Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 22, 2007

Hitguj » Views and Comments » General » गाणी, सिडी, व्हिसीडी डिव्हीडी विकत घ्यावी का » Archive through December 22, 2007 « Previous Next »

American_desi
Friday, December 21, 2007 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khushaal copy kara. Je copy karata yeil te copy kara. Dusaryana pan shikava kase karayache te. Te ajjuka and bajjuka kahi tumhala paise denar nahit garaj asel tenva. Apale paise apanach sathava.

Ajun kahi sangayache nahi. I am done for this BB.

Ajjuka
Friday, December 21, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरीकन देसीची बडबड किंवा एकुणातच पायरासीचे समर्थन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

समीर,
|आणि ते पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी निर्मात्याला कमी किंमत देणार.. हे जर असच माहे मागे नेलत तर एकंदर सर्व system
तू म्हणतोस ते एकदम करेक्ट आहे.

केदार,
|अशा किती तरी साईट ( मराठी, हिंदी चित्रपटांच्या DVD US मध्य विकनार्या अनेक (य) साईटस आहेत. त्या सर्व वितरक कंट्रोल करतात का? ( ह्याला जनकारांकडुन उत्तर अपेक्षीत आहे). |
मी जाणकार नाही पण थोडाफार हा बिझनेस माहित आहे म्हणून उत्तर द्यायचा प्रयत्न करतेय. तेव्हा पाहिजे तर वाचा नाहीतर जाणकाराची वाट बघत दुर्लक्ष करा.
श्वास चे भारतातले DVD, VCD, Video rights शेमारू ला विकलेले आहेत. म्हणजे ते DVDs, VCDs काढून भारतामधे विकू शकतात. International Rights विकलेले नाहीत. त्यामुळे कुणी देशाबाहेर विकत असेल तर ते योग्य नाही परंतू भारतात एकदम लॉटमधे खरेदी करून देशाबाहेर विकणारे जे आहेत ते original गोष्ट त्या त्या किमतीला खरेदी करत असतात आणि मग नफा कमावून किंवा न कमावता विकत असतात. म्हणजे ही संपूर्णपणे पायरसीही होत नाही. आता गंमत अशी आहे की भारताबाहेर अनेक ठिकाणी original VCD/ DVD उपलब्ध आहे. मार्ग चुकीचा असला तरी वस्तू खरी आहे त्यामुळे international video rights हे विकले जाणे अशक्य आहे. आणि भारतातले rights विकले जाताना... पायरसी झालेली आहे त्यामुळे मालाला demand असली तरी exclusivity उरलेली नाही या बेसिस वर जी काही किंमत त्या rights ची मिलाली त्यावर परिणाम झालाच.
असो.. बाकी नंतर..


Ajay
Friday, December 21, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताबाहेर VCD/DVD विकायच्या असल्या तर सगळ्यानाच त्याची मोठी किंमत दिसते (भारतापेक्षा) पण टपालखर्चात किती मोठ्या प्रमाणात पैसे जातात याची कल्पना नसते. आणि यात आपली सरकारी लाल फीतही आड येते. उदा. भारतीय टपाल खाते एअरमेलने किंवा speedpost ने पुस्तके, कपडे इतर बर्‍याच गोष्टी पाठवू देते. पण सीडीव्हिसीडी पाठवायला बंदी आहे. त्यामुळे International courier शिवाय पर्याय नाही. त्यामुळे किमत कमी होण्याची एक मोठी शक्यता कमी होते.
एका वर्षापूर्वी एका भारतीय निर्मात्याशी त्यांच्या सीडी वितरणाचे परदेशातले हक्क मिळावे म्हणून बोलणी केली होती. त्याना परदेशात विकायचे म्हणून जास्त पैसे हवे होते आणि ते देऊ ही केले होते. पण तितके पैसे हवे असतील तर आम्हाला delivery ही परदेशात द्या अशी रास्त मागणी होती. त्याना जेंव्हा पाठवायचा खर्च, कस्टम ड्युटी (भारतात export Duty नसली तरी ज्या देशात माल जातो त्या देशात import duty भरावी लागते.), packaging या सगळ्याचा खर्च कळाल्यावर त्यानी स्वत्:हून सांगतले. आम्ही भारतात delivery भारतातल्या किमतीत देतो. तुम्ही पुढे काहीही करा. माझ्या माहितीतले अजून दोन वितरक आहेत त्यानाही हा अनुभव आलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत निर्माते परदेशात delivery द्यायला तयार होत नाहीत तो पर्यंत किमतीचे गणित जमत नाही आणि international video rights अशक्य होते.


Ajay
Friday, December 21, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>बाय दी वे देशी दुकानात १० डॉलर ला हिंदी CD मिळते. माझ्या मित्राचे शिकागोत दुकान आहे. तो भारतातुन ७० रु ला एक CD खरेदी करतो अन ईकडे तिच CD ९ ते १० डॉलर ला विकतो. या पैसा कोणाला मीळतो? हा तर निव्वळ त्याचा फायदा आहे. पोस्ट वजा जाता तो त्या CD वर निदान ५ डॉलर कमावत असेन.

एक साधा प्रश्न. तुमच्या मित्राचे माहिती नाही पण अशा गोष्टी विकणार्‍याकडे एक दोन वर्ष पहा. जर ते एवढा नफा मिळवतात तर बहुतेक गावात अशी दुकाने विकून दुसया कुणाला का चालवायला देतात? कारण कुठ्लीही विक्री हि खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याची जाण आपल्यासारख्या नोकरदार माणसाना पुरेशी नसते.
तुमच्या उदा. खालील गोष्टिंचा समावेश नाही.

१. courier charges (पोस्ट नाही.)
२. कस्टम ड्युटी
३. न विकला गेलेला माल.
-जुना झालेला. एकदा एका वस्तुचे फ्याड संपले तर जुना माल काढून नवीन ठेवावा लागतो.
-चुकीचा अंदाज असलेला. सगळ्याच भागात सगळेच खपते असे नाही.
-खराब झालेला माल
४.कर्जावर माल असेल तर त्याचे व्याज
५.दुकानाचे भाडे, टेलिफोन भाडे, विजेचे बील इत्यादी.
६. क्रेडीट कार्ड घेण्याबद्दल ब्यंकेचा खर्च per transaction fee
७. Insurance: Fire, flood, Liability etc
८. packaging
९. पगार (नोकर असतील तर)
१०. advt and marketing

यातून जो नफा होईल त्यावर
Federal, state and county income tax
some products have extra surcharges
Workers comp insurance: many state require this even if there is just single owner



Ajjuka
Friday, December 21, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|त्यामुळे जोपर्यंत निर्माते परदेशात delivery international video rights
international Video rights आणि परदेशात delivery आणि निर्माते हे कडबोळंच चुकीचं करताय तुम्ही.
Video Rights च्या अंतर्गत DVD, VCD, VHS यामधे प्रति काढण्याचे व त्या विकण्याचे अधिकार निर्माता त्या त्या कंपनीला विकतो. जसे की इरॉस किंवा शेमारू इत्यादी. नंतर त्या प्रती ती ती कंपनी बाजारात आणते. International Video Rights म्हणजे जागतिक पातळीवर प्रती काढण्याचे आणि विकण्याचे अधिकार.
यामधे निर्माता केवळ चित्रपट तयार करतो. DVD, VCDs नाही.
ती कंपनी भारताबाहेर तबकड्या पाठवते की नाही ह्यामधे import-export laws महत्वाचे ठरतात.
तुमच्या परदेशस्थित कंपनीकडे import for commercial use अश्या प्रकारचे license असेल तर मग तुम्हाला काही problem येऊ नये.
पण ह्यातला कुठलाच व्यवहार हौशी पातळीवर करून परवडण्याचा नाही.


Kedarjoshi
Friday, December 21, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जाणकार नाही पण थोडाफार हा बिझनेस माहित आहे म्हणून उत्तर द्यायचा प्रयत्न करतेय. तेव्हा पाहिजे तर वाचा नाहीतर जाणकाराची वाट बघत दुर्लक्ष करा.>>>

अग अज्जुका इथे लिहीलय म्हणजे वाचनारच ना. अशी रागात वा वैतागुन का लिहीतेस.

Ajay point taken. त्यामुळे जास्त वाढवत नाही पण तुम्ही दिलेल्या कॉस्टस मध्ये मी जर दुकानदार असेल तर fixed cost and variable costs असा फंडा लावेल. प्रत्येक गोष्ट्ची रक्कम ही प्रत्येक विकल्या वा न विकल्याजानार्या गोष्टीवर लावता येत नाही. अन लॉस झाल्यावर tax बेनीफीट मिळतो ते वेगळा.

हो पण तुमचा मुद्दा योग्य आहे. नफा नक्कीच कमी होत असेल.

माझा मुद्दा आहे वितरक हे कंट्रोल करतात का. ( भारतीय सिडी, डिव्हीडी बाबतीत). उद्या मला वाटले माझ्या घरात भारतीय डिव्हीडी विकाव्यात तर त्या विकता येतात.
अमेरिकेत डिव्हीडीज साठी कायदे आहेत. त्या अमुक एक किमतीलाच विकल्या जातात. मी रेंट जे उदा दिले ते या साठीच. ( असामी मी BB, NF रेव्हेन्यु शेअर करतात हे लिहीले आहे. पण तसे भारतीय डिव्हीडी साठी आहे का? apple चे उदा पण तसेच. त्यावर कोणी प्रकाश टाकु शकेल का.

(परत एकदा मी स्वत पायरसीच्या विरोधातच आहे. जानकार असलेल्या ( अन नसलेल्या सुध्दा) लोकांकडुन माझेच डाउट्स क्लीअर करत आहे.)


Ajay
Friday, December 21, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>international Video rights आणि परदेशात delivery आणि निर्माते हे कडबोळंच चुकीचं करताय तुम्ही.
खरं तर आम्ही नाही तर काहि निर्माते

>Video Rights च्या अंतर्गत DVD, VCD, VHS यामधे प्रति काढण्याचे व त्या विकण्याचे अधिकार निर्माता त्या त्या कंपनीला विकतो.
Ideally तसे ते असावे. पण प्रत्यक्षात सगळ्यानाच ते रुचते असे नाही. ज्या निर्मात्यांशी बोलणी केली त्याना (पायरसीच्या भितीमुळे असेल कदाचीत) असे हक्क किंवा master copy द्यायची नव्हती. आणि त्यानी अगोदर तयार केलेल्या तबकड्याच विकाव्या असा आग्रह होता.

Ajjuka
Friday, December 21, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय,
पण तुम्ही established company आहात का? तुमच्याकडे इरॉस किंवा शेमारू यांच्यासारखे प्रति बनवणे व वितरण करणे यांचे infrastructure आहे का? मग त्यांनी का बरं तुमच्यावर विश्वास ठेवावा? (यातले तुम्ही हे वैयक्तिक रित्या घेऊ नये!)
राग मानू नका. हे विचारण्यात कुठलाही चुकीचा उद्देश नाही.
ideally नाही, हीच तर रूळलेली वाट आहे. आणि खरंच आजही अनेक मराठीमधल्या निर्मात्यांना मार्केटची नीट माहीती नसते ही दुर्दैवाने खरे आहे. तसेच आत्तात्तापर्यंत या मोठ्या कंपन्यांना मराठी सिनेमामधे काडीचाही रस नव्हता कारण अर्थातच धंदा नव्हता. त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करायचा प्रयत्न केला गेला असेल. पण मी आधी म्हणलंय तसं.. हौशी पातळीवर हे करणे म्हणजे कुणीतरी एकाने गाळात जाणे आहे!

केदार,
वैतागून लिहित नाहीये पण तुम्ही फक्त जाणकाराची अपेक्षा धरलीत आणि तरी मी उत्तर देतेय तेव्हा काही उपटसुंभ इथे येऊन तू स्वतःला जाणकार समजतेस का असं म्हणत चाललेल्या discussion चे बारा वाजवू शकतात. म्हणून स्पष्ट केले. दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पितो माणूस.. तश्यातला प्रकार आहे.


American_desi
Friday, December 21, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka: I must appologize. I read your profie and your constume desinging projects, plays and other activities in your home page.

You do have right to fight for anti-piracy. I will not copy any of your work. I will buy it. You are a hard working person.

My comments are not very well thought out. I am just a common man with common dream of saving money.

No more fighting from my side.

Ajay
Friday, December 21, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,
राग अजिबात नाही आणि आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत त्यामुळे हे अपेक्षित आहेच. पण ज्या निर्मात्यांशी बोलत होतो त्यांना established कंपन्याच्या अटी रुचल्या नाहीत म्हणून त्यानी स्वत्:हून आमच्याशी संपर्क साधला. त्या सगळ्या संभाषणावरून असे लक्षात आले (आणि या चर्चेवरूनही) की भारतातली किंमत आणि परदेशातील किंमत यातला खूप मोठा फरक दिसल्यामुळे या साखळीतल्या सगळ्यांचे नक्कि किती फायदा असेल या बाबत गैरसमज आहेत.

> आणि खरंच आजही अनेक मराठीमधल्या निर्मात्यांना मार्केटची नीट माहीती नसते ही दुर्दैवाने खरे आहे.
१००% सहमत

Peshawa
Friday, December 21, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

interesting .....


Piracy is Progressive Taxation, and Other Thoughts on the Evolution of Online Distribution
by Tim O'Reilly
12/11/2002

"The continuing controversy over online file sharing sparks me to offer a few thoughts as an author and publisher. To be sure, I write and publish neither movies nor music, but books. But I think that some of the lessons of my experience still apply. "

read on :
http://www.openp2p.com/lpt/a/3015


Maanus
Friday, December 21, 2007 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकंदरीत CD विकत घ्यायला लोक सहजासहजी तयार होत नाही असे दिसतेय. हे करा ते करा बोलणारे चिकार असतील, मी हा BB सुरु केला तरी मीच स्वतः किती तरी गोष्टी पैसे न टाकता मिळवतो. I may not have paid when I actually got the product, but i try to repay whenever i get chance.

netflix सारखे काहीतरी मराठी साठी यावे.


Chinya1985
Friday, December 21, 2007 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|सीडीचा उत्पादन खर्च म्हणजे केवळ कच्च्या मालाचा आणि मजुरीचा खर्च नसुन त्याच्या संशोधनात लागलेला खर्च, इतके दिवस संशोधन चालु ठेवताना आलेला खर्च, वर्किंग कॅपिटल, बाकी फिक्स्ड कॉस्ट ह्याचा विचार करा जरा.|

टन्या,सिडी पुर्ण जगात विकली जाते त्यामुळे तु लिहिलेला खर्च वगैरे जरी बरोबर असला तरी ४ चा ४०० होत नाही. शिवाय नंतर भाव कमी होतातच ना??

|आणि सीडी तथाकथीत महाग विकणे ह्यात सामान्य माणसाची काय लुबाडणुक झाली,सीडी ची किंमत हा डीमांड सप्लाय चा खेळ आहे.|

समजा रात्रिचे १० वाजलेत.गल्लीतील सर्व दुकाने बंद आहेत एकच चालु आहे. तुम्ही तिथे साबण घ्यायला गेलात ज्याची किंमत ५रुपये. आता दुकानदार म्हणाला डीमांड सप्लायचा खेळ साबणाचे १५रुपये द्या तर ती लुट नाही??तुम्ही त्याला १५रु.द्याल??मी नाही देणार.काही नाही!! तुम्हाला माहित आहे किती डिमांड असेल,तुम्ही तेव्हढा सप्लायही करु शकता पण तुम्हाला लुट करायचीय म्हणुन जास्त पैसे घेता.

|वॅल्यु ऑफ मनी नावाचा काहीही प्रकार नसतो.|

जर नसेल तर हेच आजच्या जगाच दुर्दैव आहे की सर्वात महत्वाची संज्ञा अर्थशास्त्राच्या एकाही पुस्तकात नाही.

|तर भांडवलशाहीचा पुरस्कार करु नका. |

भांडवलशाहीच्या नावाखाली गरीबांना लाथाच पडणार असतील तर त्याचा काय उपयोग??जगाला नविन प्रकार शोधण्याची गरज आहे. भांडवलशाही आणि लोकशाही विरुध्द आहेत. लोकशाहीत मेजॉरीटीचा फ़ायदा बघितला जातो आणि भांडवलशाहीत मोजक्याच भांडवलदारांचा फ़ायदा बघितला जातो.

|या बिझनेसची काडीचीही माहिती नसणं आहे. |

अज्जुका,बिल गेट्सला काडीचाही बिझनेस कळत नाही तुझ्याकडे शिकवणीला पाठवायला हव.

|पायरसीमुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत हे विधान केवळ अज्ञानमूलकच नव्हे तर अतार्किकसुद्धा आहे.|

फ़क्त पायरसीने चांगले दिवस आलेत अस मी कधीच म्हटलेल नाही.पायरसीने पब्लिसिटी झाली अस मी म्हटलय.पब्लिसिटी झाली म्हणजे लगेच चांगले दिवस येतात का??कितीतरी चित्रपट चांगल्या पब्लिसिटीनंतरही आपटतात.फ़क्त पब्लिसिटीने चांगले दिवस येत नाहीत हे तुमच्यासारख्या महान बिझनेसमेन आणि वुमेनला कस कळत नाही??पायरसीने मराठी चित्रपटांची पब्लिसिटी व्हायला नक्कीच उपयोग झालाय.

|एखादे नवे औषध विकसित करून बाजारात आणेपर्यन्त होणारा खर्च प्रचन्ड असतो. |
विजयराव हा विषय वेगळा आहे पण अनेक पहाण्यांमधुन अस दिसुन आलय की फ़क्त २०%वगैरे पैसाच संशोधन वगैरेवर खर्च होतो. बाकीचा ८०%पैसा जाहीरातबाजी व इतर गोष्टींवर खर्च होतो. हा खर्च जर कमी करुन किमती कमी केल्या तर लाखो लोकांना जरुरी औषधे मिळतील आणि जगण सुसह्य होईल. एक पहाणी सांगते की फ़ार्माकोईकोस्युटिकल्समधील बिझनेसमुळे औषधाची किंमत २०० ते १००० पटीने वाढू शकते.

|ज्याला ते Value for money
हिर् ०दयांच्या हाराच्या चोरीसाठी ते महाग असतात हे समर्थन काही योग्य नाही. नाही का? |

संघमित्रा,मी ओरिजीनल सिडी चोरा अस म्हणत नाहिये त्यामुळे हिर्‍याचा हार चोरण्याची उपमा चुकते. हिर्‍याच्या हारासारखा दिसणारा एखादा हार असेल(खरा हिरा नसणारा) तर तो हिरा नसुनही त्याच्यासारखा दिसतो म्हणुन तो घेऊ नका म्हणने बरोबर आहे का??पायरेटेड कॉपीची क्वालिटी बर्‍याच वेळी खराब असते. मग खराब क्वालिटीला आम्ही स्वस्तात विकत घेतो. हल्ली शास्त्रिय संगिताच्या पायरेटेड CD,DVD मिळू लागल्या आहेत,त्या पॉप्युलर झाल्यावर ओरिजीनलची किंमत कमी होणार असेल तर काय वाईट आहे??माझे बाबाही या महागड्या ओरिजीनल शास्रिय CD,DVD आणतात पण एखाद्या लोवर मिडल क्लासवाल्याला ५००रु देऊन घेण शक्य नसत. मग त्याने शास्रिय संगीत ऐकुच नये का??त्याने ५०रु ला मिळणारी CD,DVD घ्यायला काय हरकत आहे??पायरसी वाढली तर इतर प्रकारच्या CD,DVD प्रमाणे शास्रियवाल्यांचेही भाव कमी होतील व तो लोवर मिडल क्लासवाला ६०-७०रु देउन ओरिजीनल घेउ शकेल. तुम्ही हे का विसरता की किंमत कमी झाल्यास ग्राहक पण वाढतील??

योग,तुझी पहीली पोस्ट छान आहे.

मी पुर्णपणे पायरसीला समर्थन करत नाही आणि पुर्णपणे विरोधही करत नाही. मी परत लिहितोय की मुळ CD,DVD ची किंमत कमी झाली(मोझर बेअर प्रमाणे) तर पायरसी आपोआप कमी होईल.




Ajjuka
Saturday, December 22, 2007 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,
इथे चर्चा केलीत तर बरे होईल. केवळ तुझा मुद्दा मान्य नाही म्हणून ह्याला त्याला शिकायला पाठवूया इत्यादी थयथयाट करण्यात अर्थ नाही.
कुणाचं तरी बोलणं संदर्भ सोडून quote करायचं आपल्याला सोयीस्कर पद्धतीने आणि मग त्याला विरोध करणार्‍या सगळ्यांची लायकी काढत बसायची हे फार जुने झाले.
पायरसी आणि पब्लिसिटी या संदर्भात software शी निगडीत गणितं वेगळी आहेत आणि कलाकृतीशी निगडीत वेगळी. ह्याचा विचार कर जमलं तर.
आणि कुठल्याही कारणास्तव चोरीचे समर्थन होऊ शकत नाही तेव्हा तू कितीही काहीही म्हण. पायरसीला माझा विरोध हा असणारच.



Slarti
Saturday, December 22, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्याच्या पोस्टमधील मानसिकता अतिशय भयावह आहे. यापुढे बोलणे खुंटले.
योग, माफ करा, तुमचा मुद्दा समजण्यात माझी गडबड झाली असेल. पण चुकीच्या गोष्टीचे विश्लेषण करुन त्याची कारणे कळतील, ती कारणे हे समर्थन होऊ शकत नाही. चोरी ही चोरीच असते.

चोर निर्माण होणे याला व्यवस्था हे एक कारण असेल (जसे केदार म्हणतो) तरी चोरीला आळा बसावा म्हणून केवळ व्यवस्था सुधारावी अशी वाट बघण्यात अर्थ नाही असे मला वाटते. व्यवस्था सुधारणे व चोराला शिक्षा करणे हे दोन्ही एकाच वेळी करावे लागते. काही चुकीच्या गोष्टी या absolute चुकीच्या असतात, त्यात सापेक्षता नसते. अशा चुकीच्या गोष्टी जर सुधारायच्या असतील तर त्या सुधारतानाच 'चूक काय ?' याची व्याख्या बदलून चालेल का ? चोरीच्या कारणांचा वापर समर्थन म्हणून करुन आपण ही 'व्याख्या' हळूहळू बदलत आहोत असे वाटत नाही का ? यामुळेच 'दुकानातून चोरी करणे' हे जितके अश्लाघ्य (taboo) आहे तितकी पायरसी अश्लाघ्य नाही ही वस्तुस्थिती मला जास्त भयाण वाटते.


Yog
Saturday, December 22, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पण चुकीच्या गोष्टीचे विश्लेषण करुन त्याची कारणे कळतील, ती कारणे हे समर्थन होऊ शकत नाही. चोरी ही चोरीच असते.
100% मान्य! माझ्या पोस्ट ची सुरुवात मि खालील कारणे असू शकतात अशीच केली होती..
common sesne prevails and we all agree that piracy can not be "justified". चर्चा आता पायरसी कशी कमी करता येईल या अन्गाने व्हायला हवी. निर्माता म्हणून मी काय करायला तयार आहे, अपेक्षा काय आहेत आणि प्रेक्षक consumer म्हणून काय अपेक्षा आहे इतके विश्लेषण केले तरी this thread will have some meaningful end.. वरील सर्व पोस्ट मधून, मला तरी हे मुद्दे अधोरेखीत करावेसे वाटतात जे पायरसी ला कारणीभूत ठरतात :
१. अवाजवी किम्मत again we should only consider here way above avg type cost
2. difficulty to get the product and esp. complicated international supply chain model/regulations.
३. काही अगदी मोजके चित्रपट सोडले तर निर्मितीमुल्याच्या दृष्टीकोनातून सुमार चित्रपट वा music album साठी consumer पायरेटेड किमतीत वस्तू घेणे पसन्त करतो.. this is devaluation of the product..meaning the consumer does not want to support piracy but merely wants to buy the product at much lesser price than that "tag".

पण या सर्वापेक्षाही महत्वाचा मुद्दा मला वाटतो quality चा. आणि कुठल्याही production/manufacturing, esp. electronic media मधे nothing is as sweet and as appealing as the best quality.

मुळात मालात दम असेल तर ग्राहक खिशाला थोडिशी चड लागली तरी अधिक किमतीत वस्तू विकत घेतोच.. again that might lead to the "branding" पण शेवटी दर्जाची पायरसी करता येत नाही.

on different but related note.. now that maayboli is incorporated, would like to know how admin plans to handle the piracy of the product/content written here by various artists/members.. इथल्या गोष्टीन्च्या चोरीने आर्थिक नुकसान मोठे होत नसेल पण मला वाटत मायबोलीसारख्या content publishing business मधे पायरसी basically discredits the real work and real author more than affecting any revenue per say.


Asami
Saturday, December 22, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटची ३ posts सुंदर आहेत.

त्याने ५०रु ला मिळणारी CD,DVD CD,DVD
... राजा ह्या उदाहरणामधे किम्मत कमी होणे कसे शक्य आहे pirated copies चे पैसे मूळ कलाकार , वितरक etc कडे जाणार नाहीत. त्यांचा माल तसाह्च पडून राहणार आहे. rather त्यांचा माल बाजारातून गायब होईल असे बघ ना. त्यांना मिळणार्‍या publicity मूळे भविष्यामधे त्यांचा खप वाढेल हे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर असे वाक्य होईल. कारण भविष्यामधेही त्यांच्या कलाक्रुतींची pirated versions येणारच आहेत. BillGates विधान हे out of context आहे. आज Microsoft piracy थांबवण्यासाठी एव्हढा आटापिटा का करते आहे बघ


Kedarjoshi
Saturday, December 22, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी बरोबर पण अरे मी जे उदा देतोय त्याला हे लागु पडत नाही. आता बघ.

मला हिंदी पिक्चरची डिव्हीडी पाहायची आहे. पर्याय तिन.
१. विकत घेने.
२. भाड्याने घेने.
३. पायरेटेड डिव्हीडी विकत घेने.
४. थेटरात बघने.
यातला पहिला पर्याय प्रत्येक पिक्चर साठी (पायरसीच्या कितीही विरोधात असलो तरी) मला स्वतला परवडनार नाही कारण भुक्कड पिक्चर (म्हण्जे बेकार माल). ४ था पर्याय बर्याच पिक्चरला चालतो पण सर्वच जन माझ्या सारखे थेटरात बघत नाहीत व सर्वच गावांना हिंदी पिक्चर दाखवत नाहीत.
राहीले दोन पर्याय. नं २ व ३. पायरेटेड डिव्हीडी विकत घ्यायच्या नाही म्हणुन भाड्याने आनने योग्य. म्हनून मी बरेचदा डिव्हीडी भाड्याने आनल्या. पण कालच ईथे लिहीताना मला साक्षात्कार झाला की अरे भाड्याने आनलेल्या डिव्हीडी चे रेव्हेन्यु शेअरींग होतच नाही कारण तशी सिस्टीम नाही. मग मी जे भाडे देतो ( २डॉलर) ते तर सरळ त्या ग्रोसरी वाल्याच्या खिशात चाल्लय. मग मी जर २ डॉलर ला पायरेटेड डिव्हीडी घेतली तर निदान मला माझ्या कडे डिव्हीडी तर मिळेल अनेकदा पिच्कर पाहायला. ( म्हणजे काय २ र्या व ३ र्‍या पर्यायात मी भाड्याने घेउन पण इतके दिवस पायरसीला अजानता सपोर्ट करत होतोच की नाही).
मग दरवेळी काय मी भुक्कड चित्रपटाला २० डॉलर देउन तो हिंदी चित्रपट विकत घेउन का? मला इंग्लीश चित्रपटाला ७ डोलर थेटरात द्यावे लागतात अन हिंदी ला १०. मग दरवेळी १० रु मोजु का? ( ह्याचे उत्तर हो आहे पण ते दरवेळी परवडनारे नाही). योग म्हणतो तसे.
अन गेल्या ६ ते ८ वर्षा पासुन हिंदी पिक्चर थेटरात इकडे वितरीत होतात. गेल्या ६ वर्षापासुन मीच पाहात आहे. मग इतका वेळ सिस्टीम लावायला पुरा नाही का?
आजकाल हिंदी चित्रपटाचा धंदा भारतापेक्षा अमेरिकेत जास्त होतो, बरेच चित्रपट तर फक्त येथील पब्लीक्ला समोर ठेवुन काढाले जातात. म तरीही सिस्टीम का नको. अरे निर्माते अन वितरक वा मधले दलाल यांनाच ती लावायची नाही कारण मग भुक्कड चित्रप्टाला कोण विकत घेईल अन हा वितरनाचा खर्च कसा पार पाडेल त्या पेक्षा जी आत्ताची व्यवस्था आहे तिच्या मुळे त्यांना फक्त ३ त ५ टक्के जे चांगले पिक्चर आहेत त्यात थोडा लॉस होउ शकतो पण ९० टक्के जो बेकार माल आहे त्याचा खप निट होउ शकतो अशी क्दाचित त्यांची धारणा असेल.

मी भारतीय डिव्हीडी पुरते सिमीत या साठी ठेवले की हॉलीवुड च्या बाबतीत सगळे कंट्रोल्ड आहे. त्यांना पायरसी चा प्र्श्न तेवढा सतावत नाही. गाण्यां बद्दल आधीच लिहीले आहे.

आता दुसरा मुद्दा

अजय ने एक मुद्दा लिहाला की निर्माते वा वितरक मास्टर डिव्हीडी द्यायला तयार नाहीत तो मुद्दा आपल्या सर्व हिंदी मराठी वा देशी पिक्चर ला लागु पडतो.
शेमरु, ईरॉस कडुन अनेक डिव्हीडी मी विकत घेतल्या आहेत. त्यातील जुने पिक्चर जसे आनंद, जंजीर वैगरेंची क्वालीटी इतकी भिक्कार आहे ही व्ही सि डी वरुन जस्ट बर्न करुन डिव्हीडी केली आहे असे वाटते मग अशा मिक्कार क्लॉलीटीच्या डिव्हीडीला १९ डॉलर का मोजायचे. ( निदान त्यांनी डिजीटली रि मास्टर करु नये का?
अशा डिव्हीडी घेने त्यामुळे बंद केले. मग ग्राहक म्हणुन आपले काही हक्क आहेत की नाही. पैसे द्यायला तयार असल्यावर भुक्कड क्वालीटी का विकावी?
हा प्रश्न दोन्ही बाजु ( निर्माते व ग्राहक) साठी ओपन आहे. तुम्ही चांगली क्व्लालीटी ( पिक्चर ची सुध्दा) द्या ग्राहक पैसे द्यायला तयार होतील.
भारतात मे मध्ये गेलो होतो. तिथे ३० रु ला व्हिसीडी किरायाने मिळते वा ९० ते २०० मध्ये व्हिसीडी विकत घ्यायची यात लोक किरायाने जास्त घेतात. गम्मत म्हनजे तिथेही रेव्हेन्यु शेअरींग नसल्यामुळे किराया त्या दुकानदारालाच मिळतो. त्याची चेन नाही. मग लोक ६० रुला परत पायरेटेड कॉपी विकत घेतात अन सर्वच दुकानात त्या मिळतात. मग निर्मात्यांना, वितरकांना हे माहीत नाही का? माहीत आहे पण परत एकदा ग्राहक cost benefit analysis करतो.

माझ्या मते हा प्रश्न फक्त नैतीकतेचा नाही कारण जर शेमरु सारखे लोक भरपुर पैसे घेउन देखील चांगली डिव्हीडी दयाय्ला तयार नसतील तर ते नैतीकता पाळत नाहीत मग ग्राहक का पाळतील?



American_desi
Saturday, December 22, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

E ata bas kara he puran. Jyala je karayache te karu de. Ugach boudhik bs enough. A topic is very very universal and very very chewed up on. Dusara bolu.

Yog
Saturday, December 22, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मग मी जे भाडे देतो ( २डॉलर) ते तर सरळ त्या ग्रोसरी वाल्याच्या खिशात चाल्लय. मग मी जर २ डॉलर ला पायरेटेड डिव्हीडी घेतली तर निदान मला माझ्या कडे डिव्हीडी तर मिळेल अनेकदा पिच्कर पाहायला. ( म्हणजे काय २ र्या व ३ र्‍या पर्यायात मी भाड्याने घेउन पण इतके दिवस पायरसीला अजानता सपोर्ट करत होतोच की नाही).
इथे थोडी गफ़लत होतीये का..? विकत घ्यायची तर मूळ प्रत घे ना, पायरेटेड का..? (नेमक याचच उत्तर हव आहे!)
आणि lack of regulatory body/system/infrastructure हे मुद्दे अगदी अगदी योग्य आहेत..खर आहे शेमारू वगैरे मूळ प्रत सुध्धा कधी कधी भिकार बनवतात.इथे US मधे खटला भरता येईल, किव्वा विक्रेता appology letter बरोबर हव तर एखाद free coupon वगैरेही पाठवेल. भारतात फ़ार तर दुसरी प्रत घेवून प्रश्ण मिटेल. system नाहीये हे बरेच लोकान्च्या पत्थ्यावरच पडतय किम्बहुना त्यामूळे त्याना जस्त धन्दा करता येतोय (सर्व मार्गाने) आणि म्हणूनच पायरसी बद्दल अजून तितकी सार्वत्रिक बोम्ब उठत नाही..



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators