Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
gs1
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » gs1 « Previous Next »



काय लिहावे ?

लिहावं का असा नेहेमी प्रश्न पडतो. म्हणजे काय लिहावे असा प्रश्न नसतो, रोजच्या धकाधकीत दहा मिनिटे जरी निवांत मिळाली तरी काहीतरी सुचत असतेच. पण एकंदर जो काही विचार करण्यासारखा आहे आणि जे जे लिहिण्यासारखे आहे ते अगोदरच अनेकांनी विचार करून व लिहून ठेवले आहे, नवीन सांगावे असे काही नाही, फरक असेल तर थोडफार अभिव्यक्ती, वर्तमान संदर्भ व शैलीचा असे वाटते.

आता हाही विचार कुणीतरी आधीच करून आणि लिहून ठेवला असेल अशी खात्री आहेच.




आठवण

शारंग वाघमारे हा एम आय टी चा टॉपर, मला तीन वर्षे सिनिअर, आणि माझ्या रुपाचा क्लासमेट.
स्वभावाने अत्यंत विनयशील आणि सालस. कधीतरी येउन माझ्याशीही गप्पा मारत बसायचा.
बीई कॉंप्युटर झाल्यावर तो आय एफ एस करणार होता, म्हणजे चक्क इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस

तर असा हा शारंग एकदा मला म्हणाला जरा बोलायचय, मी म्हटल बोल तर तो गंभीरपणे सांगू लागला, ' अरे मला अस वाटतय की माझ्या मेंदूची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.'
'काय ? ' मी उडालोच.
तो म्हणाला 'खरच. विशेषत : स्मृती ! आणि मला अस वाटु लागल्यापासून मी स्वत : वरच गेली दोन तीन वर्षे वॉच ठेवला आहे. म्हणजे अस की मी एफ ई ला असताम्ना जर मला दुसरीपर्यंतचे सर्व आठवत असेल तर एस ई मध्ये किमान तिसरीपर्यंतचे तरी आठवायला पाहिजे ना ? पण हा स्पॅन कमी कमी होत चालला आहे, आणि मला भीती वाटते की काही वर्षांनी मला नजिकच्या भूतकाळातले सुद्धा आठवणार नाही'
त्याच्या या समस्येने मी तेंव्हा थोडा घाबरून गेलो होतो, आणि हल्ली तर माझेही तसेच होउ लागले आहे की काय अशी कधी कधी शंका येते.

त्यापुर्वीच थोडे काही लिहून ठेवावे असा एक विचार..







नॉस्ट्राडेमसचे भविष्य

याच्या भविष्यवाणीचे एक पुस्तक लहानपणी वाचले होते. १९८४ वगैरे साली. ते इतके परिणामकारक होते की त्यात वर्तवलेले भविष्य कायमचे मनात ठसले.

खर तर या माणसाने इतके कोड्यात लिहिले आहे की त्याच्या एखाद्या दोन ओळींच्या रिडलचा अर्थ 'जर्मनीच्या पश्चिमेकडून मोठे सैन्य येउन पोलंडवर कब्जा करून कत्तल करेल' पासून ते 'वडगावच्या वायव्येकडुन खोडआळीचा प्रादुर्भाव होउन सारे ज्वारीचे पीक खलास होईल' पर्यंत कसाही लावता येतो.

त्यामुळे एखादी घटना घडली की लगेच त्याचे कुठले तरी रिडल उचलून हे नॉस्ट्राडेमसने आधीच सांगितले होते अशा बातम्या येउ लागतात. अगदी ९ / ११ लाही हेच झाले.

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली तेंव्हा त्याने अगोदरच ती प्रेडिक्ट केली होती या बोलबाल्यामुळे मी तेंव्हा ते पुस्तक लगेच वाचायला घेतले. मूळ पुस्तक नव्हते तर त्याचे इंटरप्रिटेशन होते.

त्यात पुढील गोष्टी होत्या.

(१) १९९९ सालाच्या आसपास भारताच्या सर्वोच्च नेतेपदी दक्षिणेकडील एक असामान्य व्यक्ती आरुढ होईल.
(२) ती व्यक्ती नवी अस्त्रे - शस्त्रे शोधणारी असेल.
(३) भारतात अराजकसदृश स्थिती निर्माण होईल पण ती काबूत आणली जाईल.
(४) भारत आणि अमेरिका एकत्र येतील व रशिया त्यांना साथ देईल.
(५) त्यानंतर एक महायुद्ध होईल आणि इस्लाम चा पूर्ण विनाश होईल. अमेरिका भारत विजयी होतील.
(६) हिंदू संस्कृतीची जगभर भरभराट होईल.
(७) यानंतर जगात प्रदीर्घ काळ शांतता नांदेल.

राश्ट्रपती हे घटनात्मक दृष्ट्या सर्वोच्च पद आहे, आणि १ व २ हे कलामना चपखल बसतात. ३ चा अर्धा भाग तरी घडतो आहे आणि पुढचाही होईल असे वाटते. ४ हे घडेल असे तेंव्हा स्वप्नातही वाटले नव्हते, पण तसेही घडू लागले आहे. ५ चीही लक्षणे दिसत आहेत.

आता ५,६, ७ चे पुढे काय होते ते बघू.

India's missile man is India's president असे वाक्य कुठेतरी वाचले आणि एकदम २२ वर्षांपूर्वी वाचलेले हे भविष्य आठवले. अस्त्रे शस्त्रे शोधणारा मनुष्य पंतप्रधान कसा होईल अशी भविष्य वाचले तेंव्हा शंका आली होती मनात...





अस्तनीतील निखारे
भारतातील कम्युनिस्टांचा इतिहास व वर्तमान धोका.


प्रस्तावना

कम्युनिस्ट म्हटले की सर्वसामान्य माणसाला काहीतरी वाईट, कट्टरपंथी, हिंसक, लोकशाहीविरोधी, मानवताविरोधी, भारतविरोधी पण आता जगातून जवळजवळ अस्तंगत झालेले लोक एवढेच माहिती असते. भारत चीन युद्धात चीन्यांना जाउन मिळालेले लोक हेही माहीत आसते.

पण त्यांचे नक्की तत्वज्ञान काय, इतिहास काय, भारतात काय स्वरूपाच्या कारवाया चालू आहेत, त्याचा खरच आपल्यावर काही परिणाम होत आहे का, होणार आहे का हे सविस्तर माहित असतेच असे नाही. या सर्व पैलूंची अल्पशी ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

सद्यपरिस्थितीत कम्युनिस्टांच्या कारवायांचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक झाले आहे ते अजून एका महत्वाच्या कारणाने...

आज भारतासमोर विकास आणि प्रगतीच्या असंख्य शक्यतांचे फार मोठे विश्व उघडले आहे. केवळ सॉफ्टवेअरच नव्हे तर जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. आपला वैयक्तिक तसेच देशाचाही आर्थिक, सामाजिक असा समतोल विकास घडवून आणण्याची कधी नव्हे तेवढी मोठी संधी उपलब्ध झाली आहे आणि तिचा पुरेपूर वापर करणेही आपल्या पिढीसाठी जरुरीचे आहे.

पण यात काही अडथळेही आहेत. विषमता, अज्ञान, भ्रष्टाचार यासारखे आपलेच अंतर्गत प्रश्न तर आहेतच, पण विघटनवादी शक्तींचेही फार मोठे आव्हान समोर उभे आहे. अंतर्गत शांतता वा स्थैर्य नसेल तर कुठलीही गुंतवणूक, प्रगती, व्यापार व विकास अशक्य आहे.

हे अंतर्गत स्थैर्य, भौगोलिक एकात्मता आणि शांतता नष्ट करण्यास प्रयत्नशील असा भारताचा सर्वात मोठा अंतर्गत शत्रू म्हणजे भारतातील कम्युनिस्ट. कम्युनिस्ट म्हणजे केवळ राजकीय पक्ष असे नाही तर कम्युनिस्ट पत्रकार व इतिहासकार, कम्युनिस्ट राजकीय पक्ष, कम्युनिस्ट कामगार संघटना, कम्युनिस्ट दहशतवादी संघटना आणि कम्युनिस्ट बिगरसरकारी संस्था (NGO ) अशा पाच मुख्य माध्यमांद्वारे कम्युनिस्टांच्या कारवाया परस्पर सहकार्याने व एकमेकांना मोठे करत चालतात त्यामुळे या सर्वांचा समावेश कम्युनिस्ट या शब्दात केला आहे.

भारत हा चीनचा समर्थ प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहू शकतो हे जगाने आणि चीननेही ओळखले आहे, त्यामुळे भारतातील स्वत्:हून हस्तक बनू इच्छिणार्‍या कम्युनिस्टांकरवी भारताला खिळखिळे करण्यात चीनचाही विशेष इंटरेस्ट आहे.

आणि हाच डाव हाणून पाडण्यासाठीही कम्युनिस्टांच्या व्युहरचनेचा अभ्यास करणे आणि त्याला सर्व भारतीयांनी तोंड देणे गरजेचे झाले आहे असे वाटते.

पुढील लेखात इतिहाससिद्ध घटना मांडल्या आहेत, माझी मते नाहित. विचारणा केल्यास कुठलेही संदर्भ उपलब्ध करून देता येतील. यातील बराचसा भाग मायबोलीवर इतरत्रही लिहिला होता, पण काही बीबी कधीही उडवले जाउ शकतात असा अनुभव असल्याने इथे पुन्:प्रकाशित करत आहे.
कम्युनिझम : ओळख

कम्युनिझम म्हणजे काय याचे सोप्या शब्दात उत्तर असे देता येईल. ( ही माझी कम्युइनिझमबद्दलची मते नसून त्याच्या अधिकृत संदरभातून घेतलेले आहे. )

राजकीय तत्वज्ञान : समाजाचे शोषित आणि शोषक असे दोन भाग करून, शोषितांच्या शोषकांविरुद्धच्या रक्तरंजीत क्रांतीद्वारे शोषितांची हुकुमशाही प्रस्थापित करायला हवी असे प्रतिपादन करणारे तत्वज्ञान म्हणजे कम्युनिझम.

आर्थिक तत्वज्ञान : उत्पन्नाच्या सर्व साधनांवर (उदा. शेते, कारखाने) या शोषितांच्या सरकारची मालकी प्रस्थापित करून त्यातील उत्पन्नाचे शोषितांमध्ये समान वाटप करणे हा कम्युनिझमचा प्रमुख अर्थविचार म्हणता येईल. यानुसार वैयक्तिक मालकी वा संपत्ती निर्माण करू पहाणारे हे भांडवलदार आहेत,शोषितांचे वर्ग्शत्रू आहेत.

सामाजिक : धर्म, सम्स्कृती ही शोषितांना ताब्यात ठेवण्यासाठीची अफूची गोळी आहे. हे सर्व बूर्झ्वा म्हणजे पांढरपेशा मध्यमवर्गाचे खूळ आहे. त्यामुळे त्याचा त्याग आवश्यक आहे.कम्युनिझमला अभिप्रेत अशा जीवनपद्धतीप्रमाणेच प्रत्येकाने जीवन व्यतीत केले पाहिजे.
आंतरराष्ट्रीय : राष्ट्रवाद, देशप्रेम हीसुद्धा अशीच एक शोषण करणारी व साम्राज्यवादाला पोषक अशी निषेधार्ह गोष्ट आहे. जगातील कामगारांनी देशाच्या सीमा ओलांडुन भांडवलदारांविरुद्ध, गैरकम्युनिस्ट सरकारविरुद्ध एक झाले पाहिजे हे तत्व आहे.


दास कॅपिटल या बर्‍यापैकी क्लिष्ट व अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथाद्वारे मार्क्स आणि एंगल्सने हे तत्वज्ञान मांडले. दारिद्र्य, अज्ञान आणि अन्याय याने नाडलेले असंख्य शोषितांना ही क्रांतीची कल्पना भावली त्यातून अनेक देशात कम्युनिझम फोफावला, रशियात रक्तरंजीत क्रांती झाली, पुढे अनेक देशातही झाली आणि कम्युनिस्ट सरकारे आली.

कुणे एके काळी शोषितांची क्रांती वगैरे गोष्टींमुळे कम्युनिझम ला मिथुनच्या गरिबोंका दाता वगैरे चित्रपटांसारखेच मास अपील होते हे मान्य केले पाहिजे. वयाच्या विसाव्या वर्षी तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदयच नाही असे म्हटले जायचे पण तिसाव्या वर्षीही तुम्ही अजून कम्युनिस्टच असाल तर तुम्हाला डोकेच नाही असे पुढचे वाक्य आहे.

कम्युनिस्टांची सत्ता आल्यावर अर्थातच भ्रमनिरास झाला. नाही रे वर्गाची म्हणजे कम्युनिस्ट नेत्यांची निरंकुश सत्ता, शोषितांचे म्हणजे कम्युनिस्ट नेत्यांचे कल्याण असे सगळीकडेच घडले आणि कम्युनिझम ही पण अखेर गरिबांना भडकावून सत्तेचा मलिदा खायची कम्युनिस्ट नेत्यांची अधिक भीषण खेळी एवढाच अर्थ उरला.

शिवाय प्रतिक्रांती नावाचे एक बुजगावणे उभे केले गेले. म्हणजे काय तर शोषितांच्या या क्रांतीविरुद्ध भांडवलदार प्रतिक्रांती करणार आहेत असे एक वातावरण निर्माण केले गेले. ते वापरून कुणाही पक्षांतर्गत विरोधकाला, वा नागरिकाला भांडवलदारांचा हस्तक वा प्रतिक्रांतिकारक ठरवून ठार केले गेले वा सैबेरियात पाठवले गेले. दुसर्‍या महायुद्धात जेवढी माणसे मेली त्याहून जास्त माणसे एकट्या स्टॅलिनच्या काळात रशियात मारली गेली. एकुणाच मानवी हक्कांची जेवढी पायमल्ली कम्युनिस्टांनी केली तेवढी कुठल्याही क्रूर हुकुमशहांनीही केली नाही.

कम्युनिझमचे हे भेसूर वास्तव इतिहासात तर पानोपानी नोंदलेले आहेच पण George orwel च्या ऍनिमल फार्म आणि १९८४ या जबरदस्त कादंबर्‍या कम्युनिझमचा प्रत्येक पैलू, सारे ढोंग अगदी प्रभावीपणे उभे करतात. आयन रॅंड चे वी द लिविंग हे रशियातील अनुभवांवरचे पुस्तक सुद्धा वाचण्यासारखे आहे. लाइफ ऍंड डेथ इन शांघाय हे आत्मचरित्र माओच्या सांस्कृतिक क्रांतीमुळे लोकांनी काय नरकयातना भोगल्या हे समजते.

या सर्व भ्रमनिरासामुळे जगभर कम्युनिस्ट राजवटींविरुद्ध उठाव झाले आणि लोकशाही व्यवस्था स्थापन झाली. देशात कम्युनिझम असणे आणि नसणे यातला नरका - स्वर्गाचा फरक कुणि इस्ट आणि वेस्ट जर्मनीत जाऊन बघावा, मी पाहिला आहे. किंवा जवळच बंगालमध्ये जाऊन पाहिला तरी चालेल. जगात अनेक देशांमध्ये आज कम्युनिस्टांवर बंदी आहे. अमेरिकेसारख्या देशात असे नियमच आहेत की ड्रग पेडलर्स, गुन्हेगार याबरोबरच कम्युनिस्टांनाही व्हिसा दिला जात नाही. कम्युनिस्टांना शिव्या दिल्या असा वाक्प्रयोग मध्ये वाचला, पण बाहेर तर फ़ेसिस्ट, नाझी सारखी कम्युनिस्ट हीच अपमानास्पद शिवी समजली जाते.

तर असा हा सर्व जगाने टाकाऊ ठरवलेला कम्युनिझम आपल्याकडे मात्र अज्ञान आणि गरिबीच्या जोरावर तग धरून आहे. आता कम्युनिस्टांचा भारतातील इतिहास जरा पाहू...

कम्युनिझम आणि भारत : स्वातंत्र्यपुर्व काळ

१९१३ च्या रशियन क्रांतीनंतर भारतातही अनेक क्रांतीकारकसुद्धा मार्क्सच्या शोषणमुक्त समाजाच्या विचारांनी प्रेरित झाले होते. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र त्यांनी देशप्रेमाला झुकते माप दिले, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग हे या तत्वज्ञानातल्या एका भागाने प्रभावित झाले होते पण त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.

दुसरीकडे १९२० साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. हा पक्ष इतर बर्‍याच देशातल्या कम्युनिस्ट पक्षांप्रमाणेच लेनिनने स्थापन केलेल्या रशियास्थित कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली होता. १९३९ पर्यंतही फारशी ताकदही नव्हती कम्युनिस्टांची. कामगारांना एकत्र करून शोषक ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष अशी कम्युनिस्टांची भूमिका होती. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्याबरोबर भारतीय कम्युनिस्टांनी 'हे साम्राज्यवादी युद्ध आहे' असे घोषीत करून ब्रिटिशांना विरोध केला.

रशियाच्या तालावर कोलांटीउडी

पण बावीस जून १९४१ ला हिटलरने रशियावर आक्रमण करताच कम्युनिस्टांची भूमिका ताबडतोब बदलली आणि त्यांनी ' हे लोकयुद्ध आहे, भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली पाहिजे' असे फरमान काढले. हेही स्वत्:हून केले गेले नाही तर रशियाहून जसा आदेश आला त्याप्रमाणे केले गेले. ( स्वत्:ची धोरणे भारतासाठी नव्हे तर आपल्या विदेशी मालकांसाठी बदलण्याची ही घातक वृत्ती तेंव्हापासून जी सुरू झाली ती आजतागायत चालु आहे. दोन महिन्यापूर्वी इराणप्रश्नी त्याचे पुन्हा उघड दर्शन घडले. )

ब्रिटिशांशी हातमिळवणी

ब्रिटिशांना मदत करण्यात कम्युनिस्ट या थराला गेले की त्यांनी एक गुप्त समझोता केला. ( तो तेंव्हा गुप्त होता, आता दिल्लीच्या नॅशनल अर्काइव्हज मध्ये सर्वच कागदपत्रे उपलब्ध आहेत ) त्यानुसार
(१) सर्व कम्युनिस्ट नेत्यांची तुरुंगातून मुक्तता, त्यांना हवे ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य, त्यांच्या विविध मुखपत्रांना मान्यता व मदत या कम्युनिस्टांच्या मागण्या होत्या.
आणि त्याबदल्यात
(२) सुभाशचंद्र बोसांविरुद्ध देशव्यापी प्रचार, लष्कर भरतीत सहकार्य, सुसाईड वर्कर्सचा पुरवठा, संरक्षणविषयक कारखान्यात संप न होउ देण्याची व जास्तीत जास्त उत्पादनाची हमी, कॉंग्रेस चळवळींना विरोध असा कम्युनिस्ट करणार असलेल्या कामाचा प्लॅन ब्रिटिशांना देण्यात आला.

चले जावला सुरूंग

यानंतर जे घडले तो कम्युनिस्टांच्या देशद्रोहाने भरलेल्या काळ्या इतिहासाचा पहिला अध्याय आहे.
१९४२ चे भारत छोडो आंदोलनाचा ठराव झाल्या दिवसापासून कम्युनिस्ट पक्षाने ते सॅबोटेज करण्याचा प्रचंड प्रयत्न सुरू केला. काय काय 'काम' केले याचे रिपोर्टही ब्रिटिशांना पाठवले. (तेही उपलब्ध आहेत) मग सगळेच 'आटोपल्यावर' नंतर कॉंग्रेसने, कॉंग्रेस वर्किंग कमिटीज चार्जेस या नावाने प्रसिद्ध अशा ऐवजाद्वारे कम्युनिस्टाम्ना या सगळ्याचा जाब विचारला. ते सारे आरोप आणि त्याला कम्युनिस्ट थातूर मातूर उत्तरे हे 'रिप्लाय टु CWC चार्जेस' या नावाने माहित असलेली सारी कागदपत्रेही हा सगळा इतिहास जाणून घ्यायला उपलब्ध आहेत.

सुभाषचंद्रांविरुद्ध गलिच्छ प्रचार

करारानुसार सुभाषचंद्र बोसांविरुद्ध तर अत्यंत घाणेरडा प्रचार देशभर सुरू करन्यात आला. सुभाषबाबू जेंव्हा जर्मनीला गेले आणि त्यांनी जगप्रसिद्ध भाषण केले बर्लिन रेडिओवरून तेंव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राने त्यांचे अतिशय अपमानकारक असे व्यंगचित्र प्रसिद्ध केले त्यात सुभाषबाबू हे मांजराच्या स्वरूपात दाखवले असून गोबेल्स या हिटलरच्या प्रचारप्रमुखाने त्यांना मानगुटिला धरून उचलले आहे आणि माइकसमोर धरले आहे असे ते चित्र होते. ( पिपल्स वॉर, १९ जुलै १९४२ ) अशा घाणेरड्या प्रचाराची आणि चित्रांची राळच त्यांनी उडवून दिली. जेंव्हा जपानच्या मदतीने सुभाषबाबूंनी सीमेपर्यंत धडक मारण्याचे योजले तेंव्हा सुभाषबाबू गाढव असून त्यांच्यावर स्वार होऊन टोजो भारताकडे येत आहे असे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले ( पिपल्स वॉर, १३ सप्टेंबर १९४२ ) ( माझ्याकडे प्रती उपलब्ध आहेत. ) त्या काळात बाकी सर्व पक्षांच्या प्रकाशनावर बंदी असतांना यांची प्रकाशने का निर्धोक चालू होती हे यावरून लक्षात येते.

देशद्रोहात आकंठ बुडालेली ही माणसे, सावरकरांनी त्यांच्या एका पत्रात ब्रिटिशांची माफी मागितली या कथित कारणासाठी त्यांचे चित्र संसदेत लावायचे नाही असा गोंधळ घालत होती. सर्व मिडिया त्यांचे हे थैमान तीन दिवस दाखवत होती तेंव्हा एकालाही या विरोधकांचा भूतकाळ काय आहे हे बघायची गरज वाटली नाही.

पाकिस्तानच्या मागणीला ताबडतोब सक्रीय पाठिंबा

(१)मुस्लिम लीगने १९४० च्या त्यांच्या अधिवेशनात पाकिस्तानची मागणी करताच त्याला ताबडतोब पाठिंबा देणारा पक्ष होता भारतीय कम्युनिस्ट पक्ष.

(२)त्यासाठी त्यांनी थिअरी मांडली की 'भारत हा एक देश नाही आणि नव्हता, यात अनेक देश आहेत आणि त्यातल्या मुस्लिमांना वेगळे व्हायचे असेल तर ते न्याय्य व योग्यच आहे.' याचा हिरिरीने पुरस्कार करण्यात आला.

(३) आधी त्यांच्याकदे संशयाने पहाणार्‍या मुस्लिम लीगने कम्युनिस्टांना कसे ऍप्रेशिएट करायला सुरूवात केली याब्द्दल कम्युनिस्ट स्वत्:च गर्वाने म्हणतात Among the leaguers we found that that their earlier suspicion that we were fifth column of the congress began to disappear, they were thunderstruck to hear non muslims explain Pakistan better than that was done from the League platform itself

(४) कॉंग्रेसने पाकिस्तानची मागणी फेटाळताच कम्युनिस्टांनी 'जातीय अहंकाराचा उद्रेक' अशी टिका केली.( पी. सी. जोशी जनरल सेक्रेटरी)

(५) 'जिथे जिथे मुसलमान मोठ्या संख्येने एखाद्या सलग भूभागात आहेत तेथे आपले स्वयंशासित राज्य बनवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि इच्छा असल्यास ते फुटुन निघू शकतात' ही कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत भूमिका होती. ( ले लक्षात घेतले की आजचे त्यांचे जिहादला असणारे समर्थन समजते)

(६) या सर्वासाठी अर्थातच स्टॅलिनच्या धोरणाचा, वचनांचा आधार घेण्यात आला होता.

कम्युनिस्टांचे इतिहास आणि मिडिया याबद्दलच्या ऑब्सेशनचे कारण हे त्यांच्या या सगळ्या काळ्या इतिहासात दडलेले आहे. आणि ही माहिती देणारे एकही पुस्तक उपलब्ध नाही, कधी कुठेही लेख नाहीत, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात उल्लेख नाहित. केवळ सरकारच्या, स्वत्: कम्युनिस्ट पार्टीच्या आणि काही संशोधकांच्या ओरिजिनल दस्तैवजाच्या प्रतींमधुनच काही माहिती मिळू शकते हे या ऑब्सेशनचे यश आहे.

संदर्भ
(१) वरच्या पोस्टमधील चले जावला सुरूंगब्द्दल मी फारसा तपशील दिला नाही, कारण तो खूपच जास्त आहे आणि केवळ एवढ्याच विषयाला वाहिलेल्या अरुण शौरी यांच्या 'The Only Fatherland' Communists, Quit India movement and the Soviet Union. या टिपिकल शौरी स्टाईल अत्यंत अभ्यासपुर्ण पुस्तकात ते सर्व विस्ताराने दिले आहे.
(२)खालील पुस्तकेही बघण्यास हरकत नाही. पण कम्युनिस्टांनीच लिहिलेली असल्याने पुस्तकात थोडे शोधण्याची तयारी हवी.

Ghosh S. -socialism and communism in india.
Druhe D. N. - soviet russia and indian communism
E. D. Scalapino - the communist revolution in India.
sumant banerji - india's simmering revolution
P.C. Joshi - problems of the mass movement
Kolakowski - Main currents in marxism vol -III

महत्वाची टीप : माझ्या या आधीच्या व पुढच्याही विवेचनात अनेकदा रशियाचा उल्लेख आला आहे. पण त्यात कुठेही रशियावर टीका करायचा हेतू नाही, वा अनादर तर अजिबातच नाही. माझ्या इतिहासाच्या मर्यादित आकलनाप्रमाणे गेल्या साठ वर्षात एक रशिया हा वेळो वेळी खर्‍या मित्रासारखा भारताच्या मागे उभा राहिला आहे, व मदत केली आहे. आज बदलत्या परिस्थितीत त्याला मर्यादा असल्या तरी त्याने आजपर्यंत केलेल्या मदतीचे मोल कमी होत नाही.



स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कम्युनिस्टांची वाटचाल कशी झाली ते पुढच्या भागात पाहू..
कम्युनिझम आणि भारत : स्वातंत्र्योत्तर काळ

१९४५ -१९५० : पहिल्याच लोकशाही सरकारला विरोध, सश्स्त्र उठाव.

१९४५ च्या निवडणुका कम्युनिस्ट पक्षाने लढवल्या होत्या, पण त्यात कॉंग्रेसला यश मिळाले होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारस कम्युनिस्टांत दोन तट पडले. कॉम्रेड बी. टी. रणदिवेंच्या गटाचे म्हणणे होते की संप, उठाव, हिंदू मुस्लिम दंगे याचा फायदा घेऊन आता क्रांतीचे रणशिंग फुंकले पाहिजे आणि कम्युनिस्टांनी सत्ता ताब्यात घेतली पाहिजे, कॉंग्रेसची सत्ता म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. पश्चिम बंगाल शाखेने त्यांना पाठिंबा दिला. १९४७ मध्ये प्रसिद्ध केलेया पत्रकात ते म्हणतात ' कॉंग्रेस फॅसिस्टांवर तुम्ही बंदुका रोखा. सर्व कलकत्त्याला किंवा सर्व बंगालला आग लावा.' वाद विकोपाला गेले आणि लोकशाही सरकारच्या विरोधात क्रांतीला विरोध केल्याबद्दल पी. सी. जोशींची उचलबांगडी करून बी. टी. रणदिवे सरचिटणीस झाले. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताबद्दल कम्युनिस्टांचे दोन कलमी धोरण ठरले.
(१)शहरी भागात सर्वत्र संप घडवून आणणे.
(२) (आंध्र प्रदेश) तेलंगण भागात सशस्त्र उठाव करून तो ताब्यात घेणे. ( तेंव्हा तेलंगण निजामाकडे होता)

पण सरदार पटेलांनी सप्टेंबर १९४९ मध्येच निजामाला शरण आणून तेलंगण भारतात समाविष्ट करून घेतले. त्यानंतर पुढे तीन वर्षे कम्युनिस्टांचा भारत सरकारशी सशस्त्र संघर्ष चालू राहिला.

१९५१ - १९५९ : भांडणे आणि रशियाच्या आदेशांचे पालन.

मे १९५० मध्ये राजेश्वर राव सरचिटणीस झाले. ते चीनसमर्थक असल्याने अंतर्गत संघर्ष सुरू झाला. इकडे नेहरू रशिया संबंध जुळू लागले होते. त्यातच रशियाने ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाद्वारे असा आदेश दिला की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सांसदीय पद्धतिशी जुळवून घ्यावे. याला अर्थातच चीनवादी राव यांचा विरोध होता. यावरचे मतभेद एवढे टोकाला गेले की ते आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट नेत्यांनी सोडवावे असे ठरले. त्याप्रमाणे १९५१ मध्ये डांगे, राव, अजय घोष वगैरे रशियाला गेले. आणि अखेर स्टॅलिनच्या आदेशाप्रमाणे राव यांच्या ऐवजी अजय घोष सरचिटणीस झाले. भारताविरुद्धचा सश्स्त्र लढा मागे घेण्यात आला. निवडणुका लढवण्याचे धोरण ठरले.

अशा रीतीने ४ वर्षे चाललेली भारताविरुद्धची क्रांती स्टॅलिनच्या आदेशाने संपुष्टात आली. या सर्व निर्णयप्रक्रियेत भारताला काय हवे ? काय चांगले ? याचा विचार सुद्धा झालेला दिसत नाही.

भारत रशिया मैत्री १९५५ मध्ये वाढत गेली आणि त्याचा परिणाम म्हणून रशियाने भारत सरकारशी जुळवून घेण्याचा स्पष्ट आदेश अजय घोषना त्यांच्या १९५६ रशिया भेटीत दिला. त्याप्रमाणे पक्षाने निवडणुका लढवल्या व १९५७ मध्ये केरळमध्ये नंबुद्रिपादाम्च्या तेतरुत्वाखाली कम्युनिस्टांना सत्ता मिळाली.


१९५९ - १९६४ : पावलापावलाला देशद्रोह.

१९५९ ला पहिली भारत चीन चकमक झाली त्यात १० भारतीय जवान ठार झाले. कम्युनिस्ट पक्ष चीनच्या मागे उभा राहिला, प्रत्यक्ष नंबुद्रिपादनेच 'हे भारतीय आक्रमण सहन केले जाणार नाही' असे जाहीर केले. कॉम्रेड डांगेंना याबद्दल संसदेत फैलावर घेताच त्यांनी 'चीनला समर्थन ही पक्षाची चूक आहे. मी या बाबतीत माझ्या पक्षाशी सहमत नाही' असे संसदेत २४ ऑक्तोबर १९५९ ला नमूद केले.

पण रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जाहीर पाठींबा देताच कम्युनिस्टांना त्यांची भूमिका काही काळ बदलावी लागली. प्रश्न चिघळत गेला, चीनचे आक्रमण झाले, दबाव वाढत गेला आणि अखेर १ नोव्हेंबर १९६२ रोजी कम्युनिस्ट पक्षाने चीनचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. हा ठराव मात्र सुखासुखी होउ शकला नाही, प्रचंड विरोध, गोंधळ झाला आणि चीनच्या समर्थनार्थ आणि ठरावाच्या विरोधात ज्योती बसू, हरकिशन्सिंग सुरजीत, नंबुद्रिपाद इत्यादींनी राजीनामे दिले. (कॉंग्रेसमध्ये पेरलेलेया कम्युनिस्टांपैकी एक मणीशंकर आय्यर हा त्या वेळेला युरोपात चीनवाद्यांसाठी धनसंकलन करत होता.)

नंबुद्रिपाद आणि इअतर ९५७ कॉम्रेड्ससह ही सर्व मंडळी जानेवारी १९६३ पर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगाची हवा खात होती. आज हीच मंडळी समाजात उजळ माथ्याने वावरत तर आहेतच. पण सरकारमध्ये सहभागी आहेत, निर्णयासाठी दबाव आणत आहेत, अनेक गोपनीय कागदपत्रे बघू शकत आहेत ही खरी भयावह परिस्थिती आहे.

एक लक्षात आले असेलच की या सगळ्यात पुन्हा भारताच्या बाजूचे की चीनच्या असा प्रश्नच नव्हता. रशियाच्या ऐकायचे की चीनच्या बाजूने उभे रहायचे असा प्रश्न होता. यावरुन ही सगळि साठमारी चालू होती.

ते युद्ध तर आपण हरलो. पण चीननेही शस्त्रसंधी जाहीर केली आणि आपल्याला मुक्त करायला लाल सेना आली या स्वप्नात वावरणार्‍यांचा भ्रमनिरास झाला.

१९६४ - १९६७ : फूट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना, पुन्हा दहशतवादाकडे.

कम्युनिस्ट पक्षातील ही सर्व भांडणे विकोपाला गेली. त्यातच चीनवादी कॉम्रेड्सनी कॉ. डांगे यांनी १९२५ मध्ये तुरुंगातून मुक्ततेच्या बदल्यात ब्रिटिशांशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेतल्याचे प्रकरण उकरून काढले आणि अखेर भारतीय कम्युनिस्ट पक्षापासून फुटुन वेगळे होत आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला.
चीनने पेकिंग रिव्ह्यूद्वारे या नव्या पक्षाचे स्वागत करताम्ना मूल सीपीआयवर त्यांच्या मवाळ सुधारणावादी धोरणांबाबत जोरदार टीका केली. या नव्या नव्या सीपीएमचे चारू मुजुमदार, कानू सन्याल वगैरे नेते 'कायद्याने वा सरकारच्या माध्यमातुन आपले ध्येय साध्य होणार नाहीत. आता सशस्त्र क्रांतीद्वारे सत्ता काबीज केली पाहिजे. चीनचे नेते माओ हेच जागतिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. संसदीय मार्ग हा सुधारणावाद आहे, तो स्वीकारणार्‍यांबरोबर सहकार्य नाही' अशा गर्जना करू लागले. ( सुधारणावादी ही कम्युनिस्टांमधली मोठी शिवी आहे.)

पण तरीही १९६७च्या निवडणुका सीपीएम ने लढवल्या आणि अनपेक्षितपणे सत्ता मिळाल्यावर बसू आणि कंपनी एकदम घुमजाव करून सध्या क्रांती नको, पुढे निवडणुकातूनच देशभर सत्ता मिळवू असे म्हणू लागली.
असे करणे हा माओशी द्रोह आहे असे चारू मुजुमदार, सन्याल या जहालांचे मत होते आणि त्यातूनच पुन्हा एकदा मतभेदांची ठिणगी पडली. १९६७ मध्ये नक्षलबाडीला पहिला कम्युनिस्ट उठाव झाला आणि बुरागंज हा भाग स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आला. समांतर सरकार स्थापन करण्यात आले. हे सर्व चिघळत जाऊन १९६९ मध्ये लेनिनच्या जन्मशताब्दीच्या दिवशी मुजुमदार सन्याल यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ ईंडिया(मार्क्सिस्ट - लेनिनिस्ट) सिपीएम पासून फुटुन वेगळी झाली.
या नव्या क्रांतीचे चीनतर्फे स्वागत करण्यात आले, आणि या वेळेला सीपीएम वर टीका करण्यात आली की त्यांनी तेलंगणाची क्रांती अर्धवट सोडुन दिली व विश्वासघात केला. नक्षलबाडीचा दहशतवाद ही १९५१ म्ध्ये रशियाच्या दबावाने थांबलेल्या कम्युनिस्टांच्या भारताविरुद्धच्या सशस्त्र क्रांतीचेच १६ वर्षाच्या खंडानंतर पडलेले पुढचे पाउल होते.

१९६७ साली सुरू झालेला हा हिंसाचार आता अनेक राज्यातल्या मिळून शेकडो जिल्ह्यात पसरला आहे. किती ठिकाणी भारताचे राज्यशासन उलथुन यांचे शासन सुरू झाले आहे. आतापर्यंतच्या मुद्यांवरून
(१)कम्युनिस्टांचा देशद्रोह.
(२)भारताविरुद्धची कटकारस्थाने.
(३)परकीयांशी हातमिळवणी.
(४)दहशतवाद.
(५) भारताचे विभाजन करू पहाणारी भूमिका.

हे स्पष्ट झाले असावे, आणि त्यांना सर्व शक्तीनिशी विरोध करण्याची आवश्यकताही जाणवली असावी.

कम्युनिस्ट दहशतवादाची पुढची एका बाजूला सम्सदीय राजकारण तर दुसर्‍या बाजूला सशस्त्र लढा ही दुहेरी वाटचाल, उल्फा, जिहादी, LTTE , नेपाळचे माओवादी अशा सर्वांशी हातमिळवणी आणि सद्यस्थितीबद्दलची झोप उडवेल अशी काही महत्वाची आकडेवारी हे आपण नंतर थोड्या काळाने पाहू.
shivaji

शिवकालीन महाकवी भूषणनी लिहून ठेवले आहे...

कासी की कला जाती
मथुरा मसिद होती
सिवाजी ना होतो
तो सुन्नती होत सबकी

नंतर काशी आणि मथुरा तर भ्रष्ट झालीच, पुढचेही व्हाय्चे नसेल तर पुन्हा एखादा शिवाजीच जन्माला यायला हवा.

शिवजयंतीच्या (एक दिवस उषीरा) शुभेच्छा.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner gs1 Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators