताक्षरीवर कळले हे गाणे.


Ramani
Wednesday, January 18, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधेचा रास, मीरेचा भास
यमुनेच्या काठावर " वाघाचा वास "

" माघाचा मास "


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators