Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
kedarjoshi
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » kedarjoshi « Previous Next »

मी ICICI च्या Value analysis ला थोडे पुढे नेऊन दरवेळी कशावर रिसर्च करायचा ते ठरवतो. ती फाईल ईथे upload केली आहे. दरवेळी LTP चेंज केल्यावर साधारण estimates मिळु शकतात. यात १०० कंपन्या बंद्दल माहीती आहे. प्राथमीक अंदाजावरुन जर कंपनी गुंतवनुकीला चांगली वाटली तर पुढचा रिसर्च करायला मदत होऊ शकेल.

application/vnd.ms-excel
Value from Multex Estimate.xls (44.5 k)
application/vnd.ms-excel
Value from Multex Estimate_2.xls (20.0 k)
India Inc

फेब महीन्यात लोकांना Valantine Day चे वेध लागतात पण मला लागतात बजेटचे वेध. ICWA करताना आम्हा मित्रात एक compitition असायची की या वर्षी कुठला tax वाढेल वा कमी होईल. 80 L, 80 CCB अशा भयानक भाषेत आम्ही एकमेकांशी बोलायचो. वाटायचे की फार तिर मारलेत. गेले ते दिन गेले. हातातून पेन सुटले नी कि बोर्ड आला. ( नाही मी म्हातारा नाही गेले ते दिन गेले म्हणायला) पण Management accounting सुटले ते सुटलेच.

थोड्याच दिवसात बजेट येईल. परत एकदा ४ दिवस लोक बोलतील व विसरुन जातील. खरच काय होईल या वेळेस. India Inc ही टर्म आता ग्लोबल झाली आहे. भारतात काय होत यावरुन Nasdq वर किंवा खाली जातो. (हे जरा जास्त आहे, I Know ) पण म्हणायचा मुद्दा हा की India is crucial part of global economy.

wheel will come to complete stop in few years ई.स. १७ - १८ ०० मध्ये जगात पावरफुल असनार्या दोन इकानॉम्या होत्या. एका चिन, दुसरा भारत.

चिन शिवाय आज US चे पान हालत नाही. १९७५ नंतर चिन मध्ये ज बदल झाले त्याची फळ त्यांना मिळाली.

भारता साठी १९९१ उजाडाय्ची वाट पाहावी लागली. पण त्याची फळे आज आपण पाहात आहोत. ते रिपीट करन्याचा माझा मुळीच उद्देश नाही. पन they say history repeats itself .

बजेट पुर्वी आपण २००८ च्या आसपास कुठे असु (सोबत जग) देखील कुठे असेल. हे मला मांडावे वाटले.

येत्या मार्च महीन्यात कंपन्याचे वार्षीक निकाल जाहीर होतील. Year On year growth ह्या वर्शी ४० टक्क्याची आहे. ( based on 9 months results . गेल्या वर्शी ती २२ ते २५ टक्के होती. (गेल्या वर्षी India Inc 8 टक्क्यानी वाढली. ह्या वर्षी देखील तिच परिस्थीती राहानार आहे.

जागतीक ईकॉनॉमीत कमोडीटी प्राईजेस कमी झाल्या आहेत त्याचा परिनाम भारतावर होनारच. रिलायन्स, च्या नफ्यात त्याचा फरक दिसेल.

हाउसिंग - कंस्ट्र्क्शन. - गोल्डमेन सचेस हे असे इस्टीमेट करत आहेत की या वर्षी लोन ईंडस्टी ही २० टक्क्याने ग्रो होईल. (त्याचा परिनाम म्हणजे banks चे स्टॉक वाढतील. पुणे, बेंगलोर, दिल्ली, हैद्राबाद हे जरी ड्रिम लोकेशन्स असतील तरी ईतर ही मोठ्या शहरात घर घेने वाढेल. गेल्या वर्षी लार्सर्न टुब्रो, गुजरात अंबुजा अशा कंपन्याचा नफ्यात भरगोस वाढ झाली. गुजरात ज्या न्फ्यात तर १५५ टक्क्याने वाढ झाली. या वर्षी देखील तसेच टारगेट आहेत.
घर घेन्यामुळे जी बुस्ट मिळाली तिला खिळ घालन्याचा प्रयत्न RBI सात्यत्याने करत आहे. कालच एकाठिकानी वाचले की परत CRR 2 टक्क्यने वाढनार. कदाचीत या बजेट मध्ये काही लेव्हीज वा टक्सेस वाढायची शक्यता नाकारत येत नाहे. पण २००८ हे वर्ष देखील housing year असेल यात वाद नाही.


Capital goods मध्ये BHEL, L&T सारख्या मोठ्या कंपन्या कडे कधी न्हवे ते backlog आहेत. प्रंच्ड मोठ्या प्रमानावर ऑर्डर्स असल्यामुळे २००८ हे वर्ष फायद्याचे ठरनार.

Auto: पुढील दोन वर्ष हे Auto ind चे असायला हरकत नाही. खुप पैसा, वाढलेल्या गरजा यामुळे चारचाकी हे स्वप्न न राहाता गरज बनली आहे. M&M, Maruti, Tata Motors, Bajaj Auto हे गेल्या वर्षी पेक्षा जास्त नफा या वर्षी कमावतील असा माझा अंदाज आहे.मारुती नेहमी कार च्या किमती कमी करते या वेळेस वाढविल्या आहेत या वरुन अंदाज येईल. गेल्या वर्षी स्मॉल कार्स वरची excise duty २४ वरुन १६ वर आनली या वेळेस कदाचित लार्ज कार्स, ट्र्क्स वैगरे पण १६ वर येतील. read sales boost

IT sector बद्दल मी लिहायलाच नको. परत एकदा फाय्दा होनार्च. TCS, INFY, Satyam, Wipro हे परत एकदा big daddy राहतील.

फार्म गुडस भारतीय शेती मान्सुन वर आधारित असल्यामुळे यावर मला जास्त काही लिहीता येनार नाही.

परकिय चलन व गंगाजळी hold your breath भारत जगातील २० श्रींमत देशात गणला जाउ लागला आहे. परकिय चलनाचा भरपुर साठा असल्यामुळे अनेक बाबी आपोआप साध्य होतील.

India Inc कडे आता दुर्लक्ष करता येनार नाही असे २००० मध्ये अटलजीनी व यशंवत सिन्हा नी म्हटले होते. ते प्रत्यक्षात आले आहे.बर्याच कंपन्या आपला manufactring
base पण भारतात आणायला तयार आहेत. sweden & UK ला भारतीय मेक ची टाटा ईंडीका एक्सपोर्ट केली जानार आहे.

Hindalco नावाची आणखी एक कंपनी एका परकिय कंपनीला $ 6 B cash मध्ये देउन विकत घेत आहे. टाटानी एक स्टिल कंपनी विकत घेतली. भारत फोर्ज ही जगातील (हो) नं एक ची फोर्जींग कंपनी आहे. ह्या तिन्ही उदा वरुन दिसुन येईल की फक्त IT तच आपण पुढे नाही तर manufacturing मध्ये पण पुढे जात आहोत.

मा. प्रधानमंत्री व अर्थमंत्री हे कदाचित परत एकदा ८ ते ९ टक्क्याची घोषना करतील अशी आशा वाटत आहे.

all in all हे वर्ष पण भारतीय शेअर बाजारा साठी चांगलेच असनार ही पण आशा करु या व एक समृध्द भारत निर्मान करन्यास आपला खारीचा वाटा देऊ या.

DOW ५२७ पॉईंटस्नी पडला आहे (लिही पर्यंत व अजुनही जोरात नोझ डाईव्ह घेत आहे. A 9 percent slide in Chinese stocks. Is that the reason?)

उद्या भारतात बजेट सादर होईल. काल भारतीय शेअर मार्केट साठी परत एक वाईट दिवस होता. ९ फेब पासुन १२०० + पॉईंटस्नी मार्केट पडले आहे. उद्या काय होईल?
बजेट ०७

काय झाले या बजेट मध्ये? चांगले की वाईट? सुधारणा की पोलीटिकल स्पिच?

प्रत्येकजन आपाआपल्या प्रमाने अंदाज काढतो. माझ्या मते हे बजेट न्युट्रल होते. FM नी जास्त जोखीम उचलली नाही. सर्वाना खुष ही केले नाही कोणी रागवले ही नाही.

गेल्या वर्षी पेक्षा ढळक जानवनारी गोष्ट म्हणजे आपली मन्युफॅक्चरींग ग्रोथ ही ८.७ टक्या वरुन ११.३ टक्के झाली आहे. ( जे लोक अस म्हणतात की भारतीय शेअर बाजार फक्त आय टी वर अवलंबुन आहे व तो कधी ही कोसळेल, त्यांनी वरिल वाक्याची नोंद घ्यावी. सर्व उत्पादन करनार्या कंपन्या ह्या फायद्यात आहेत, ते देखील अमेरिके सारखी IT मध्ये गुंतवनुक न करता. )

बजेट मधील काही ठ्ळक मुद्दे मी मांडनार आहे. (माहीती साठी तुम्ही मायाजालात शोध करु शकाल हे मनात ठेवून).


१. गहु व तांदळावर सट्टेबाज सट्ट करु शकनार नाहीत. त्यामुळे ह्या दोन्ही वरचे भाव नियत्रंना असतील.
२. ४००० करोड रु हे ग्रामीन भागातील रस्त्यांसाठी राखीव.
३. स्त्री वर्गा साठी आता आयकर लिमीट ही १४५००० असेन.
४. फॉरेक्स रिझर्व हे सध्या १८० बिलीयन डॉलर्स आहेत.
५. ईफ्लेशन टारगेट हे ५.२ टक्के ते ५.४ टक्के असेन.
६. टेक्नॉलॉजी संबधीत वस्तु जसे Flat screen tv, AC, Laptop, Digital Camera, DVD, Ipod ई स्वस्त होईल.
७. आय टी कंपन्यासाठी MAT नावाचा नविन टॅक्स.
८. सिमेंट कंपन्यांसाठी २ प्रकारची ईक्साईज ड्युटी. - ve गोष्ट.
९. HIV शिक्षणावर भर.
१०. India या व्याखेत बदल.
११.व्यवसाइक सेंवा वर १० टक्के TDS
१२. टुरीझम वाढविन्या साठी तेथे उभारलेल्या स्व्वंवान्ना (हॉटेल वैगरे) ५ वर्षांसाठेई करमुक्ती.
१३. मेडीकल ईव्कीपमेंटस मध्ये ७ टक्यांनी कपात.
१४. ईसॉप वर कर.
१५. डिवीडंड वरील करात वाढ.
१६ मागे मी Auto Ind साठी ED 16 वर आणतील असा अंदाज वर्तविला पण बहुतेक तो FM ला मान्य नाही. auto ind जैसे थे.

असे अनेक मुद्दे आहेत पण मला जे महत्वाचे वाटले ते मी लिहीले. all in all न्युट्रल बजेट.

आता थोडे मार्केट कडे वळुयात.

फेब मधील १४७२३ या उच्चांका वरुन आत परत १२९३८. जवळपास १८०० पॉईंटस्ने करेक्शन झाले आहे. काल जे करेश्कन झाले त्यात (भारतात) चायनाचा हात नाही तर भारतीय गुंतवनुकदारानी बजेट वर दाखविलेली नाराजी आहे. या करेक्शन मुळे अनेक भाग जे महाग झाले होते ते परत एकदा घेऊ शकतो. ही खालील काही भाग घेन्यासाठी सुवर्नसंधी आहे.
टिसीयस, ईन्फी, रोल्टा, लार्सन एन्ड टुब्रो, लक्ष्मी मेटल, सेल ई.
शिवाय ईंडेक्श बेसड फंड मध्ये पैसे गुंतविने योग्य ठरेल. बाजार काही दिवस तरी sideways मध्ये ट्रेड करेल.
FMCG हे सेक्टरच मुळी equal wait वा under performer आहे. ( compare with other like Auto / infra etc). पण तरीही त्यातील काही चांगल्या कंपन्या ज्यात फायदा नक्की आहे.

डाबर -
मार्च मधील निकालानुसार गेल्यावर्षी पेक्षा साधारण ३३ टक्के विक्रीत वाढ तर ३० टक्यांनी नफ्यात वाढ आहे. P&L पाहाताना असे लक्षात येते की व्याज आता काहीही उरले नाही व interest cover ratio हा ४२ आहे. म्हनजे कंपनीची स्तिथी अत्युत्तम आहे. FY07 व FY08 ला साधारण ३.९ व ४.६ असा EPS प्रीडीक्ट केला आहे. म्हण्जे येत्या दोन्ही वर्षात कंपनीला मोठा नफा अपेक्षीत आहे.

५२ आठवडे लो - ९६.१०
५२ आठवडे हाय - ११९
आजची किंमत - १००

सध्याच्या १०० रु किमतीला हा समभाग पुढील वर्षीच्या नफ्याच्या फक्त २६ वेळेने (टाईम्स) ट्रेड करत आहे. आजचा p/e जर ३५ धरला तर हा समभाग १० p/e ने स्वस्त भेटत आहे.

MACD chart पण बाय रिकमंड करत आहे. व्हॉल्युम वर जात आहे. हा समभाग घेतल्यावर पुढील वर्षी फायदा नक्की होनार.


टाटा टी -

मी लिहायला घेतले तेव्हा हा ८७० ला होता (काल), हे पोस्ट करताना तो आता ९२३ झाला आहे. पण अजुनही तो साधारण ७ ते ८ टक्के वर जाउ शकतो कारण पुढील वर्षीच्या EPS वर तो ट्रेड करत आहे व तो ५३ आहे. अजुनही यात वर जान्याची शक्ती आहे.

Procter & Gamble


५२ आठवडे लो - ६२७.६०
५२ आठवडे हाय - १००५
आजची किंमत - ७८३
फंडामेन्टली खुप स्ट्रॉंग कंपनी.

३० जुन ला वर्ष अखेर आहे. गेल्या तिमाही निकालात मागील तिमाही निकाला पेक्षा जास्त नफा व विक्री झाली. तो ट्रेंन्ड कायम राहीला तर नक्कीच जुलै महीन्यात फायदा होऊ शकतो. दोन तिन दिवस वाट पाहुन जर ७५० च्या आसपास आला तर नक्की घ्यावा. बरीच अपसाईड उरली आहे. नक्की फायदा होईल. पण त्या साठी एकहाद्या मोठ्या ट्रेडर चे लक्ष जायला हवे कारण निग्लीजीबल व्हॉलुम ने हा शेअर ट्रेड करत आहे. ज्या दिवशी व्हॉलुम बुस्ट मिळेल त्या दिवशी नकीच ८५० क्रॉस होनार.
डॉलर विरुध्द रुपया.

सध्या रुपया ला चांगले दिवस आले आहेत, हे तसे ईकॉनॉमी सुधारल्याचे लक्षन आहे. पण देशाची अर्थव्यवस्था खरच सुधारली आहे की रुपायाची सध्याची वाढ ही तात्पुरती आहे हा प्रश्न बहुतेकांना आहे.

पण माझ्या मित्रांना वेगळाच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे १ डॉलर ला जिथे ३ वर्षापुर्वी ४८ रु, २ वर्षापुर्वी ४४ रु तिथे आज ४० रु म्हणजे त्यांची बाहेरील देशातील नेटवर्थ, भारतीय रुपयात कन्वर्ट करताना कमी होत आहे.

रुपयाचा जोरदार वाढीमुळे मोठ्या कंपन्याच्या निव्वळ नफ्यात घट होत आहे. जेव्हा रु. ४० ला पहिलेंदा टच झाला त्या दिवशी ईन्फोसीस व टिसीऐस च्या समभागात जोरदार घट झाली. त्यांचा LRP - Long range planning ला जोरदार फटका मिळाला त्यामुळे पुढील वर्षीच्या अंदाजीत नफ्यात त्यांना घट दाखवावी लागली.

मग नक्की काय होनार? रु. आणखी वाढनारा की कमी होनार? डॉलर च का? पॉन्ड मध्ये का फरक होत नाहीये? अशा स्तिथीचा नेमका फायदा कोणाला? बिलीव्ह ईट ऑर नॉट हा फायदा सर्वात जास्त परकिय गुंतवनुक कंपन्यांना होत आहे तो कसा?

परदेशी बन्का आंतरराष्ट्रीय बाजारातुन ५.५ टक्के दराने डॉलर्स उचलतात त्या लगेच भारतात रु. मध्ये बदलबुन भारतातील वित्तीय कंपन्याना कमी मुदतीसाठी १४ ते १५ टक्के दराने कर्जाने देतात. कमीशन वजा जाता ह्या व्यवहारात त्यांना निव्वळ फायदा हा ९ ते १० टक्क्याने होतो. अशा व्यवहारा मुळे सध्या भारतीय बाजारात डॉलर च्या मागनीपेक्षा पुरवठा जास्त आहे, त्यामुले डॉलर ला जास्ट भाव नाही. ( हे अनेक कांरणापैकी एक, जागतीक तेल बाजारात डॉलार पेक्षा युरोला आलेले महत्व, ईराक वॉर, अमेरीकेत ८ ट्रिलीयन वित्तीय तुट ही बाकीची कारन),
तर ह्या परिस्थीत फायदा अभारतीय कंपन्यांनाच. RBI मग काय करते? हा प्रश्न येतो, तर सध्या तरी आपल्याला ( RBI ) महागाई दर नियंत्रनात ठेवायचाय. त्यामुळे सहज मिळनारे डॉलर RBI विकत घेऊ शकत नाही कारण डॉलर जर विकत घेतले तर भारतात उपलब्ध असनार्या रुपयांमध्ये वाढ होईल व परत त्याचा परीनाम अर्थव्यवस्थेवर उलटा होईल म्हणुन तिथे काही करता येत नाही. मध्ये अफवा होती की CRR ५ टक्यानी वाढेल तसा तो RBI ने वाढविला नाही कारण मग त्याचा परीनाम रुपी व्हल्यु अजुन वाढली असती व परदेशी कंपन्यांनी अजुन फायदा करुन घेतला असता.

अमेरीकेत वॉरन बफेट सारख्या मोठ्या गुंतवनुकदाराने २००६ च्या शेवटी त्याचे १ बिलीयन डॉलर्स हे डॉलर पडावेत म्हणुन लावले. ( options money market ) तो देखील डॉलर पडेल म्हणतोय. बिल गेटस एका व्याख्यानात म्हणला की by good ol' $.

जर खरच येत्या दोन वर्षात डॉलर पडला तर मग गार्टनर ने जे भारता विषयी लिहीले ते खरे होऊ शकते. त्यांनी २००३ मध्ये लिहीले होते की २०१५ पर्यंत भारतीय लेबर व अमेरिकन लेबर ह्या आज जो फरक आहे तो राहानार नाही. आपन तिथे जाऊ की नाही हे माहीत नाही पण घसरनारा डॉलर व चढनारा रुपाया पाहीला की मी मात्र खुश होतो.
NTPC Option call tip .

मी आज माझा आवडता शेअर NTPC ची कुंडली घेऊन बसलो होतो. येत्या तिन महीन्याचे ऑपश्न कोट बघीतल्यावर मला एक युक्ती ( की स्ट्रटेजी) सुचली.

आजचा NTPC चा भाव १५०.८०
option call detials OPT-NTPC-30-Aug-2007-135-CA
Option price ( In Rupees) 10 ( which is my imaginary figure as no quote is preseent and you can put this as limit option price in buy order)
Strike Price (In Rupees) 135 ( for 30 aug.)
Volatility (% per annum) 1.24
Stock price (In Rupees) 150.80
Dividend (% per annum) 25
Interest Rate (% per annum) 12
Duration left 75 Days (from today ie Saturday)
Option Type Call
Exercise Type American

There are the key retios
Delta: 1
Gamma: 0
Theta: 0
Vega: 0


ह्या ग्रीक कडे लक्ष दिल्यावर माझे डोळेच चमकले. बघा डेल्टा (१ आहे). हा ऑप्शन DITM म्हणजे Deep in the money आहे कारण आज्ची किमंत १५० आहे व आपन ऑगस्ट च्या शेवटी १३५ रु ने विकत घेउ असे ठरवत आहोत.

आता जरा math करुयात.
आचजी किमंत १५०
स्ट्राईक प्राईज १३५ आधीक आपण ऑफ्श्न घ्यायची किमंत १० रु म्हणजे आपला ब्रेक ईव्हन हा १४५ असेल (अजुन १० ही किमंत नक्की नाही ती ४ वा ७ वा १२) ही असु शकते. पण मी लिमीत मध्ये १० ठेवल्यामुळे ईथे ही १०)

जर ऑगस्ट ३० ला NTPC १४५ रु च्या वर असेल तर जेवढा वर असेल तेवढा फायद. ( म्हण्जे समजा आजच्याच किमतीला राहीला तर ५ रु प्रती शेअर फायदा), शिवाय डेल्टा १ अस्ल्यामुळे जी मुव्ह्मेंट underlying security मध्ये होईल तेवढीच वा त्या पेक्षा जास्त option मध्ये होईल म्हन्ज़े (१६२५ X ( त्या दिवशीची किमंत वजा १४५), म्हण्जे अपसाईड अनन्लिमीटेड.
जर शेअर तिथे गेला नाही वा १४५ च्या खली राहीला तर जास्तीत जास्त नुकसान ने ( १६२५ १०) होईल.

शिवाय मध्येच (३० ऑगस्ट पर्यंत) तो विकता ही यु शकेल. जर तो १५० ला राहील्ल तरी ५० टक्के फायदा).
Worth trying
कालचा दिवस (१८ ज़ुन) कदाचित एक महत्वाचा दिवस ठरु शकेल. कारन काल सर्व ईतर ईंडेक्स पडलेले असताना ( देशातील जसे auto, bank etc) BSE मात्र वर गेला. बहुतेक चर्नीग सुरु झाले आहे. जर हे खरे चर्नींग असे तर BSE ७ ते ८ टक्याने पडु शकतो.

ऊद्या लक्ष ठेवावे लागेल, तसे कदाचित नसावे पण. कारन चर्नीग किमान ३ ते ४ दिवस टिकले तर BSE पडु शकतो.

But then this will gr8 opp. for short selling .
12 July 2007
The rupee climbed towards a nine-year high on Thursday, but suspected RBI intervention and dollar buying by oil refiners halted its ascent, traders said.

At 10:25 am (0455 GMT), the partially convertible rupee was at 40.36/37 per dollar - near a nine-year peak of 40.28 it hit in May. It closed on Wednesday at 40.40/41. "There was some decent (dollar) buying by state-run banks around 40.36 and it may be on behalf of the RBI.
-------------------------------
Can't wait to see at 35 level. Is it even possibale? when?
आज मार्केट पडत आहे त्यामुळे मी आनंदात आहे. विचीत्र वाटतय नं, पण हो. bulls make money, bears make money pigs get slaughtered .

परवा ५००+ पॉईंटस नी मार्केट पडले, काल परत ३५०+ नी वर आज सुरुवातीला ५०० नी निगेटिव्ह व आता थोडे रिकव्हर होत आहे.

गेल्या महीन्यातील सर्व मोठ्या कंपन्यांच्या रिझल्टस मुळे बाजार एकदम तेजीत होता. नवशिखे लोक ५२ विक हाय वर विकत घेत होते. जुलै च्या शेवटच्या गुरुवार नंतर म्हणल आता शॉर्टींग करायला हरकत नाही. माझ्याकडे चार मोठ्या शॉर्ट पोझीशन्स होत्या. एकदम निगेटिव्ह मोड मध्ये, माझे सर्व शॉर्टस क्लिअर करन्यासाठी मला अशाच एका मोठ्या फॉल ची आवशक्ता होती आज सर्व शॉर्ट्स स्वेकर केले व निफ्टीला ४४०० ची पोझीशन घेतली आहे. निफ्टी ४४०० काल १८५ ला मिळत होते आता १०४ ला मिळत आहे. येत्या ८ ते १० दिवसात परत बाजार वर जानारच तेव्हा त्याचा फायदा होईल.(वाचकांसाठी टिप.)
Another biggest fall yesterday. BSE -646 , Nifty down by 194.

माझ्या सुदैवाने काल परत मी मार्केट पडनार म्हणून तयारी करुनच बसलो होतो पण ईतके पडेल असे वाटले नाही. २०० पर्यंतचा अंदाज होता. किल्यात पडझड झाली पण ती लवकरच भरुन निघेल. उलट काल मी गेल्या २ महीन्यातील सर्वात मोठी खरेदी केली. (-६४६ बापरे). निफ्टी ४३०० कडे झुकत होते व BSE ला १४८०० चा सर्पोट मला वाटत होता. सर्व लोकांची सर्व गणित BNP Paribas मुळे कोसळली. आज परत काय होईल याकडे लक्ष ठेवावे लागेल. Japan, US ने पॉझीटिव्ह गाईडंन्स दिला तर उद्या भारत परत वर जाईल.

२००८ ज़ुन टारगेट BSE 16500 असे अर्नींग्स वरुन वाटत आहे त्यामुळे प्रत्येक डिप रेड डे म्हणजे एक पर्वनी समजुन खरेदी करायला हरकत नसावी.
L&T - about to cross 52 week high in coming days. ( upside break)

http://finance.yahoo.com/charts#chart14:symbol=500510.bo;range=3m;indicator=dividend+sma+bollinger+rsi+volumema+macd;charttype=candlestick;crosshair=on;logscale=on;source=undefined
BNP Paribas ची कमाल.

एका महीन्यापुर्वी बिएन्पी पारीबा ने त्यांना २ बिलीयन डॉलर्स चा हिशोब लागत नसल्याचे जाहीर केले अन सार्या जगात Credit Crunch Crisis चे वारे वाहु लागले. खर तर bnp ने पहीले जाहीर केले इतकेच. त्यांनी जाहीर करन्याची कोंडी फोडली की सर्व जगातल्या अनेक banks ने लिक्वीडीटी प्रॉब्लेमस असल्याचे जाहीर करायला सुरु केले अन त्यामुळे त्याचा परिनाम सर्व जगातील शेअर मार्केटस वर व्ह्यायला सुरु झाला. भारतही त्याला अपवाद कसा असेल? कारण अनेक बिलीयन डॉलर्स ची उलाढाल FII करत असतात त्यांनाही तो प्रॉब्लेम जानवु लागला व त्यांनी मार्केट पाडायला ( पक्षी त्यांचा क्डे असलेले शेअर्स विकायला) सुरु केले. त्यामुळे आपण परत एकदा ऑगस्ट च्या मध्यावर १४००० कडे आलो.
सर्वजन परत एकदा रोज शेअर मार्केट वर बोलायला लागले. ( तस ही आपल्या क्डे पुल नी सांगीतल्या प्रमाने टक्सी वाले मत देत असतात) त्यामुळे अनेक पंडीत रोज सांगु लागले की शेअर बाजार परत एकदा १२००० कडे जानार, हे विका ते विकु नका वैगरे जाहीराती परत एकदा चालु झाल्या. सर्वच बाजारातुन बाहेर पडन्याची घडपड करु लागले.

अचानक सप्टेबर मध्ये US gov ने रेट कट केले. त्यांना करावे लागले. बाजारासाठी ही बातमी आनंददायी ठरली व सर्व जगातील indexes नव्या उंची कडे झेपावु लागले. गेल्या आठवड्यात DOW ने परत तिन महीन्यापुर्वीचा उच्चांक गाठला.
भारत यात पिछाडीवर राहीला तर नवल. आपण ही आधी १५००० नंतर १६००० व आता १८००० कडे धावु लागलो. ही किमया फक्त दिड महीन्यात. या सर्वात रिलायन्स पक आघाडीवर आहे. रोज एका रिलायन्स कंपनी च्या बाजारभावात २० - २० टक्याने वाढ होत आहे. (बहुतेक रिलायन्स ने युवराज अन धोनी ला हायर केले वाटते). जर रिलायन्स १८०० वर गृहीत धरला (आज २२५०) तर मार्केट परत १६००० कडे जाईल. काही analysis करायचा आधीच चढ उतार होत आहेत. अशा मार्केट मध्ये कुठल्याही ब्रोकरच्या सुचनांकडे पाहाने धोकादायक ठरेल. (जो पर्यंत तेजी आहे तो पर्यंत काही वाटनार नाही पण ही तेजी रोज चालु राहानार नाही).
असे काय झाले की एका महीन्यात valuation बदलले. काहीही नाही. काही मोठ्या कंपन्या जसे LNT, BHEL, Reliance पुढील तिमाहीत मोठा नफा दाखवनार यात वाद नाही पण p/e ratio २००९ च्या अर्नींग कडे जात आहे त्यामुळे जर मार्केट पडले तर खुप तोटा होउ शकेल. माझ्यामते तरी १६५०० ला चांगला सपोर्ट आहे. एक मोठे करेकश्न ड्यु आहे व येत्या काही दिवसात ते होइल.
मी सध्या दोन्ही बाजुने खेळत आहे. माझ्या काही F&O strategies
Nifty Nov Call 5250 - sale around 180+ , purchase again for 150 or less. Extreme bearish strategy - which paid of hadsome money to me in recent days. Range for last 3 days 90 to 192.
Buy- Nifty 5350 call for insurance.
Rel petro - Sale oct call of 160 , buy when Relpetro comes to 154-155
rel petro - buy 170 call for insurance
Rel cap Futures - sale Oct or Nov 1800, buy again around 1760

हे काही सध्या साठी फॉर्मुले देतो. माझ्या साठी हे चालले पण यात खुप मोठी रिस्क आहे त्यामुळे रिस्क घेन्याची तयारी असेल तर्च पुढे जा (ता का मी आज ते येता नोव्हे यात मार्केट पडेल अशा गृहीतावर हे सर्व दिले आहे).
बाजार पडेल काय? नक्की सांगता येत नाही पण मी जर फंड manager असेल तर मी नफा बुक करनारच त्यामुळे येत्या काही दिवसात सेल लागनार आहे असे वाटते.
जर मार्केट पडले तर तुम्ही काय करनार. त्या दिवशी बाजारातुन, आइ वडीलाकंडुन वा मित्रा कडुन जितके पैसे उभे करता येतील तितके करा व खरेदी करायला सुरु करा. ( गेला मे, यावेळचा ऑगस्ट या दोन्ही वेळेस मी योग्य ते स्टॉक मार्केट पडल्यावर लगेच खरेदी करायला सुरु केले त्याचा फायदा झाला तसाच तो तुम्हालाही होअओ कारण पुढील वर्षी आपण २०००० क्रॉस करनार आहोत.
मार्केट पडल्यावर खरेदी करायचे काही शेअर्स.
Reliance, Rel Energy, Rel petro, Rel Capital, Rel Comm, Bhel, LNT, M&M, Escorts, Tata Steel, SAIL, NTPC, SBI, ICICI, India Cements, Suzlon
शेअर्स वाचताना लक्षात आले असेलच की infra, banks v power हे सेक्टर out perform करनार आहेत. मागे मी LNT,BHEL, Relcap va Sail बद्दल लिहीले होते. आज त्यांचे रीटर्न्स ११० टक्या पेक्षा जास्त आहेत.
मिडीया स्टॉक्स

पीव्हीआर

गेल्या काही तिमाही पासुन ही कंपनी प्रत्येक तिमाहीत जास्त नफा नोंदवत आहे. शिवाय ऑपरेटींग प्रॉफीट मार्जीन पण सुधारत चालले आहे यावरुन कंपनीचे व्यवस्थापण चांगले आहे असे वाटते. येत्या काही महीन्यात आणखी काही मल्टीपेल्क्स निर्मान केले जानार आहेत. नेट प्रॉफीट मार्जीन जरी पुर्ण वर्षासाठी कमी असले तरी नेट रेशोज ( करन्ट, क्क्विक वैगरे) खुप चांगले असल्यामुळे कंपनी चांगली आहे असे वाटते. मार्च २००८ च्या अर्नींग्ज्स ला साधारन २१% वर ति प्ले करत आहे. ट्रेंड पाहीला तर तर ३० पर्यंत जायला हरकत नाही. येत्या काही महीन्यात ६० ते ७० रु चा फायदा होऊ शकतो.
( कॉशन - या कंपनीचे रेग्युलर ट्रेड्स कमी होतात).

सन टिव्ही

गेल्या एक वर्ष भराची मुव्हमेंट पाहाता सन टिव्ही सेंसेन्स सोबत मुव्ह होत नाही. बॅलेन्स शिट रेशोज पाहाता कंपनीकडे भरपुर कॅश आहे असे दिसुन येते. ऑपरेटींग प्रॉफीट मार्जीन पण खुप चांगले आहे. सध्या हा पण २० टक्यांवर ट्रेड करत आहे व ंआCड सिग्नल सध्या सेल दाखवत वर जात आहे त्यामुळे कदाचीत अपवर्ड ब्रेक झाला तर त्याचा फायदा होउ शकतो. पण सध्या साठी स्टेटस को म्हणजे घेतला नाही तरी चालेल. ( वा अगदीच घ्यायचा असेल तर १० टक्के घेउन एखाद्या पॉझीटिव्ह मुव्हमेंटची वाट बघावी व नंतरच पुढची खरेदी करावी.

डिश टिव्ही अजुनही ही कन्स्पेंट भारताचा फक्त काही भागात आहे त्यामुळे साहजीकच खर्च जास्त व इनकम कमी असनार. (निदान पुढील २-३ वर्षे) अजुन काही अपसाइड वाटत नाही. ऑफकोर्स जर डिश ने काही चांगले डिल दिले तर लोक डिश कडे जाउ शकतील व इनकम मध्ये वाढ होइल. पण आश्चर्याची गोष्ट की गेल्या काही महीन्यात डिश वर अनेक ब्लॉक डिल्स झाल्या आहेत. पुढच्या तिमाही पर्यंत वाट बघने योग्य राहील असे वाटते.

झी टिव्ही खर तर बेस्ट बेट आहे. साधारण ३७० चे टारगेट आहे. कंपनीचे रेशोज पण मस्त आहेत. सारेगमपा मुळे टिआरपी पण वाढला आहे. झी टिव्ही - डेफिनेट बाय
History is being written as I write here.
चालु होताना निफ्टी ५२४ अंकानी तर बीसई १५०० अंकानी पडल्यामुळे आत्ता भारतीय शेअर बाजर १ तासा साठी सस्पेन्ड केला आहे. ही ससपेन्ड करन्याची फक्त ३ री वेळ आहे. मागे जुन २००६ मध्ये ही असेच झाले होते. आज बाजार सुरु झाल्यावर जर थोडा पडला तर परत एकदा खरेदी करायला चालु करन्यास चांगला मुहुर्त आहे. गेल्या पंधरवड्यात बाजारात २००० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली त्यामुळे प्रॉफीट बुक होनारच होता. FM काय बोलतात त्यावर पुढची वाटचाल (निदान १० दिवसांची) अवलंबुन असेल असे दिसते.
लक्ष्मीपुजन मुहुर्त

शेअर बाजारा साराख्या जागेत पण मुहुर्ताचे पुजन असते. या दिवशी लोक बरीच खरेदी करत असतात. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पैशांचा काय प्लान केला आहे. साधारण आपण सोन घेतो. यावेळी मात्र सोन्या सोबत वा सोन्या पेक्षा शेअर बाजारात देखील गुंतवनुक करता आली तर पुढील वर्षी पर्यंत त्या पैशांचे काय होईल असा साधारण एक अदांज मी काढला. त्या साठी तिन सिनेरिओ तयार केले. १००००० रु जर आपण आज गुंतवले तर त्याचे किती पैसे मिळतील असा अदांज लावला.
अंदाजासाठी गृहीतक.

१. फिक्स डिपॉझीट किमान ३९० दिवस. iCICI bank ३९० दिवसांसाठी ९ टक्के व्याज देत आहे. सरकारी वा शेड्युल ब्यॉंका जास्त देतात.
२. म्युचवल फंडात गुंतवताना गेल्या वर्षीचे साधारण रिटर्न्स लक्षात घेतले. ( काही MF नी गेल्या दिवाळी पासुन आज पर्यंत ८० टक्के परतावा दिला आहे पण मी मात्र साधारण ३० ते ४० टक्के गृहीत धरत आहे. मी गृहीत धरल्या पेक्षा जास फायदा होन्याची शक्यता आहे.
३. शेअर्स. यात मी परत एकदा गेल्या वर्षी पासुन आज पर्यंत साधारन किती वाढ झाली त्याचा अर्ध्यापेक्षा कमी संख्येला गृहीत धरत आहे. ( माझ्या स्वत साठी गेल्या वर्षी ते आज पर्यंत ८७ टक्के परतावा मिळाला आहे पण यात मी अनेक रिस्क्स घेतल्या आहेत, त्यात डे ट्रेडींग, ऑप्शन्स वैगरे सर्व आहे तसेच काही शेअर्श वर मला २०० टक्के फायदा पण झाला आहे पण तो नेहमी होनार नाही).
४. बाजार हा साधारण २२००० पार पाडेल असे ग़ृहीत धरले आहे.

तर १००००० रु वर साधारण असा परतावा मिळु शकतो.



हे अगदी मॉडेस्ट रिटर्न्स आहेत. तुम्हाला मात्र जास्त परतावा नक्कीच मिळु शकतो.

दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. पुढील वर्ष सर्वांना अर्थपुर्ण जावो.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Archive through October 13, 2006
Owner kedarjoshi Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators