Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
champak
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » champak « Previous Next »

स्पेन च्या राजकिय इतिहासात आज चा दिवस ठळक पणे नोन्दला जाईल. गेली ४० वर्षे ज्या दहशतवाद्यांनी किमान १००० लोकांचे प्राण घेतले अन प्रचंड वित्ता हाणी केली त्यांनी आज जाहीररित्या शस्त्रे खाली ठेवत असल्याची घोषणा केली.
हे तसे अचानक च घडले. गेला महिनाभर या ४ राज्यात खंडणी अन स्फ़ोटांनी धुमाकुळ घातला होता. इथल्या उद्योजकांकडुण खंडणी मिळाली नाही तर त्यांच्या व्यावसायीक जागांमध्ये बाॅम्ब्स्फ़ोट घडत होते. अन आज अचानक त्या दहशत्वाद्यांनी TV वरील थेट प्रक्षेपणात शांततेच्या मार्गावर येण्याचे जाहीर केले. त्यांच्या पत्रपरिषदेत कधी नव्हे तो स्पेन चा राष्ट्रध्वज बाजुला ठेवलेला होता, जो आजवर मी तो कित्येकदा शहरातील रस्त्यांवर जळताना पाहीला, ते लोक स्पेन च्या national TV ला थेट मुलाखत देत होते!!!

शहराचे महपौर अन राज्याचे मुख्यमंत्री ह्यांनी तर शॅम्पेन फ़ोडुण आनंद साजरा केला.
पण right wing वाली popular party ह्याला काय उत्तर देते ते पाहणे रंजक ठरेल!

द्वेष अन हिंसेने कार्य सिद्धिस जात नाही हे त्यांना समजले, तसे आपल्या देशातील काही लोकांना समजले त किती बरे होइल!!!


Eta declares permanent ceasefire
इन्किलाब झिंदाबाद!!!         

http://www.esakal.com/20060323/sampvish.html

काल बनगरवाडी पाहिला.

माझे वडील मुख्याध्यापक असल्याने त्यांचा बदलीच्या निमित्तने अनेक गावे अन आस पास च्या वाड्या वस्त्या वर जाणे होत असे. ह्या चित्रपटातील अनेक व्यक्तीरेखा प्रत्यक्ष पाहिल्या आहेत, अनेक प्रसंग असे आहेत कि जे मी अनुभवले आहेत, असे राहुण राहुण वाटत होते.

मी आई बद्दल लिहिले तेंव्हा मला Itsme नी आम्ही अन आमचा बाप हे पुस्तक वाचायला सुचवले होते. त्यानंतर देशात जाणे झाले, पण पुस्तक वाचायचा योग आला नाही. पण हा चित्रपट पाहिल्यावर मात्र माझ्या जुण्या आठवणी जाग्या झाल्यात.

वेळ मिळाला कि लिहितोच :-)

औंध च्या राज्यांचा प्रजाहितदक्ष असा लौकिक होता, पण ह्या चित्रपटाच्या शेवटाने मात्र त्या समजाला थोडा धक्का बसला. अजुण माहीती मिळवावी लागेल.

शुक्रवारी Mother Teresa de Calcutta हा spanish भाषेतला चित्रपट दाखवला गेला. छान वाटले.

About 20 lakh Maharashtra families have signed up for the Rural Employment Guarantee Scheme since its launch last month. But an Ahmednagar village doesn’t need job guarantee anymore .......

http://www.indianexpress.com/res/web/pIe/full_story.php?content_id=89398
Foreign Investors नी पैसा काढुण घेतला तर market पुन्हा कोसळणार का?

हे सांगायला कुणा अर्थतज्ञाची गरज आहे असे मला वाटत नाही.

एकुण च आपल्याकडे जी बुम झालेली आहे, ते म्हंजे शरीराची प्रमाणबद्ध वाढ न होता शरीराला आले ली सुज आहे असे वाटते.

देशाची growth ही स्वयंपुर्णतेतुण असावेई. परक्या भांडवलावर किती अवलंबुण रहायचे हे ठरले पाहीजे. भांडवलदार लोकांना देशाच्या सीमा नसतात. आज भारतात सोयी अन स्वस्त मजुर आहेत म्हणुण ते भारतात गुंतवणुक करित आहेत, उद्या दुसर्‍या कुठल्या देशाने ह्या सोयी दिल्या कि गेले तिकडे.

पण सामान्य माणसाचा उद्देश हा केवळ त्याच्या एकट्याचे जीवण कालात खुप सुख उपभोगावे असे च असते. त्यामुळे तो फ़ार पुढचा विचार करित नाही.

उदाहरण द्यायचे झाले तर
Olympic games host cities चे देता येईल. ज्या ज्या ठिकाणी ह्या games होतात, त्या शहरात काही काळापुरते व्यवसायात बुम येते, पण नंतर मात्र त्य शहराची अर्थव्यवस्था पुरी बिघडुण जाते. उभा केलेला डोलारा सांभाळण्या ची कुवत राहत नाही. कारण कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन च हाताशी नसते.

देशाचे नेतृत्व करणार्‍यांनी ह्या बाबी लक्षात घेतल्या पाहीजेत. सामान्यांचे जावु द्या पण नेत्यांनी किमाण २५ ते ५० वर्षे पुढचा विचार केला पाहीजे. तर ते दुर्दृष्टी असणारे नेतृत्व मानता यील.

काल लॅब मधील एका सहकार्‍या सोबत फ़्रान्स च्या hossegor गावामध्ये एका वार्षिक खरेदी महोत्सवा ला गेलो होतो. दर वर्षी ईस्टर च्या सुटी मध्ये इथे हा महोत्सव भरतो. सुट्टी चा हंगाम असल्याने ७५ कि.मी. अंतर जायला तब्बल २ तास वेळ लागला.

कपड्या ची २० ते २५ वेग वेगळ्या कंपण्यांची दुकाणे अगदी ओसंडुण गेली होती. त्याला जोडुण च sports articles ची ही खुप सारी दालणे होती.

सगळ्या स्पेन अन फ़्रान्स मधली पोरे अन पोरी:-) तिथे आली त कि काय असी शंका मला आली. दालनांमध्ये जाण्या साठी काही ठिकाणी तब्बल दोन दोन तास रांगा लागल्या होत्या. तीठिकाणे सोडुण मी अन सहकारी बाकी सगळी दालणे धुंडालुण आलो. माझा खरेदीचा उद्देश नव्हता खिशात पैसे च नव्हते :-) पण सहज फ़िरायला ( तिथला समुद्र किनारा खुप सही आहे) म्हणुण गेलो होतो. म्हणुण काही नोन्दी....
१) कुठल्याही कपड्यावर made in US or Europe दिसले नाही. विक्रिला ठ्वलेले सगळे कपडे Made in Brazil, Vietanam, Indonesia, China, Thiland, Shri Lanka, Pakistan, Malysia, etc.

२)तिथली दुकाणे एका च मोठ्या दालनात न ठेवता १०० ते २०० मीटर च्या अंतरावर विखुरलेली ठेवली होती. अन आग प्रतिबंधक यंत्रणी ची जाणवण्या ईतपात सोय केलेली होती. अर्थात विक्री प्रतीनिधी असणार्या smokers नी मात्र दालणा च्या प्रवेश वा exit जवळ जावुण सिगारेटी फ़ुंकण्या चे कार्य केले च! ( हे मीरत दुर्घटणेच्या पार्श्वभुमीवर )

३)गडबड होउ नये म्हणुण प्रतेक कंपनी चे स्वतः चे सुरक्षा रक्षक अन त्याना मदतीला स्थानिक पोलीस.

एक नीट नेटके संयोजन असलेला मोठा मेळावा अनुभवायला मिळाला!
श्री दिनेश कृपेकरुन काल तीन नाटके पाहता आली:-)

रणांगण : सद्य स्थिती तही माजलेल्या दुहीमुळे ह्या नाटकातील संवाद अगदी काळजाचा ठाव घेतात.

¨ दिल्लीच्या त्या जालीम तख्तावर मराठ्यांचं बुड एकदा तरी टेकु द्या की ¨ :-(

आपण इतिहासापासुन काहीच शिकत नाही का? एब्राहीम गारद्याचा तो अतृप्त आत्मा अजुनही महाराष्ट्रदेशी संदेश घेउन आलेला दिसत नाही!

सखाराम बाईंडर : सखाराम ला चंपी ची तत्वं पेलवली नाहीत. नेहमी खरा वागणारा सखाराम शेवटी मात्र ईतर सामान्य लोकांसारखा च वागला. पापभिरु वाटणारी लक्ष्मी शेवटी खलनायिका वाटली!

आनंद ओवरी : तुकारामाच्या भावाचं मनोगत, एकदम छान वाटतं हा एकपात्री प्रयोग पाहताना!

सबकुछ सिखा हमने
पर ना सिखी होशीयारी
सच कहते दुनियावाले
के हम है अनाडी!:-)

गेल्या चार दिवसाच्या सुटी मध्यी स्पेन च्या रस्ते अपघातात १०८ लोक मरण पावले! अमर्याद वेग, दारु पिउण वाहन चालवणे अन विनापरवाना वाहण चालवणे ह्यांचा एकत्रीत परिणाम.
मागील वर्षी ही ह्या च सुटीत १०५ लोक मरण पावल्या ची माहीती दिली जात होती. तसे प्रत्येक वीकेंड ला इथे १० ते १५ लोक वाहण अपघातात जातात च!

अपघाताला परिस्थीती जबाबदार आहे, वाहन चालक नाही, असा कायदा इथे आहे. त्यामुळे वाहन चालकाने किती ही मोठा अपघात घडवला तरी तो तुरुंगात जात नाहे, तर केवळ त्याचा परवाना काही काळासाठीरद्द होतो! अन त्याला जुजबी दंड होतो. इथे आता ते कायद्यात बदल करण्या चा विचार करत आहेत.

नुकताच फ़्रान्स मधील होसेगर गावाला जाताना मित्रा सोबत अपघताचा विषय निघाला होता. त्याला म्हटलो, कि इथे वाहने उत्तम आहेत, रस्ते उत्तम आहेत मग अपघात का होतात? मला तर शंका आहे कि इथले लोक चांगले नाहीत??

अन त्यावर त्याचे उत्तर होते ... हो! इथले लोक चांगले नाहीत.:-(

शेवटी प्रमोद महाजन ह्यांच्या वर मृत्यु ने जय मिळवला.........:-(

आजवर भारतातील अनेक तरुण नेते, ऐन उमेदीच्या काळात काळाच्या पडद्या आड गेले आहेत. एक लढवय्य सैनिक तयार करण्या साठी किती वेळ अन पैसा खर्च होतो, ह्याची ज्यांना समज आहे, त्यांना असा एक लढवय्या सेनापती गेल्यावर किती नुकसान झाले असेल ह्याचा अंदाज येईल.

प्रमोद महाजनांचा परिचय अन कर्तुत्व ह्यावर आता माध्यमांतुन खुप काही लिहीले बोलले जाईल. त्यांच्या कामाच्या पद्धतीचा हा एक वेगळा अनुभव!

नगर जिल्ह्यातील कोपरगाव ची आठ दहा लोक दिल्ली ला कामानिमित्त सुमो गाडी घेउण गेले होते. दिल्ली मध्ये फ़िरताना एका ठिकाणी त्यांच्या गाडीला अपघात झाला. अन पोलीसांनी गाडी जप्त केली अन ह्यांना स्टेशन मध्ये बसवुण ठेवले. इतक्या दुर प्रदेशात काय करावे अन कोणाला भेटावे हे न समजल्याने लोक भांबावले होते. कोपरगावचे एक गृहस्थ भाजपा चे राज्य सभेचे खासदार आहेत. ते काही काळ भाजपा चे प्रदेशाध्यक्ष ही होते. तर अपघातग्रस्त गाडीतील एका ने मग त्यांना फ़ोन केला. पण त्या खासदार ग्रुहस्ताने ओळख दाखवायचे नाकारले.

मग सहज च एकाने श्री. प्रमोद महाजनांना फ़ोन केला, अन परिस्थीती सांगितली. त्यावर, श्री. महाजन ह्यांनी तात्काळ त्या पोलीस अधिकार्‍याशी बोलुण कोपरगाव च्या ह्या लोकांन्ची सुटका करवली. अन ह्यापुढे ही काही झाले, तर मला अथवा माझ्या कर्यालयाला कळवा असा शब्द ही दिला!

नेता जेंव्हा मोठा होतो, तेंव्हा तो एका पक्षाचा असु शकत नाही. श्री. महाजन ह्यांच्या जाण्याने त्यांच्या पक्षाचे च नव्हे तर राज्याचे अन देशा ची ही नुकसान झाले आहे.

अश्या नेत्याला अखेरचा सलाम!!!

आज केतकी चे मेल आले!!! तिचे मेल आले हे पाहताच आज चांगली बातमी मिळणार yess तिचे लग्न ठरले!

ती पुण्यात Law शिकत होती. मागील वर्षी भारत भेटीत ती ची भेट झाली होती, तेंव्हा मेल आय डी ची देवाण्घेवाण झाली. अन आज मेल आले, तेंव्हा च समजले......... yess!!!


केतकी, माझी debeting ची पार्टनर. M.Sc. ला असताना आम्ही दोघांनी खुप सारी बक्षिसे जिंकली. एक वेळ अशी आली, कि आमच्या प्राचार्यांच्या केबीन मधे चषक ठेवायला जागा नाही म्हणुण आता स्पर्धा बंद करा असा सल्ला प्राचार्यांनी दिला :-)

माझ्या सारखा गबाळ्या पार्टनर ची तिने दोन वर्षे खुप च काळजी घेतली!!

तिचा hero ,जो कि सध्या E-TV मधे निवेदक आहे. त्याची अन ही ची debeting च्या निमित्ताने च झालेली ओळख आहे! पोरा चा आवाज सही होता, पुणेरी आहे हे विषेश! लग्न जर ते live दाखवणार असतील, त मला पहायला विसरु नका:-)! दि. १६ डिसेंबर २००६


First look....... एका थेसिस ची कहाणी! :-)

First look
धन्यवाद मित्रांनो!


मी Organic chemistry---Asymmetric synthesis ह्या विषयावर Ph.D. केली आहे!

ह्या विषयाचा आपल्या दैनंदिन जीवनात प्रचंड वापर होतो. साधे उदाहरण द्यायचे तर दोन जण जेंव्हा एकमेकांशी हस्तांदोलण करतात, तेंव्हा ते आप आपला उजवा हात समोर च्या च्या हातात देतात. पण समजा त्या पैकी एक डावखुरा आहे.......... काय गंमत होते ते बघा...... तो चुकुण त्याचा डावा हात पुढे करतो.........!! अन मग mis-match होते! मी मागे डावर्‍या लोकांचे अनुभव असा एक बीबी उघडला होता! तोच हा संदर्भ!


उपलब्ध वा आपल्याला माहीती असलेल्या organic molecules पैकी बहुतेक molecules हे असे डावे वा उजवे असतात. महत्वाचे म्हंजे कि आपल्या शरीरातील Amino acids, carbohydrates / Sugars हे पण एका अर्थी असेच एक कल्ली असतात. म्हंजे सगळे amino acids हे L- म्हंजे उजवे तर sugars ह्या D- म्हंजे डावर्‍या असतात. त्यामुळे एखादे नविन रसायन जेंव्हा शरीरात प्रवेश करते तेंव्हा ते जर डावे वा उजवे असेल त्या नुसार ते amino acid वा sugar शी react होते.

दुसरे उदा. म्हंजे, लिंबु!:-) लिम्बामध्ये असलेले molecule अन सन्त्र्यामध्ये असलेले molecule हे एक च organic molecule चे डावे वा उजवे रुप आहेत. त्यामुळे मुळ molecule जरी Limonine हे असले तरी, त्यांचे दोन वेग वेग ळे वास अन चव असतात.

ह्या शास्त्राच म्हंजे च chirality- the greek word which means Handedness , चा शोध माणवाला १८१५ साली लागला होता, पण त्या चा सामान्य माणसाला जबरदस्त भयानक अनुभव मात्र १९५०-१९६० ला आला. झाले असे कि, अमेरिका अन युरोपा मध्ये गरोदर स्त्रियांना दिले जाणारे एक औषध कि ज्याचे नाव Thalidomide http://en.wikipedia.org/wiki/Thalidomide होते, त्या चे असे डावे अन उजवे असे दोन प्रकार होते. परंतु ते विकताना डावे अन उजवे अश्या मिस्त्र स्वरुपात विकले जाई. अन त्या perticular औषधाचे आपल्या शरीरामधील रसायनांमुळे डाव्या चे उजव्यात वा vice versa रुपांतर होणे खुप शक्य असते, त्यामुळे ते वेगळे करता येत नाहीत. तर ह्या औषधाने गरोदर स्त्रियांच्या morning sickness वर इलाज केला जाई. पण जेंव्हा हे औषध दिले गेलेल्या स्त्रिया अधु अपंग अन विकृत बाळांना जन्म देउ लागल्या, तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला. एकुण १०,००० अधु अपंग बाळं जन्माला आली. अन कित्येक हजार जन्मण्यापुर्वी च जग सोडुण गेली.

त्या नंतर ही मेडिकल क्षेत्रात अशी अनेक औषधे आली कि जी डावे अन उजवे ह्या दोन प्रकारात असल्याने, पेशंट ना त्रास झाला. उदा. सेलाडेन नावाच्या antihistamine ड्रग ने काही पेशंट ना heart disease झाल अन ते प्राण गमावुण बसले.

ह्यामुळे जगभरातील drug administrations नी अश्या डावे अन उजवे असणार्‍या औषधांच्या दोन्ही रुपातील biological activity तपासण्याचे बंधन कंपन्यांवर टाकले, के जेणे करुण आपल्याला फ़क्त उपयुक्त असणारा च molecule बाजारात विकला जाईल. सध्या पुर्ण बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपैकी ३० टक्के हे अश्या फ़क्त एकाच प्रकारच्या molecules असतात. अन बाकी च्यांचे दोन्ही पण प्रकारातील biological acticity माहीती असते.

असे एका च प्रकारचे म्हंजे डावे वा उजवे molecule बनवणे हे कष्टप्रद असते! ते अनेक प्रकारे साध्य केले जाउ शकते.
१) नैसर्गिक रित्या उपलब्ध डाव्या वा उजव्या molecule पासुण आपल्याला हवा तो औषधी molecule मिळवणे.
२) डाव्या अन उजव्या च्या मिश्रणातुण ते वेग वेग ळे करणे...... हे जिकरीचे असते.
२) अशी एक methodology बनवणे कि जिथे एक symmetrical precursor पासुण फ़क्त डावा वा फ़क्त उजवा असा molecule बनवणे........ मी ह्या तीसर्‍या भागात काम करतो.!

तर जो molecule symmetrical आहे, ( म्हंजे अस कि त्यावर विषिष्ठ रासायनिक प्रक्रिया केली असता तो फ़क्ट डावा अथवा फ़क्त उजवा molecule देउ शकेल ) त्यापासुण सुरुवात करुण फ़क्त डावा वा उजवा molecule मिळवणे! ह्याला asymmetric synthesis or chiral synthesis असे म्हणतात. ह्यात अनेक प्रकार आहेत. ते इथे वेळेअभावी अन मराठी भाषांतर करण्या च्या माझ्या कुवती अभावी देउ शकत नाही.

महत्वाचे... डाॅक्टर ( म्हंजे मी नव्हे, तर खरे खुरे सुया देणारे डाॅक्टर ) जेंव्हा सांगतात कि हे औषध dark and cold place ला ठेवा त्यामागे एक अर्थ असतो. कारण डावे अन उजवे molecules तापमान अन ओलावा ह्यामुळे एका form मधुण दुसर्‍या form मध्ये बदलले जावु शकतात. अन जर दुसरा form जर विषारी असेल त त्या औषधाचे side effects भयंकर असतात. ह्यामुळे हल्ली मेडिकल दुकाणाला A/c सक्तीचे केले आहे!

विनंती : ह्या बाबत मेडिकल क्षेत्रातील लोक जास्त चांगली माहीती देउ शकतील. तसेच scientific terminology एंग्रजीतुन मराथीत रुपांतरीत करणे मला फ़ारसे शक्य नाही, कारण मराठी प्रतीरुपे च माहीती वा अस्तित्वात नाहीत. तेंव्हा अपुर्ण माहीतीबद्द्ल दिलगीर आहे.

एखाद्या ला जर जास्तीची माहीती हवी असेल वा काही प्रश्न असतील तर ते इथे वा मला मेल करुण विचारु शकता. वेळ असेल तसे उतार देईल.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Archive through July 01, 2005
Archive through September 16, 2005
Archive through March 16, 2006
Owner champak Type HTG0001 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators