Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठीचे मरण मराठी माणसांच्या हाती ...

Hitguj » Views and Comments » General » मराठीचे मरण मराठी माणसांच्या हाती « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 21, 200435 01-21-04  7:48 pm
Archive through May 11, 200620 05-11-06  10:58 am
Archive through May 17, 200605-17-06  10:56 am
Archive through May 17, 200605-17-06  1:33 pm
Archive through May 24, 200720 05-24-07  5:06 am

Mandard
Thursday, May 24, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की गुजरात, कर्नाटक मधे पण बिहारींचा प्रोब्लेम आहे. इथे दिल्लीत पण आहे. पण महाराष्ट्रात जास्त आहे. मधे शिला दिक्षित यांनी त्यांच्याविरुद्ध बोलल्यावर संसदेत दंगा करुन त्यांना माफ़ी मागायला लावली.
शिवसेनेने सत्तेत असताना स्वताच्या तुम्बड्या भरण्यापलीकडे काही केले नाही. ते सत्तेवर नसताना काय करणार घंटा?
महाराष्ट्र एकेकाळी प्रगत राज्य होते. सर्व राजकिय पक्षांनी मिळुन त्याची वाट लावली आहे. कराडला (माझ्या घरी) रोज आठ तास लोड शेडिंग असते. सरप्लस विज असणार्या राज्याची आजची अवस्था दयनिय आहे. असो थोडे विषयांतर झाले.


Robeenhood
Thursday, May 24, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,
इथे मराठेतर वर्गास एकत्रिकरण करण्याचा विचार जोर धरीत आहे.पण महाराष्ट्रात मराठ्यांसहित सर्व जातींचे नेतृत्व तेवढी विश्वासार्हता मिळवू शकत नाही. मागास्वर्गीय समाजात मायावती इतका होल्ड असलेला नेता नाही. सुरुवातीस कांशीराम व मायाला गाम्भीर्याने कोणी घेतले नाही पण त्यांची मोडस ऑपरेन्डी बघा. आमचे मित्र यू पीत निवडणूक अधिकारी म्हणून गेले होते. या बाईने महाराष्ट्रातील पुढार्‍यांची नावे तिथल्या जिल्ह्याना दिलीत. शाहू, आम्बेडकर.ई. शाहू महराजांच्या शताब्दीला तिने स्वखर्चाने कोल्हापूरला मोठा कार्यक्रम केला तेव्हा महाराश्ट्राचे कुत्रे फिरकले नाही. या गोष्टी अपील होतात लोकाना. राजकारण हा ह्युमन मॅनेजमेन्टचा भाग आहे.इव्हन क्षत्रिय आणि ब्राम्हणाना देखील तिच्याबद्दल विश्वास वाटला तेवढा भा ज प त्यांचा घरच्या पक्षाबद्दलही वाटला नाही. यावरही मायावती बालिश आहे असे वाळूत चोच खुपसलेल्या शहमृगासारखे कोणाला वास्तवाकडे दुर्लक्ष करायचे असेल तर करू द्या.

आज महाराष्ट्रात ब्राम्हणाना राजकारणात स्थान किंमत वाटा नाही. उद्या तो महाराष्ट्रात मायावतीने देऊ केला तर ब्राम्हणांचे धृवीकरण मायावतीकडे होणारच नाही असे सांगता कोणी? जे मराठे करीत नाही ते माया करू शकते. त्यामुळी धोतरे ढिली होण्याइतके मराठे हुशार आहेत!!
त्यामुळे कदाचित ब्राम्हण व अल्प समूहाना महत्व येण्याची शक्यता आहे. आणि अल्प समूहाना स्थान, रेकग्निशन मिळण्यालाच लोकशही म्हनातात!!
ता.क. मी अल्पसंख्याक शब्द वापरला नाही त्याला इथे वेगळाच 'वास' येत असतो:-)


Chinya1985
Thursday, May 24, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहुड मायावती बालिश नक्कीच नाही.दुसरी गोष्ट म्हणजे ब्राम्हणांना मायावतीनी महत्व देण्यापुर्वी मराठा समाजानी दिल तर जास्त बर होइल. युपी मधे ब्राम्हण समाज मोठा आहे १३-१४%.पण महाराष्ट्रात तो ३-४% आहे.त्यामुळे इथे मायावती मराठा समाजाला जास्त महत्व देइल. (इथल्या पोलिसीमधे मराठा समाजाला जास्त महत्व दिल जाइल).कालच बातमी होती की मायावतीचा महाराष्ट्रातिल ब्राम्हण फ़ेस त्या ब्राम्हणाचा नातू असणार आहे ज्याने आंबेडकरांना काळाराम मंदिरात जायला रोखल होत.दोन वर्षापुर्वी त्यानी म्हटल होत की त्याच्या आजोबांनी आंबेडकरांना मंदिरात न सोडुन मोठी चुक केली होती. असा चेहरा जर समोर आला तर ब्राम्हण त्याला पाठिंबा देण्याची शक्यता आहे कारण जातियवादाला जबाबदार फ़क्त ब्राम्हणांनाच मानल जात (वास्तविकता सर्वच अपर कास्ट जबाबदार आहेत) महाराष्ट्रात राजकारण जरी मराठे चालवतात तरी त्यांचा स्वतंत्र पक्ष नाही. राष्ट्रवादीला मतदानाच्या वेळीच त्यांची आठवण येते.शिवाय मुस्लिम आणि बिसि,ओबिसि यांची साथ सुध्दा त्यांना हवी म्हणून शालिनीताई पाटलांना काढण्यात आल.पण आता तोच मुद्दा मायावतीनी धरलाय. आता ती म्हणतेय की ती आर्थिक मागासांना आरक्षणाला पाठिंबा देतेय. आपल्याकडे पण ब्राह्मण मराठे तिला पाठिंबा देउ शकतात कारण त्यांच्या नेत्यांनी जे कराव अशी त्यांची इच्छा होती ते आता मायावती करतेय.

बाळासाहेब कधी कधी त्यांच्या भुमिका बदलतात हे बरोबर आहे पण हे तर सर्वच नेते लोक करतात.बाळासाहेब त्यातल्या त्यात कमी वेळा भुमिका बदलतात. हिंदुत्वासाठी आपल्याला त्यांची गरज आहे हे मात्र नक्की.दुसरीकदे हे होत नाही कारण मुंबै इतके परप्रांतिय तिथे नाहीत.शिवसेना ही एक 'पॉलिटिकल पार्टी' आहे आणि त्यांना मुंबैत निवडुन येण्यास अमराठी लोकांची गरज आहे.कारण मुंबैत मराठी 'मेजोरिटी'नाही


Kedarjoshi
Thursday, May 24, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ती म्हणतेय की ती आर्थिक मागासांना आरक्षणाला पाठिंबा देतेय>>

हा आरक्षणवाद्यांना घरचा आहेर आहे. मायवाती म्हणजे काही फार मोठी झंझावात नाही की तो सर्वाना उडवुन लावेल वा त्या शिवाय पर्याय नाही. मायावती मुख्यमंत्री बनन्यासाठी उत्तर प्रदेसह्चे राजकारण समजावुन घ्यायला हवे. तिथे आधी कॉग्रेसने उच्चवर्नीयांना वाटी लावले. त्यांना भाजपा जवळचा वाटला पण भाजपाही काही वेगळे करु शकला नाही. तो पर्यंत काशीराम / मायावतीचा उदय झाला होता व तिने फक्त दुरदुष्टी ठेवुन अशा सर्व असंतुष्ट गटांना एकत्र आनले. तसे म्हणले तर हीच लोकशाही आहे असे म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात स्तिथी वेगळी आहे. कारण शिक्षीत जनता. सर्व ब्राम्हण जनता वा दलीत जनता एकत्र येऊ शकत नाही. कारण मीच मोठा अशी सर्वांची धारणा आहे.

मराठा लॉबी तर अनाड्यांनी भरली आहे. शिवसेना धरसोड करते, भाजपाला कुत्रेही विचारत नाही, कॉग्रेस दरवेळी फालतु घोषणा देऊन राज्य करते व राज्याची स्तिथी ही बिहार पेक्षा फार वेगळी नाही. राज्य म्हणजे बारामती, पुणे, मुंबै असा एक समज झालेला दिसतो आहे. बाकीच्यांचे काहीही हो आपली तुंबडी भरली पाहीजे असेच राजकारण आहे.

कानपुर मध्ये कुनीतरी पुतळ्याला काहीतरी केले तर महाराष्ट्रात दलीतांनी दंगे केले. शक्तीप्रदर्शन करायला काहीतरी निम्मीत्त हवे. अशा लोकांचा हातात येत्या निवडनुकीत सत्ता तुम्ही देनार का?

मनसा वैगरे निव्वळ पोकळ गप्पा आहेत ते पण सत्तेसाठी मराठी पणाच्या गप्पा हानतायत.

मग अशा लोकात कुणाला निवडायचे म्हणुन लोक कॉंग्रेस ला निवडुन देतात,ज्यांना सत्तेचे कुरान सोडायचे नाही मग भले लोकांचा घरी अंधार असला तरी चालेल.

तर वरील सर्व कारनांमुळे मायावती पॅटर्न चालेल असे वाटत नाही.

चालला असता तर खरेच बरे वाटले असते. पण सध्याच्य रिपाई टाईप लोकांचा हाती सत्ता देन्या पेक्षा मी परत एकदा नाईलाजाने भाजपा ला मत देईन.


Robeenhood
Thursday, May 24, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली तरी तिने ब्राम्हणाना काही दिले नाही.सरकारात शाळा आश्रमशाळा मंजूर करताना खूप भ्रष्टाचार चालतो अशी बोलवा होती. मी मुम्बईला माझ्या मित्राचे रूमवर उतरलो असताना तिथे नांदेडचा एक भा ज पाचा कार्यकर्ता आला होता. तो कार्टूनिस्टही होता. तो जुना संघाचा कार्यकर्ता होता.त्याला एक शाळा मंजूर करून पाहिजे होती. दोन चार दिवस तो याला भेट त्याला भेट असे चालले होते. शेवटी त्याचे काम झाले नाही. त्याला विचारले काय झाले. तो म्हटला तीन चार लाख रुपये मागताहेत. आम्ही म्हटले कशाचे पैसे तुमचा पक्ष सत्तेत आहे. तुम्ही जुने कार्यकर्ते आहात. शिवाय संघाचे. तुमचे काम बिनपैशाचे अन ताबडतोब व्हायला पाहिजे.

तो विषादाने म्हणाला'तसे नाही कॉंग्रेसचे लोक आमच्या लोकाना पैसे देऊन शाळा मिळवतात. तसेच पैसे ते आमच्याकडून मागतात. अन सांगतात हापैसा पक्षकार्यासाठी लागतो. दक्षिणेत आपला पक्ष कमजोर आहे तिथे पक्षाचा प्रचार वाढविण्यासाठी कार्यकर्ते पाठवावे लागतात. त्यांच्या अन प्रचाराच्या खर्चासाठी पैसे लागतात म्हणून पैसे द्या. त्याचे काम शेवटी झाले नाही ते नाहीच...
यावरून आपली तुम्बडी भरली पाहिजे असेच आहे.. भाजपावर टीका करण्याचे कारण म्हणजे हे एक नम्बरचे ढोंगी आहेत.भाजपाने किती ब्राम्हणाना मंत्री केले याना निवडून आणण्यासाठी ब्रम्हण हाडाची काडे करतात.
यांच्या ढोंगातून त्यांच्या स्वत्:च्या कार्यकर्त्यांचीही सुटका नाही!!!


Chinya1985
Saturday, May 26, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार मायावती काही करु शकणार नाही असे म्हणणे चुकिचे आहे. मी पण काही तिला पाठिंबा देत नाही पण आर्थिक मागासांना आरक्षण द्या अस अप्पर कास्ट म्हणत होते तेंव्हा त्यांच्या नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला नाही आणि आता 'दलित क्विन' त्याला पाठिंबा देते म्हणजे आमचे नेते आम्हाला जे देत नाहित ते दलित क्विन देत असेल तर तिला पाठिंबा का देउ नये?असा विचार नक्की होउ शकतो.

मायावती इथे सफ़ल होण्याची शक्यता कमी आहे कारण महाराष्ट्रातिल राजकारण हे जातींवर तितकस अवलंबुन नाही.युपि मधे राजकारण सुरु होत जातिवरुन आणि संपत पण जातिवरुन.शिवाय इथे आधिच बर्‍याच पार्ट्या आहेत.



Chinya1985
Thursday, May 31, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो सामनातिल बाळासाहेबांचा लेख वाचा.खरच भारी आहे. अग्रलेख आहे 'अचाट भोसले पुचाट पोटावळे'

http://saamana.com/2007/may/30/Index.htm

Chinya1985
Saturday, June 02, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सोप आहे.खाली जिथे लिहायला जागा आहे तिथे जा,देवनागरी वर click कर, मग नवी window उघडेल,तिच्यात डाविकडे english मधे लिहिल की ते उजविकडे मराठीत दिसत.मग copy message click कर आणि post कर झाल

Chinya1985
Friday, June 22, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराष्ट्र टाइम्स मधील बाबासाहेब पुरंदर्‍यांचा लेख वाचनिय आहे

महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या शौर्याबद्दल शंका घेता येणार नाही. कोणते शौर्य ? केवळ रणांगणावरचे की त्याच्या बाहेर असणाऱ्या विविध क्षेत्रांमधले ? गेल्या दीड-दोनशे वर्षांच्या कालखंडाकडे नुसता एक दृष्टिकटाक्ष टाकला , तरी मराठी माणसाच्या शौर्याची , त्याच्यातल्या त्यागी वृत्तीची आणि कर्तृत्वाची साक्ष पटल्याशिवाय राहात नाही.

१८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाचे हे दीडशेवे आणि भारतीय स्वातंत्र्याचे साठावे वर्ष आहे. १८१८ मध्ये पेशवाईच्या अस्तानंतर अवघ्या १४ वर्षांनी उमाजी नाईक या पुण्यातल्या तरुणाने इंग्रजी राजवटीविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव केला. कॅ.मॅकिन्टॉशने त्यास पकडून फाशी दिले. उमाजी नाईकला दिसत होते की आपल्या पाठीशी कोणीही नाही ; तरीही तो इंग्रजांविरुद्ध ताठ मानेने उभा राहिला. केवढे धाडस हे! दोन वषेर् त्याने ब्रिटिशांना झुलवले. बंडामागचे त्याचे तत्त्वज्ञान कोणते होते ? ' इथे शिवाजी महाराजांचे राज्य पुन्हा यायला हवे ', असे तो उघड म्हणत असे!

कोल्हापुरातील महाराजांचे भाऊ चिमासाहेब भोसले ८० मराठी माणसांच्या मदतीने १८५७ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध उभे राहिले. इंग्रजांविरुद्ध उठाव करताना त्या सर्वांना वीराचे मरण आले. स्वत: चिमासाहेबांना ब्रिटिशांनी कराचीत स्थानबद्ध केले आणि तेथेच ते मरण पावले. आज पाकिस्तानात गेलेल्या कराचीत चिमासाहेबांची समाधी आहे. हे शौर्य नाही तर दुसरे काय आहे ?

ब्रिटिश सत्तेविरुद्ध जिवाची पर्वा न करता उभे राहिलेले भास्करराव नरगुंदकर भावे. १८५७ मध्ये दक्षिण भारतात उठाव करणारे पहिले संस्थानिक. ब्रिटिशांनी त्यांना पकडून बेळगावला फाशी दिले. या सर्वांना समोर मृत्यू दिसत असतानाही त्यांचा शौर्याचा बाणा कुठेही लपून राहिला नाही! झाशीच्या राणीचे वडील मोरोपंत तांबे यांना चार एप्रिल १८५८ रोजी झाशी येथे पकडले आणि दुसऱ्या दिवशी फाशी दिले. झाशीची राणी ब्रिटिशांशी लढता लढता धारातीथीर् पडली ; ती तर अवघी २३ वर्षांची होती. अशा गोष्टींना सामोरे जाणे हे अचाट शौर्याशिवाय शक्यच नाही! नंतरच्या काळातले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके असो किंवा चाफेकर बंधू असोत. त्यांनी जे सहन केले ते आपल्या कल्पनेबाहेरचे आहे.

आम्ही शौर्य कुठे गाजवले नाही , हाच मुद्दा आहे. शौर्याच्या सीमाही आम्ही केव्हाच ओलांडल्या आहेत. १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धात युरोपमध्ये जर्मनीच्या ताब्यातील एक दुर्गम ठाणे घेण्यासाठी ब्रिटिश सैन्यात कर्नल असणाऱ्या बिकानेरच्या कर्नल गंगासिंह महाराज यांनी मराठा इन्फंट्रीच्या १७५ सैनिकांची मदत घेतली ; ती मराठी माणसातील शौर्याच्या गुणामुळेच! त्यावेळी या महायुद्धात पंजाबी , गुरखा , मदासी फौजा असताना मराठी इन्फंट्रीच का , असा आज प्रश्ान् पडतो. शिवाय त्यांनी ही माणसे निवडून घेतली , अशीही कुठे नोंद नाही. जर्मनीचे ठाणे ताब्यात घेण्यापूवीर् गंगासिंह महाराजांनी या मराठा सैनिकांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला. शत्रूवर अचानक हल्ला करतानाही या सैन्याने ' छत्रपती शिवाजी महाराज की जय ' अशा गर्जना केल्याची नोंद गंगासिंह महाराजांच्या डायरीत आहे.

तीच गोष्ट दुसऱ्या महायुद्धातली. सुभाषबाबूंच्या सैन्यात असलेल्या जगन्नाथराव भोसले यांचे मोठेपणही नेहरूंनीच जाणले. छत्रपतींवर अपार निष्ठा असणाऱ्या भोसलेंकडे स्वातंत्र्यानंतर नॅशनल डिसिप्लिन स्कीमची सूत्रेही देण्यात आली होती. छत्रपतींच्या प्रेमापोटी दिल्लीतल्या माझ्या भाषणांना जगन्नाथराव आवर्जून येत , हेही आज मला स्वच्छ आठवते.

मराठी माणसावर संसदेत टीका झाली तेव्हा सी. डी. देशमुखांनी तेवढेच सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की , भविष्यात शत्रूचे हल्ले होतील , तेव्हा हल्ला परतवण्यासाठी मराठेच पुढे असतील. मराठी माणसातले शौर्य आणि इमान हे नेहमीच जागे राहिले आहे!

उद्योगक्षेत्रातले शौर्य दाखवणारे शंतनुराव किलोर्स्कर पाहिले की वाटते , उत्तुंग कर्तृत्त्व हेच त्यांचे शौर्य होते. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या मर्दमुकीबरोबरच उत्तम माणूस आणि रसिक हा त्यांच्यातला गुणही मराठी माणसास शोभेल असाच होता. कोणताही असा कर्तृत्ववान माणूस पाहिला की त्याच्या मनातील प्रेरणा या ' छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या पाच शब्दांच्या मंत्रामध्ये समावल्या आहेत याची खात्री पटते. अर्थात यासाठी शिवचरित्र हे पचवावेही लागते!

माणसे एकाच कामाच्या मागे ध्यास असल्यासारखी लागून वेडी होतात , तेही शौर्यच असते. मग ते शिक्षणासाठी स्वत:चे आयुष्य जायफळासारखे उगळणारे कर्मवीर भाऊराव पाटील असोत , लक्ष्मणराव किलोर्स्कर असोत वा विठ्ठलराव विखे-पाटील असोत.

आजचा मराठी तरुण मध्यपूर्व , युरोप आणि अमेरिकेत जे काही करतोय , तो पराक्रमच आहे! तीन महिन्यांपूवीर् दुबईला व्याख्यानासाठी मी गेलो , तेव्हा लक्षात आले की आता दुबई हे दुसरे वॉशिंग्टन झाले आहे. तिथल्या भव्य इमारती , कारंजी , रस्ते पाहिल्यावर मला सांगण्यात आले की , पैसे जरी दुसऱ्या कोणाचे असले तरीही हे सर्व उभारणाऱ्या आकिर्टेक्ट आणि इंजिनीअर्समध्ये सर्वाधिक भरणा मराठी माणसाचा होता!

तोच अनुभव अमेरिकेतील ' नासा ' मध्ये मला आला. व्याख्यान दिल्यावर तेथेही माझ्यासमोर जे चेहरे आले ते सर्व घोरपडे , जाधव आणि देशपांडेच होते! हे सर्व पाहिले की ऊर अभिमानाने भरून येतो. महाराष्ट्रीय माणूस आज शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात कुठेही मागे नाही आणि हा त्याचा पराक्रमच आहे याची साक्ष पटते!

आज मराठी मुलगीही तेवढ्याच तडफेने हा पराक्रम करताना दिसते. एकच उदाहरण देऊन थांबतो. जगात अनेक अनोळखी देशांमध्ये जाऊन तेथे खूप प्रवास करून राहाण्याचे धैर्य मराठी मुलगी तितक्याच धाडसाने करू लागली आहे. मीना प्रभू हीच ती मराठी मुलगी! ' माझे लंडन ' नंतर इराण , तुर्कस्थान , इजिप्त , रोम , चीन अशा अनेक ठिकाणी जाऊन तिथला अभ्यास करणारा मराठी शौर्याचा हा बाणा यापुढेही अखंड तेवत राहील , यात मला शंका वाटत नाही.


Mandard
Sunday, June 24, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथल्या भव्य इमारती , कारंजी , रस्ते पाहिल्यावर मला सांगण्यात आले की , पैसे जरी दुसऱ्या कोणाचे असले तरीही हे सर्व उभारणाऱ्या आकिर्टेक्ट आणि इंजिनीअर्समध्ये सर्वाधिक भरणा मराठी माणसाचा होता! ....................

बाबासाहेबांना कोणितरी थाप मारली वाटते. हे काही तितकेसे खरे नाही. हा भरणा मल्लु, तामिळ, तेलगु इ. व शेवटी मराठी असा आहे.( UAE मधे.)


Satishmadhekar
Sunday, June 24, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही शौर्य कुठे गाजवले नाही , हाच मुद्दा आहे. शौर्याच्या सीमाही आम्ही केव्हाच ओलांडल्या आहेत. १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धात युरोपमध्ये जर्मनीच्या ताब्यातील एक दुर्गम ठाणे घेण्यासाठी ब्रिटिश सैन्यात कर्नल असणाऱ्या बिकानेरच्या कर्नल गंगासिंह महाराज यांनी मराठा इन्फंट्रीच्या १७५ सैनिकांची मदत घेतली ; ती मराठी माणसातील शौर्याच्या गुणामुळेच! त्यावेळी या महायुद्धात पंजाबी , गुरखा , मदासी फौजा असताना मराठी इन्फंट्रीच का , असा आज प्रश्ान् पडतो. शिवाय त्यांनी ही माणसे निवडून घेतली , अशीही कुठे नोंद नाही. जर्मनीचे ठाणे ताब्यात घेण्यापूवीर् गंगासिंह महाराजांनी या मराठा सैनिकांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला. शत्रूवर अचानक हल्ला करतानाही या सैन्याने ' छत्रपती शिवाजी महाराज की जय ' अशा गर्जना केल्याची नोंद गंगासिंह महाराजांच्या डायरीत आहे.

ठाणे होते जर्मन्यांच्या ताब्यात. ठाणे जिंकायचे होते ब्रिटिशांना. फायदा झाला तर ब्रिटिशांचा. तोटा होणार होता तो जर्मनांचा.

पण लढले, जखमी झाले आणि मेले ते मराठे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवावर स्वतःचे राज्य स्थापन केले. इथे मात्र या महापुरुषाचा जयजयकार करत मराठे दुसर्‍यांकरता लढून मेले. हा प्रसंग नक्कीच अभिमान बाळगण्यासारखा नाही किंवा मराठी माणसांची थोरवी सांगण्यासारखा सुद्धा नाही. हा प्रसंग जर अभिमानाने जगात सांगितला तर जगभर आपले हसे होईल.

तेच जर भारतात ब्रिटिशांविरूद्ध लढले असते तर त्यांचे युद्ध सार्थकी लागले असते आणि कदाचित भारताला स्वातंत्र्य लवकर मिळाले असते.


Chinya1985
Monday, June 25, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिशराव ते चुकिच्या लोकांकडुन लढले पण त्यांच्या शौर्‍याची तरी दाद द्यायला हवी. त्यांचे शौर्य कमी नव्हते. शिख लोक पण ब्रिटिशांकडुन लढलेल्या शिखांच्या शौर्याच्या कथा सांगतात. अभिमान बाळगतात. त्यांच्या शौर्याची दाद देण्यात चुक नाही. जगातल्या सर्वात महान शौर्याच्या कथांमधे २१ शिखांची एक कथा आहे ते युध्द त्यांनी ब्रिटिशांसाठी लढले होते. सर्वात शौर्यच्या ७ घटनांमधे याचा समावेश आहे. शिख लोक याचा अभिमान बाळगतात.
मंदार माझ्या माहितीप्रमाणे दुबैमधे मराठी लोक भरपुर आहेत


Mandard
Monday, June 25, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार माझ्या माहितीप्रमाणे दुबैमधे मराठी लोक भरपुर आहेत -------

मी पाच वर्षे होतो. मराठी लोक भरपुर आहेत पण ते प्रमाण साधारण १०० भारतीय लोकात १० असे आहे.


Mandard
Monday, June 25, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९१८ मध्ये पहिल्या महायुद्धात युरोपमध्ये जर्मनीच्या ताब्यातील एक दुर्गम ठाणे घेण्यासाठी ब्रिटिश सैन्यात कर्नल असणाऱ्या बिकानेरच्या कर्नल गंगासिंह महाराज यांनी मराठा इन्फंट्रीच्या १७५ सैनिकांची मदत घेतली ; ती मराठी माणसातील शौर्याच्या गुणामुळेच! त्यावेळी या महायुद्धात पंजाबी , गुरखा , मदासी फौजा असताना मराठी इन्फंट्रीच का , असा आज प्रश्ान् पडतो. -----------------

मराठा इन्फ़्रन्ट्री ही लाइट इन्फ़्रन्ट्री आहे तिच्या स्थापनेपासुन अशा इन्फ़्रन्ट्री जलद हल्ला करण्यासाठी वापरतात. त्यामुळे मराठा इन्फ़्रन्ट्रीला निवडले असावे. असे मला वाटते. चु.भु.द्या.घ्या.


Chyayla
Monday, June 25, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या उत्तम माहिती दिलीस अभिमानाने उर भरुन यावी अशीच... पण मराठी माणसाची काळी बाजुही तितकीच वाइट आहे. शिवाजी महाराजान्नाही शत्रुपेक्षाही आपल्याच मराठी लोकान्शी लढावे लागले. फ़न्दा फ़ितुरी हा तर रक्तातलाच गुण एवढच काय सम्भाजी महाराजाना शत्रुच्या तावडीत देणारे त्यान्च्या सासरची मन्डळीच होती.

आजही हीच मनोवृत्ती देशप्रेमी तत्वाना केवळ राजकारण व जातीन्च्या आधारावर विरोध करताना पाहुन शरम वाटते. सन्तानासुद्धा नाही सोडले रे त्याना सुद्धा जातीनमधे वाटुन घेतले. शिवाराजीराजान्चे गुरु रामदासस्वामीन्ची पण जातीच्या आधारावर निन्दा नालस्ती करायला या लोकाना लाज वाटत नाही.

मराठी माणुस चिमाजी अप्पाने (बरोबर ना?) दील्लीचे तख्त फ़ोडले पण दील्लीच्या गादीवर कधी बसु शकला नाही, अटकेपर्यन्त सुद्धा पराक्रम गाजवला पण अन्तर्गत सन्घर्षामुळे पुढे टीकवता आले नाही.

तरी मराठी माणुस असल्या फ़ितुराना पुरुन उरेल असा विश्वास व आशा वाटते.

अमेरिकेत तरी ईकडे फ़िनिक्स मधे मला गुलटी लोकच जास्त दीसतात पण सगळे एकामेकाला साम्भाळुन, सहकार्य करुन रहतात त्यामानानी मराठी लोक ईतके दीसत नाहीत. ते सगळे श्रेय चन्द्राबाबु नायडुला देअतात आज आन्ध्र मधुन जवळपास प्रत्येकी २ कुट्म्बामागुन एक जण तरी अमेरिकेत असतो एवढच काय त्यान्चे बरेच नातेवाइकही ईथे स्थानिक झालेत. पण सगळ्यात जास्त एक गोष्ट आवडली की यातले बरेच जण वर्षातुन काही रक्कम गावाच्या विकासासाठी भारतात पाठवतात. त्याद्वारे पाणी पुरवठा, कधी क्रिडासन्कुल तर कधी रस्ते उभारणी यासाठी उपयोग करतात. असे काही मराठी माणसाला स्वता:च्या गावाकरता करता आले तर छान कल्पना आहे.



Kedarjoshi
Monday, June 25, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी माणुस चिमाजी अप्पाने (बरोबर ना?) दील्लीचे तख्त फ़ोडले >>>>>

सदाशिवराव भाऊ ( चिमाजी आपा चे चिंरजीव) यांनी दिवाने खास फोडले व चांदी लुटली.
दिल्लीच्या गादीवर ते बसु शकले नाही याचे अनेक कारणं आहेत.
१. ईरानी तुरानी संघर्ष.
२. गनिम लोकांचा कागदपत्राला फालतु महत्व देऊन दिल्ली चे संरक्षन करन्याचा घेतलेली भलती जबाबदारी. व सर्वात महत्वाचे म्हणजे
३. थोरले शाहु छत्रपती यांची " जुने मोडु नये, नवे करु नये " ही भेकड वृत्ती. (ह्याच कारना मुळे थोरल्या बाजीरावाला देखील (सदाशिव चे काका) बर्याच गोष्टी सोडुन द्यावा लागल्या.

(विषयांतर झाले पण वर संदर्भ होता म्हनुन लिहीले).


Chinya1985
Monday, June 25, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार दुबैबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी एकदाच गेलो होतो तेंव्हा एका दुबैकर मराठी माणसानी सांगितले होते की बरेच मराठी लोक आहेत.

मी सुध्दा केदारप्रमाणेच सदाशिवरावभाउ पेशव्यांनी दिल्लिचे तख्त फ़ोडले असे ऐकले होते.

च्यायला तुम्ही लिहिलेले बरोबर आहे. मराठी माणसाने आपल्याच लोकांचे पाय ओढणे सोडायलाच हवे. मी स्वत्: या पायओढीचा अनुभव घेतला आहे. आपल्या माणसाविरुध्दची दुश्मनी सर्वात महत्त्वाची अशी एक मानसिकता मराठी लोकांमधे आढळते. त्या दुश्मनीसाठी परप्रांतिय, परदेशीय लोकांची मदत घ्यायला लोक मागेपुढे पाहत नाहित.
एक साध उदाहरण पहा राज ठाकरे, नारायण राणे इतके वर्ष शिवसेनेत होते. आता मतभेदांनी वेगळे झाले तरी सर्वात पहिला शत्रु म्हणजे शिवसेना. ती संपवायची याचाच ध्यास. वास्तविक इतर मुद्द्यांवर सुध्दा हे लोक राजकारण करु शकतात.


Mandard
Tuesday, June 26, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार सदाशिवभाऊंनी तख्त फ़ोडले नाही. त्यांनी फ़क्त दिवाने खासचा चांदीचा पत्रा काढुन त्याची नाणी पाडली व आपल्या सैन्यासाठी दोन घास अन्नाची सोय केली. नजिबाने तख्त फ़ोडले अशी अफ़वा उठवली. शिंदे-होळकरांनी अहमदीया करार केला होता. त्याप्रमाणे दिल्लीच्या बादशाहीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली. त्यासाठीच पानिपतचा भीषण रणसन्ग्राम घडला. मराठी माणसांचे सगळे सदगुण, दुर्गुण या लढाईत दिसले. असो पानिपत हा वेगळा बी बी लागेल हे सर्व लिहायला

Satishmadhekar
Friday, July 13, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2199224.cms

असे महाराष्ट्रात करायला काय हरकत आहे? पण असे करायला इच्छाशक्ती हवी आणि आपल्याला संकुचित विचारांचा वगैरे म्हणतील अशी भीतीही सोडायला हवी.

Saurabh
Friday, July 13, 2007 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

satish, jara samajavun sanga ki ha nirnay jast changala ka ahe? mi lekh wachala ahe. mala tari he ulat gange sarakhe watat ahe.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators