Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
admin-team
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » admin-team « Previous Next »

|| श्री
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

म्हटलं आपण पण जागा घ्यावी म्हणजे इथून कुणी विषयांतर केलं म्हणून हाकलणार नाही.

पण seriously आम्हालाही कधी कधी लिहायचं असतं पण त्याचा काय परीणाम होईल याचा दहा वेळा विचार करावा लागतो. आम्ही नेमकं काय काय करतो, कसं करतो, का करतो हे तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा प्रपंच.

इथे खुसखुशीत आणि खमंग वाचायला मिळणार नाही. पण तुम्हाला खुसखुशीत लिहायला आणि खमंग वाचायला मिळावं म्हणून आम्ही केलेली धडपड दिसेल कदाचित. आणि त्याचबरोबर स्वतःचा नोकरीधंदा संभाळुन, घरच्या कामातून वेळ काढून, हितगुजवर चाललेल्या आगी विझवणारे, messages तुम्हाला नंतर सापडावे म्हणून योग्य जागी हलवणारे, तुमच्या प्रश्नांना शक्य असेल तेंव्हा उत्तर देणारे नेमस्तक त्याच्याच / तिच्याच शब्दात तुम्हाला दिसतील.
नाही म्हणजे हे मायबोली, नेमकं आहे तरी काय?

हो ते सगळं ठीक आहे, तुम्ही हे दहा वर्ष करताय, पण त्याचा उद्देश काय?

तुम्ही सुरुवात कशी केली? प्लॅन काय होता आणि तो कितपत successful झाला?

पुढचा plan काय आहे? तो तुम्ही एकदा सांगून का नाही टाकत?

पैसे सुटतात का काही? का सगळ्या लष्कराच्या भाकर्‍या?

नाव मायबोली आणि मला तर कितीतरी पानं इंग्रजीत दिसतात ते कसं काय?

तुमची वेबसाईटची व्याख्या काय आहे हे स्पष्ट कराल का?

मला "वंदन करूनी धृतराष्ट्राचे, नंदन करूया महाराष्ट्राचे" हे गाणं मिळेल का?


खरंतर या कुठल्याही प्रश्नाचं माझ्याकडे याक्षणी उत्तर नाही. आणि उत्तर शोधुनही काढलं तरी ते महत्वाचं आहे का?

/about_us/ इथे म्हटल्याप्रमाणे
तुम्हाला, मायबोलीकरांना, मायबोली लाडकी वाटते, आपली वाटते. तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं यातंच सगळं आलं, नाही का?


-Admin
माझा मॉडपणा!
( -- मैत्रेयी)


इथे खरं तर 'माझी मॉडरेटर पदावरील कारकीर्द' असे म्हटले असते तर छान भारदस्त वाटले असते नाही का?
पण ते म्हणजे 'सशाने आपल्या कपाळाला गंडस्थळ म्हणण्यासारखे(ढापलेली उपमा) किन्वा कुत्र्याच्य पिलाने आपल्या केकाटण्याला डरकाळी म्हणणयासारखे(ही ढापलेली नाही) झाले असते!
बरं ते असो!
तशी मी लहानपणापासून कायम वर्गात ' सेगरेटरी ' असयाची! मी स्वत:वर खूष होण्याला आणि इतर मुली जरा माझ्यावर खार खाऊन असण्याला (अजून एक) निमित्त होते ते!
चौथी मधे GS होण्यापर्यन्त माझी मजल गेली तेवा मी अगदीच खुष झाले होते. पण मग प्राथमिक शाळेच्या निरोप समारंभाला आमच्या एका बाईंनी मला अचानक माझ्या या यशा(?)चे रहस्य सांगितले," अग तू वर्गात इतकी अखंड बडबड कराय्चीस आणि इतरांना पण 'बोलते' करून वर्गाला कायम disturb करायचीस ना, मग आम्ही तुला सेक्रेटरी च करून टाकलं! आता स्वत: सेक्रेटरी असताना दंगा करता येत नाही ना!"( नशीब एवढा तरी विश्वास वाटला त्यांना!):-)
अशा रितीने माझा तोवर हवेत उडणारा सेक्रेटरी पदाचा फ़ुगा फ़ुटला!

नन्तर मग हायस्कूल मधे सेक्रेटरीपदाला माझ्याहून अधिक लायक(!) उमेदवार मिळाले असावेत कारण नन्तर मग मी पुन्हा सेक्रेटरी झाले नाही.

तर जेव्हा काही वर्षापूर्वी इथे US मधे आले तेव्हा मायबोलीवर TP करत पडीक रहाण्याला सुरुवात झाली. नन्तर २ वर्षापूर्वी मला मॉड होणार का असे विचारण्यात आले तेव्हा मला हा सेक्रेटरी होण्याचा एपिसोड आणि त्यामागचे खरे कारण आठवल्यावाचून राहिले नाही!:-)
तर अशी झाली माझ्या मॉडपणाची सुरुवात!


पूर्वी इतर कुणी मॉड जेव्हा एका फ़टकार्‍यात कुणा कुणाचे काय काय त्यांच्या मते वादग्रस्त आणि माझ्या मते खमंग पोस्ट्स उडवून द्यायचे तेव्हा मला मॉड ही जमात ' शिष्ट, खडूस ' वाटायची! आणि जरा त्यांच्या 'पावर' चे कौतुक पण वाटायचे!
मग रितसर admin नी आम्हाला मायबोलीवरच्या मॉड ना करावी लागणारी कामे, त्याची पद्धत, त्यासाठीचे software तसेच moD's code of conduct याची कल्पना दिली. या सर्वामुळे एकदम जाणीव झाली की मॉड म्हणजे कुणापण यूजर च्या पोस्ट्स ' तलवारीने ' उडवण्याचे स्वातन्त्र्य नसून मायबोलीवरच्या सभ्यतेला सांभाळण्याची जबाबदारी आहे!


क्रमश :
आता मुख्य म्हणजे वात्रटपणा, कुठल्याही BB वर TP करणे, एकंदर च पोस्ट मधील भाषा सगळेच नाही म्हटले तरी जरा सांभाळावे लागणार होते!(इथे बर्‍याच कुत्सित हसण्यांचा आवाज मला आत्ताच येत आहे!:-) )
तेव्हा कुठे नुकत्याच या जबाबदारीतून मोकळे झालेल्या असाम्याच्या उत्साहाचे रहस्य पण समजले:-)(असाम्या ~D~D )

सुरुवातीला आम्ही एकूण दहा नवीन मॉड होतो. सर्वांना काही जबाबदार्‍या वाटून दिल्या होत्या.
मॉडना करायची नेहमीची कामे म्हणजे BBs ची वरचेवर सफ़ाई, गरजे प्रमाणे नवे bbs बनवणे, BBs ची वर्गवारी, आवश्यक वाटल्यास असलेले BB बन्द करणे, एकत्र करणे, पोस्ट्स हलवणे वगैरे. ही कामे बहुतांशी विभागवार वेगवेगळ्या मॉड्स ना दिली जातात तर काही कामे(जसे अयोग्य पोस्ट्स delete करणे, कुठे users चे अनुचित वर्तन व्यक्तिगत आरोप किन्वा अनावश्यक वाद विवाद असे दिसल्यास ते सांभाळून घेणे) ही ज्याला प्रथम दिसेल तो / ती मॉड ती कामे करतो.
काही तारीखवार करायची कामे, जसे गुलमोहोर मधे नविन महिना चालू करणे, गणेशोत्सव, दिवाळी अंकाची कामे, MODs choice अशी कामे असतात.त्यांची जबाबदारी बहुधा एखाद दुसर महिना आधी कुणी ना कुणी मॉड स्वेच्छेने उचलतात. मग गरज असेल तेव्हा इतर काही मॉड त्यांना join होतात आणि ते काम कसे पार पाडायचे ते ठरवून पुढची action घेतात. अशा प्रकारे आपसात understanding वर ही कामे होतात.

कधीतरी काही निर्णय सर्व मॉड्स नी मिळून घ्यायची वेळ येते. कधी तो निरणय एखादा नवा विभाग, नवा नियम, नवा उपक्रम सुरू करण्याबद्दल असतो, तर कधी एखाद्या वादग्रस्त परिस्थितीत मॉड्स ची भूमिका यावर पण असतो :-)
आम्ही सर्व मॉड वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या टाईमझोन मधे असल्यामुळे हे सगळे संभाषण 'याहूकृपेने'च होते. मॉडरेटर्स चा एक याहू ग्रुप आहे त्यावर ईमेल्स आणि क्वचित चॅट द्वारे आम्ही एकमेकांशी संपर्क साधतो.
हे सगळे इतके डीटेल मधे(काय रटाळ पोस्ट आहे असं वाचणारे म्हणतायत याची मला कल्पना आहे!) सांगायचेही एक कारण आहे.

काय होतं की काही वेळा आमच्या हातून पण काही चुका होतात, जसे की अनावश्यक पोस्ट्स उडवताना नजरचुकीने चांगले पोस्ट डिलीट होणे, कधी कुठे अयोग्य पोस्ट कुणीच मॉडने न उडवता तशीच राहणे, तर कधी एखाद्या user च्या प्रश्नाला उत्तर द्यायचे राहून जाते!
असे व्हायचा अवकाश की लग्गेच आपले जागरुक मायबोलीकर प्रश्नांचे सरबत्ती सुरूच करतात :-) "माझे पोस्ट आक्षेपार्ह होते का? का उडवले?" " माझ्य प्रश्नाला उत्तर का दिले जात नाहिये? नव्या लोकांना इथे असे ignore करतात का?" " आम्हाला अमूक ठिकाणी warning दिली आणि त्या तमक्याला का दिली नाही?" " त्या अमूक गावच्या तमूक हायस्कूल च्या बीबी वर लोक personal attack करत आहेत मॉड्स तुम्ही काय करताय?"
मधे तर एक दोन users नी मॉड्स आणि मायबोली administration विरुद्ध आघाडीच उघडली होती! त्यांनी तर मायबोलीकरांच्या अयुष्यात घडणार्‍या काही भल्या बुर्‍या घटनांनादेखिल मायबोली administration लाच जबाबदार धरले होते!
असो. असे काही प्रसंग आमच्या साठी अगदी संस्मरणीय म्हणतात तसे होतात!
हे असे घडते तेव्हा अर्थात मॉड्स बद्दल यथेच्छ टीका होते! कधी लोक मॉड्स नी बारीक सारीक वादात पोलिसासारखी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा करतात, म्हणतात मॉड काहीच action घेत नाहीत! कधी म्हणतात नको तिथे जास्त कडक धोरण दाखवलेय!:-) अर्थात हे सर्व चालायचेच!

खरं अशा चुका बहुधा 'चुकून' च झालेल्या असतात आणि दुर्दैवाने नन्तर सुधारता येत नाहीत. कधी अनेक मॉड्स च्या मधे समज - गैरसमजाअमुळे, कधी communication gap मुळेही अशा चुका घडतात.

आता जसे अशा टीकेला सामोरे जावे लागते तसेच कदाचित जास्तच प्रमाणात मायबोलीकर मॉड्स च्या कामा(?!)चे कौतुक पण करतात!
अगदी"तुम्ही हे अद्भुत कार्य करत आहात" "तुम्ही लोक आहात म्हणून माझ्या अयुष्यातला मायबोलीचा विरंगुळा सुरळित चालत आहे" अशा प्रकारचे अगदी लाजवणारे कौतुक पण ऐकायला मिळालेय आम्हाला :-)
या सगळ्यामुळे मला तरी 'मॉडपणा' हे काम नाही तर विरंगुळाच वाटत आला आहे!
अशा रितीने मी अमचे मॉड्स चे कौतुक करून घेतले, आता आपले ऍडमिन राहिले की!
तर त्यांच्या सारखा सहनशील, दयाळू माणूस दुसरा नसेल!:-O
आम्ही करत असलेल्या लहान(!) मोठ्या चुका, नको तेव्हा केली जाणारी, राहून गेलेली, उशीरा केलेली कामे सग्गळे सांभाळून घेतात! तेही कधी एकही कठोर शब्द न बोलता.. कधीतरी कानपिचक्याही देतात पण त्या(शालजोडीतल्या?) गोड शब्दात :-)
असो. तर आता बस करते हे पुराण
एरव्ही कधी ही (आमची बाजू!) सांगायची संधी मिळत नाही, पण admin नी हा bb उपलब्ध करून दिला तेव्हा म्हटले चला इथे बोलून घ्यावे :-)
चला मग भेटत राहूच!

कळावे, लोभ असावा..

-- मैत्रेयी
नवीन दशकाच्या उंबरठ्यावर..
गणेश चतुर्थीच्या सर्व मायबोलीकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना शुभेच्छा.

आज मराठी तिथीनुसार मायबोली.कॉम ११ व्या वर्षात पदार्पण करते आहे.

दहा वर्षांपूर्वी सुरू केलेलं हे साधं पान. मराठीसाठी आपल्याला जमेल तसं जमेल तितकं काहीतरी करायचं, इतकी छोटी इच्छा. खाज म्हणा हवं तर. तेंव्हा वेब नावाचं प्रकरण फारतर २ वर्ष जुनं असेल. तांत्रीकदृष्ट्या मराठीतर सोडाच, पण इंग्रजीखेरीच कुठल्याही भाषेतून प्रकाशित करण्याची अडचण होती. साठवण्याची जागा, बंडवीड्थ वगैरे सगळ्याच गोष्टी खूप महाग होत्या. मुक्त प्रणाली सॉफ्टवेअर अगदीच मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते.
आम्ही काही केलं असं म्हणण्यापेक्षा, आम्ही मायबोली सुरू करण्याचं निमित्त झालं असं म्हणुया. कारण जगभरचे मराठी भाषिक असं काहि व्हावं याची वाट पहात होते. मायबोलीवर उदंड प्रेम करून त्यानी दिलेल्या प्रतिसादामुळे परत कधी मागे वळून बघावं लागलं नाही. डॉट कॉमच्या फुग्यामधे ज्या वेगाने वेबसाईट सुरु झाल्या, तशा बंदही पडल्या. मायबोलीकरांच्या पाठींब्यामुळे सुदैवाने मायबोली आजही अस्तित्वात आहे. पण काळाबरोबर मायबोलीला बदलणं भाग आहे. म्हणूनच स्वत्:च्या पायावर उभं रहाण्यासाठी भक्कम आर्थिक पाया तयार करते आहे, व्यक्तिकडून संस्थेकडे वाटचाल करते आहे. पण एक गोष्ट अजूनही अगदी तशीच आहे. १९९६ मधे "आम्ही कोण" मधे लिहिल्याप्रमाणे
'सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्हाला, मायबोलीवरच्या पाहुण्याना, मायबोलीकरांना, मायबोली लाडकी वाटते, आपली वाटते. तुमची ही आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं यातच या खटाटोपाचं सार्थक आहे."


भेटी, सरासरी दर महिन्यात १०७,७००
+ पृष्ठवाचने, सरासरी दर महिन्यात १,३७८,०००
+ वेळोवेळी मदत करणारे स्वयंसेवक / हितचिंतक १३०
+ दहा वर्षातला एकूण खर्च, डॉलरमधे १६, ८३०
+ पाच तासापेक्षा कमी झोप मिळालेल्या रात्री १०४०
-------------------------------------------------------------------------
= गेली दहा वर्ष जगभरच्या मराठी माणसांना एकत्र करणारं
हे जिव्हाळ्याचं कुटुंब अमूल्य
ऋणनिर्देश
मायबोली सुरु झाल्यापासून वेळोवेळी अनेक जणांनी आपाआपल्या परीने मदतीचा हात पुढे केला, बहुमुल्य सुचना केल्या, वेळ दिला. त्या सगळ्यांची मायबोली ऋणी आहे.

वेबसाईट खरं तर "मायबोली" म्हणायच्या अगोदर १ महिना सुरु झाली होती. तिचं पहिलं नाव होतं "ऐसी अक्षरे". सनीव्हेल, कलिफोर्निया मधल्या उत्तरा आळतेकरांनी, मायबोली हे नाव सुचवून तिचं पुन्हा एकदा बारसं केलं.

त्यावेळेस मराठी फॉंट मिळायला लागले होते पण ते कामचलाऊ होते. सुंदर नव्हते. अशातच श्रीकृष्ण पाटील आणि त्याच्या फॉंटबद्दल कळालं. हे आजोबा निवृत्त झाल्यावर मुलाकडे आले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी programming शिकले आणि त्यांनी अत्यंत सुंदर असे फॉंट केले. फॉंट प्रोग्रामिंग हा अतिशय किचकट आणि वेळखावू प्रकार आहे. म्हणजे तेंव्हा तरी होता. आता बराच सुलभ झाला आहे. श्रीकृष्ण पाटलांचा या वयातला उत्साह आणि भारतीय भाषांसाठी केलेली धडपड पाहिल्यावर मायबोलीसाठी आणखी स्फुरण चढलं. त्यांचा एकच फॉंट मायबोलीसाठी विकत घेतला होता. पण कुणीतरी मराठीसाठी इंटरनेटवर करतय हे कळल्यावर त्यांनी त्यान्च्याकडचे सगळ्या प्रकारचे फॉंट मायबोलीला भेट दिले.

क्रमश्:
admin
हितगुज सुरु व्हायच्या जवळ जवळ एक वर्ष अगोदर "बकुळीच्या फुलांची" सुरुवात झाली. सुरुवातीला सगळं स्वत्: शोधून संकलित करत असे. पण ते बरोबर दर सोमवारी प्रकाशित करणं हि थोडी कसरत झाली होती. रविवारी दुपारी किंवा वीकेंडला बाहेर कुठे लांब जाणं शक्य नसायचं. यापुर्वी आय. आय. टी. त असताना तंत्रचं संपादन केलं होते त्यामुळे चांगलं आणि नवीन सतत लिहिणं अवघड आहे याची कल्पना होती. पण नुसतं लिहिणंच नाही तर वेळेवर प्रकाशित करणं आणि ते दर सोमवारी असं महिनोंमहिने करणं याच्या मागे जरी फार कष्ट नसले तरी खाजगी आयुष्यावर नक्किच परिणाम करणारं होतं. सुदैवाने रविंद्र गोडबोलेची मायबोलीवरुनच गाठ पडली. त्याने कधिही लिहिलेली बकुळीची फुले भविष्यात आपोआप प्रसिद्ध होतील अशी सोय करून दिली. ती नसती तर बकुळीची फुलं पहिल्याच वर्षी कोमेजली असती.
त्याच वेळेस तोच program वापरून सुंदर हट्टंगडी "नामाचा गजर" असा भक्ती वाङमयाशी निगडित असलेला भाग चालवत असे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
बकुळीच्या फुलांसाठी अनेकांनी संकलन केले आणि त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही करीत असू. पण यात सगळ्यात उत्साही म्हणजे ८६-८७ वर्षांचे अटलांटाचे दादा देशपांडे. त्यांचं मराठी काव्यावरचं प्रेम प्रचंड दांडगं. कुठुन कुठुन ते बकुळीच्या फुलांचं संकलन करून पाठवायचे. अशी माणसं भेटली की मला काही करायला जमत नाही अशी सबब सांगता येत नाही.

संतोष किल्लेदार यांनी सुरुवातीपासुन खुप मौल्यवान सुचना आणि वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. त्यांची व्यंगचित्र मालिका बरीच गाजली.
जरी हितगुज नसलं तरी जोरात V&C झालेला तो मायबोलीवरचा पहिला विषय असेल. त्यांची चित्र काढून टाका ती मायबोलीवर शोभत नाही असा निषेध करणारी आणि खूप दिवसांनी धमाल हसलो आणखी ठेवा असं म्हणणारी दोन्ही प्रकारची पत्र (ईमेल) यायची. मराठीत इंटरनेटवर प्रसिद्ध झालेली ती पहिली व्यंगचित्रं.

क्रमश्:

admin
मायबोलीवरची पहिली interactive गोष्ट म्हणजे भेटकार्डे. खरंतर पूर्णपणे online असल्याने त्याला "कार्ड" म्हणावं का हा प्रश्नंच आहे. तेंव्हा कागदावरही मराठी भेटकार्ड कुणाला माहिती नव्हती. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदा मायबोलीनं केला. जेष्ठ चित्रकार रवी परांजपे यांची चित्रं तेंव्हा वापरली होती (आजही काही आहेत) त्यावेळेस मायबोली हे नाव कुणालाच माहिती नव्हते. तेंव्हा थोडी भितभितच त्यांची परवानगी मागितली होती. पण त्यांनी अतिशय उदार मनाने मायबोलीवर चित्रे ठेवायला परवानगी दिली.

ऑगस्ट १९९८ मधे हितगुज सुरू झालं आणि मग इतकं पुढे गेलं की मायबोली म्हणजेच हितगुज असं समीकरण बनलं.
हितगुजवरचा सगळ्यात पहिला संदेश आजही उपलब्ध आहे.

सगळ्यात पहिला संदेश

क्रमश्:
admin
हितगुजचा पसारा इतका वाढला की त्याचे प्रशासन करणे अवघड होऊ लागले. हितगुजच्या नेमस्तकांनी हातभार लावला म्हणून आज इतके दिवस हितगुज आहे आहे हे नक्की. परशुराम (परेश केळवेकर) आणि मेधा (मेधा करंदीकर) हे सगळ्यात सुरुवातीचे नेमस्तक.

जून २००० मधे हितगुजवर प्रसिद्ध झालेली तेंव्हापर्यंतच्या नेमस्तकांची ओळख (काहींची स्वत:च्या शब्दात.. त्यांना काय माहिती हे प्रकाशीत होणार आहे, आणि पुन्हा २००६ मधे पुन्हा प्रकाशीत होणार आहे :-))

parshuram (परेश केळवेकर) :
मुळचा मुक्काम ठाणे, सध्या US . गुलमोहर मधे यांच्या काही सुंदर कविता सापडतील. सध्या "moderator" च्या कामातुन निवृत्ती. पण कधी कधी गुप्त पणे ते हितगुज ला भेट देतात

medha (मेधा करंदीकर) :
हितगुजवरच्या अनेक मेधांपैकी एक. सध्या moderator च्य कामातुन निवृत्ती. सुंदर चित्रकार. लहान मुलांना चित्रकला शिकवायचा उपक्रम सुरु केला. याही गुप्तपणे हितगुजला भेट देतात असे ऐकिवात आहे. !

Svsameer (समीर सरवटे):
He was born and brought up in the beautiful land of Goa. He completed his education there and came to mumbai for job. After working for 5 years, now he is in US. Currently staying at Harrisburg, PA- 3 hours drive from Edison, NJ. His hobbies are hanging around on Hitguj :-), listening to music, reading( mostly Marathi) and Nature.."

samrya (समीर कुलकर्णी):
मुळ्चा पुण्याचा, सध्या मुक्काम Milwaukee, WI, US. "सही करता येते" एव्हढे शिक्षण, सध्या व्यवसाय keyboard वरती निपुणता दाखवणे".

asami (बिपीन चौधरी):
अनुवंशिक वारसा मुम्बईशी नि सांस्कृतिक पुण्याशी... थोडक्यात सांगायचे तर born and brought up in Mumbai and stayed some time in Pune. इथे US मधे बॉस्टन मधे आहे for last 2 years. Educational background VJTI मधून electronics engineering. पुलं आणि हितगुज चा निस्सीम चाहता.

limboni (स्मिता करंबेळ्कर लिमये):
मुम्बईसह महाराष्ट्रातल्या अनेक गावाची आहे.
काही वर्ष कर्नाटकातही राहिलेली आहे. शिकायला पुण्यात होते. लग्नानंतर नवरा पुण्याचा म्हणून पुण्याचीही आहे. कलिफ़ोर्निआमधे गेली साडेचार वर्षांपासून राहते.

Ajay (अजय गल्लेवाले) :
नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर, नांदेड, बंगलोर, शिकागो, बॉस्टन या गावात हे वाढले. (अजुनही वाढ चालुच आहे, संपण्याची लक्षणे दिसत नाही). पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात "अभियंता" , पवईला "तंत्र" आणि "चव्हाटा" , बंगलोर ला "स. न.वि.वि." च्या रुपाने लोकांचा छळ करुनही यांचा आत्मा शांत न झाल्यामुळे सध्या हितगुजच्या मागे लागले आहेत.

Bhavana (भावना गल्लेवाले) :
कराड, औरंगाबाद, पुणे, मॉस्को या गावात शिक्षण. बाहेर १०-१२ तास interpreter म्हणून बडबड करुनही, घरात आल्यावर तेव्हढीच बडबड (जागेपणी)वेगवेगळ्या भाषांतून करण्याचा तगडा स्टॅमिना. त्यांनी काही वर्षांपूर्वी पुण्याला NDA मधे नोकरी केली असल्यामुळे सगळ्यांनी त्यांना (आणि त्यांच्या लष्करी खाक्याला) वचकून रहावे हे उत्तम.

क्रमश्:

admin

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner admin,anilbhai,itsme,Kalandar77, Maitreyee,Milindaa ,Paragkan,Storvi ,Svsameer Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators