Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
mbhure
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » mbhure « Previous Next »

मन माझे....


सिल्वीया हल्ली चर्चमध्ये आणि मेडिटेशनला अजिबात जात नाही. तशीच ती जादुच्या प्रयोगांनाही जात नाही. आता मॅजिक शोचा ह्यात काय संबंध? तर त्याचे असे झाले....

एका शनिवार दुपारी रिनेने तिला रॉबिनकडे, रिनेच्या बॉयफ़्रेंड्कडे, पार्टीला येण्याबद्दल विचरले. आणि रविवार ऑफ असल्यमुळे सिल्विया लगेच तयार झाली. तो तीचा स्कूलचा ग्रुप होता. काहीजणांशी तिची रॉबिनकडेच ओळख झली होती. आठला ड्युटी संपल्यावर 'Meijer' (मायर) मधुन रिनेच्या गाडीतुन त्या पार्टीसाठी निघल्या.

रॉबिनकडच्या पार्टीची एक गोष्ट सिल्वियाला नेहमी आवडायची, ती म्हणजे शिस्त. पार्टी असली तरी कधीच बेताल होत नसे. आजही तसेच काहिसे होते. एक तासभर ड्रिंक्स झाल्यावर रिनेने ओव्हनमध्य जेवण बेक करायला ठेवले. बाकीच्याने तोपर्यंत ड्रिंक्सचा पसारा आवरला आणि जेवण बेक होईपर्यंत तेथे असलेल्या एकाने जादूचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. तो इयान होता. सिल्वियाने त्याला आज प्रथमच ग्रुपमध्ये पाहिले. तो रॉबिनच्या बहिणीचा 'नवाकोरा' मित्र असल्याचे तीला कळले. त्याने पहिल्यांदा काही पत्त्याच्या जादू दाखवल्या, नंतर मनातले आकडे ओळखणे किंवा एखद्याला गणित घालुन ते सोडविताना त्याचा / तिच्या आवडीचा रंग ओळखणे.... Simply Amazing . तोपर्यंत जेवणा तयार झाल्याचा ओव्हनने अलार्म दिला आणि सगळे जेवायला उठले.

जेवल्यानंतर आयरिश क्रीमचा आस्वाद घेताना, सर्वांनी इयानला जादू शिकवण्याचा आग्रह केला. त्यानेही आढेवेढे न घेता ज्या सोप्या पत्त्याच्या जादू होत्या त्या दाखवल्या. तो स्वतः कॉलेजमध्ये Magic & Mind वर कोर्स घेत होता. तसा ग्रुपमध्ये तो वयाने बर्‍यापैकी मोठा होता. त्याला कोणीतरी आकडे किंवा रंग ओळखायला शिकवण्याची सुचना केली.

"It is nothing but Telepathy. ही एक कला म्हणा २६ पण ती आत्मसात करावी लागते. त्यासाठी मन एकाग्र कराव लागत आणि समोरच्याही मन एकाग्र करण्यासाठे मग गणित वगैरे घालावी लागतात. एकदा का लिंक जुळली की मग सोप होत. अर्थात, सर्वात महत्वाचे पथ्य म्हणजे त्या मनातुन काही क्षणात बाहेर पडायचे नाहीतर फार गोंधळ होईल. स्वतः जादुगारालाही त्याचा त्रास होईल. ह्या मागचे Scientific Reason मला अजुन तरी माहित नाही " इयान माहिती पुरवत होता. अगदीच आग्रह झाला म्हनुन त्याने सर्वाना शांत बसुन Concentrate करायला सांगितले.
" तुमाच्यापैकी प्रत्येकाला हे जमेलच असे नाही आणि जमले तरी सर्वांशीच तुमची लिंक जुळेल असेही नाही. It has to be cultivated by practice. एखादाच असा असतो की त्याच्याकडे ही ' शक्ती ' असते आणि फार मास्टर न होताही सहजतेने वापरु शकतो. So lets Concentrate." २ - ३ मिनीटाच इयानने मोठ्याने हसत त्या शांततेचा भंग केला. अर्थात त्याचे कारण फक्त सिल्वीयाला कळेले होते. सिल्वीयाला इयानच्या मनातले कळु शकते, हे इयानला कळले आहे आणि त्याला हे कळल्याचे तिला समजले आहे ह्याची तिने सर्वांसमोर कबुली दिली. सिल्वीयाला स्वतःला ही ह्याची मजा वाटली.

............................................

रविवारी सकाळी कॉफीचे घोट घेताना सिल्वीयाला एकदम गेल्या आठवड्यात झालेली पार्टी आठवली आणि हसु आले. त्यानंतर तिने तो प्रयोग रिनेवर केला होता; अर्थात रिनेच्या नकळत. पण काहीच हाती(मनी) लागले नाही. इयानने हे ही सांगितले होते की, प्रत्येकवेळी किंवा सर्वांबरोबर तो अनुभव मिळनार नाही. हा विचार चालू असतानाच समोरच्या अपार्टमेंटमधल्या बाईकडे ती टक लावुन पाहात होती. ' काय धम्माल होईल जर असे मनातले कळले तर...' ह्या विचाराने तीला आणखीच हसु फुटले.

दुपारी लॉण्ड्रीत कपडे ड्रायरला लावुन बसली असतानाही टेलीपथीअचा विचार तिच्या डोक्यातुन जात नव्हता. " कदाचित असेही असेल की त्या ' काही ' व्यक्तीपैकी इयान हा एक असेल की ज्याच्याशी मी मनोसंवाद साधु शकते. " असे तिला वाटुन गेले. Lets Try! एक प्रयत्न म्हणुन तिने लॉण्डरीत बसल्या बसल्या एकाग्र होऊन इयानचा विचार करू लागली. पहिली काही मिनटे अशीच गेली, पण हळुहळु तिला जाणवू लागले की ती त्याचे मन ' वाचत ' आहे. अचानक तिला २४० V चा धक्का लागला. ती पुर्णपणे थरारली. 'OH MY GOD!!! He murdered Kathy. Cant Believe it!!' ती मनातल्या मनात किंचाळली. कॅथी इयानची पहिली मैत्रीण होती आणि नंतर ती त्याला सोडुन निघुन गेली एव्हढेच जगाला माहित होते. प्रत्येकाचे वैयक्तीक स्वतंत्र्य अबाधित राखणर्‍या या जगाने ह्याबाबतीत फार काही महत्व दिले नव्हते. सिल्वियाला ह्या गुन्ह्याचा सुगावा लागला हे इयानने टेलीपथीने जाणले. तो आपल्याला आता सोडणार नाही हे ही तिला कळले. भरभर कपडे आवरुन ती पट्कन घरी आली. आधी पोलीसांना कळवावे की रिनेला हे ठरवत असताना तिला लक्षात आले की तिचे हे विचार इयानला आवडलेले नाहीत आणि सिल्वीयाची कशी काय विल्हेवाट लावावी याच विचारात तो गाडी घऊन तिच्याकडे यायला निघाला आहे.

गाडीची चावी, पर्स आणि जे काही हाताला लागेल ते गोळा करुन्; खुंटीवरचे जॅकेट अंगात अडकवत सिल्वियाने धाडकन् दरवाजा बंद केला. अपार्टमेंटच्या दारातुनच तीने रिमोटने आपल्या फोर्ड टॉरसचे दार उघडले. हातातील सर्व गोष्टी बाजुच्या सीटवर फेकुन ती गाडी चालु केली. आपल्यापासुन ५ - ७ मैलावर रहाणारा इयान आपल्याला कधीही गाठु शकतो ह्या विचाराने ती थंडी तिला जरा जास्तच जाणवू लागली. तोपर्यंत तिला हे ही लक्षात आले होते की आपण घर सोडुन पळतोय हे इयानला कळले आहे. ' ह्यावर काहीच उपाय नाही का? छे, भलतच झाल हे!' असे म्हणत तीने गाडी चालू केली आणि स्पीड लिमीट वगैरे न पाळता ती अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या बाहेर पडली. इयानपासुन दूर पळायचे ह्या दृष्टीने रस्तावरुन ती भरकटल्यासारखी जात होती. कुठ? काहीच माहिती नव्हते. येतील ती वळणे घेत ती निघाली.
............................................

इयानच्या जरी हे लक्षात आले की सिल्विया आपल्यापासुन दूर पळायचा प्रयत्न करते आहे. पण ती काही न ठरवता गाडी चालवत असल्याने त्याला तिचा माग लागत नव्हता. '९४ ईस्ट... म्हणजे बया शिकागोच्या दिशेनी निघाली आहे तर. एखाद मैल पुढे आपल्या आहे,' इयान मनातल्या मनात हसला. त्याने सिल्वियाला पोलीसांकडे न जाण्याबद्दल सुचवले होते. त्याने तिला हे ही जाणवून दिले की 'टेलीपथी हा कधीच पुरावा मानला गेला नसता. फारतर पोलीसांनी कॅथीच्या नाहीसे होण्याबद्दल शोध घ्यायचा प्रयत्न केला असता पण भक्कम पुराव्याअभावी ते त्याला अटक करु शकले नसते. तो मोकळाच रहाणात आहे आणि मग.... १९ सिल्वियाला संपवायचे हे त्याने नक्की केले होते पण फक्त कसे ते त्याने ठरवले नव्हते आणि तसे प्लान करणे त्याला शक्य नव्हते. आपल्या विचारातुन बाहेर येत, सिल्वियाचा माग शोधण्याचा तो प्रयत्न करु लागला. पण त्याच्या लक्षात आले की ती कुठेतरी पेट्रोल घेण्यासाठी थांबली आहे. पण कुठे????
............................................

गाडीला विचित्र धक्के बसु लागल्याने सिल्वियाच्या एकदम लक्षात आले की पेट्रोल संपते आहे. फारसा विचार न करता तिने येईल तो फाटा (Exit) घेतला आणि गाडी प्रथम दिसले त्या पेट्रोल पंपावर उभी केली. " बाप रे, क्रेडीट कार्डचे पाकीट घरीच राहिले वाटत " , घाईत निघताना आपण भलतीच चुक केल्याचे तिला जाणवले. पर्समध्ये बारा डॉलर आणि काही सेंट होते. पेट्रोल भरावे तर खाण्याचा Problem आणि परत ह्या ५ - ६ गॅलन्मध्ये यी अशी कितीशी दूर जाऊ शकणार होती. Why not do Hitch Hiking? असा मनाशी ठरवुन ती शेजरीच लागुन असलेल्या Shady Restaurent मध्ये शिरली. Double Cheese Burger ची ऑर्डर देऊन ती बाजुला झाली. ह्यापळापळी तीला जरा ब्रेक हवा तोता.
" Take next Exit for Michigan City..." , एव्हढे ऐकल्याबरोबर सिल्वियाच्या अंगावर सरकन काटा आला. लगेच तिने काऊंटरवरच्या मुलाला "Change mine to To 13go (Takeway parcel)" सांगितले. हातात बर्गरची बॅग घेऊन सिल्विया धावत रेस्टॉरंटच्या बाहेर पडली. गाडीचे नंतर बघु असे ठरवून, त्यातल्या त्यात सोबर वाटणार्‍या एका ट्रकवल्याला तिने Request केली आणि त्याच्या बरोबर निघाली. " कुठे जाणार? " ह्याचे उत्तर "I am just hitch hiking. Nothing perticular" देऊन पुढे काही ऐकण्यापुर्वी खाण्यात गुंतली. ट्रक हायवेवरुन न जाता आतल्या रस्त्याने चालला होता. तिला सर्वच अनोळखी होते त्यामुळे ' जागेच राहु' या निग्रहात ती कधी झोपले तिला कळलेच नाही.

हॉर्नच्या आवाजाने ती दचकुन जागी झाली. " Vow Chicago Downtown!" अगदी Reflex Action मध्ये ती स्वतःशीच बोलली आणि आणखी एक चूक केल्याचे तिला जाणवले. " तुला आवडल नाही का? " तिच्या भेदरलेल्या चेहर्‍याकडे पाहात ड्रायव्हरने विचारले, "Don 19t worry रात्र असल्यामुळे बराचसा ट्रॅफिक कमी झाला आहे. हे डाऊन टाऊन संपेपर्यंत लागेल तेव्हढाच. त्यातही ट्रकला Express Lane मधुन जाता येत नसल्याने थोडे सावकाश जावे लागेल पण ठीक. " सिल्वियाने यंत्राप्रमाणे मान हलवली. आता पुढे काय हा विचार तिच्या डोक्यात फिरत होता तोच ड्रायव्हरने तिला विचारले, " तुला कुठे सोडायचे?, " ज्या प्रश्नाला ती टाळू पहात होती तो आता तिला विचारण्यावाचुन गत्यंतर नव्हते, " तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात? "
" मिल्वॉकीला मी आमच्या वेअर हाऊसला जाणार आहे. तुला वाटेत कुठे सोडायचे असेल तर सांग. मी हाय वे लगत तुला Drop करु शकेन. "
............................................

' चलो मिलवॉकी', इयानची काळजी सुटली. बराचवेळ तो सिल्वियाच्या गाडीजवळ आपली गाडी पर्क करुन बसला होता. ती ट्रकमधुन आडरस्त्याने निघाली ह्याशिवय त्याला तिच्या प्लानबद्दल बराच वेळ काहीच कळत नव्हते. तो Express lane मध्ये शिरला तेंव्हा ती शिकागोच्या दुसर्‍या टोकाला असल्याचे लक्षात आहे. थोडी ड्रायव्हिंगची जोखीम उचलावी लागणार होती; पण त्याला तो तयार होता.

इयानने शिकागो सोडले तेंव्हा ट्रक मिलवॉकीत शिरण्यापुर्वी हाय वे शेजारी असलेल्या वजनकाट्याच्या लाईन उभा असल्याचे त्याला समजले. आता तर फारच सोपे झाले!!
............................................

" अजुन किती वेळ? "
" फार नाही. अर्ध्या तासाच्या आत उरकेल सगळ. आज जरा गर्दी आहे इतकेच. तुला एखाद्या बस स्टॅण्डवर सोडु का? "
सिल्वियाला काय उत्तर द्यवे कळत नव्हते. तिची चलबिचल होऊ लागली. अर्धा तास म्हणजे इयानला पुरेसा टाईम आहे. ना इथे उतरुन काही फायदा होता ना बस स्टॅण्डवर. गाडीतुन इयानने तिला कसेही गाठले असते.
" जिथे आमचे Disribution Center आहे तिथुन तुला पुढे जायला काहीही मिळणे कठीण नाही. फक्त मॅकडोनल्डच्या ट्रकची ये जा असते. तसे ते मिशिगन लेक जवळ आहे आणि आता काळोखही झाला आहे.... "
" तिकडे काहीतरी सोय होईल " पुढे काही माहिती देण्याआधी सिल्वियाने ड्रायव्हरला सांगितले.
............................................

जसे मिलवॉकी जवळ येऊ लागले तशी दोघांनाही 'What Next?' हा प्रश्न सतावत होता. वाटेत एकदा मॅकडोनल्डच्या ट्रकला ओव्हरटेक करुन इयानने खात्री करून घेतली होती. त्यानंतर ट्रकपासुन थोडे अंतर ठेऊन तो गाडी चालवत होता. आता फत्क सिल्विया कोठे उतरणार ह्यावर त्याचे पुढचे प्लान अवलंबुन होते.
............................................

हाय - वे वरुन ट्रक आतल्या रस्त्याला लागला त्यावेळी बरीच रात्र झाली होती. बहुतेक सर्व मॉल वगैरे गर्दीची ठिकाणे बंद झाली होती. तसेच अश्या अनोळखी जागी उतरुन जायचे तरी कुठे? 'त्यापेक्षा जे होईल ते बघु; सध्यातरी ट्रकम्ध्ये सुरक्षित आहोत' असा विचाराने डोळे मिटुन सिल्विया इयानचा अंदाज घेऊ लागगली.

" तुला कुठे सोडु सांग कारण आता तिसर्‍या सिग्नलनंतर मी distribution Center मध्ये जाणार " , ड्रायव्हरने तिला विचारले.

पण खरच कुठे जायचे? तशी रस्त्यावर तुरळक घरे होती पण कुठे आसरा घेता येईल असे सिल्वियाला काहीच दिसत नव्हते. इतक्यात शेवटच्या सिग्नलवर Amber light असताना ट्रुक पुढे गेला आणि इयानला तेथे थांबावे लागले. जरा पुढे गेल्यावर तिने ट्रकवाल्याला थांबायला सांगितले आणि तो थांबण्या आधीच घाईघाई ती उतरलीसुद्धा. त्या ट्रकवाल्याचे आभारही मानले नाहीत हे तो वळल्यवर तिच्या लक्षात आले. ती त्या गल्लीतुन घाईघाईने चालू लागली. कुठे जातो आहे याचे तिला भान नव्हते. इयानची गाडी कुठेही दिसत नव्हती. आपण उतरल्याचे त्याला कळले आहे पण कुठे ते न कळल्याने तो ईथेच आसपास फिरतो आहे हे तिला समजले होते. रस्त्यात फारच थोडे दिवे होते. एखादी गस्त घालणारी पोलीसांची गाडी येवो अशी ती मनोमन प्रार्थना करत होती. रात्री रस्त्यात एकटी मुलगी बघुन त्याने तिला नक्की Lift दिली असती. ह्या विचारात ती असतानाच ती एका junction पाशी यीऊन थांबली. तिथल्या लाईटच्या उजेडात तिला दिसले की एक रस्ता गोल्फ क्लबकडे जातो आहे. तिकडे जाण्यात काहेच अर्थ नव्हता. क्लब केंव्हाच बंद झाला होता. म्हणुन ती उजवीकडे जाणार्‍या रस्त्यावर वळली.
............................................

'Oh, Golf Club...' इयानच्या तो नजरेच्या टप्प्यात होता. मोकळ्या मैदानात त्याला कुठेच सिल्विया दिसली नाही. लपण्यासाठी काहीच नव्हते. त्याने हेडलाईटच्या उजेडात चेक केले. त्याने गाडी उजवीकडील रस्त्यावर वळवली. तो एकच रस्ता होता. आजुबाजुला झाडी वाटत होती. चला, आता कुठे पळेल? एकदा का गाठले की.... ह्या काळोखात कुणाला कळणारही नाही काय झाले ते. झाडीत मारुन फेकली तर लोकांच्या लक्षात यायलाही काही दिवस जातील.... Very Ideal Spot!!! आता इयान एकदम रिलॅक्स झाला.
............................................

पहिली थोडावेळ उतरण असल्याने सिल्वियाला धावताना थोडे अडखळल्यासारखे झाले. पण मग प्लेन रस्ता आला तेंव्हा ती जीवाच्या आकांताने धावत होती. रस्ता खडबडीतही असावा. तिला मिट्ट काळोखात स्वतःचे मरण सोडुन काहीच दिसत नव्हते. Lake असावा कारण तिला पाणवारा जाणवत होता. पाठीमागे जरा लांबवर तिला गाडीचा आवाज ऐकु येत होता. तिने वळुन पाहिले. गाडीचे डीम लाईट त्या काळोखात तिला वाघाच्या डोळ्याप्रमाणे भासले. भितीने पाय तिला साथ देत नव्हते; तरीही ती जास्त जोरात धावण्याचा प्रयत्न करु लागली.
............................................

हेडलाईटच्या उजेडात इयानला धावणारी सिल्विया दिसली. उगीच एखादा पोलीस आला तर.... म्हणुन त्याने गाडीचा वेग आता कमी केला. ' बस ठरल! गाडीचा धक्का लागुन... ' तो विकृत हसला. सिल्वियापासुन काही यार्डावर असताना त्याने आजुबाजुचा अंदाज घेत गाडीचे दिवेही बंद केले.
............................................

गाडी आणि सिल्वियातील अंतर झपाट्याने कमी होऊ लागले. ' कुठ पळू मी, कशी पळू मी... ' अशी तिची अवस्था झाली आणि त्यात अंधार. इयानला चुकविण्यासाठी ती एकदम उजवीकडे वळली आणि उरलीसुरली शक्ती एकवतून ती जोरात धावत सुटली. ' Ohh no!! what 19s that?' धावता धावता ती कशालातरी अडखळुन पडली. ' रस्ता बंद ' साठी लावली चेन होती. ती धडपडत उठली आणि दुखावलेल्या पायांनी जमेल तशी धावू लागली. इयान तिच्या मागेच होता. आता काही फुटांचे अंतर राहीले होते. मरण पाठीमागे दिसत होते. कुठच्याही क्षणी आता धडक बसुन आपला अंत.... " ईऽऽऽऽ " अशी जोरदार किंचाळी तोंडातुन फुटते तोच कुठेतरी खोल खोल जात असल्यासारखे सिल्वियाला वाटते. सर्व अंग थंड पडत अस्ल्याचे तिला जाणवले. ' कसले हे मरण ' असे म्हणते ना म्हणते तेव्हढ्यात काहीतरी जोरदार आदळ्याचा आवाज आला. तिने डोळे गच्च मिटून घेतले. तरंगल्यासारखे वाटत असले तरी घुसमट जाणवत होती. ' आता आपण स्वर्गात की नरकात?' हा विचार करतानाच ती कुठेतरी स्थिरावली आणि मग सर्व काही शांत झाले.
............................................

"Are you OK, ma'm? No, just Relax...." हळु डोळे उघडुन काही हालचाल करणार, इतक्यात खोलवर कुठूनसा आवाज ऐकू आला. आपल्या डोळ्यासमोर दिसणारे काळ्या आणि पांढर्‍या कपड्यातले देवदूत आहेत की यमदुत हे कळेपर्यंत तिचे डोळे परत मिटले गेले.

थोड्यावेळाने सिल्वियाने डोळे उघडले तेंव्हा आअपल्या बाजुला उभ्या असलेल्या पोलीसाकडे पाहुन ती क्षीण हसली. " तू हॉस्पिटलम्ध्ये आहेस. आता कस वाटतयं? " ह्या त्याच्या प्रश्नावर ती फक्त प्रसन्न हसली.
" देवाचे खरच तू आभार मानायला हवेस. How did you manage to come out of car?" तिच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्हाकडे पाहात त्याने पुढे विचारले, " नक्की काय झाले? Why you guys are driving on Jetty? का तुम्च्या लक्षात नाही आलं की ती लेक मिशीगनची जेट्टी अहे ते? " इतक्यात डॉक्टर आले. त्याने सिल्वियाला जरा आराम करू द्यावा असे पोलीसाला सांगितले आणि दोघेही खोली बाहेर गेले.
............................................

त्यावेळी अंधार असल्याने तिला काहीच कळले नाही. आपण स्वर्गात किंवा नरकात न पडता, जेट्टी संपल्यामुळे पाण्यात पडत होतो हे आठवुन सिल्विया एकटीच पण " मना " पासुन हसली.


("Stories by Alfre Hitchcock" मधील Murder by Mind ह्या कथेच जमेल तसा आणि आठवेल तसा अनुवाद.)

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner mbhure Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators