Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » farend » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 06, 200620 11-06-06  6:43 pm

Savyasachi
Tuesday, November 07, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milindaa, junya athavani datun alya ka re? :-)

Psg
Tuesday, November 07, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हंऽऽऽ माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. मस्त लिहिलं आहेस फ़ारेंड! :-)

Dineshvs
Tuesday, November 07, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend आपल्याकडची सगळ्यात खास गाडी म्हणजे शकुंतला एक्स्प्रेस. हे तिचे खरे नाव नाही, लाडाचे नाव.
कुणी आहे का, ईथे तिच्याबद्दल चार शब्द लिहु शकणारे ?


Farend
Tuesday, November 07, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश शकुंतला (एक्सप्रेस) माहीत नाही. रामटेक च्या बाजूला जाणारी एखादी गाडी का? (कालिदासाशी संबंध असावा म्हणून) की कोकणातील एखादी गाडी?

मी मुंबई रत्नागिरी कोकण रेल्वे झाल्यावर बर्‍याच वेळा गेलो आहे, त्यातील कोणत्या तरी गाडीचे हे नाव आहे का? पण ऐकले नाही.


Rar
Tuesday, November 07, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहीतीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे 'शकुंतला express ' ही यवतमाळ भागातून जाते. ब्रिटीशांच्या काळात यवतमाळ भागात तयार होणारा कापूस मुंबई मार्गे Manchester ला पाठवण्यासाठी हा narrow gauge track बांधला होता. ह्या गाडीला खूप छान steam engine होते म्हणे. आता काय आहे माहीत नाही!
चु.भु.द्या.घ्या.

Farend, एकदम आवडत्या topic वर लिहीले आहेस. भारतातल्या रेल्वेने मी खूप प्रचंड प्रवास केला नाहीये, पण मला एकूणच हे रेल्वे आणि त्याची engines खूप आवडतात. कधीतरी US मधल्या रेल्वेबद्दल आणि खूप उचापती करून काढलेल्या ह्या engines च्या फ़ोटोबद्दल लिहीता आलं कधी मला तर पाहते.


Dineshvs
Wednesday, November 08, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रार, तीच ती आत्तापर्यंत धावत होती ती. तिचे रुप आणि वेग याबद्दल खुप वाचले होते.

Bee
Wednesday, November 08, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, इथे खाली एक लिंक देतो आहे जी फ़क्त शकुंतला एक्सप्रेस बद्दल आहे.

तुम्हाला ह्या ट्रेनचे हे नाव कसे पडले ह्याबद्दल काही अजून माहिती आहे का?

मला एक कळत नाही, लंडन करारचा आणि आता ह्या ट्रेनचा काय संबंध. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरितून मुक्त झालो आहे. मग भारतातील सगळे पुल किंवा रुळ हे आपले आहेत. आता जी लिंक दिली आहे त्यात असे म्हंटले आहे की हा करार २००६ मधे संपून शकुंतला कायमची बंद होणार आहे.

दिनेश, तुम्ही तर यवतमाळ विदर्भ इथे कधी गेला नाहीत मग हा संदर्भ कसा काय आठवला?


http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/4041983.stm

Paragkan
Wednesday, November 08, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामटेक भागातून जाते ती बार्शी लाईट. आता ती ही बदलत आहे. माझे काका या बार्शी लाईट च्या वेगाबद्दल गमतीने म्हणत की 'आम्ही गाडी चालू असताना पहिल्या डब्यातून उतरून बाजूच्या शेतातून कणसं खुडून पुन्हा गाडीच्या शेवटच्या डब्यात चढत असू.' कदाचित खरंही असेल. बार्शी लाईटने पंढरपूरच्या यात्रच्या दिवसात प्रवास करणं हे एक दिव्य आहे. मी कधी केला नाही पण केवळ बघूनच हात जोडत असे.

Dineshvs
Wednesday, November 08, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तीच ती. याबाबत खुप मजेदार कथा वाचली होती. त्या गाडीसाठी कुणी तिकिट काढत नसे. सरळ टिसीच्या हातावर पैसे टेकवायचे आणि गाडीत चढायचे. चालत्या गाडीतुन ऊडी मारली तरी चालते वैगरे अश्या बर्‍याच गोष्टी. ती वाटेत अनेकवेळा बंदहि पडत असे. पण तरिही ती फार लोकप्रिय होती.
आपल्याकडे कुणी त्या भागातलं नाही का ?


Ameyadeshpande
Thursday, November 09, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शताब्दीच्या ऐवजी सुरू केलेल्या इंटरसिटीनी मी खूपदा मुंबई पुणे करायचो. शनिवारी सकाळी ७ ला दादरहून निघायचं की बरोबर ९.४५ ला पुणे स्टेशन. कल्याण, ठाणे, कर्जत आणि लोणावळा एवदईच थांबते ही. शिवाजीनगरलाही थांबत नाही. आणि रविवारी संध्याकाळी इंद्रायणी ६ ला पुण्याहुन गेली की ही ६.३० ला निघायची. इंद्रायणी कायमच आधीच बुक्ड असायची त्यामुळे ही छान वाटायची आणि सुसाट जायची अगदी. परवा मुंबईला जाऊन आलो तेव्हा मुद्दाम एकदा ह्यातून प्रवास केला. मला कायमच मुंबई पुणे ट्रेन प्रवास आवडतो... दर वेळी एक थ्रील जाणवतं उगाच. बसची तिकीटं हल्ली २००, २५० झालियेत. ट्रेन मात्र स्वस्ताई टिकवून आहे. (६१ रुपये)
बाकी लहानपणी मिरजेहून पुण्याला जायचं म्हणलं की कोयना फ़िक्स आमची जाता येता.
कोल्हापूरहून निघणारी कोयना मिरजेपर्यंत passenger आहे (म्हणजे passenger च तिकीट पडतं (११ रुपये)) आणि मग पुढे एक्स्प्रेस. वालचंद कॉलेज समोर विश्रामबाग म्हणून स्टेशन आहे छोटसं तिथेही थांबते २ मिनिटे ही. मिरजेहून अगदीच ५ मिनीटे पुढे. पण तिकीट मात्र २५ रुपये (एक्स्प्रेसचं ). मग आमच्या कॉलेजची कोल्हापूरची बरीच मुलं मिरजेला उतरून तिथून बसनी यायची कॉलेजला.


Ameyadeshpande
Thursday, November 09, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिरजेहूनच जायची ना बार्शी लाईट? मिरजेला narrow gauge चं एक वेगळं स्टेशन आहे. पंढरपूरला वगैरे जायची ट्रेन तिथून. बहुतेक तीच बार्शी लाईट. आम्ही नरसोबाच्या वाडीला निघालो की खूपदा सकाळी हिचं क्रॉसींग असायचं. आता माहीत नाही चालू आहे का ते.


Milindaa
Thursday, November 09, 2006 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, तू वालचंदचा का? कोणती बॅच?

Ameyadeshpande
Thursday, November 09, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२००२ ला पास झालो. १९९८ ची admission

Sashal
Wednesday, May 09, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

andy de dee dew spiderman >>>

मला ते, that's the way of the spiderman .. असं ऐकू यायचं ..

Dineshvs
Wednesday, May 09, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या मॅन लोकांचे आपण का कौतुक करायचे ? आपला हनुमॅन होताच कि. या सगळ्या मंडळींपेक्षा भन्नाट कामगिर्‍या केल्यात त्याने.

Zakasrao
Thursday, May 10, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड धमाल लिहिलयस अगदी सुरवातीपासुन वाचल आज.
स्पायडी पाहायला धमाल येते रे लॉजिक ठेव गुंडाळुन आणि बघ. शिवाय त्यानी फ़क्त त्याच्या अचात शक्तीचे प्रयोग नाही दाखवले तर सामाजिक जाणीव छान दाखवली आहे. मी अजुन ३ नाहि पाहिला पण पहिले दोन्ही पाहिलेत.


Itgirl
Tuesday, November 20, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल, नऊ मेनंतर काहीच लेखन नाही पुढे?? का बर? :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators