Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
lalu
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » lalu « Previous Next »

श्री गणेशाय नमः

धन्यवाद! :-)
जागा तर मिळाली.
स्नो वितळून गेला आहे तेव्हा लोकहो तुम्हाला इथे धुडगूस घालायला, बागडायला काही हरकत नाही. फक्त शेजारी ललिताताई आहेत त्याना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सर्व मायबोलीकरांचे इथे स्वागत आहे.

American Idol चा आजचा रिझल्ट फारसा अनपेक्षित नव्हता. स्टीव्ही बरी गायची, ती इतक्या लवकर जाईल असं वाटलं नव्हतं. बाकी कॅथरीन, मॅन्डीसा, पॅरिस, लिझा, एस यन्ग, एलियट, ख्रिस ही मंडळी १२ मधे नक्कीच असतील असं वाटतं. दर वेळी बघताना एक गोश्ट जाणवते. क्वचितच कोणी आफ्रिकन अमेरिकन ( ब्लॅक ) ' वाईट' गाताना पहायला मिळतं. खेळ, गाणं आणि नाच हे जणू त्यांच्या रक्तातच असतं. तसेच ते लोक अगदी मनमोकळे, धीट. सहसा बुजरे, awkward पहाण्यात नाही येत. यावेळीही पॅरीस, मॅन्डीसा आणि लिझा उत्तम गाणार्‍यापैकी तिघी आहेत. याबद्दल गप्पा मारायच्या असतील तर ही हक्काची जागा समजा. :-)

आता थोडं राजधानीतून.... Washington Post च्या रविवारच्या Outlook पुरवणीमधे नेहमी काही ना काही वाचनीय असतं. हा पेपर माझ्या हातात पडतो त्यामुळे निवांतपणे वाचता येऊ शकतो. आत्ता त्यातलीच एक लिन्क आशिषने current affairs मधे दिलेली पाहिली. त्याच पुरवणीत FEMA चा माजी चीफ ब्राऊन ची मुलाखतही आहे.

”A conversation with Michael Brown”

तो स्वतः तर दोषी आहेच, पण इथेही कशा प्रकारचं राजकारण होतं त्याची झलक मिळेल. इथली एक म्हण आहे, ”If you need a friend in Washington, get a dog!

आणि बुशसाहेबांच्या लवकरच होणार्‍या भारतभेटी निमित्त हे दोन लेख.
“Bush seeks India's cooperation”

”Scientist's visa denial”

याबद्दल भारतातल्या एम्बसीने ”highly unusual statement of regret” इश्यू केलं म्हणे.

कुठे काही नवीन नाही का इथे?
शुभेच्छा बीबी भरुन वाहतोय पण वाहूदे, नाहीतर आपल्याला कोण 'जीवेत शरदः शतम्' म्हणणार, आपण मन्त्री थोडेच आहोत!

दिनेश 'नायजेरिया' लिहितायत पण मला पुन्हा केनया च वाचतोय असं वाटतंय! ~ड

सगळीकडे प्रवासवर्णनाचे पीक आले आहे. भारतात कुठेही गाडीने फिरण्याचा मी आता धसकाच घेतलाय. त्यात पुन्हा हवाईदेवीच्या बीबी वर प्रवासविषयक लेखन पाहून मला किंकाळी फोडून जागेवर जाऊन बेशुद्ध पडावेसे वाटले! मी 'प्रवासातील कुजबुज' वगैरे च्या अपेक्षेने गेले होते! ~ड

ते GS1 आणि टीम कुठले गड शोधून सर करत फिरतायत. मला संशय येतो. तेलबैला आणि नागफणी चा फोटो मला सारखाच वाटला.

तेच तेच प्रश्न, त्याच त्याच पार्ट्या, तेच तेच मेनू, त्याच त्याच रेसिपीज!- पार्ले व पाककला.

कमी कपडे आणि मुली मुले!

बर्फाच्छदित डोंगर, समुद्र, आणि ताजी सुकी फुले!

पीपीवर सातशे फेरे आणि
सूतकताईचे धागेदोरे!

मला ते 'दे जा वू' का काय ते तसं झालंय! 'जा वू दे'. (झालं!)



हे स्वगत का काय ते असावं. या शब्दावर लिंबाचा copyright नाही ना? नाहीतर 'मनोगत' म्हणा. पण मनोगताचं नाव इथे काढलेलं काही लोकाना आवडत नाही!

आता 'वर्षा विहारा' कडून अपेक्षा वाढल्या आहेत! कारण... कारण त्यांचे डिटेल्स अजून आलेले नाहीत. तिथे काही नवीन असेल अशी आशा! ~द
"Idols" -One more time! :-)

Auditions मधे आवाजामुळे किन्वा इतर कारणाने लक्षात राहिलेले, नंतर Top 10 म्हणून निवडले गेल्यामुळं आणि दर आठवड्याला TV ला खिळून पाहिल्यामुळे अगदी 'ओळखीचे' झालेले ते दहा ' Idol ' प्रत्यक्षात दिसण्याचा दिवस उजाडला एकदाचा!

आम्ही अगदी पहिल्या सीझन पासून या कार्यक्रमाचे die hard फॅन्स. दर वर्षीचे Top 10 नेहमीच टूर वर इकडे यतात, पण या ना त्या कारणाने
कधी जाणं जमलं नव्हतं. यावेळी अगदी online ticket विक्री सुरु झाली त्या मिनिटाला प्रयत्न चालू करुनसुद्धा सुरवातीला चान्गल्या जागेवरची तिकिटं नाही मिळाली. पण मुलगा खट्टू होईल म्हणून नसल्यापेक्षा असूदेत म्हणून ठेवली पण नन्तर नशीबानं चा.गली तिकिटं मिळाली. लगेचच शो sold-out झाला.

रेडिओवर Idols च्या कार्यक्रमाबद्दल आणि बुश भेटीबद्दल ऐकायला मिळालं. तेव्हाच 'येतील की नाही' अशी शंका होती त्या मॅकफीबाई आल्याचे कळले. खरं तर त्या आदल्या दिवशी शो साठी पिट्सबर्गलाच पोचायच्या, पण त्या ९ तास Airport वर अडकून पडल्या तरी कश्याबश्या अध्यक्षांना भेटायला मात्र पोचल्या. कार्यक्रमात त्यानी घसा खराब असल्यानं डॉक्टरान्च्या सल्ल्यप्रमाणे दोनच गाणी गाईन असे सान्गितले. घसा थोडा बसल्यासारखा वाटला खरा!

शो ची सुरवात मॅन्डीसा ने दणक्यात केली. मग Ace आणि Kelly ने बोअर केले. केली बोलली चान्गली. White House टूर च्या वेळी तिथल्या लायब्ररीत असताना ती प्रत्येक बुकशेल्फ ढकलून काही सिक्रेट दरवाजा वगैरे उघडतो का बघत होती म्हणे! :-) लिझा, पॅरिस आणि बकी चान्गले गायले. त्या ढॅण ढॅण म्युझिक मधे आणि पोरीबाळींच्या किंकाळ्यात ख्रिस ने कोणती दोन गाणी म्हटली ते मला कळले नाही.
इलियटची आई आली होती. त्याने तिच्यासाठी म्हणून खास एक गाणं म्हटलं.टेलत शेवटी आला. तो प्रेक्षकांतूनच गात गात स्टेजवर गेला. आमच्या जवळूनच गेला तो, पण त्याच्याकडे आणि माझ्या मुलाने वासलेला 'आ' बघण्यात फोटो काढायचे राहून गेले. त्याने त्याच्या नेहमीच्या 'श्टायल' मधे dance केला 'Do I make you proud' गायला.

धमाल आली. खचाखच भरलेल्या auditorium मध्ये, तरुण, शाळकरी मुलंमुली आणि parents ची गर्दी होती. बाहेर स्पोँसर Kellog, pop tarts फुकट वाटत होते. :-) Idols शो चे भांडवल करायला त्यांचे merchandise चे स्टॉल्स होते. भरमसाठ किंमती असूनही लोक काही ना काही घेत होते. हा शो खरंच किती लोकप्रिय आहे याची पुन्हा एकदा कल्पना आली.मुलं तर थोडाच वेळ जागेवर बसली असतील. सगळी आपापल्या आवडीच्या Idol च्या गाण्यावर नाचत होती. आणि (काही) आई वडील कानांत बोटं घालून हसत होते. :-) एकंदर अनुभव छान होता.

Tickets- $$$
Food & Drinks- $$
Parking- $$
Merchandise- $$

Friday evening with kids at 'Idol Live' $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$...... :-)

शो संपल्याबरोबर आम्ही धावत बाहेर! का तर undergroud पार्किन्ग मधून बाहेर येऊन गर्दीतून वाट काढत घरी पोहोचावं म्हणून. जरी रात्रीचे १० वाजले असले तरी ती शुक्रवारची रात्र होती आणि DC मधलं लाईफ तर नुकतं सुरु होत होतं....
गणपतीबाप्पा मोरया!!

आमच्या घरचा गणपती. दर्शनाला या. सर्वांना आमंत्रण आहे! :-)


राजधानीतून...

Nov 8, 2006

A visit to Ward 57 of Walter Reed Army Medical Center, Washington, DC

मी आणि "जो", माझा एक कलिग सालाबादप्रमाणे कंपनीतर्फे होणार्‍या या हॉस्पिटल भेटीसाठी गेलो. हे आर्मी मेडिकल सेन्टर आहे म्हणजे साहजीकच इथं युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना उपचारासाठी आणतात. सध्या आहेत त्यातले काही अफगाणिस्तानातून, बहुतांशी इराकमधून आलेले.

ज्या रुग्णांनी ' visitors चालतील' असं सांगितलं आहे त्यांनाच भेटता येतं. तसे आमच्या लिस्ट मध्ये ९ जण होते. त्यांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, काही छोट्या मोठ्या भेटी देणे, एकूण काय तर त्यांना थोडा विरंगुळा म्हणून आणि आपला पाठिंबा दाखवणे एवढाच भेटीचा उद्देश.फोटो घ्यायला अर्थातच परवानगी नाही. भेटवस्तूंवरही बंधनं आहेत. food items चालत नाहीत. त्यांना साधारण कोणत्या गोष्टी लागतात किंवा हव्या आहेत अशा वस्तूंची एक लिस्ट मिळाली होती. त्यातल्या काही गोष्टी आम्ही घेतल्या होत्या.

"जो" स्वतः एक सैनिकच. नुकताच इराकहून परत आलेला. त्याने वाटेत कारमध्ये त्यांच्याशी काय बोलावे किंवा काय बोलू नये याचेच धडे दिले. "कसं झालं, काय झालं" असं सहसा विचारु नये कारण एखादे वेळेस हल्ल्यत त्यांचे बाकी सगळे सहकारी मृत्यू पावले असतील, बाकी काही कटू आठवणी असू शकतील म्हणून. सहसा भविश्याबद्दल बोलावं. ते स्वतःहून बोलले तर ऐकून घ्यावं. हे सगळं समजून खरं तर मी "जो" ला जास्त बोलू द्यावं असंच ठरवलं. तो त्यांच्यातलाच एक असल्यामुळं त्यांची मनःस्थिती जास्त चांगली समजू शकत होता.

आम्ही पोचलो तो लंच टाईम होता. सार्जंट " Robert " अमचा escort होता. त्याने आम्हाला ward मध्ये नेले. आमच्या लिस्ट मधल्या ९ पैकी काही लन्च घेत होते, surgery मध्ये होते तर काही अगदी थकल्यामुळे भेटायला उत्सुक नव्हते. पहिला भेटला Al, विशीतला तरुण होता कॅलिफोर्नियाचा. double-amputee . गुडघ्यापासून खालचे दोन्ही पाय गेलेले. २ आठवड्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. जवळ त्याची आई आणि बहीण होत्या. खूप थकलेला वाटला..मनाने. सुरवातीला फारसा बोलायला उत्सुक दिसला नाही. काही माहिती त्याच्या आईनेच दिली. मग "जो" ने त्याला जरा बोलते केले. पूर्ण recovery नंतर त्याला आपल्या आधीच्या आवडीच्या कामात पुन्हा मन रमवायचे होते.. teaching मध्ये.
त्याच्या आईशी आणि बहिणीशी थोड्या गप्पा मारल्या. नातेवाईकांसाठी असलेल्या सेंटरच्या apartment मध्ये त्या रहात होत्या.

मग भेटला "Mike" , टेक्सासचा. हा पण विशीतलाच. आम्ही रुम मध्ये शिरताच त्याने स्वतःहूनच बोलायला सुरवात केली. त्याला इराकमधून परत यायला ३६ दिवसच उरले होते. तो आणि त्याचे सहकारी परती नंतरचे प्लॅन्स ही आखत होते. तो सांगत होता .. " we were ambushed ". त्यांच्या Humvee वर हल्ला झाला होता. एक महत्वाचं असं destructive शस्त्र याच्याकडे होतं म्हणून "मीच त्या लोकांच target होतो" अशी त्याची खात्री होती. एका सहकार्‍यामुळं तो वाचला आणि नशीबाने वैद्यकीय सेवा जवळच उपलब्ध होती तिथे ड्रायव्हर ने गाडी नेली. एका Stingray IED त्याच्या पायात घुसले. त्याच्या हाताजवळ येऊन पडलेले ग्रेनेड त्याने उचलून परत फेकण्यापूर्वी फुटल्याने हातही जबर जखमी झाला. याच्या सगळ्या अंगभर जखमा होत्या. याच्याही सोबतीला त्याची आई होती. आमच्याशी बोलत असतानाच त्याला त्याच्या बायकोचा फोन आला, ती काहीतरी आणायला बाहेर गेली होती. आम्ही जावं म्हणून उठलो, तर त्यानं थांबवलं आणि फोन झाल्यावर पुन्हा गप्पा मारल्या. याला खूप बोलायचं होतं. बरा झाल्यावर पुन्हा आर्मीत परत जाण्याची त्याची इच्छा होती. आम्ही निघताना त्याने आमचे आभार मानले - "knowing people care really helps. "
खरं तर आम्हालाच त्याच्याशी बोलून बरं वाटलं.

नंतर इतर काही जणांना भेटून, सर्वांसाठी आणलेल्या गोष्टी त्याना देवून आम्ही परत निघालो..

****

याच सुमारास midterm elections होऊन सगळीकडे निकालचे वारे वहात होते. सिनेटचा कंट्रोल ठरवणारा व्हर्जिनियाचा निकाल थोडा उशीरने लागला. या आणि अजून काही करणासाठीही ही एक महत्वाची निवडणूक ठरली.

व्हर्जिनियाचे सिनेटर (आता माजी) जॉर्ज़ ऍलन यांनी त्यांच्या campaign मध्ये एका भारतीय वंशाच्या मुलाला उद्देशून macaca (a monkey) असा शब्द वापरला आणि त्यावरुन झालेले वादळ तुम्हाला माहितच असेल. Washington Post ने ही स्टोरी लावून धरली. त्या आधी बर्‍याच
points नी पोल्स मधे पुढे असणारे, आणि व्हर्जिनियाची निवडणूक सहज जिंकून पुढे President ची निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा असणारे ऍलन चक्क पराभूत झाले. बाकी काही असो, पण immigrants ना (ते ही भारतीय वंशाच्या) कसेही वागवलेले खपवून घेतले जात नाही आणि त्याचे असे जबर परिणाम होऊ शकतात हे दिसून आले हे महत्वाचे आहे.

****

बरेच दिवस गाजत असलेला 'भारत अमेरिका अण्वस्त्र करार' सिनेट मधे पास झाला. त्याला १२ सिनेटर्स नी विरोधी मतदान केले. हे सगळे democrats आहेत. ही त्यांची नावे :-) -

Akaka (D-HI),
Bingaman (D-NM),
Robert Byrd (D-WV),
Conrad (D-ND),
Dayton (D-MN),
Dorgan (D-ND),
Feingold (D-WI),
Harkin (D-IA),
Johnson (D-SD),
Patrick Leahy (D-VT),
Barbara Boxer (D-CA),
Ted Kennedy (D-MA)

सध्या इतकेच.

(हे काही सदर वगैरे नाही. सहज आपलं लिहावं वाटलं म्हणून इथे घडलेल्या काही गोष्टींबद्दल लिहिलं तश्या त्या घडूनही बरेच दिवस झाले आहेत. :-))

आमच्या घरचा यावर्षीचा गणपती. दर्शनाला यावे ही विनंती. :-)





सजावट : रुनी ( Runi ) :-)
आजचा नैवेद्य.
या वर्षी अजून एका मायबोलीकरणीचा हात लागलाय बनवायला. :-)

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner lalu Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators